Homeनागपूर न्यूजएनसीबी मुंबई कनेक्शनचे तार मुंद्रा पोर्टपर्यंत : अतुल लोंढे यांचा धक्कादायक आरोप

एनसीबी मुंबई कनेक्शनचे तार मुंद्रा पोर्टपर्यंत : अतुल लोंढे यांचा धक्कादायक आरोप

Advertisements


रविंद्र कदम,सुनील पाटील,समीर वानखेडे,मनीष ,भानुशाली एकमेकांशी संबंधित

भाजपलाच देशाचा ‘उडता भारत’करायचा आहे!

नागपूर,ता. २ नोव्हेंबर: रविंद्र कदम याच्या गाडीचा वापर गुजरात मधून अम्ली पदार्थाच्या तस्करीसाठी झाला,मात्र कदम याच्या नावे असणा-या ‘MH 12JH 3000’या गाडीच्या मूळ मालकाचा पत्ता शोधला असता ती कराड-८१५,माणिक चौक असा असून हा पत्ता खोटा निघाला,एका खासगी पोर्टलला मुलाखात देताना चूकून गोसावी याने स्वत: बोलण्याच्या ओघात तो गुजरात येथील ‘मुंद्रा‘येथे गेला असल्याचे सांगितले मात्र लगेच ही क्लिीप अर्ध्यातच कापण्यात आली,मी माझ्या खासगी कामासाठी गुजरातला गेलो असल्याचा गोसावी याचा दावा आहे,आर्यन खान ड्रग्स प्रकरणी एनसीबी मुंबई कनेक्शनचे तार थेट गुजरातमधील मुंद्रापोर्ट पर्यंत जुळले असल्याचा धक्कादायक आरोप प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत केला.

२२ सप्टेंबर २०२१ रोजी किरण गोसावी हा गुजरातमध्ये गेला,मनीष भानुशाली याचा ‘काम हो गया’असा लघू व्हिडीयो देखील हाती आला असून सॅम डिझूजा याने देखील गाडीत स्वत: ५० लाखांची देवाण-घेवाणची गोष्ट झाली असल्याचे मान्य केले आहे.तीच गाडी गुजरातला गेली होती,या गाडीचा मालक रविंद्र कदम कोण आहे?तो या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड आहे की मोहरा आहे?यात ज्या नीरज यादवचे नाव आले तो मध्यप्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे.

या संपूर्ण प्रकरणावरुन लक्ष वळवण्यासाठी भाजपने आर्यन खानचा मुद्दा समोर आणून ‘हिंदू-मुसलमान’खेळी केली.देशाचा प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी याच्या गुजरात येथील मुंद्रा पोर्टवर २५ हजार किलो अम्ली पदार्थ सापडले.ही जगातली सर्वात मोठी कारवाई होती मात्र यावरुन हेतूपुरस्सर लक्ष विचलीत करण्यात आल्याचा आरोप लोंढे यांनी याप्रसंगी केला.

‘डायरेक्टर ऑफ रेव्हन्यू इन्सिटिट्यूट’(डीआरआय)या संस्थेने मुंद्रा पोर्टवरुन हे हजारो काटींचे ड्रग्स पकडले होते मात्र अचानक त्यांच्याकडून चौकशीचे अधिकार काढून ते प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले.एनआयए ही तपास यंत्रणा केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या अधिकाराखाली येते आणि शहा हे नेहमीच उघडपणे मान्य करतात की अदानी हे त्यांचे ‘परम मित्र आहेत’.त्यामुळेच अदानी हे त्यांच्या पोर्टवर अफगानिस्तान व इराण या दोन देशांमधून कंटेनर उतरणार नाही,असा निर्णय घेत आहेत का?अदानी हे भारत सरकार आणि सार्वभौम संसदेपेक्षाही मोठे झाले आहेत का?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

या देशात भाजप हा तरुणाईला नशेडी,गंजेडी करण्याचे कटकारस्थान करीत असल्याचा धक्कादायक अारोप लोंढे यांनी केला.भाजपच्या हातात पंजाबची सत्ता होती तेव्हा त्यांनी ते राज्य ‘उडता पंजाब’केले,तसाच आता भारताला भाजपला ‘उडता भारत‘करायचा असल्याचे ते म्हणाले.
समीर वानखेडेला अटक करण्याची मागणी करीत रविंद्र कदम कोण?याचा शोध घेण्याची विनंती राज्यातील गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या संपूर्ण प्रकरणाचा तपास ‘इकानॉमिक ऑफेन्स विंग‘(ईओडब्ल्यू)व गुन्हे शाखाकडे सोपवण्यात यावा अशी मागणी करणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले.

