Homeनागपूर न्यूजकाँग्रेसची ‘नामुष्की’ नाही एकजूट:‘तानाजी वनवे

काँग्रेसची ‘नामुष्की’ नाही एकजूट:‘तानाजी वनवे

Advertisements


(रणधूमाळी विधान परिषद निवडणूकीची भाग-४)

’श्रेष्ठींच्या निर्णयाचे स्वागत:प्रफूल्ल गुडधे पाटील

उमेदवार कोणीही असो राष्ट्रवादी आघाडीसोबत: दुनेश्‍वर पेठे

नागपूर,ता.१० डिसेंबर : विधान सभा स्थानिक मतदार संघाच्या निवडणूकी,त काँग्रेसने ऐन वेळी आपला उमेदवार बदलला.पक्षाचा अधिकृत उमेदवार बदलून अपक्ष उमेदवाराला पाठींबा जाहीर केला.यासाठी क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी संपूर्ण ‘रणनीती’आखली मात्र अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यासारख्या राष्ट्रीय पक्षाला विधान परिषदेच्या निवडणूकीत आपला उमेदवार देता न आल्याने नामुष्कीचा प्रश्‍न ऐरणीवर आला.

आज तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर पार पडलेल्या मतदानाच्यावेळी मनपाचे विराेधी पक्ष नेते तानाजी वनवेराष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांचे ‘एकत्र’आगमन झाले.राज्यातील आघाडीप्रमाणे शहरात देखील दोन्ही पक्ष हे ’एकत्र’असल्याचा सूचक प्रसंग दर्शवून एकाच वेळी या दोन्ही नेत्यानी मतदान केले.

मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना ऐन वेळी काँग्रेसने आपला उमेदवार बदलला व अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला,यामुळे पक्षावर नामुष्की ओढवली का?असा प्रश्‍न वनवे यांना करता,काँग्रेस हायकमांड जो निर्णय घेते तो निर्णय पक्षाचा कार्यकर्ता मान्य करीत असतो असे ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा डॉ.छोटू भोयर उमेदवार होते, त्यांनाच बदलवणे हे कितपत योग्य होतं?यावर डॉ.छोटू भोयर हे प्रदेशाध्यक्षाचे उमेदवार नसून पक्षाचे उमेदवार असल्याची पुष्टि वनवे यांनी जोडली.पक्षाने दूसरा उमेदवार दिला तरी आम्ही उमेदवारासाेबत नसून पक्षासोबत असतो असे ते म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या राजकारणात विरोधी पक्ष नेते पदाकरिताही कोर्ट कचेरी होते,आता १२ तास आधी उमेदवार बदलण्यात आला त्यासाठी तरी एकत्र राहणार का?यावर बाेलताना,जाे निर्णय झाला तो झाला,आघाडीसोबत बसून हा निर्णय झाला असल्याचे वनवे यांनी सांगितले.या निर्णयाला आघाडीतील पक्षांचे देखील शंभर टक्के समर्थन असल्याचे त्यांनी सांगितले.

छोटू भाेयर हे ‘असमर्थ’ नाहीत, असे सांगत असल्याकडे लक्ष वेधले असता यावर छोटू भोयर यांनी काँग्रेसच्या बैठकीतच जाहीर केलं की त्यांना पक्षाचा निर्णय मान्य आहे.काँग्रेसवर कोणतीही नामुष्की ओढवली नसून सर्व एकजूट असल्याचे त्यांनी सांगितले.

आमचा उमेदवार शंभर टक्के विजयी होणार असल्याचे सांगून एका प्रश्‍नावर, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची कोणतीही नाराजी नसून ते सर्व बैठकीला उपस्थित होते असे उत्तर त्यांनी दिले.

यावेळी मतदान स्थळी महानगरपालिकेतील काँग्रेस मतदारांची धूरा सांभाळणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफूल्ल गुडधे पाटील यांना उमेदवार बदलण्याबाबत विचारले असताना, जो काही निर्णय घेण्यात आला तो काँग्रेस पक्षाने सर्व विचाराअंती घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.ही एक प्रक्रिया असते असे ते म्हणाले.काँग्रेस श्रेष्ठींनी विचारपूर्वक घेतलेल्या निणर्याचे आम्ही स्वागत केले आणि मतदान करतोय,असे सूचक विधान त्यांनी केले.

सुरवातीच्या ‘नाराजीनाट्या’नंतर रुळावर आलेल्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांनी देखील काँग्रेसने सुरवातीचा काही काळ आमच्या नेत्यांसोबत बोलणी केली नसल्याचे सांगत, दोन दिवसांपूर्वी मात्र आमच्या नेत्यांसोबत बोलणी झाली व त्यानुसार आम्हाला आघाडीच्या उमेदवारासोबत राहण्याची सूचना मिळाली असल्याचे सांगितले.

वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी देखील नागपूर दौ-यात हेच निर्देश दिले.तसे ही आम्ही काँग्रेसच्या विचारधारेचेच आहोत.त्यामुळे काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय या निवडणूकीत घेतला.ऐन वेळी काँग्रेसने उमेदवार बदलण्याच्या भूमिकेला राष्ट्रवादीचे समर्थन आहे का?यावर बोलताना मतदार हे ‘समझदार’,हूशार’असल्याचे त्यांनी सांगितले.

आधीचा उमेदवारच काँग्रेसने कायम ठेवला असता तरी राष्ट्रवादीचे समर्थन असते का?यावर बोलताना,आधीच्या उमेदवाराला देखील आघाडीतील पक्ष म्हणून पाठींबा दिला असता असे पेठे यांनी सांगितले.

Latest बातम्या