Homeनागपूर न्यूजबंटी शेळके युवा शहर अध्यक्ष निवडीचे मास्टर माईंड:वसीम खान यांचा आरोप

बंटी शेळके युवा शहर अध्यक्ष निवडीचे मास्टर माईंड:वसीम खान यांचा आरोप

Advertisements

दिल्लीवारीतून तौकिफ बशिर खान यांची नियुक्ती:मतांना महत्व नाहीच

काँग्रेस सोडणार नाही पण पक्ष श्रेष्ठींनी न्याय द्यावा

नागपूर,१२ मार्च २०२२ : नुकतेच युवा शहर काँग्रेसच्या अध्यक्ष पदी तौकिफ बशिर खान यांची नियुक्ती झाली,या नियुक्तीचा जल्लोष ही झाला,रॅली ही काढण्यात आली मात्र ही निवड सलग मतदानातून झालेल्या संख्या बेरजेतून न होता शहरातील युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांच्या मर्जीतून झाली,यासाठी पडद्यामागे बरेच काही घडवून आणण्यात आले,एवढंच नव्हे तर दिल्लीवारी ही झाली आणि अचानक शिलज पांडे किवा इतरांनी,ज्यांनी या निवडणूकीत हजारो मते मिळवली होती त्यांना डावलून शहर युवा काँग्रेसच्या अध्यक्ष पदी ३८ वर्षीय तौकिफ बशिर खान यांना आनूण बसवण्यात आले असल्याचा आरोप या निवडणूकीतील उमेदवार असणारे वसीम खान,सिलज पांडे,रौनक चौधरी,अक्षय घाटोळे व अक्षय हेटे यांनी पत्र परिषेत केला.

महाराष्ट्र प्रदेशसाठी नुकतेच युवा काँग्रेसच्या निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात नागपूर शहरच्या अध्यक्ष पदी तौकिफ बशिर खान यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा झाली.ही घोषणा होण्या पूर्वी पडद्या मागे ब-याच घडामोडी घडल्या.काँग्रेस पक्षात गटातटाचे राजकारण हे वरच्या पातळीवरच नव्हे तर आता युवा ब्रिगेडमध्ये ही खेळल्या जात असल्याचे हे प्रकरण द्योतक आहे.

युवा काँग्रेसच्या निवडणूक नियमानुसार वय वर्षे १८ ते ३५ वर्षाच्याच उमेदवारांना ही निवडणूक लढता येणार होती,याच सबबीखाली तौकिफ बशिर खान यांचा अर्ज रद्द देखील करण्यात आला होता.मात्र बंटी शेळके यांनी तौकिफ बशिर खान यांची ‘दिल्लीवारी’घडवली आणि जे होल्डवर ठेवण्यात आले होते त्या सर्वांना डावलून आणि स्वत:च्याच निवडणूक नियमांना बगल देत ३८ वर्षीय तौकिफ बशिर खान यांना युवा काँग्रेसचे शहर अध्यक्ष घोषित करण्यात आले.

इतर उमेदवारांनी तौकिफ बशिर खान यांच्या तुलनेत सर्वांनी मिळून जवळपास ४० हजार मते मिळवली होती.कोणी १४ हजार कोणी १३ हजार कोणी ६ हजार तर कोणी साढे चार हजार मात्र जवळपास ४० हजार मतांच्या उमेदवारांना डावलून,ज्याचा उमेदवारी अर्जच रद्द करण्यात आला त्यालाच शहर अध्यक्ष पदी विराजमान करण्यात आल्याची व्यथा या उमेदवारांनी पत्र परिषदेत मांडली.आम्हाला न्याय मिळाला नाही,बशिर खान यांची नियुक्ती रद्द झाली नाही तर आम्ही पक्षाचे काम सोडू,आमच्यासोबत ४० हजार मतदारांचे देखील काँग्रेस पक्षाला नुकसान होणार असल्याचा दावा या उमेदवारांनी केला.आम्ही एक महिना दिवस रात्र मेहनत केली,मतदारांना ऑन लाईन निवडणूकीशी जोडले.प्रत्येक मतदारामागे ५० रुपये खर्च होत होते.दिवस रात्र झपाटल्या सारखं फक्त निवडणूकीचाच विचार केला मात्र आमच्याच पक्षाने एक फार मोठा झटका आम्हाला दिला असल्याची व्यथा त्यांनी मांडली.

