Homeनागपूर न्यूजमोदींनी नव्हे महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात करोना!

मोदींनी नव्हे महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात करोना!

Advertisements

पत्र परिषदेत रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसवर घणाघात

नागपूर,ता. १२ फेब्रुवारी २०२२: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत, देशात काँग्रेसमुळे करोना पसरला असल्याचे वादग्रस्त विधान केले होते.त्या विरोधात देशभर काँग्रेसने आंदोलन पेटवले आहे.अनेक ठिकाणी काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते सामोरासमाेर भिडतात आहेत.नागपूरात देखील शुक्रवार दि.१० फेब्रुवारी रोजी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते सामाेरासमोर भिडले व तनावग्रस्त स्थिती निर्माण झाली.मोदींच्या संसेदतील या विधानावर केंद्रिय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना विचारले असता त्यांनी मोदींच्या विधानाचा काँग्रेसने विपर्यास केल्याचे सांगून मोदींनी काँग्रेस नव्हे तर महाराष्ट्रातील काँग्रेसने देशात करोना पसरवला असल्याचे म्हटले आहे,एवढंच नव्हे तर मोदींचे संपूर्ण वक्तव्य यू-ट्यूबवर जाऊन बघण्याचा देखील सल्ला दिला.दानवे हे आज शनिवार दि.१२ फेब्रवरी रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत बोलत होते.

याप्रसंगी मंचावर माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे,महापौर दयाशंकर तिवारी,खा.डॉ.विकास महात्मे,आ.कृष्णा खोपडे,आ.मोहन मते,अा.विकास कुंभारे,माजी आ.सुधाकर देशमुख,अनिल सोले,गिरीश व्यास,माजी महापौर अर्चना डेहनकर,उमा खापरे, चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की करोनाच्या काळात लॉकडाऊन दरम्यान मुंबई तसेच दिल्लीत काँग्रेसने प्रत्येक गल्लीबोळ्यात जाऊन लाऊडस्पीकरवर घोषणा केली की आपापल्या गावाला निघून जा,त्यांनीच भीती पसरवली,यामुळेच रेल्वे स्टेशन्सवर तूफान गर्दी झाली,या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने मग रेल्वे उपलब्ध करुन दिल्या.मोदी यांचे हेच म्हणने होते मुंबईतील महाराष्ट्र काँग्रेसने देशात करोना पसरवला.

काँग्रेसचे अस्तित्व संपत आले आहे,तरी देखील काँग्रेसचं अस्तित्व संपलं नाही हे दाखवण्यासाठीच काँग्रेस अशी आंदोलने करीत असल्याची टिका दानवे यांनी केली.

मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात देशात एक ही संस्था उभारली नाही उलट देशातील २३ संस्था विक्रीस काढल्या,या प्रश्‍नावर बोलताना ख-या अर्थाने विरोधकांनी याचे विश्‍लेषणच केले नाही,अशी टिका करीत,आमच्या सरकारने ज्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या त्याची वाच्यताच ते करीत नाही. विरोधकांनी तर अर्थसंकल्प न वाचताच अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवसा आधीच अर्थसंकल्पावर टिका करने सुरु केले,असे दानवे म्हणाले.

यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा खानीतील मोठ्या प्रमाणात होणारी कोळसा चाेरी या विषयी छेडले असता,या विषयावर वेगळी पत्र परिषद घेईल,असे म्हणून हा प्रश्‍नच त्यांनी टोलवला.

रेल्वेबाबत बोलताना, मोदींनी सात प्रकल्प सुरु केले असून वाराणसी-दिल्ली,मुंबई-नागपूर,अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचा प्रकल्प सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकल्पाचे डीपीआर देखील तयार अाहेत.मुंबई-नागपूर समृद्धि महामार्गासाठी राज्य सरकारला जमीन देखील उपलब्ध करुन दिली आहे,फक्त आता या प्रकल्पाला ३० टक्के जमीन जास्त लागणार असल्याने या संबंधीचा प्रकल्प अहवाल लवकरच तयार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.राज्य सरकारकडून या प्रकल्पावर होणा-या खर्चाबाबत विचारले असता,आमच्या स्तरावर आम्ही बरोबर ‘टॅकल’करीत असल्याचे दानवे म्हणाले.

