Homeनागपूर न्यूजपदवीधर नाही, काँग्रेसच्या पराभवाची चर्चा करा: फडणवीस

पदवीधर नाही, काँग्रेसच्या पराभवाची चर्चा करा: फडणवीस

Advertisements


(रणधुमाळी विधान परिषदेची भाग-३)

नागपूर,ता.१४ डिसेंबर २०२१: विधान परिषदेच्या स्थानिक मतदारसंघाच्या निवडणूकीचा निकाल आज घोषित झाल्यावर भाजपच्या गोटात जोरदार उत्साह संचारला.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आकाशवाणी चौकातील स्वागत लॉन्समध्ये कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.यावेळी माध्यमांसोबत संवाद साधताना फडणवीस यांना पदवीधर मतदारसंघाचे अपयश धूऊन निघाले असं वाटतं का?असे विचारले असता पदवीधर नाही आज काँग्रेसच्या पराभवाची चर्चा करा अशी कोटी केली.

याप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले, की त्यांना अतिशय अानंद आहे की त्यांचे सहकारी चंद्रशेखर बावणकुळे हे पुन्हा एकदा विधी मंडळात प्रचंड मतांनी निवडून आले,आजचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे,अकोलामध्ये देखील वसंतभाई खंडेलवाल हे देखील चांगल्या मताने निवडून आले असून भारतीय जनता पक्षाला सहा विधान परिषदेच्या निवडणूकीपैकी ६ विधान परिषदेत विजय मिळाला आहे.त्यामुळे तिन्ही पक्ष एकत्रित आले तर सर्व निवडणूका जिंकता येतात अशी जी मांडणी केली जात होती,त्याला या निवडणूकींच्या निकालामुळे छेद मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

बावणकुळे यांच्या विजयामुळे विदर्भाचे कार्यकर्ते हे प्रचंड उत्साहात आहेत. यासाठी विशेषत्वाने पंतप्रधान नरेंद्र मोदी,पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा,गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो, त्यांनी आमच्यावर विश्‍वास दाखवला आणि वसंत खंडेलवाल,बावणकुळे व आमच्या सर्व उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली,आमच्यावर विश्‍वास दाखवला आणि आम्ही यश खेचून आणू शकलो तसेच या संपूर्ण निवडणूकीत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी जे मार्गदर्शन केलं,त्यांचे देखील आभार याप्रसंगी फडणवीस यांनी मानले.

याप्रसंगी या यशामुळे पदवीधर निवडणूकीचे अपयश धूऊन निघाले का?असा प्रश्‍न विचारला असता,यश-अपयश हे राजकारणामध्ये लागू नसतात असे सांगत, आज यशाचा दिवस आहे,अपयशावर चर्चा नंतर करु ,अपयशावर चर्चा काँग्रेसची करा,अशी खोचक टिपण्णी देखील त्यांनी केली.

 

Latest बातम्या