Homeनागपूर न्यूजआघाडी सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही:कृष्णा खोपडे

आघाडी सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही:कृष्णा खोपडे

Advertisements

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची केली मागणी:भाजपचं नागपूरात तीव्र आंदोलन

नागपूर,२४ फेब्रुवारी २०२२ : महाराष्ट्राच्या इतिहासात उद्धव ठाकरे सरकारचे कॅबिनेट मंत्री असणारे नवाब मलिक यांनी भारताचा मोस्ट वान्टेड आतंकवादी याच्याकडून संपत्ती खरेदी करून त्यांचे आतंकवाद्यासोबत थेट संबंध आहे, हे सिद्ध केले आहे. दाऊद इब्राहीम याने पाकिस्तान मध्ये बसून भारतातील निष्पाप लोकांची, हजारो नागरिकांची हत्या केली, अशा नवाब मलिकची ई.डी. व्दारा ८ तास चौकशी करून मलिक यांना अटक केली यावरुन त्यांचे आतंकवाद्यांसोबत थेट संबंध असल्याचे जाहीर झाले. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याची नैतिकताच राहिलेली नाही. अशा नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली.
भाजपतर्फे आज झाशी राणी चौकात तीव्र निर्दशने करण्यात आले होते,त्याप्रसंगी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
शरद पवारांचे आश्चर्य-

शरद पवारांनी आतंकवाद्यासोबत सांठगाठ ठेवणा-या नवाब मालिकांचा तत्काळ राजीनामा न घेता, आपातकालीन बैठक आपल्या बंगल्यावर बोलवून, छगन भुजबळ यांच्या माध्यमातून प्रवक्त्यांची भूमिका पार पडून राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली. अनिल देशमुखांच्या वेळेस सुद्धा हीच भूमिका घेतली होती. नंतर राजीनामा देण्यास भाग पाडले. नवाब मलिक यांना ई.डी. ने ८ तास चौकशी व विचारपूस केल्यानंतर व रात्री ८ वा. पर्यंत सुनावणी होऊन सुद्धा त्यांना ८ दिवस कोठडी देण्यात आली. देशद्रोहाचा गंभीर गुन्हा केल्यानंतरसुद्धा त्यांचा राजीनामा घेण्यात येत नाही, याचं आश्‍चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे लाचार मुख्यमंत्री-
महाराष्ट्राच्या इतिहासात उद्धव ठाकरे सारखा लाचार मुख्यमंत्री आजपर्यंत लाभलेला नाही. शिवसेनेने भगवा झेंडा सोडून हिरवा झेंडा हाती धरल्यामुळे त्यांची काँग्रेस व राष्ट्रवादी सारखी मानसिकता झालेली दिसतेय. दोन वर्षात राज्याच्या अनेक मंत्र्यांवर बलात्कार, महिलेशी छेडछाड, १०० कोटींची वसुली असे अनेक गंभीर आरोप असून त्यात विकासकामे ठप्प, कोरोना मध्ये भ्रष्ट्राचार असे आरोप होत असतनाच, त्यापेक्षाही उंच झेप नवाब मालिकांनी घेतली असून त्यांचे आतंकवादी सोबत थेट संबंध जाहीर झाले,यानंतर झाल्यांनतर सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचा राजीनामा घेण्यास टाळाटाळ करीत आहे. अशा लाचार मुख्यमंत्र्यांना पुरस्कार देण्याची वेळ आली आहे.

राष्ट्रपती शासन लावा-
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राज्याच्या दोन वर्षात उद्धव ठाकरे सरकारच्या अधिकांश मंत्र्यांनी भ्रष्ट्राचाराचा रेकोर्ड केला आहे. बलात्कार, कोरोना भ्रष्ट्राचार, हत्या, व आतंकवाद्यासोबत संबंध असे गंभीर आरोप असताना काही मंत्री जेलमध्ये काही बेलवर आहेत. मंत्र्यांच्या या गैरकृत्यामुळे राज्याची मान खाली टाकायला लावण्याचे काम या मंत्र्यांनी केले आहे. आणखी अनेक मंत्री राडारवर असून राज्याचे नाव बदनाम करण्याचे काम या सरकारने केले आहे. आतंकवाद्या सोबत संबंध असणारी ही पहिलीच सरकार असून राज्यपालांनी आपल्या संवैधानिक अधिकारांचा वापर करून राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली.
भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी ईडीचे अभिनंदन करीत देशाची ही संस्था लपून बसलेल्या एका-एका देशद्रोहींना शोधून अटक करीत असल्याचे सांगितले.जोपर्यंत नवाब मालिक राजीनामा देणार नाही तोपर्यंत भाजपचे आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा दिला.

महापाैर दयाशंकर तिवारी यांनी उपहासात्मक व्यंगातून नवाब मालिकचे आका हे देखील लवकरच कारागृहात दिसतील असे सांगितले.

माजी आमदार गिरीश व्यास यांनी देशद्रोहींची शामत मोर्दी काळातच आली असल्याचे सांगून गेल्या अनेक दशकांपासून देशद्रोही बॉम्ब स्फोटाचा गुन्हेगार दाऊद इब्राहिमसोबत मिळून देशाला आतून पोकळ करीत होते असे सांगितले.देशात अश्‍या प्रकारचे गुन्हे करणारे नवाब मलिक यांनी मंत्री पदाचा त्वरित राजीनामा द्यावा,अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी जोरदार घोषणाबाजी व नारे निर्दशने झाली.‘नवाब मलिक मुर्दाबाद’,‘शरद पवार मुर्दाबाद’,महाविकास आघाडी मुर्दाबाद’,‘नवाब मालिक राजीनामा द्या’अश्‍या घोषणांनी आसमंत निनादला.

युवा मोर्च्यातर्फे शिवाणी दाणी व पारेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात नवाब मालिक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

आंदोनात आंमदार मोहन मते, विकास कुंभारे, माजी आमदार डॉ मिलिंद माने,प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम,अर्चना डेहनकर,संगठन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर,प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, महामंत्री संजय बंगाले, राम अंबुलकर,बाल्या बोरकर,भोजराज डुंबे,सुनील मित्रा किशोर पलादुरकर,संजय चौधरी,संजय अवचट,विनोद कन्हेरे, देवेन दस्तुरे,किशोर वानखेड़े,संदीप जाधव,संदीप गवई आदींनी सहभाग नोंदवला.

Latest बातम्या