Homeनागपूर न्यूजमोदींवर अश्‍लाघ्य शब्दात टिका करणा-या भास्कर सुमन यांच्या पुस्तकावर बंदी आणावी

मोदींवर अश्‍लाघ्य शब्दात टिका करणा-या भास्कर सुमन यांच्या पुस्तकावर बंदी आणावी

Advertisements


सामाजिक कार्यकर्ते राजेश डी.देवराजा यांची मागणी

अमॅझोनवरुन पुस्तक हटवावे

नागपूर,ता. १ डिसेंबर:भास्कर सुमन लिखित ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी,राहूल गांधी,ममता बॅनर्जी,संविधान व लोकशाहीचे विचारवैभव’या पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशलाघ्य शब्दात टिका करण्यात आली आहे.मोदी हे देशाचे पंतप्रधान असून देशातच नव्हे तर जगात देखील आदर प्राप्त करणारे नेते आहेत.या पुस्तकामध्ये मोदींसाठी अतिशय अप्रिय,अपमानजनक,अभद्र व आक्षेपार्ह्य लिखाण केले असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ता म्हणून आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे आघाडी सरकारने या पुस्तकावर बंदी आणावी तसेच या पुस्तकाचे अमॅझोनवर लोकापर्ण झाले असून याला दरराेज हजारो लाईक्स मिळतात आहे,हे पुस्तक अमॅझोनवरुन हटवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश डी.[देवराजा] यांनी आज पत्रकार भवनात आयोजित पत्र परिषदेत केली.

याप्रसंगी त्यांच्यासोबात कार्यकर्ते स्वप्नील बालक धरडे उपस्थित होते.यावेळी बोलताना देवराजा म्हणाले की,या पुस्तकात राहूल गांधी व ममता बॅनर्जी यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना, बाबा रामदेव यांना थापाड्या,ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भाजपाचा दलाल असे संबोधले आहे.

एवढ्यावरच लेखक महाशय थांबले नाहीत तर त्यांनी शतकाचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर देखील कठोर ताशेरे आढले आहेत,अक्षय कुमार यांच्याबाबत ही अभद्र टिपण्णी केली आहे.

लेखकाला संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याचा अधिकार निश्‍चितच आहे मात्र याचा अर्थ त्यांना इतरांचे वस्त्रहरण करण्याचा अधिकार पोहोचत नाही,असे देवराजा म्हणाले.वरील सर्व मान्यवरांवर टिका करताना लेखकाने भाषेचे व शब्दांचे भान ठेवायला हवे होते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेताना इतरांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविण्याचा कोणातही अधिकार लेखकाला नाही.मी भास्कर सुमन या लेखकाला ओळखत नाही,मी कधीही त्यांना भेटलो देखील नाही मात्र या लेखकाने ज्या प्रकारची भाषा पंतप्रधान मोदींसाठी आपल्या पुस्तकात वापरली आहे ती कदापि समर्थनीय नाही.

पंतप्रधान मोदी हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अत्यंत दूर्देवी,सदैव वादग्रस्त आणि यशस्वी पंतप्रधान ठरले असे लेखक लिहतो तर लोकशाहीला प्रत्यक्ष छेद देऊन भारतात झोटिंगशाहीचा उदय करणारा पहिला पंतप्रधान, अश्‍या शब्दात देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेख लेखक आपल्या पुस्तकात करतो जे सर्वथा अनुचित आहे.

आपल्या पुस्तकात लेखक हा स्वामी रामदेवबाबांना थापाड्या तर अण्णा हजारे यांना भाजपाचा दलाल अश्‍या शब्दात संबाेधित करतो.

अभिनेता अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांनी एकेकाळी पेट्रोल,डीजेलच्या दरावर केलेल्या ट्वीटवरुन लेखकाने त्यांच्यावर देखील आक्षेपार्ह्य विधान केले आहे.

यामुळेच महाराष्ट्र सरकारकडे आमची मागणी आहे त्यांनी लवकरात लवकर या पुस्तकावर बंदी आणावी तसेच अमॅझोनवर देखील कारवाई करावी.

सरकारने या पुस्तकावर बंदी न आणल्यास न्यायालयात दाद मागू असा इशारा देवराजा यांनी दिला.

Latest बातम्या