Homeनागपूर न्यूजगडर लाईनचे भांडण अन् ’जय श्रीरामचे’नारे!

गडर लाईनचे भांडण अन् ’जय श्रीरामचे’नारे!

Advertisements

कुकरेजा यांच्या कार्यालयाची तोडफोड:तोडफोड कुकरेजाच्या कार्यकर्त्यांनीच केली:बाबू खानचा दावा

मनपा निवडणूकांवर हावी होणार ‘हिंदूत्वाचा’चा मुद्दा!कुकरेजाची भाषणात ‘हिंदूत्ववादी’ ललकार

विकी कुकरेजा भू-माफिया:बाबू खानचा आरोप

बाबू खान खंडणीखोर:विकी कुकरेजाचा प्रत्यारोप

नागपूर,ता.२७ फेब्रुवारी २०२२: महानगरपालिकेच्या निवडणूकीचा बिगूल लवकरच वाजणार आहे,पाच वर्ष नागपूरकर नागरिकांसाठी गडर लाईन,गडरचे चेंबर,खड्डे‘मुक्त‘रस्ते,सिमेंट रस्ते,हिरव्यागार बगिच्यांचा आंनद,सेवाभावी आरोग्यसेवा,’आपली बसचे’ सुलभ परिवहन,कचरा संकलनाचे चोख नियमन,चोवीस बाय सात अखंड पाणीपुरवठा इ.सुखसुविधा पुरविण्यातच सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांचे पाच वर्षे कसे निघून गेले ते नागपूरकर जनतेला ही कळले नाही,त्यातही गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या प्रकोपामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांचे संवैधानिक अधिकार हे देशाच्या राष्ट्रपतीसारखे ’नामधारी’झाल्याने,जनतेच्या ‘नि:स्वार्थ’ सेवेची संधीच नगरसेवकांना मिळू शकली नाही त्यात गडर,चेंबर,आरोग्य यासारख्या गरजा या,मूलभूत गरजांमध्ये मोडत असल्याने नागरिक देखील आपल्या या मूलभूत गरजांबाबत आपापल्या प्रभागातील नगरसेवकांवरच रोष काढत असल्याची शेकडो उदाहरणे घडली असताना, आजही काही महिलांनी घराजवळील गडर लाईनवर अतिक्रमण झाल्याने नाल्या तुंबल्या व त्या उग्र दुर्गंधीमुळे मुलाबाळांसह त्यांचाही जीव कासाविस झाला असल्याने व गेल्या दोन वर्षांपासून अनेक निवेदने देऊन देखील ही दररोजच्या जगण्यामरण्याची ‘गंभीर’समस्या न सुटल्याचे कारण देत, सरळ दहा ते पंधरा महिलांनी आज भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्र.१ चे नगरसेवक व माजी स्थायी समितीचे अध्यक्ष विकी कुकरेजा यांच्या कार्यालयावर धडक दिली.

यावेळी बाबू खान नावाचा युवा काँग्रेसचा कार्यकर्ता हा देखील सोबत होता.मात्र आपल्या लोकप्रतिनिधीला जाब विचारण्यास गेलेल्या या महिलांची कुकरेजा यांच्या कार्यालयातील कार्यकर्त्यांसोबत चांगलीच बाचाबाची झाली,कुकरेजाही तातडीने आपल्या कार्यालयात पोहाेचले,गोष्ट हमरी-तुमरीवर आली व कार्यालयातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये फक्त कार्यालयातील सामानांची नासधूस बंदिस्त झाली,ती वेगाने व्हॉट्स ॲप ग्रूप्सवर व्हायरल झाली, त्यात बाबू खान नावाचा ’मुसलमान’याने सिंधी बांधवांच्या अस्मितेलाच आव्हान केल्याचा व सर्वांनी तातडीने वसंतशहा चौकात जमा होण्याचा मॅसेज पसरला,एवढंच नव्हे तर कार्यालयासमोर जरीपटका येथील सिंधी बांधवांचा जमावडा लागताच कुकरेजा यांनी ही एका हिंदू नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड झाली असून ही ’हिंदूत्व’ची लढाई असल्याचे ’जाहीर’केले,यामुळे गडर लाइनचे भांडण मनपाच्या निवडणूका तोंडावर येताच उत्तर प्रदेशप्रमाणे उपराजधानीत देखील आता ‘हिंदू-मुसलमान’मुद्दांवरच लढली जाणार आहे का?असा प्रश्‍न आता नागपूरकरांना पडला आहे.

