

(रणधुमाळी विधान परिषद निवडणूकीची भाग-१)
काँग्रेसने विजयाचा आनंद कालच केला साजरा
भोयर यांची ‘विकेट’ स्वयंसेवक असल्यामुळेच
‘भरवसा’सर्वात मोठा ठरला फॅक्टर:केदारांच्या हाती सूत्रे
उमेदवारी अर्ज घेणार होते मागे!.चर्चेला उधाण
भाेयर यांचा ‘एकाकी’ प्रचार ‘एकाकी’ मतदान
भाजपची शिस्तबद्ध मतदान ‘रणनीती’
काँग्रेस-भाजप दोन्ही पक्षांचा विजयाचा दावा
बसपची तटस्थता सर्वात ‘क्रियाशील’:मतदान केंद्रावर सर्वात आधी उपस्थिती!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १० डिसेंबर २०२१: विधान सभेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत परंपरागत शत्रू असणारे काँग्रेस व भारतीय जनता पक्ष हे यावेळी देखील ‘आमने-सामने’होते.विशेष म्हणजे काँग्रेसने या निवडणूकीत आपला उमेदवार हा ‘स्व’पक्षातला न देता भाजपमधून ‘आयात’केला होता आणि इथेच निवडणूकीत ‘ट्वीस्ट’आले.
सर्वप्रथम डाॅ.छोटू भोयर हे स्वयंसेवक असल्याने काँग्रेसच्या विचारधारेत कुठेही ‘फिट’बसले नाहीत,त्यात ते संघ व गडकरी यांच्या अतिशय जवळचे असल्याने ते काँग्रेसचाच ’गेम’करण्यास आले असल्याचा संशय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात बळावला,काँग्रेसच्या खासगी बैठकीत भोयर यांच्या नावाला अनेक कार्यकर्त्यांनी‘ मनापासून‘ विराेध केला असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
यानंतरही भोयर यांना उमेदवारी देण्यात आली मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भोयर हे, आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पूर्ण तयारीत होते,अशी खात्रीशीर माहीती पुढे आली आहे.त्यांच्यावर संघाचा दवाब होता असे सांगितले जात असून एका रात्रीत माणसाच्या मेंदूमध्ये घट्ट बसलेली कोणतीही ‘विचारधारा’ ही वस्त्रासारखी बदलता येत नसल्यानेच भोयर यांच्या ‘बंडखोरीवर’ काँग्रेसमध्ये कोणीही विश्वास ठेवण्यास तयार झाले नाहीत.
उमेदवारी अर्ज मागे न घेऊ शकल्याने भोयर यांनी प्रचारात रस दाखवलाच नाही.फक्त दोन दिवस प्रचार केला,यानंतर मात्र काँग्रेसचे बाहूबली नेते सुनील केदार यांनी या निवडणूकीची संपूर्ण सूत्रे आपल्या हातात घेतली.
यानंतर काँग्रेसमध्येच भोयर हे नेमके कोणाचे उमेदवार आहेत?प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे की केदार यांचे?हा ‘संभ्रम’ कायम झाला.हाच संभ्रम दूर करण्यासाठी पटोले यांनी ‘दिल्लीत’धाव घेतली आणि ‘पत्र प्रपंच’घडवून आणला.पटोले यांना भोयर हेच उमेदवार हवे होते ही कपोलकल्पनाही त्यामुळे संपुष्टात आली.
भोयर यांची ‘एकनिष्ठता’ पक्षासोबत नाही हे ही वावटळ उडाल्यानेच पडद्यामागील ‘नाट्य’ सुरु झाले मात्र रिंगणात काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसल्यानेच अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना ‘पिक्चर‘मध्ये आणण्यात आले व त्यांच्या मागे संपूर्ण जोर लावण्याचे निर्देश केदार यांनी बैठकांवर बैठका घेऊन मतदारांना दिले.
