Homeनागपूर न्यूजमी फक्त विशवस्त, मालक नाही:प्यारेखान

मी फक्त विशवस्त, मालक नाही:प्यारेखान

Advertisements

हजरतबाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या जमिनींवर ८० टक्के अवैध कब्जा

केंद्राच्या योजनेनुसार धार्मिक स्थळाचे सौंदर्यीकरण सुरु:शाळा,महाविद्यालये,रुग्णालयांचे निर्माणकार्य

न्यायालयाच्या आदेशाचीच अंमलबजावणी: रोजगाराची होणार निर्मिती

जागेवर अवैध कब्जा करणा-यांचे मनसूबे पूर्ण होऊ देणार नाही:धमक्यांना घाबरत नाही

नागपूर,ता.९ मार्च २०२२ : हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टची एकूण ८४ एकर जागा असून सध्यास्थितीत ८० टक्के जागेवर लोकांनी अवैध कब्जा करुन ठेवला आहे यात काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे तर काही सामान्य लोकं आहेत.न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत की ज्या कामासाठी ट्रस्टच्या जमीनीवर केंद्र शासनाचा पैश्‍यांचा विनियोग होत आहे तेच काम झाले पाहिजे.आधीच्या विशवस्तांनी मनमानी कारभार केल्यानेच ही समस्या निर्माण झाली आहे.आपल्या धार्मिक स्थळाचे सौदर्यीकरण झाले पाहिजे,या ठिकाणी शाळा,महाविद्यालये,रुग्णालये निर्माण होऊन हजारो लोकांना रोजगार मिळाला पाहिजे,ही दूरदृष्टिच माजी विश्‍वस्तांमध्ये नव्हती.फक्त पैश्‍यांचा व्यवहार करुन अनेकांना मोक्याच्या जागा देण्यात आल्या,एकेका मालकाचे वीस-वीस घरे व झोपड्या आहेत तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी अनेक दूकाने व घरांवर कब्जा करुन त्याचे भाडे ते खात आहेत,त्यामुळेच माझा विरोध होत असल्याचे हजरतबाबत ताजुद्दीन ट्रस्टचे विश्‍वस्त प्यारेखान यांनी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना सांगितले.

प्रचार-प्रसार माध्यमात वारंवार माझ्यावर चिखलफेक केली जाते,मी अमुक मंत्र्यांचा माणूस, अमूक पक्षाचा माणूस म्हणून माझी हेटाळणी आणि बदनामी केली जाते,माझा भारतीय जनता पक्ष किवा राजकारणाशी काय संबंध?मी न्यायालयाच्या व धर्मादाय आयुक्तांच्या लिखित आदेशाने विश्‍वस्त म्हणून नियुक्त झालो.माझे काम हे केंद्राच्या पैश्‍यांचा विनियोगावर लक्ष ठेवणे व ते पूर्ण करने एवढंच आहे.मी फक्त तीन वर्षांसाठी नियुक्त झालो असून माझ्या नंतर पदसिद्ध होणारे, ट्रस्ट कशी चालवतात याच्याशी माझा संबध नाही मात्र माझ्या कार्यकाळात मी बाबा ताजुद्दीन यांच्या जागतिक दर्जाच्या धार्मिक स्थळाच्या सौंदर्यीकरणाच्या कामात कोणतीही कचुराई हाऊ देणार नाही,मला ट्रस्टचा पैसा खायचा आहे ना खाऊ द्यायचा आहे,असा निर्धार ते व्यक्त करतात.

८० टक्के जमीनीवर अवैध कब्जा ही बाब गंभीर नाही का?आमचा प्रयत्न या जमिनी परत घेऊन त्यावर न्यायालयाच्या व धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार सौंदर्यीकरणाचे काम करने एवढेच आहे.न्यायालय व धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाची प्रत आम्ही तीन महिन्यांपूर्वीच मनपा प्रशासन,नागपूर सुधार प्रन्यास व पोलिस ठाण्यात दिल्या आहेत,आता हे प्रशासनाचे काम आहे त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे किती काळात पालन करतात.तीन दिवसांपूर्वी आम्ही पुन्हा त्यांना हे आदेश पोहोचवून आलो आहोत.आम्हाला ही गोरगरीबांचे झोपडे तोडण्याची हौस नाही मात्र आम्ही पण न्यायालयाच्या आदेशाला बांधिल आहोत.