हूडको कॉलनी प्रभाग.क्र १ मध्ये बापूना वाईन शॉपच्या पहील्या व दुस-या गल्लीतील गडर लाईनवर अतिक्रमणामुळे दुर्गंधी पसरत असून डासांचा त्रास भयंकर वाढला आहे,या प्रभागाचे नगरसेवक विकी कुकरेजा यांना वारंवार निवेदन देऊन देखील समस्या सुटली नाही,घरातील लहान मुले वारंवार आजारी पडत असल्यामुळे आपल्या मुलांबाळांसह या भागातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात कुकरेजा यांना जाब विचारायला त्यांच्या कार्यालयात पोहोचला.तेथील कार्यकर्त्यांनी कुकरेजा कार्यालयात नसल्याचे सांगितले मात्र अामच्या समस्यांचं निराकरण करा असा वाद महिलांनी घातला,या गोंधळाचे चित्रण मोबाईलमध्ये त्यांच्यासोबत आलेला मुलगा करीत होता.या महिलांसोबत बाबू खान देखील होता.कुकरेजा यांच्या कार्यालयातील जगदीश नावाच्या कार्यकर्त्याने मोबाईल चित्रण बंद कर तुला काय पूर्ण इंडियामध्ये व्हिडीयो पाठवायचा आहे का?अशी दमदाटी करुन मोबाईल हिसकला यामुळे चिडून बाबू खान याने मोबाईलमध्ये चित्रण करणा-या मुलाच्या हातातील मोबाईल घेऊन पून्हा कॅमरा ऑन केला.

यावर वाद वाढत गेला व कुकरेजा याने ‘तुम्ही मला वोट दिले नाही,हमारे ही पैसो से हम जितके आये है,आपके पैसो ने मुझे नही जिताया’अशी अरेरावी केली.भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या या वेळी कुकरेजा यांच्या कार्यालयात उपस्थित होती,त्यांनी सर्व महिलांचे मोबाईल हिसकावले,महिलांनाही कार्यालया बाहेर धक्काबुक्की करुन पिटाळून लावले यात एका महिलेचा ब्लाउजचा मागील बंद ही तुटला,जो तिने आज रविवार दि.२७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.१५ वा.तातडीने प्रेस क्लब येथे घेण्यात आलेल्या पत्र परिषदेतही दाखवला,ती तोच ब्लाऊत घालून पत्र परिषदेत आली होती.उपरोक्त संपूर्ण घटनाक्रम बाबू खान,गंगा बंडू वाघमारे,सोनिया रॉय,चंदा मुरलीधर वाघमारे,शोभा पाटील,मीना बैस आदींनी पत्र परिषदेत कथन केला.

कुकरेजा यांच्या कार्यालयात संजय चौधरी,खेमराज धमाल,जगदीश वंभानी,मुन्ना पाटील आदी कार्यकर्त्यांनी मला मारझोड करुन माझ्या मागे दगड घेऊन धावले,असा आरोप बाबू खान याने केला.आम्ही फक्त पंधरा ते वीस महिलांच कुकरेजा याच्या कार्यालयात गेलो होतो,आमच्यासोबत फक्त आमची पोरंसोरं होती,बाबू खान आणि एक दोन मुले होती होता,आम्ही फक्त दोन पुरुष घेऊन कुकरेजा याच्या कार्यालयाची तोडफोड करायला जाणार होतो का?असा प्रश्‍न गंगा वाघमारे यांनी उपस्थित केला.

आम्हालाच मारहाण झाली,शिवीगाळ झाली,कुकरेजा याने ‘मांग,चांभार कही के जुते मारके इनको बाहर भगाओ’ अश्‍या शब्दात अपमान केला जो आम्हाला कसा सहन होणार असल्याचे त्या म्हणाल्या,आम्ही फक्त तोंडी वाद घालत होतो,आम्ही कोणतीही तोडफोड केली नाही,कुकरेजाचे इतके सारे कार्यकर्ते कार्यालयात असताना आम्ही तोडफोड करु शकतो का?

ही संपूर्ण तोडफोड कुकरेजा याच्याच कार्यकर्त्यांनी केली असल्याचा आरोप बाबू खानने केला.आम्ही फक्त निवेदन द्यायला गेलो होतो,पण त्याला ते ही सहन झाले नाही,ज्याच्या घरातच राज्याचे मुख्यमंत्री येऊन बसतात तो कशाला ऐकणार आहे गरीबांच्या समस्या?त्यांनीच कार्यालयात तोडफोड केली असून लवकरच ते ही फूटेज तुमच्यासमोर आणनार असा दावा बाबू खानने केला.एवढंच नव्हे तर कुकरेजा याने एकदा मागे व्हॉट्स ॲप कॉलवर दिलेली धमकी कारण व्हॉट्स ॲप कॉल रेकॉर्ड होत नाहीत त्यामुळे ही दुस-या मोबाईलवर रेकॉर्ड केली असून लवकरच माध्यमांसमोर व्हायरल करणार असल्याचे बाबू खान याने सांगितले.यात कुकरेजा याने अत्यंत अरेरावीपणे मी अमूक अमूक ठिकाणी खूप चांगले काम केले आहे,प्रभागाचा खूप चांगला विकास केला आहे असे तू लोकांना सांग,अशी धमकी मला दिली असल्याचे बाबू खानने यावेळी सांगितले.आजच्या घटनेतील ’हिंदू-मुस्लिम’करणारे व्हॉट्स ॲप मॅसेज देखील त्यानी माध्यमांना दाखवले.यांच्याकडे पाच वर्षातील विकास कामे सांगायला काहीच नाही त्यामुळेच ते हिंदू-मुस्लिम करुन मते मागणार असल्याची टिका बाबू खान याने केली.

पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी कुकरेजा याने संपूर्ण शहरातील कार्यकर्ते व प्रभागातील सिंधी बांधवांना गोळा करुन नेले,त्यात ही पोलिस ठाण्यात जाताना ते ‘जय श्री राम’चे नारे देत होते,वंदे मातरमचा जयघोष करीत होते,भारत माता की जय म्हणून स्फूरण चढवत होते,वंदे मातरम तर आम्ही पण म्हणतो,माझ्याच भागात गणपती बसतो त्यातही मी सहभागी होतो,आम्ही हिंदू मुस्लिम करीत नाही ’इनको तो बस राजनीती करनी है‘अशी टिका याप्रसंगी बाबू खानने केली.

विकी कुकरेजा भाजपचा नगरसेवक होण्यापूर्वीच भू-माफिया होता,असा आरोप करीत एवन पॅलेसचा खसरा क्रमांक बदलून त्याने ती जागा हडपली.नागार्जून कॉलनीतील तीन हजार चौ.मी चा भूखंड आपल्या कुख्यात गुंडांकरवी धमकावून एका अबला महिलेकडून लाटली.त्याने केलेले अनेक बांधकाम हे अवैध आहेत,ज्या सुषमा चौधरीबाबत ते सांगतात की आजच्या वादात आम्ही त्यांचा पदर ओढला त्या तर त्यावेळी तिथे हजर ही नव्हत्याच.जरीपटका पोलिस ठाण्यात देखील कुकरेजा व त्याचे समर्थक अश्‍या थाटात बसले की तेथील पोलिस निरीक्षक त्यांना पाणी,चहा देऊन खातिरदारी करीत होते,माझ्यासोबतच्या महिला या इतक्या तास तक्रार करा म्हणून सांगत होत्या मात्र त्यांची तक्रार नोंदवण्यात आली नाही,कुकरेजा याने या महिलांना जातिवाचक शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर अट्रासिटीचा गुन्हा नोंदवण्याचे बंधनकारक असताना पोलिसांनी देखील शहरात मोठमोठ्या नेत्या व मंत्र्यांचा वचक बघून आमच्यासोबत अन्याय केल्याचा आरोप यावेळी बाबू खान ने केला.

.पालकमंत्री नितीन राऊत यांचे सुपूत्र कुणाल राऊत यांनी जरीपटका पोलिस ठाण्यातील अधिका-यांना योग्य तक्रार नोंदवण्याची फक्त सूचना केली होती मात्र कुकरेजाने आपल्या अहंकारची लढाई पालकमंत्री व उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांच्यापर्यंत नेली जेव्हा की त्यांचा यात कहीही संबंध नाही,असे बाबू खान म्हणाला.

बाबू खान हा खंडणीखोर-कुकरेजा
कुकरेजा यांनी या संपूर्ण घटनाक्रमानंतर आपल्या कार्यकर्त्यांना व प्रभागातील जनतेला संबोधित करताना मी पाच वर्षात आपल्या प्रभागात काहीच कामे केली नाही का?असा प्रश्‍न विचाला.बाबू खानने कटकारस्थान करुन माझ्या कार्यालयाची तोडफोड केल्याचे सांगून अनुसूचित जातीच्या महिला अध्यक्षा लीना सोनकूवरवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हात टाकला,त्यांची ओढणी खेचून त्यांचा अपमान केला असा आरोप कुकरेजा यांनी जरीपटका येथील नागरिकांना संबोधित करताना केला.‘सत्ताधीश’ने कुकरेजा यांना संपर्क केला असता,बाबू खान हा या भागातील ब्लॅकमेलर असल्याचे त्यांनी सांगितले.काँग्रेसचे कार्यकर्ता जबरीने माझ्या कार्यालयात घूसले,मी भूमिपूजनात व्यस्त होतो मात्र कार्यालयातून फोन येताच मी कार्यालयात पोहोचलो.या घटनाक्रमाला सर्वस्वी नितीन राऊत जवाबदार असून त्यांचीच फूस या घटनेला असल्याचा आराेप त्यांनी केला.त्यांचा मुलगा कूणाल राऊत स्वत: आठ तास जरीपटका पोलिस ठाण्यात जाऊन बसला असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र गडर लाईनचा प्रश्‍न चक्क हिंदूत्ववादी अस्मितेपर्यंत कसा पोहोचवला जाऊ शकतो, असे विचारताच,शहरा अध्यक्षांचा फोन आला आहे, असे सांगून त्यांनी फोन कट केला.

 

 

 

Latest बातम्या