

दोषीवर कठोर कारवाई करण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी
नागपूर,ता. १४ नोव्हेंबर: त्रिपुरा येथील कथित घटनेच्या निषेधार्थ शुक्रवार,दिनांक १२ नोव्हेंबर रोजी रजा अकादमी व अन्य सहा संघटनांच्या नेतृत्वात अमरावती, मालेगाव व नांदेड शहरात मोर्चा काढण्यात आला. हा सुनियोजित षड्यंत्राचाच भाग आहे, महाराष्ट्रात स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे मुख्यमंत्री असतानां असे घडणे अनाकलनीय आहे. ३०.००० ते ४०,००० धर्मांध जिहार्दीचा जमाव पूर्ण तयारीनिशी एकत्र येऊन कायदा हातात घेऊन हिंसाचार घडवून आणतात आणि शासन प्रशासन शांत राहून सर्व सहन करते याचा थेट संबंध सरकार पुरस्कृत हिंसाचार असाच होऊ शकतो,असा घणाघाती आरोप विश्व हिंदू परिषदेचे महासचिव मिलिंद परांडे यांनी आज पत्र परिषदेत केला.
एवढा जमाव एकत्र येतो आणि प्रशासनाला आणि शासनाला याची माहिती नसणे हे गुप्तचर विभागाचे मोठे अपयश आहे,असे ते म्हणाले. या तीनही मोर्चात जमाव अनियंत्रित झाल्याने शहराच्या मुख्य मार्गावरील अनेक ठिकाणी तोडफोड तसेच दगडफेक करण्यात आली . औषधी दुकाने, कृषि सेवा केंद्रे, रूग्णालय यासह अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली. काही व्यापाऱ्यांवर तसेच पोलिसांवर, प्रशासनिक अधिकाऱ्यांवर हल्लाही चढविण्यात आला. यात अनेक जण जखमी झाले, यावरून सरकारला, महाराष्ट्राचा ‘बंगाल’ करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. शासन या सर्व घटनांचे मूक समर्थक असल्याची भावाना निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.
हे शांतताप्रिय हिंदू समाजाला वेठीस धरण्याचे व नुकसान पोहचविण्याचे षड्यंत्र आहे. शासन व प्रशासनाने वेळीच सावध व्हावे व भानावर यावे. अन्यथा हिंदू समाज आपले संरक्षण करण्याकरीता घटनादत्त अधिकाराचा वापर करून धर्मांध जिहादीना धडा शिकविण्यास सक्षम असल्याचा इशारा त्यांनी दिला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या गोष्टीचा तीव्र निषेध करते तसेच शासन व प्रशासनास इशारा देते की या सर्व धर्मांध जिहादींना योग्य शासन करून धडा शिकवावा. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे.
विहीपची महाराष्ट्र शासनाकडे हीच मागणी आहे की रजा अकादमी ज्यांनी आव्हान केले त्यांच्यावर एफआयआर दाखल करून संबधितांवर गुन्हे दाखल करावे व त्वरित त्यांना अटक करण्यात यावी. तसेच ज्या दुकानांची, व्यवसायीक प्रतिष्ठानांची , घरांची तोडफोड व जाळपोळ झाली, त्याची संपूर्ण नुकसान भरपाई रजा अकादमी कडून करुन घ्यावी.
मुळात ज्या त्रिपुराच्या घटनेचा उल्लेख रजा अकादमीकडून केला गेला ती घटनाच घडली नाही, भ्रामक व चुकीची माहिती प्रसारीत करून हे सर्व सुनियोजित पद्धतीने घडवले असल्याने यांनाच जवाबदार धरण्यात यावे,असे ते म्हणाले.
विहीपतर्फे ज्या ज्या ठिकाणी रजा अकादमी व त्यांच्या सहका-यांनी या घटना घडवल्या त्या त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय महामहीम राज्यपालांना भेटून संपुर्ण प्रकरणाची माहितीही देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. .
या पूर्वी देखील मुंबई येथील आझाद मैदानावर हिंसाचार करणारे, हुतात्मा स्मारकाला क्षतीग्रस्त करणारे व आता अनावश्यक भ्रामक, जे घडलंच नाही ते सांगून हिंसाचार पसरवणा-या रजा अकादमीला प्रतिबंधित करण्याची मागणी विहीपने केली आहे.
हिंसाचारात सहभागी सर्व संघटनांतील सर्व आयोजक, पदाधिकारी व दोषींना त्वरित अटक करावी तसेच हिंसाचाराशी संबंधित धर्मांध जिहादी संघटनांकडून झालेल्या नुकसानीची वसुली करून या हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्यांना, नुकासान भरपाई करून दिलासा द्यावा, अशी मागणी शासन व पोलिस प्रशासानाकडे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासह व्यापारी संघटना व अन्य संघटनांनी निवेदन देऊन केली आहे.
पत्र परिषदेत विहिंप विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे, प्रांत उपाध्यक्ष डॉ.हेमंत जांभेकर, प्रांत सहमंत्री प्रशांत तितरे, प्रांत प्रचार प्रसार प्रमुख निरंजन रिसालदार उपस्थित होते

आमचे चॅनल subscribe करा