या ठिकाणी ४०० खाटांचे रुग्णालय तयार होत आहे,गरजू,गरीब मुलांसाठी महाविद्यालये निर्माण होत आहे,या विकासाची येथील नागरिकांनाच फळे चाखायला मिळणार आहे.मी तर घरचा श्रीमंत आहे,माझा स्वत:चा व्यवसाय आहे, विश्‍वस्त म्हणून माझ्या नियुक्तीला फक्त ७-८ महिन्यांचा कालावधी झाला असून तीन वर्षे पूर्ण झाल्यावर मलाही त्या पदावर राहण्याचा संवैधानिक अधिकार राहणार नाही मात्र जे योग्य आहे तेच निर्णय मी राबवणार,मी कोणतेही चुकीचे काम हजरतबाबा ताजुद्दीनच्या जागेवर होऊ देणार नाही.

येथील कुख्यात गुंड आबू खान आमच्या विरोधात न्यायालयात देखील गेला आहे मात्र न्यायालयाने त्याची याचिका खारिज केली.या ठिकाणी मालक हे फक्त २० टक्के राहत असून ८० टक्के भाडेकरु आहेत,अवैधरित्या ट्रस्टच्या जागेवर झोपडे बनवून,दूकाने,दोन-दोन मजली घरे बनवून भाडे वसूली केली जात आहे.विश्‍वस्त म्हणून मी याला विरोध करतो तर माझीच बदनामी माध्यमात केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ समाजसेविका रुबिना पटेल यांनी पत्र परिषद घेऊन त्यांच्यावर धमकावण्याचे गंभीर आरोप केले होते,याबाबत विचारले असता रुबिना पटेल यांनी देखील संस्थेच्या नावाखाली अवैधरित्या फार मोठ्या जागेवर कब्जा करुन ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी खुशाल न्यायालयात जावे,कागदपत्रे सादर करावी,ट्रस्टने त्यांना समाजसेवी संस्था चालवण्यासाठी ट्रस्टची जागा भाडेतत्वावर दिली होती मात्र करार संपुष्टात आल्यानंतर देखील त्या जागा खाली करायला तयार नाहीत.करारपत्रात नमूद केल्याप्रमाणे जेव्हा कधी ट्रस्ट त्यांना जागा परत मागेल तेव्हा एका महिन्याच्या नोटीसवर त्यांना ट्रस्टची जागा खाली करुन द्यावी लागणार आहे मात्र त्या पत्र परिषद घेऊन गैरसमज निर्माण करीत आहेत.

ही हजरतबाबा ताजुद्दीन ट्रस्टची जागा असून या ठिकाणी इतर संस्था कार्यरत राहू शकत नाही,त्यांनी त्यांची रुबी फाऊंडेशन ही बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये विलीन करावी व आपले सेवाकार्य सुरु ठेवावे,त्यांना शासनाकडून निधी मिळतो मान्य आहे,ट्रस्टमध्ये त्यांनी त्यांची संस्था विलीन केल्यावर शासनाकडून निधी मिळणार नाही मात्र ट्रस्टसाठी काम केल्याने त्यांच्या उत्पन्नात खंड पडणार नाही,ट्रस्ट भक्कमपणे त्यांच्या संस्थेच्या मागे उभी राहील,त्यांनी त्यांचे सेवाकार्य फक्त हजरतबाबा ताजुद्दीन ट्रस्टच्याच अंतर्गत सुरु ठेवावे कारण त्यांचे उदाहरण देऊन अनेक इतर संस्था आमच्याशी वाद घालतात ट्रस्टच्या जागेवर रुबी फाऊंडेशनसारखी खासगी संस्था राहू शकते तर आमची संस्था का नाही?रुबिना पटेल यांनी संस्थेच्या जागेवरच घर निर्माण केलं आहे,वास्तविक पाहता हे कोणत्याही तत्वात बसत नाही,आवास वेगळा व संस्था वेगळी असायला हवी मात्र त्यांनी देखील ट्रस्टच्या फार मोठ्या भूखंडावर अवैध कब्जा केला असून आतापर्यंत फक्त तोंडी ती जागा सोडण्यास सांगितले आहे,आतापर्यंत ट्रस्टने एक ही नोटीस त्यांना पाठवली नाही,त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून दहा हजार रुपये महिन्याचे भाडे देखील ट्रस्टकडे भरले नाही,त्यांना आमच्या अटी मान्य नसतील तर कायदेशीररित्या आम्ही त्यांना लवकरच नोटीस देणार आहोत.

Latest बातम्या