फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजवैद्यकीय विज्ञान बदलतंय,ज्ञानकक्षा वाढवणे काळाची गरज

वैद्यकीय विज्ञान बदलतंय,ज्ञानकक्षा वाढवणे काळाची गरज

Advertisements


नवजात शिशूवरील तीन दिवसीय‘ महा न्यूओकॉन परिषद-२०२१’ शुक्रवारपासून
नागपूर, ता. २० ऑक्टोबर २०२१: वैद्यकशास्त्रात दररोज नवे संशोधन पुढे येत आहे. नवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. मात्र बालमृत्यू रोखण्यात अद्याप वैद्यकशास्त्र मागे असल्याचं दिसून येतं. देशात २४ तासांमध्ये ६७ हजार ३८५ बाळ जन्माला येतात. मात्र त्याच तुलनेत दर मिनिटाला एक बाळ दगावत असतात असे भयावह चित्र आजही दिसत असल्याची खंत उपराजधानीतील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत व्यक्त केली.परिणामी सातत्याने बदलत जाणा-या वैद्यकीय विज्ञानाच्या ज्ञानकक्षा आत्मसात करण्याची नामी संधी या परिषदेतून मिळणार असल्याचे परिषदेचे प्रमुख व उपाध्यक्ष डॉ.जयंत उपाध्येय यांनी सांगितले.

देशात बालमृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकतं फक्त गरज आहे निरनिराळ्या भागातील बालरोगतज्ज्ञ तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना योग्य ज्ञान देऊन पारंगत करने याची.यासाठीच शुकवारपासून १७ व्या वार्षिक‘ महा न्युओकॉन परिषदेचा’ शुभारंभ होत असल्याची माहीती त्यांनी दिली. महाराष्ट्र, राजस्थान, गोवा आणि गुजरात या राज्यातील बालरोग तज्ज्ञांची ही परिषद आहे. नवजात शिशूंसंदर्भात विशेष तांत्रिक सत्र, कार्यशाळा होणार असल्याची माहिती डॉ. जयंत उपाध्ये यांनी दिली. नवजात शिशूंचे आरोग्य सांभाळण्यासाठी आगामी काळात वैद्यकीय क्षेत्रातील नवीन संशोधनाचे तसेच ज्ञानाचे आदानप्रदान व्हावे, या हेतूने ही परिषद आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.

कमी दिवसांचे,कमी वजनाचे बाळ जन्माला येणे,निरनिराळ्या संसर्गातून बाळ दगावणे,नवजात शिशूंवरील शस्त्रक्रिया, जन्मानंतर तासाभरात होणारे मृत्यू, कोरोना काळातील आरोग्य समस्या अशा विविध विषयांवर तांत्रिक सत्र होतील,अशी माहिती डॉ.उपाध्येय यांनी दिली.परिषदेत चार सत्रात देशातील तज्ज्ञ हे मार्गदर्शन करणार आहेत.प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय आभासी पद्धतीने देखील भारताच्या निरनिराळ्या भागातून बालरोगतज्ज्ञ तसेच वैद्यकीय क्षेत्रतील तज्ज्ञ यात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नवजात मूलांच्या तुलनेत नवजात मुलींचा मृत्यूदर हा अधिक असल्याची माहिती डॉ.उदय बोधनकर यांनी दिली.याला बरेच सामाजिक,आर्थिक,भावनिक संदर्भ असल्याचे ते म्हणाले.बाळ जन्माला येण्यापूर्वी व आल्यानंतर नवजात शिशुच्या उपचाराबाबत,काळजीबाबत बरेच टप्पे असतात,यातील अनेक बाबींचा शोध लागला असून ते ज्ञान इतरांनाही मिळणे काळाची गरज असल्याचे डॉ.वसंत खडतकर यांनी सांगितले.‘हेन्डलिंग न्यू बॉर्न बेबी’हा सर्वस्वी आव्हानात्मक विषय असल्याचे त्यांनी सांगितले.

