Homeनागपूर न्यूजॲग्रोव्हिजनमध्ये गर्दीचा गोंधळ

ॲग्रोव्हिजनमध्ये गर्दीचा गोंधळ

Advertisements


वेळेपूर्वीच मुख्य द्वार केले होते बंद

गडकरींच्या हस्ते ड्रोनचे उद् घाटन: गडकरींवरच नागरिकांचा संताप

डॉ.ममता खांडेकर

(Senior Journalist)

नागपूर,ता. २६ डिसेंबर २०२१: ‘समृद्ध शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान’या ब्रीद वाक्याने सुरु होणा-या नागपूरातील रेशीम बाग येथील ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषि प्रदर्शनीत आज रविवारी नागरिकांनी कुटुंबियांसह तूफान गर्दी केली,सर्वच वयोगटातील लहान,मोठी बालके,तरुण,महिला,ज्येष्ठ नागरिक,पालक,महराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून येणारे शेतकरी,ग्रामीण भागातून येणा-यांमुळे आज रविवारी ॲग्रोव्हिजन कृषि प्रर्दशनीचा परिसर अक्षरश: गर्दीने फूलून गेला होता.गर्दी टाळण्याचे राज्य सरकारचे निर्देश बघता अखेर आयोजकांना सायंकाळी ५ वाजताच टेबल आडवे लाऊन मुख्य प्रवेश द्वार बंद करावा लागला मात्र कृषि प्रदर्शनाची वेळ, ही सायंकाळी ६ पर्यंत जाहीर केली असताना आयोजक नागरिकांना प्रदर्शनीत येण्यास मज्जाव करु शकत नाही,असा संताप व्यक्त करीत नागरिकांनी मुख्य प्रवेश द्वारावरच चांगलाच गोंधळ घातला.

नागरिकांचा संताप बघता अखेर आयोजकांनी सर्वांना आत येण्याची परवानगी दिली त्यामुळे नागरिकांचा उद्रेग टळला.

याच वेळी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे प्रदर्शनीत उपस्थित होते व त्यांच्या हस्ते धानुका ॲग्रो टेक लिमिटेडच्या ड्रोनचे उद् घाटन करण्यात आले.परिणामी गडकरी यांच्या भोवती प्रदर्शनीच्या आत चोख सुरक्षा बंदोबस्त असल्यामुळे देखील बाहेरील गर्दीला अात येण्यास रोखण्यात आले होेते.

यावर देखील नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला.ही प्रदर्शनी नेत्यांसाठी नसून सामान्य शेतक-यांसाठी असल्याचे नागरिक म्हणाले.आम्ही आपल्या लहान-लहान मुलाबाळांसह गेल्या दीड तासांपासून बाहेरच ताटकळत उभे आहोत,प्रदर्शनीत आतमध्ये कोणतेही नेते किवा मंत्री असले तरी नागरिकांना वेळेपूर्वी आत येण्यास आयोजक बंदी घालू शकत नसल्याचे, प्रवेश द्वारावर जमलेल्या व गोंधळ घालणा-या नागरिकांनी सांगितले.

राजकारण करता का शेतक-यांसोबत?३०-४० किलोमीटरवरुन शेतकरी येथे आला आहे,वृत्तपत्रे,टी.व्ही.वर सायंकाळी ६ पर्यंत कृषि प्रदर्शनी सुरु असल्याच्या जाहीराती मग कशाला दिल्या?शेतक-यांना उल्लू बनवता का?बंद करा तुमची नाटकं!पुढल्या वर्षीपासून बंद करा हा ॲग्रोव्हीजन!असा अनावर झालेला संताप ही यावेळी जमलेल्या गर्दीचा दिसून पडला.

हा संपूर्ण गोंधळ ‘सत्ताधीश’ने आपल्या कॅम-या मध्ये कैद केला व प्रवेशद्वारावर उपस्थित सुरक्षा रक्षकांना ,लोकांना आत न येऊ देण्याचे कारण विचारले असता,आधीच आतमध्ये तूफान गर्दी असल्याची सबब सांगून आतील गर्दी कमी झाल्यानंतर यांना आत सोडणार होतो,अशी सबब पुढे केली.

मात्र गर्दीचा संताप बघता लागूनच असलेले दोन्ही प्रवेशद्वार मोकळे करण्यात आले.आडवे धरलेले टेबल हटवताच, थोड्या वेळा पूर्वी संताप अनावर झालेल्या गर्दीने आनंदाचा सुस्कारा सोडत हसत-हसत आपल्या बालबच्च्यांसहीत आत प्रवेश केला.

विशेष म्हणजे आतमधील स्टॉल्सवर देखील आयोजकांतर्फे ५ वाजताच स्टॉल बंद करण्याची सूचना पावणे पाच वाजता पोहोचली!.यावर अनेक स्टॉलधारकांनी देखील नाराजी व्यक्त केली. उद्या २७ डिसेंबर रोजी कृषि प्रदर्शनीचा शेवटचा दिवस असून आजच प्रदर्शनीचा गाशा गुंडाळला जाणार असल्याची चर्चा देखील ऐकू आली.

Latest बातम्या