शीलज पांडे यांची फक्त २४ तासांसाठीच युवा शहर अध्यक्ष पदी नियुक्ती झाली,बंटी शेळकेनी सोंगट्या फिरवल्या,स्वत: ४० वर्षांचा असतानाही तो युवा काँग्रेसचा राष्ट्रीय सचिव आहे. त्याने आता नागपूर शहरातही ३८ वर्षीय तौकिफ बशिर खानला दिल्लीवारी घडवून, युवा काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी विराजमान केले जे सर्वथा अयोग्य व इतर प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय करणारी कृती असल्याचे उपस्थित उमेदवारंनी म्हटले.याच बंटी शेळकेंच्या २०१९ मधील विधान सभेतील निवडणूकीसाठी आम्ही आमच्या रक्ताचे पाणी केले होते.नियम सर्वांना एक सारखाच लागू झाला पाहिजे.ज्याचा उमेदवारीचा अर्जच आधी रद्द झाला यानंतर त्याने कमी वय असणारे खोटे आधारकार्ड सादर केले.त्याच्या निवडणूक प्रमाणपत्र व पारपत्रावर त्याच्या ख-या वयाची नोंद आहे.याच व्हिजावर तौकिफ बशिर खान हा एकदा श्रीलंका व एकदा बँकाकची वारी करुन आला आहे.

आमच्या रक्तातच काँग्रेस आहे,आम्ही इतर विचारधारा मानू शकत नाही मात्र आमच्याच पक्षात आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्हाला पुढे येऊन बोलने भाग असल्याचे त्यांनी सांगितले.ज्या प्रमाणे उमेदवारी अर्ज, वयोमर्यादेच्या कारणावरुन होल्डवर ठेवण्यात आला होता त्याचप्रमाणे आमचे देखील अर्ज होल्डवर होते कारण आमच्यावर राजकीय गुन्हेगारीचे गुन्हे दाखल आहे.आंदोलन करने,पुतळे जाळणे इ.सारखे गुन्हे आमच्यावर आहेत मात्र आमचे अर्ज होल्डवर ठेऊन बशिर खान यांना मात्र पक्ष, नियुक्ती देऊन मोकळा झाला.शिक्षा म्हणून आमचे अर्ज तीन महिने रोखून ठेवण्यात येणार होते,बशिर खान याचाही अर्ज रोखण्यात आला होता मात्र अचानक त्याला नियुक्ती देण्यात आली आणि आम्हा सर्वांना तीन महिने तातकळत ठेवण्यात आल्याची शिक्षा मिळाली.या अन्यायाची तक्रार आम्ही शहर अध्यक्ष आ.विकास ठाकरे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याजवळ देखील केली असून दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींना मेल करणार असल्याचे वसीम खान यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशसह पाचही राज्यांच्या निवडणूक निकालांमधून काँग्रेस पक्षाने काहीच बोध घेतला नाही का?या प्रश्‍नावर बोलताना,अश्‍याच प्रकारांमुळेच काँग्रेसवर ही अशी वेळ अाली असल्याची कबूली उपस्थित उमेदवारांनी दिली.काँग्रेस पाचही राज्यात हरली,एवढंच नव्हे तर पंजाबसारख्या मोठ्या राज्यात सत्ताही गमवावी लागली,कोणते ना कोणते कारण गुटबाजीचे देखील राहीलेलं असू शकतं,आम्ही जमीनीसोबत जुळलेलो कार्यकर्ते आहोत.दिवस रात्र पक्ष वाढीसाठी मेहनत केली मात्र आमच्याचसोबत असलं काही तरी घडत असेल तर युवांचा देखील जोश तुटेल.आमच्या शहरात निवडणूकीतून नव्हे तर निवडणूक झाल्यानंतर, दिल्लीवरुन अध्यक्ष ठरवण्यात येत असेल तर आमच्याही मनाला ठेच लागणारच आहे,असे त्यांनी सांगितले.आम्ही दिल्लीतील श्रेष्ठींना मेल केला,ट्वीट केले आहेत.आम्हाला न्याय मिळण्याची आशा आहे,असे त्यांनी सांगितले.

Latest बातम्या