Homeनागपूर न्यूजमोदींना मी मारु शकतो,शिव्या देऊ शकतो:पटोलेंना वाद भोवला

मोदींना मी मारु शकतो,शिव्या देऊ शकतो:पटोलेंना वाद भोवला

Advertisements


पटोलेंविरुद्ध पोलीस ठाण्यात बावणकुळेंची तक्रार

असभ्य भाषा ही भाजपची संस्कृती काँग्रेसची नाही:अतुल लोंढे

वक्तव्य गावगुंडाविरोधात, पंतप्रधान विरोधात नाही:पटोले यांचे स्पष्टीकरण

नागपूर,ता. १७ जानेवारी: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांद्याबद्दल मी अपशब्द वापरल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हीडिओतील ‘मोदी’या नावाचा उल्लेखाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध नसून माझ्या मतदार संघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत मी बोलत होतो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.मात्र मोदींना मी मारु शकतो,शिव्या देऊ शकतो,त्यांचे हे विधान आता त्यांना चांगलाच भोवल्याचेेे दिसून पडत आहे.आज कुही पोलिस ठाण्यात माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी नाना पटोले यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी असभ्य भाषा बोलणे ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे काँग्रेसची नाही,असा चिमटा भाजपला काढला आहे.

पटोले यांनी या वादावर बोलताना,माझ्या मतदारसंघातील स्थानिक गुंड मोदीबद्दल नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा तो व्हिडीओ असून खोडसाळपणे सोशल मीडियावर तो व्हायरल केला जात असल्याचे सांगितले. मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर मोदी नावाच्या स्थानिक गावगुंडाबाबत बोलत होतो. पण भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर काही उतावीळ भाजप नेते त्या वक्तव्याचा संबंध खोडसाळपणे व जाणीवपूर्वक पंतप्रधान मोदी यांच्याशी जोडून पंतप्रधान मोदी यांचा तेच अवमान करत आहेत जे दुर्दैवी असल्याचे पटोले म्हणाले.

भाजपाच्या नेत्यांनीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका यांच्याबद्दल सातत्याने अपशब्द वापरले , त्यांच्या बदनामीची मोहिमही राबवली पण काँग्रेसने नेहमीच संविधानिक पदावरील व्यक्तींचा आदर केलेला आहे. पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च नेते असतात, त्यांच्या पक्षाबद्दल वैचारिक मतभेद असू शकतात, त्यांच्या धोरणांवर, कामाच्या पद्धतीवर टीका केली जाऊ शकते परंतु त्यांच्याबद्दल व्यक्तीगत पातळीवर आम्ही कधीही अपशब्द वापरलेला नाही, आमची ती संस्कृतीही नाही. मी जे बोललो त्याचा पंतप्रधानांशी संबंध दाखवून नाहक बदनामी करण्याचा हा प्रकार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रात्री कूही पोलीस ठाण्यात दाखल केली.

देशाच्या  पंतप्रधानांना अशी गंभीर धमकी देणारे नाना पटोले यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून बावनकुळे आणि इतर भाजपा नेत्यांनी पोलिसांना केली. यावेळी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा नेते आनंदराव राऊत, अजय बोढारे उपस्थित हाेते.

तर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर पलटवार करताना, असभ्य भाषा वापरणे ही भाजपची संस्कृती असून काँग्रेसची नाही अशी टिका केली.गावगुंडांनासून गावक-यांचं संरक्षण करणं हा गुन्हा आहे का?असा सवाल त्यांनी केला.पटोले ही कुठेही भाषण देत नव्हते,ते लोकांच्या गराड्यात होते आणि लोक त्यांच्याकडे तक्रारी करीत होते.भंडारा जिल्ल्यात टोपण नाव मोदी असणारा एक गावगुंड आहे,त्याच्या संदर्भात पटोले बोलले होते.शिव्या देणे,मारहाण करणे,संपवण्याच्या गोष्टी करणे ही काँग्रेसची संस्कृती नाही
.याच भाजपच्या उमेदवाराच्या लोकांनी पटोले यांच्या पुतण्यावर गेल्या विधानसभा निवडणूकीत प्राणघातक हल्ला केला होता अशी आठवण लोंढे यांनी भाजपला करुन दिली.

भंडारा जिल्ह्यात पटोले यांच्याविरुद्ध माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ’खासमखास’आमदार परिणय फूके यांची लढत चांगलीच रंगली होती,फूके हे विधान परिषदेचे आमदार असतानाही फडणवीस यांनी फूकेंना पटोले यांच्याविरुद्ध मैदानात उतरवले होते व विधान सभेची निवडणूक लढायला लावली होती,या निवडणूकीत साम,दाम,दंड,भेदाची सर्व चाणक्य नीतीं अवलंब करुन देखील फूके यांचा पराभव झाला होता मात्र तरी देखील विधान परिषदेचे आमदार असल्याकारणाने त्यांची आमदारकी असित्वात आहे,हे विशेष!

याकडेच लक्ष वेधीत लोंढे यांनी पटोले यांच्या पुतण्यावर भाजपच्या उमेदवाराच्या समर्थकांनी अगदी चाकू,सु-यांनी हल्ला केल्याची आठवण करुन दिली.त्याची तक्रार,एफआयआर आणि खटला अद्यापही सुरु असल्याचे लोंढे यांनी सांगितले.पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या विरोधात भाजपच्या लोकांनी ‘चोर’हे विशेषण लावले होते,कालच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्याविषयी अनुद् गाराने बोलले हे संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलं,त्यामुळे ही संस्कृती भाजपची आहे,तुम्ही मुख्यमंत्री असताना लोक मरतात,प्रधानमंत्री असताना लोकांचे जीव जातात,आमच्यामुळे जात नाही,त्यामुळे पटोले यांचे जे काही वकतव्य होतं ते पंतप्रधानांना उद्देशून नव्हे तर मोदी नावाच्या एका गावगुंडाबाबतचे जे विधान होते,त्यामुळे एवढा मेलोड्रामा भाजपच्या नेत्यांना करणे शोभत नाही,असा टोमणा त्यांनी हाणला.

Latest बातम्या