रेल्वेमध्ये या पुढे डबाबंद अन्न दिले जाणार नाही,तर तिथे शिजवलेले अन्न प्रवाशांना उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहीती दानवे यांनी दिली.विदर्भाला केंद्र सरकारने भरभरुन दिले आहे असे सांगत,वर्धा-नांदेड रेल्वे मार्गासाठी ३,००० कोटी,वर्धा-बल्लारशासाठी १८०० कोटी,वर्धा-नागपूरसाठी ६०० कोटी आणि नागपूर-नागभीडसाठी ११४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी यांनी १ फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व केंद्रिय मंत्र्यांना देशभरात अर्थसंकल्पाविषयी पत्र परिषदा घेऊन माहिती देण्याची सूचना केली आहे,याच पार्श्वभूमीवर आज रावसाहेब दानवे यांनी नागपूरात पत्र परिषद घेतली.याप्रसंगी बोलताना,हा अर्थसंकल्प देशभरातील वेगवेगळ्या घटकांच्या योग्य सूचना घेऊन,सर्वसामान्यां पुढे ठेऊन मांडण्यात आला असल्याचे दानवे यांनी सांगितले.हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक व सर्वांना न्याय देणारा असल्याचे ते म्हणाले.हा देशाचा अमृत महोत्सवी अर्थसंकल्प असून पुढील २५ वर्षांचा वेध घेणारा अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले.सुवर्ण महोत्सवी वर्षात देश कसा असेल याचा विचार या अर्थसंकल्पात दडला आहे.२०१४ पूर्वी भारताची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावर होती ती आता ५ व्या क्रमांकावर आली आहे.३ ट्रिलीयन वरुन ५ ट्रिलीयनपर्यंत देशाची अर्थव्यवस्था पोहोचली आहे.जीडीपीचा आकार १४० कोटी होता तो आता २७० कोटींवर पोहोचला आहे.हे सर्व फक्त पंतप्रधान मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळे शक्य झाले आहे.२०१४ पासून प्रत्यक्ष कर वाढले नाही,अप्रत्यक्ष कर खूप होते,तो आता १८ टक्क्यांवर आणला.जीएसटी लागू होण्यापूर्वी १८ टक्के तसेच शेकडो प्रकारचे कर आकारले जात होते.कृषि क्षेत्रासाठी पूर्वी ३१ हजार कोटींची तरतूद होती ती आता १ लाख ३२ हजार कोटी रुपयांची करण्यात आली आहे.शेतक-यांच्या नाशवंत वस्तूंना वेळेवर योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी ‘किसान रेल’सुरु केली.आज देशात अश्‍या १९०० रेल चालवल्या जातात.मोदी सरकारने शेतक-यांच्या सबसिडीवर ९० कोटींचा खर्च केला आहे.मोदी हे पंतप्रधान नसते तर देशात मोफत घरे,विज कनेक्शन,रस्त्यांचे जाळे,साढे आठ कोटी गरीबांना उज्जवला गैसचे कनेक्शन फक्त १०० रुपयात,८० कोटी लोकांना मोफत धान्य,शेतक-यांच्या खात्यात ६ हजार रुपये जमा,आयुष्यमान भारत योजना,कोविड काळात १७० कोटी मोफत लसीकरण होऊ शकले नसते.मोदींमुळेच करोनासारख्या भयंकर महामारीच्या संकटातून बाहेर पडू शकलो असल्याची पुश्‍ती ही याप्रसंगी दानवे यांनी जोडली.

दिवंगत राहूल बजाज यांना वाहीली श्रद्धांजली-
पत्र परिषद आटोपताच देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती राहूल बजाज यांच्या निधनाची वार्ता येऊन धडकली.पद्मभूषण राहूल बजाज यांच्यासारख्या उद्योगपतींचे जाने हे फक्त उद्योग जगतासाठीच नव्हे तर सामाजिक क्षेत्रासाठी देखील फार मोठी हानि असल्याचे ते म्हणाले.

Latest बातम्या