त्यांची ही संपूर्ण ‘रणनीती’काल सायंकाळनंतर यशस्वी झाल्यानेच,सदर येथील तुली इंटरनॅशनलमध्ये जिल्हा सदस्य तसेच राष्ट्रवादीसोबतच्या बैठकीत ,मतदानापूर्वीच विजयाचा जल्लोष रात्री उशिरापर्यंत साजरा असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वाधिक योग्य उमेदवार असतानाही प्रफूल्ल गुडधे पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना करने काँग्रेसला या निवडणूकीत अडचणीचे ठरले.भोयर यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर देखील राष्ट्रीय स्वयंसंघाच्या दवाबात असल्याचा ‘मॅसेज’सर्वदूर काँग्रेसच्या गोटात पोहोचला होता.त्यामुळे काँग्रेसची खरी लढाई ही भाजपच्या उमेदवारा ऐवजी भोयर यांच्या विरुद्धची ही झाली.
भोयर यांच्या समर्थतेतील ‘असमर्थता’-
पटोले यांनी दिल्लीवरुन आणलेल्या पत्रात भोयर हे निवडणूक लढण्यास ‘असमर्थ’ असल्याने काँग्रेसने अपक्ष उमेदवाराला समर्थन द्यावे,असा उल्लेख आहे मात्र भोयर यांनी वारंवार माध्यमांना दिलेल्या विधानात ते ‘असमर्थ’नाहीत असा उल्लेख केला आहे. त्यांच्या विधानात सत्यताच होती मात्र तेवढीच ‘हतबलता’ते समर्थ असतानाही नियतीने लादलेल्या असमर्थतेत होती कारण खरं ते सांगू शकत नव्हते.काँग्रेसचा ‘अविश्वास ’त्यांना नडला.जी काँग्रेस उमेदवारी अर्ज भरेपर्यंत व दोन दिवस प्रचारासाठी त्यांच्या मागे ठामपणे उभी होती त्याच काँग्रेसने अचानक पवित्रा बदलला होता,‘भोयर हे निवडणूक जिंकल्यानंतर संघाच्या दवाबात भाजपमध्ये परत जातील’ही तथाकथित ‘वस्तूस्थिती’काँग्रेस श्रेष्ठींना कळली होती,असे आता बोलले जात आहे….!
त्यामुळेच भोयर हे फक्त निवडणूकीतील ‘मत पत्रिकेवरील‘ काँग्रेसचे उमेदवार म्हणून मागे उरले,कागदोपत्री लढत ही बावणकुळे आणि मंगेश देशमुख यांच्यात सुरु झाली.
एवढंच नव्हे तर मी आता आयुष्यभर काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून राहील असा दावा करणारे भोयर, हे येत्या काही दिवसातच आपल्या पापाचे प्रायश्चित करुन भाजपमध्ये परत जातील असा ठाम विश्वास भाजप मधील अनेक नेतेच आता खासगीत व्यक्त करीत आहेत कारण राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्र नसतो अशी म्हण प्रसिद्ध आहे.कौटिल्य आणि चाणक्य यांचे ही ‘राजनीतीशास्त्र’ फिके पडतील अश्या रणनीती या निवडणूकीत घडल्या, एवढंच.
या संपूर्ण निवडणूकीत ‘खेला झाला’तो मात्र भोयर यांचा.हा ‘खेला’ तडीस नेला तो केदार यांनी, आता या खेलाची परिणीती, जय किवा पराजयमध्ये झाली तरी काँग्रेसच्या मतदानावर भोयर हे निवडून येणार नाहीत….हा ‘खेला’ मात्र यशस्वी झाला अन् ….काल तुली इंटरनॅशनलमध्ये याच विजयाचा जल्लोष क्रीडा मंत्री सुनील केदार,उर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत,माजी मंत्री रमेश बंग,जिल्हा परिषदेचे संपूर्ण पदाधिकारी,राष्ट्रवादीचे जिल्हातील संपूर्ण मतदार यांच्या उपस्थितीत उशिरापर्यंत साजरा झाला……!

आमचे चॅनल subscribe करा