

‘हरित व स्वच्छ उर्जा’उपक्रम
नागपूर,ता. २२ जानेवारी: भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पेट्रोलियम पदार्थांचे नैसर्गिक स्त्रोत हे अतिशय मर्यादित आहेत त्यामुळे एक ना एक दिवस ते या भू-तळावरुनच संपुष्टात येणार आहे मात्र आजच्या आधुनिक व धकाधकीच्या जगात सध्या तरी प्रत्येकाला आपली दैनदिन दिनचर्या पेट्रोलियम पदार्थांच्या वापराशिवाय पार पाडणे शक्य नाही मात्र असे असले तरी वर्षातून किमान एक महिना तरी आपण या नैसर्गिक उर्जेच्या स्त्रोताची थोडी तरी बचत करु शकतो याच उद्देशाने ‘सक्ष् म-२०२१’(सरंक्ष् ण क्ष मता महोत्सव)हा एक महत्वाचा राष्ट्रीय उपक्रम पृथ्वीवरीलअसून नैसर्गिक ईंधन वाचवणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे इंडियन ऑईलचे वरिष्ठ व्यवस्थापक व जिल्हा समन्वयक अधिकारी जे.के.देशमुख यांनी आज प्रेस कल्ब येथे आयोजित पत्र परिषदेत सांगितले.
याप्रसंगी भारत पेट्रोलियमचे राजीव नार्वेकर तसेस एचपीसीएलचे डॉ.अक्ष् त गंगवाल उपस्थित होते.ही पत्रकार परिषद इंडियन ऑईल, एचपीसीएल,पीसीआरए,भारत पेट्रोलियम व गेलतर्फे संयुक्तरित्या आयोजित करण्यात आली होती.पुढे बोलताना देशमुख हे म्हणाले की देशात आपण दररोज पेट्रोलचे विविध उत्पादन वापरतो.दररोज पेट्रोलियम पदार्थांची विक्री होते आणि ग्राहक ती वापरत असतात. मात्र भारत सरकारची योजना आहे की वर्षातून अकरा महिने तर आपण पेट्रोलियम उर्जेचा वापर तर करीत असतोच मात्र दरवर्षी १५ जानेवारी ते १६ फेब्रुवारी दरम्यान किमान हा एक महिना तरी भारतीय नागरिकांनी कमीत कमी प्रमाणात या उर्जेचा वापर करावा,यामुळे या नैसर्गिक उर्जेची बचत होईल व पर्यावरणाला देखील फायदा पोहोचेल.
यासाठीच सक्ष् म-२०२१ या उपक्रमाची सुरवात भारत सरकारने केली असून नुकतेच महाराष्ट्राच्या तेल उद्योगातर्फे आयोजित १६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०.३० वा. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यिारी यांच्या हस्ते या उपक्रमाचे ऑन लाईन उद् घाटन पार पडले.हा कार्यक्रम यू-ट्यूबवर थेट प्रक्ष्ेपित करण्यात आला असून या कार्यक्रमाला २१०८ पेक्ष्ा अधिक प्रेक्ष् कांची पसंती मिळाली.या प्रसंगी इंधन संवर्धन प्रतिज्ञा देखील घेण्यात आली.या उद् घाटनपर कार्यक्रमात राज्यपाल यांच्या व्यतिरिक्त बीपीएसचे कार्यकारी संचालक रवी.पी.एस,आयओसीचे कार्यकारी संचालक अमिताभ अखौरी,गेलचे कार्यकारी संचालक गौतम प्रसाद, एचपीसीचे विभागी प्रमुख डी.एन.कृष्णमूर्ती, पीसीआरए वेस्टचे संचालक अभिजित घोष तसेच महाराष्ट्राचे राज्यस्तरीय समन्वयक संतोष निवेंडकर उपस्थित असल्याची माहिती त्यांनी दिली.
हा एक महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम असून आपल्या देशाच्या उर्जा सुरक्ष्ा,शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्ष् णासाठी भारत सरकारने हा उपक्रम सुरु केला असल्याची माहीती त्यांनी दिली.जीवाश्म इंधनावरील व्यर्थ खर्चाला आळा घालणे,परकीय तिजोरीवरील वाढते ओझे कमी करणे आणि जीवाश्म इंधनांच्या ज्वलनशीलतेमुळे निमार्ण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामांपासून पर्यावरणाचे रक्ष् ण करणे हे या कार्यक्रमाचे अंतिम लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना(पीसीआरए)पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समनव्यक यांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्या संबधित राज्य सरकारच्या सक्रीय सहभागाने आणि पाठिंब्याने विविध उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात प्रामुख्याने शाळा,महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी इंधन संवर्धन,पेट्रोल पंप,गॅस एजन्सीज इ.बाबत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.याशिवाय बैठक,कार्यशाळा इ.द्वारे इंधन संवर्धनावरील मोहिमा,गृहीणींसाठी गट चर्चा, विविध सामाजिक संस्थांसाठी मोहिम,ईंधन कार्यक्ष् म ड्रायव्हिंग स्पर्धा,रेडीयो व दूरचित्रवाणीवरील चर्चा इ.उपक्रम आयोजित केले असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्यात सक्ष् म-२०२१ या उपक्रमात सुमारे २४ विविध उपक्रमांचे अायोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी २००० पेक्ष्ा अधिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या वर्षातील राज्य पातळीवरील बेस्ट डेपोसाठी पीसीआरए पुरस्कार बेस्ट-मुंबई,एमएसआरटीसी-मुंबई आणि पीएमपीएमएल-पुणे यांना ४ प्रवर्गावर आधारित पुरस्कार घोषित करण्यात आले.गेल्या वर्षीच्या तुलनेत केएमपीएल मधील ‘जास्तीत जास्त सुधारणा’ या निकषावर बेस्ट डेपोला वार्षिक चषक व रोख पुरस्कार देण्यात आल्याची माहिती या प्रसंगी त्यांनी दिली.
पेट्रोल व डिजेलच्या दरवाढीविषयी प्रश्न उपस्थित केला असता या प्रश्नाच्या उत्तरासाठी ते सक्ष् म प्राधिकरण नसल्याचे त्यांनी सांगितले.या प्रश्नाचे उत्तर वरीष्ठच देऊ शकतील. इथॉनलवरील प्रश्नाबाबत बोलताना डॉ.गंगवाल यांनी पेट्रोलध्ये चांगली बचत होत असून देशासाठी अत्यंत महत्वाची उर्जा असल्याचे सांगितले.इथॉनलचा पेट्रोलमधील वापरामुळे दरा मध्ये देखील खूप तफावत संभवते,असे उत्तर त्यांनी दिले.

आमचे चॅनल subscribe करा