
‘महाराष्ट्रमुळे देशात करोना पसरला’वाद
काँग्रेस आंदोलकांना हूसकाऊन लावल्याचा भाजपचा दावा
नागपूर,ता.१० फेब्रुवारी २०२२: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसेदत काँग्रेसवर टिका करीत, देशभरात काँग्रेसमुळे करोना पसरला असल्याचे वादग्रस्त विधान केले होते.महाराष्ट्रात काँग्रेसने मजूरांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी विविध साधने उपलब्ध करुन दिली.मुंबईवरुन परतलेल्या विविध राज्यांच्या मजूरांमुळे देशात करोनाची स्थिती भीषण झाल्याचा आरोप मोदी यांनी सदनात केला,मोदींच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली असून मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी महाराष्ट्रात सर्वदूर काँग्रेसची आंदोलने सुरु आहे.आज नागपूरात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या छत्रपती चौकातील घरासमोर शहर काँग्रेसच्यावतीने नारेबाजी करण्यात आली मात्र काँग्रेस कार्यकर्ते पोहोचण्या पूर्वीच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते गडकरी यांच्या निवासस्थाना समोर पहोचले होते,परिणामी या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांच्या विरोधात जोरदार नारेबाजी झाली,अखेर भाजपच्या मागणीवरुन सोनेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस अधिका-यांनी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे,आ.राजेंद्र मुळक व महीला शहरध्यक्ष नॅश नुसरत अली यांना अटक केली.

मोदी यांनी संसदेत महाराष्ट्राविरोधात असे वक्तव्य केले असताना नागपूरचे खासदार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे देखील संसदेत उपस्थित होते.गडकरी यांना काँग्रेसच्या वतीने फक्त प्रस्ताव दिला जाणार होता,असे काँग्रेसचे म्हणने आहे.यात मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी,असा प्रस्ताव गडकरींना देण्यात येणार होता.काँग्रसेचे कार्यकर्ते आ.विकास ठाकरे व राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वाखाली गडकरी यांच्या घरासमोर नारे-निर्दशने करण्यासाठी दूपारी १२.३० वाजता एकत्रित होणार होते मात्र त्यापूर्वीच ११ वाजता भाजपचे आमदार व कार्यकर्ते यानी गडकरी यांच्या निवासस्थाना समोर ठिय्या मांडला.गडकरी हे निवासस्थानी नसून गोव्यात विधान सभेच्या प्रचारासाठी गेले होते,हे विशेष!
काँग्रेसने मोदी यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करीत ‘नरेंद्र मोदी शर्म करो,नरेंद्र मोदी मुर्दाबाद’अशी नारेबाजी करताच वातावरण तापले.सोनेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस अधिका-यांनी वातावरण तनावग्रस्त होत असल्याचे बघून आंदोलनकर्त्यांना तेथून निघून जाण्याचे आदेश दिले मात्र भाजपच्या आमदारांनी आधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तेथून हूसकाऊन लावण्याची मागणी केली परिणामी पोलिसांनी काँग्रेसचे आ.विकास ठाकरे,राजेंद्र मुळक,नॅश अली यांना ठाण्यात नेले व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड करुन पुरुष व महीला आंदोलनकर्त्यांना वेगवेगळ्या वाहनात कोंबून सोनेगाव पोलिस ठाण्यात नेले.काही काळानंतर या नेत्यांना सोडून देण्यात आले.
पोलिसांनी काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना आंदोलनस्थळावरुन हूसकाऊन लावल्यानंतरच भाजपचे कार्यकर्ते यांनी आंदोलनस्थळ सोडले.
या आंदोलनात भाजपचे आ. कृष्णा खोपडे,आ.मोहन मते,उमा खापरे,ॲड.धर्मपाल मेश्राम,नगरसेवक सजंय बंगाले,राम अम्बुलकर,सुनील मित्रा,भोजराज डुम्बे,सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे,चन्दन गोस्वामी,परेन्द्र पटले,माजी महापौर अर्चना देहनकर,अश्विनी जिचकार,नीता ठाकरे,मनीषा धावड़े,स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर,सचिन कायरकर,गुड्डू त्रिवेदी,परशु ठाकुर,सजंय चौधरी,किशोर प्लांदुरकर,अमोल ठाकरे ,सुबोध आचार्य,दीपांशु लिंगायत,संतोष लड्डा,मनीषा कोठे,आसिफ पठान,एजाज शेख,रमेश चोपड़े,सुरेश गुप्ता,भोला सहारे,राजेश हातीबेड,योगेश पाचपोर,दीपराज पारडीकर,माया इवनाते,संदिप गवई,मनीष काशीकर,पवन तिवारी आदींची उपस्थिती होती.

गडकरींच्या सुरक्षेचा दृष्टिकोण-अविनाश ठाकरे(सत्ता पक्ष नेते,नागपूर महानगरपालिका)
सोशल मिडीयावर गडकरी यांच्या घरासमोर आंदाेलन करण्याचा संदेश व्हायरल झाला.त्यामुळे भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या घराकडे धाव घेततली.आम्ही आंदोलन पुकारले नव्हते तर काँग्रेसने सोशल मिडीयावर मॅसेज व्हायरल केला होता त्यामुळे आम्ही माघार घेणे शक्य नव्हते.परिणामी आम्हीच पोलिसांना मागणी केली आधी काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना घटनास्थळावरुन हूसकाऊन लावा तरच आम्ही येथून जाऊ.त्यामुळे पोलिसांनी ज्यांनी आंदोलन सुरु केले त्यांना हूसकावले,ते तिथून निघून गेल्यावर आम्ही देखील आंदोलनस्थळ सोडले,आमचा हेतू हा फक्त आमच्या नेत्याच्या सुरक्षेचा होता.

आमचे चॅनल subscribe करा