Homeनागपूर न्यूजभोयर यांची ‘निष्ठा’स्वत:वरच!

भोयर यांची ‘निष्ठा’स्वत:वरच!

Advertisements

(रणधुमाळी विधान परिषदेची भाग-२)

भोयर यांचे मात्र खंडण

एकमेव ’दूर्मिळ मत नेमके कोणाचे? चर्चेला फूटला पेव

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.१४ डिसेंबर: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणूकीचा निकाल आज घोषित झाला, त्यात भाजपचे विजयी उमेदवार चंद्रशेखर बावणकुळे यांना ३६२,काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ तर काँग्रेसचे ‘अधिकृत’ उमेदवार डॉ.छोटू भोयर यांना १ मत पडलं.भोयर यांना प्राप्त झालेल्या या ‘एकमेव’ मतावर मात्र बरीच खळबळ माजली आहे.हे एक मत भोयर यांनी स्वत:,स्वत:ला दिले असल्याचे गृहीत धरल्या जात आहे,मात्र भोयर यांना दूरध्वनीवर याबाबत विचारले असता त्यांनी याचे खंडण करुन, मी माझे मत स्वत:ला दिले नसल्याचे सांगितले.

भोयर हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत.ते उपमहापौर तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे विश्‍वस्त पदी देखील राहीले आहे.गेल्या ३४ वर्षांपासून ते भाजपमध्ये आहेत.ते स्वत:ला स्वयंसेवक म्हणून घेतात.संघाच्या व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या ते जवळचे मानले जातात मात्र अचानक या निवडणूकीत त्यांनी पवित्रा बदलला आणि २२ डिसेंबर रोजी ते ‘काँग्रेसवासी’झाले.

त्यांनी भाजपचा ‘त्या’ग करुन क्रीडा मंत्री सुनील केदार,उर्जामंत्री नितीन राऊस,काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे,आ.अभिजित वंजारी यांच्या उपस्थितीत देवडीया भवनात काँग्रसचे सदस्यत्व स्वीकारले.यानंतर २४ तासात त्यांना उमेदवारी देखील जाहीर झाली. २४ डिसेंबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना, त्यांनी या संपूर्ण नेते मंडळींच्या ‘साक्षीने’जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वा. अतिशय उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

याप्रसंगी केदार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत ‘काँग्रेस ही निवडणूका जिंकण्यासाठी लढत असते’अशी काहीशी दांभिक प्रतिक्रिया दिली होती.त्यामुळे भोयर यांच्या पाठीशी केदार,राऊत,विकास ठाकरे,अभिजित वंजारी आदी संपूर्ण नेते असल्याचे समोर आले व ही निवडणूक चुरशीची झाली.

मात्र निवडणूक अर्ज भरल्यानंतर फक्त दोनच दिवस भोयर यांनी प्रचार केला,यानंतर त्यांनी प्रचारातूनच माघार घेतली.पडद्याच्या पाठीमागे नेमके काय घडले हे मतदारांना देखील कळले नाही आणि अचानक काँग्रेसने मतदानाच्या २४ तास आधी आपला उमेदवार बदलला.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आता, ही आमची ‘स्ट्रेटेजीच’ होती असे सांगत आहे मात्र अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला भाजपच्या विराेधात अशी अखिल भारतीय ‘स्ट्रेटेजी’ करण्याची नेमकी काय गरज होती यावर आता बरेच चर्वितचर्वण होत आहे.

९ डिसेंबर रोजी नाना पटोले यांनी दिल्ली गाठून पक्षाने आपला अधिकृत उमेदवार बदलला असल्याचे ‘पत्र’ आणले,त्याच रात्री सदर येथील हॉटेल तुली इंटरनॅशनलमध्ये काँग्रेसचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत ’जीत का जल्लोष’देखील साजरा झाला, मात्र हा ‘जल्लोष’ निवडणूकीतील विजयासाठी नसून त्यांना अधिकृत उमेदवार बदलण्यात आलेले ‘यश ’यासाठी होता,असे खासगीत काँग्रेसचेच काही मतदार सांगतात.

भोयर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ‘काँग्रेस ही निवडणूक ९ डिसेंबर रोजीच हरली होती’अशी मार्मिक टिपण्णी केली आहे.असे असले तरी ज्या छोटू भोयर यांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत काँग्रेससोबतच राहील अशी उद् घोषणा केली होती ते ‘मतदानापूरतीही’काँग्रेससोबत नसल्याचे चित्र उमटले.

१० डिसेंबर रोजी मतदान झाले होते.मतदानासाठी भोयर हे एकटेच सकाळी १० वा.तहसील कार्यालयात पोहोचले होते.यावर माध्यमांनी त्यांना बालतं केल्यावर ’मी प्रचार ही एकट्याने केला मतदानासाठी ही एकटाच आलो’असल्याची कोटी त्यांनी केली होती.

तुम्ही कोणाला मत दिलं,यावर भाष्य करने मात्र त्यांनी टाळले हाते.त्यामुळेच आज भोयर यांना प्राप्त झालेले ‘दूर्मिळ’असे एकमेव मत नेमके कोणाचे?यावर बराच खल सुरु झाला आहे.भोयर यांनी ‘काँग्रेसवासी’असताना ही आपले मत ‘स्वत:लाच’ दिले असल्याची अनेकांना शंका आहे,तर अनेकांनी भोयर यांना आज ‘एक ही मत मिळाले नसते’ तर त्यांच्या काँग्रेस निष्ठेवर शिक्कामोर्तब झाले असते असे मत मांडले.दुसरीकडे त्यांना मतदारांची देखील सहानूभुती प्राप्त झाली असती,असे बोलल्या जात आहे.

काँग्रेसप्रति आपली निष्ठा दाखवण्याची सुवर्ण संधी भोयर यांनी दवडली,असे अनेकांना वाटत आहे.काँग्रेसने भोयर यांच्या विश्‍वासासोबत, एवढे पराकोटीचे ‘मानापमान महानाट्य’घडवून देखील, भोयर यांनी काँग्रेस पक्षाप्रति निष्ठा दाखवली असती व आपले मत मंगेश देशमुख यांच्या पारड्यात टाकले असते तर काँग्रेस पक्षात त्यांच्याविषयीचे चित्र वेगळे उमटले असते असे आता बोलले जात आहे कारण त्यांच्यावरील ‘अविश्‍वास’हेच त्यांच्या मागील समर्थन मागे घेण्याचे कारण असल्याचे सांगितले जात होते.

तर भोयर यांच्या काँग्रेसलाच ’मत’दिले असल्याच्या विधानावर, मग भोयर यांच्या पारड्यात एकमेव मत टाकणारा तो महाभाग कोण?याचा शोध आता काँग्रेस व भाजपा दोन्ही पक्षालाच घ्यावा लागणार आहे,यात ही शंका नाही.

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रा बाहेर भोयर यांच्या मतदानानंतर, ३४ वर्षांच्या भाजपमधील ‘सवयीप्रमाणे’त्यांनी भाजपच्याच उमेदवाराला सवयीप्रमाणे मत दिले असल्याची मिश्‍किली देखील चांगलीच रंगली होती.

Latest बातम्या