
(रणधुमाळी विधान परिषद निवडणूकीची भाग-२)
नागपूर,ता.१० डिसेंबर: बहूप्रतिक्ष्त असा मतदानाचा दिवस उजाडला आणि भारतीय जनता पक्षाचे मतदार सदस्य हे तीन वेगवेगळ्या बसेसने वेगवेगळ्या वेळी तहसील कार्यालयात पोहोचले.काँग्रेसतर्फे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ.छोटू भोयर यांनी उमेदवारी अर्ज भरताच, भोयर हे भाजपच्या मतदारांच्या ‘निष्ठेला’ सुरुंग लाऊ शकतात,या शक्यतेने भाजपने आपले संपूर्ण १०५ नगरसेवक विविध ठिकाणी सहलीला पाठवले, एवढंच नव्हे तर त्यांच्यावरील देखरेखीसाठी ‘योग्य’पदाधिका-यांची नियुक्ती ही केली.
परिणामी भोयर यांना भाजपच्या नगरसेवकांना संपर्क करण्याचे माध्यमच उपलब्ध होऊ शकले नाही.दूसरीकडे भोयर यांनीच या संपूर्ण निवडणूकीतून मानसिकरित्या अंग काढून घेतल्याचे नागपूरकरांनी अनुभवले.
आज भाजपचे दहा दिवस दूरवर, सहलीला गेलेले नगरसेवक हे बसने तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर पोहोचले.दोन दिवसांपूर्वीच त्यांचे उपराजधानीत आगमन झाले मात्र तरीही त्यांना घरी जाण्याची परवानगी नव्हती,दोन दिवस पेंच येथे निसर्गरम्य परिसरात घालवल्यानंतर आज मतदाना पूर्वी ते स्वागत लॉन्समध्ये एकत्रित आले व या लॉनमधून सरळ मतदान केंद्रावर पोहोचले.
भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वाखाली हे मतदान होईपर्यंतची संपूर्ण शिस्तबद्ध रणनीती पार पडली.बसमधून उतरल्यानंतर एका रांगेत उभे राहून भाजप नगरसेवकांनी मतदान केले.यावेळी त्यांच्यासाठी बाहेरुन भाजपच्या काही पदाधिका-यांनी वेळेवर नाशत्याची देखील सोय केली मात्र कर्तव्यावर असणा-या पोलिसांनी तो नाश्ता फाटकाच्या आत नेऊ दिला नाही,पिण्याच्या पाण्याची बाटली देखील हे नगरसेवक आत नेऊ शकले नाहीत.
शहराध्यक्ष दटके,स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर,माजी महापौर संदीप जोशी आदी भाजप पदाधिका-यांची आपल्या नगरसेवकांच्या नाश्त्यासाठी तळमळ बघता अगदी सकाळपासूनच नगरसेवक ‘तहान-भूक’ विसरुन फक्त मतदानासाठीच सज्ज राहीले होते असा अंदाज अनेकांनी बांधला.
अनेक नगरसेवकांनी ही सहल म्हणजे ‘प्रशिक्षण’असल्याचे तर अनेकांनी गमतीत ‘संस्कार वर्गाशी’या सहलीची .गमतीने तुलना केली.मात्र भाजपची या निवडणूकीला घेऊन एकणूच रणनीती ही अतिशय शिस्तबद्ध असल्याची चर्चा आज चांगलीच रंगली.
भाजपची रणनीती यावर प्रतिक्रिया देताना शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी, भाजपसाठी प्रत्येकच निवडणूक ही महत्वाची असल्याचे सांगून, ही देखील निवडणूक देखील आमच्यासाठी महत्वाचीच असल्याचे सांगितले.काँग्रेसचे नाव न घेता, आमच्या समोरच्या पक्षाने आमच्यासाठी ही निवडणूक ‘सोपी’केली अशी माध्यमांमध्येच गोष्ट रंगली,मतदानाच्या १२ तास आधी त्यांनी आपला उमेदवार बदलला,संघाचा स्वयंसेवक म्हणून उमेदवार बदलला जातो, मग अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्या अर्जावर तर ६ भाजप सदस्यांच्या ‘सूचक’ म्हणून स्वाक्ष-या आहेत ते कसे चालले?त्यांनी काहीही केलं तरी ही निवडणूक भारतीय जनता पक्ष ४०० पेक्षा अधिक मतांनी जिंकणार आहे हा आमचा ओवर कॉन्फिडन्स नाही तर विश्वास आहे.
याच विषयावर बोलताना भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी काँग्रेसची परंपरा ही विश्वासघाताचीच असल्याची टिका केली आणि अश्या पक्षात जाणा-यालाही चांगला सबक मिळाल असल्याची पुश्ती जोडली.आपणच उभे केलेल्या उमेदवारावर काँग्रेसला विश्वास नाही आणि त्यांनी ऐन वेळी उमेदवार बदलला.त्यांनी कोणताही उमेदवार बदलला तरी भाजपला काहीही फरक पडत नाही,भाजपला लोक विकासाच्या नावावर मतदान करतात.आमचे उमेदवार चंद्रशेखर बावणकुळे हे ४०० मतांनी निवडून येतील हा विश्वास आहे.

आमचे चॅनल subscribe करा