आजपर्यंत देशाच्या इतिहासात स्वायत्त संस्थांचा वापर अश्‍याप्रकारे राजकीय लाभासाठी झाला नाही,असे ते म्हणाले.या संपूर्ण प्रकरणाला भाजपचा ‘शुभ आर्शिवाद ’ असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला.

रविंद्र कदम,सुनील पाटील,समीर वानखेडे,भानुशाली हे सगळे एकमेकांशी संबंधित आहेत.सॅम डिझूजा,मनीष भानुशाली यांचे छायाचित्रही व्हायरल झाले आहेत.

मलिक यांचे आरोप हे एका मंत्र्यांनी जवाबदारीने केलेले आरोप असल्याचे लोंढे म्हणाले.पुराव्याशिवाय नवाब मलिक हे अारोप करणार नाहीत,जाणीवपूर्वक महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी हे संपूर्ण कटकारस्थान भाजपतर्फे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

फटाके दिवाळीत फोडतात:फडणवीसांना टोला

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांनी केलेल्या आरोपांवर पत्र परिषद घेताना ते या संपूर्ण प्रकरणावर दिवाळी नंतर फटाके फोडणार असल्याचे म्हणाले मात्र फटाके हे दिवाळीतच फोडत असतात,दिवाळी नंतर नाही,असा टोला हाणत फडणवीस यांनी त्यांच्या संपूर्ण पत्र परिषदेत एकदाही मलिक यांनी केलेल्या आरोपांचे खंडण केले नाही, तर नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबतचे कनेक्शन उघड करणार अल्याचे सांगितले.ते राज्याचे ५ वर्ष मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी कारवाई का नाही केली?
हा लढा दोन पक्ष,दोन व्यक्तींमधला नाही, ही लढाई देशाच्या भविष्याची आहे.दूर्देवाने या लढाईत तथाकथित ‘देशभक्तचांच’ सहभाग असल्याचा आढळून येतोय,असे ते म्हणाले.

आर्यन खान व अर्णव गोस्वामी यांना वेगळा न्याय का? मुस्लिम तरुणाईने आम्ली पदार्थाचे सेवन केल्यास ते मुस्लिम असल्याने कारवाई होऊ नये असे तुमचे म्हणने आहे का?‘सत्ताधीश’च्या या प्रश्‍नावर शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे मग ते कोणत्याही धर्माचे असोत,असे लोंढे म्हणाले,अर्णव गोस्वामी यांच्या व्हॉट्स ॲप चॅटमध्ये त्यांनी न्यापालिकेला मॅनेज केले असल्याचे गंभीर चॅट्स होते मात्र काय कारवाई झाली? त्यामुळेच आर्यन खान व अर्णव गोस्वामी यांना स्वायत्त संस्था फक्त व्हॉट्स ॲप चॅट्स वरुन वेगवेगळा न्याय का देत आहेत,असे विधान मी केले होते.आर्यन खानची मेडीकल टेस्ट करण्यात आली नाही,त्याला कायदेशीर अधिकार पुरविण्यात आले नाहीत,त्याच्या मित्राच्या बूटात ६ ग्रॅम अम्ली पदार्थ सापडलेत तर या तरुणांना २८ दिवस कारागृहात राहावे लागले मात्र मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींची व हजारो किलोंचे अम्ली पदार्थ सापडतात त्या तपासाचं पुढे काय होतं?असे उत्तर त्यांनी दिले.

साक्षीदारांना संरक्षण देण्याऐवजी या प्रकरणात साक्षीदारांना समाेर आणल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Latest बातम्या