नाेव्हेंबरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव हा नाहीसा होणार असल्याने ही परिषद ऑन-लाईन ऐवजी प्रत्यक्ष घेण्यात येत असल्याचे डॉ.धोटे यांनी सांगितले.लहान बालकांचे अकाली मृत्यू,आजार याबाबत विचारांचे आदान-प्रदान या परिषदेच्या माध्यमातून होणार असल्याचे ते म्हणाले.
बाळ जन्माला आल्याबरोबर रडायलाच हवा अन्यथा त्याच्या मेंदूवर याचा गंभीर परिणाम होत असतो.बाळ जर रडला नाही तर त्यासाठी नेमके काय करायला हवे?याचेच प्रशिक्षण या परिषदेच्या माध्यमातून बालरोगतज्ज्ञ,पॅरा मेडीकल स्टाफ,परिचारिका आदी यांना मिळणार असल्याचे डॉ.संजय देशमुख यांनी सांगितले.केंद्र सरकारचे ‘नवजात शिशू सरंक्षण’या कार्यक्रमाचा देखील सविस्तर उहापोह परिषदेत होईल.

नवजात अभ्रकाला जन्माला आल्याबरोबरच काही समस्या उद् भवल्यास तो ‘गोल्डन पिरेड’घालवणे घातक ठरतं.याशिवाय उपचारासाठी वेळेवर धावपळ हे देखील बाळाच्या जिवितासाठी धोकादायक ठरु शकतं.मेळाघाटसारख्या अतिदुर्गम भागातील अभ्रकासाठी तर उपचारासाठी प्रवास किंवा कमीत कमी संसाधनामध्ये उपचार या दोन्ही बाबी जोखिमेच्या ठरतात.अश्‍यावेळी वेळेवर उपलब्ध असणा-या कमीत कमी संसाधनामध्ये नवजात अभ्रकावर कोणते व कसे उपचार करावे,याचे ज्ञान वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनाच असणे अत्यावश्‍यक आहे.या परिषदेतून हे सर्व ज्ञान उपस्थितांना उपलब्ध होणार असल्याचे डॉ.अनिल राऊत यांनी सांगितले.कमी वजनाचं बाळ कसं हाताळावं,याचे देखील ज्ञान या परिषदेच्या माध्यमातून मिळणार आहे.

वैद्यकीय विज्ञान झपाट्याने बदलत आहे.मूळ प्रश्‍न नवाजात शिशूची योग्य काळजी आणि मृत्यू दर आटोक्यात आणने हा आहे.एवढे ज्ञान व संसाधन उपलब्ध असतानाही अद्याप आपण बालमृत्यू दर शून्यावर आणू शकलो नाहीत.त्यामुळेच निश्‍चिच ध्येय साध्य करण्यासाठी जनजागृतीचा उपयोग या परिषदेच्या माध्यमातून होणार असल्याचे डॉ.योगेश पापडे म्हणाले.

पत्रकार परिषदेला डॉ. अविनाश गावंडे, डॉ. वसंत खडतकर, डॉ. विजय धोटे, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. विजय गव्हाणे, डॉ. अनिल राऊत, डॉ. मिलिंद मंडलिक, डॉ.संजय देशमुख, डॉ. सोमशेखर निंबाळकर,डॉ.योगेश पापडे, आदी उपस्थित होते.

रविवारी सकाळी उद् घाटन-
बालरोग तज्ज्ञांच्या न्युओकॉन -२०२१ परिषदेचे उद् घाटन रविवारी (ता. २४) सकाळी १० वाजता रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन होईल. दरम्यान २२ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या नवजात शिशूंसह बालरोगावर विशेष शोधप्रबंध सादर करण्यात येणार आहेत. परिषदेत सुमारे ५०० बालरोग तज्ज्ञ, नवजात शिशूरोग तज्ज्ञ उपस्थित राहतील.२२ ऑक्टोबर रोजी वैद्यकीय तज्ज्ञ,वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्यासाठी सकाळी ९ ते ५ वा.दरम्यान विशेष प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या