
आपल्या शहरातील पर्यावरण रक्षणासाठी लढतच राहू
इंटरमॉडल अजनीत नको:अभ्यासाअंतीचे निष्कर्ष भीतीदायकच
लहान मुलेही भरडली जातील:नागपूरचं पर्यावरण संतुलन आणखी कोलमडणार
भूगर्भातील पाण्याची पातळी होणार असंतुलित:ॲसिडिटी आणि किटकांचा वाढणार त्रास
नागपूर शहर डेंग्यूसदृष्य आजारांची होणार राजधानी!
इंटर मॉडल खापरी किवा अन्य पाच ठिकाणी होऊ शकतं स्थानांतरित :पर्यायी वृक्षारोपण अशास्त्रीय आणि अपयशी
सूूूूूबाभूळ ही ‘कूबाभूळ’नाहीच:ती देखील आहे हिरवा आच्छाद:हजारो पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास
नागपूर,ता.२५ फेब्रुवारी २०२२ : अजनीतील अडीच हजार कोटींच्या इंटर मॉडल स्टेशनचे कवित्व हे आता वैचारिक,बौद्धिक,भावनिक,नैतिक,व्यवसायिक व राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या टिपेला पोहोचले असून शहरातील पर्यावरणवादी त्यात ही मोठ्या प्रमाणात युवा वर्ग हा पदरातला पैसा खर्च करुन ही लढाई सोशल मिडीयापासून तर न्यायालयाच्या पटलापर्यंत जीव तोडून लढताना दिसतोय,नुकतेच पर्यावरणवाद्यांच्या या संघर्षाला ‘मंत्री मिडीयातील’ एका ज्येष्ठ पत्रकारानी एका खुल्या मंचावर नागपूरच्या विकासाला बाधा पोहोचवणारे‘पर्यावरण माफिया’अश्या शेलक्या शब्दात संबोधित केले,यावर शहरातील पर्यावरणवादी यांनी आज एकत्रितपणे प्रेस क्लब येथे पत्र परिषद आयोजित करुन अजनीत इंटर मॉडल स्टेशन का नको,याचा अभ्यासपूर्ण आलेख मांडला,या प्रकल्पामुळे केवळ पर्यावरणाचेच अतोनात नुकसान होणार नसून, मानवाच्या शरिरावर काय दुष्परिणाम होतील याचा आलेखच उपस्थित तज्ज्ञांनी मांडला.‘सेव्ह अजनी वन’मोहिमेसाठी एकत्रित आलेल्या पर्यावरणवाद्यांनी या वेळी आम्हाला ‘पर्यावरण माफिया’ही उपाधी देखील हात जोडून कबूल आहे,जर आपल्या घरातलं,आपल्या शहरातलं कधीही भरुन न निघणारा पर्यावरणीय विध्वंस वाचवण्यासाठी प्रयत्न करने,लढा देने,त्यासाठी आवाज उठवणे ही ‘माफियागिरी’आहे तर आम्हाला ही उपाधी आनंदाने स्वीकृत असल्याचा टोला,टिकाकारांवर हाणला.
अजनीवनला असणारा विरोध हा फक्त विरोधासाठी विरोध नसून संपूर्ण अभ्यासाअंतीची प्रतिक्रिया असल्याचे सुरवातीलाच अनसूया काळे-छाबरानी यांनी स्पष्ट केले.विकासाला आमचा विरोध नाहीच ना इंटर मॉडल स्टेशन प्रकल्पाला, मात्र हा प्रकल्प जर शहरातील मध्य भागातीत एकमेव हरित पट्टा उरलेल्या म्हणजे किमान चाळीस हजार झाडे कापून होणार असेल तर याचे या शहराच्या पर्यावरणावर,मानवी जिवनावर,जिवजंतूंवर,भूगर्भातील पाण्याच्या पातळीवर,सतत वाढत असणा-या शहरातील उष्णतेवर काय परिणाम होतील?यावर बोलणे,सांगणे,जनजागृती करने म्हणजे आम्ही विकास विरोधी आहोत असा होत नाही.मूळात आमचा प्रकल्पाला विरोधच नाही,तो प्रकल्प नागपूर शहराचे पर्यावरणीय संतुलन बिघडवून होऊ नये एवढीच आमची मागणी आहे आणि यासाठीच आमचा लढा असल्याचे त्या म्हणाल्या.त्यामुळेच या प्रकल्पासाठीच्या जागेचा पुनर्विचार झाला पाहिजे हीच आमची आग्रही मागणी आहे.नागपूर शहराचे खासदार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे नेहमी सांगतात इंटर मॉडल स्टेशन हे त्यांचे स्वप्न आहे परंतू ‘हे स्टेशन होने हे त्यांचे स्वप्न आहे की ते अजनीवनमध्येच होने हे त्यांचे स्वप्न आहे?’असा खरमरीत सवाल त्यांनी केला.केंद्रिय मंत्र्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी, पर्यावरणाचा अपरिमित -हास हा किमान आमची सुशिक्ष्त व जागरुक युवा पिढी ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नसल्याचे त्यांनी ठणकावले.या विषयावर व्यापारी वर्गाने देखील पत्र परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली,लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्तिचे स्वातंत्र्य आहे,आम्हाला देखील आमची भूमिका ठामपणे मांडण्याचा अधिकार भारताचा संविधान देतो,मग आमचे अभिव्यक्तिचे स्वातंत्र्य हे इतरांच्या नजरेत ’माफियागिरी’कशी काय होऊ शकते?असा खणखणीत सवाल त्यांनी उपस्थिति केला.आमच्या मोहिमेला लिखित तसेच ऑन-लाईन समर्थन देणारे चाळीस हजार नागरिक हे देखील माफिया आहेत का?अनेक पत्रकारांनी आमच्या चळवळीच्या समर्थनार्थ वृत्त प्रसिद्ध केले मग ते देखील माफियाच्या श्रेणीत येतात का?मूळात या प्रकल्पासाठी ४९० एकरची जागा हवीच कशाला?यामुळे कापल्या जाणा-या झाडांची संख्या,ती देखील ५० ते १०० वर्षे जुनी असणारी हॅरिटेज झाडांची संख्या ही चाळीस हजारांपर्यंत पोहोचली असून ही झाडे कापून या जागेवर बांधणार काय?तर मॉल्स,कमर्शियल इमारती,हॉटेल्स?म्हणजे नैसर्गिक जंगल कापून सिमेंट क्रांक्रिटचे जंगल उभारणार आणि यालाच २०५० साठीचा विकास हे ‘गोंडस’ नाव देणार,२०५० सालच्या पिढीसाठी तरी पर्यावरणीय शुद्धता,नैसर्गिक श्वासांचा विचार या प्रकल्पात आहे का?आमचा प्रकल्पाला विरोध नाही पण अजनीवनची हजारो झाडे नामशेष करुन आमच्या पिढीला असा ‘अशाश्वत’विकास नको,असे मत अनसूया यांनी मांडले.
सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.वसंत खळतकर यांनी झाडांचा थेट संबंध पर्यावरणाशी आणि मानवी फूफ्फूशांची येत असल्याचे सांगितले.लहान मुलांची फूफ्फसे ही प्राणवायूमुळेच विकसित होत असतात.नुकतेच दिल्लीतील बारा कुटूंबे ही नागपूरात वास्तव्यास आली कारण त्यांच्या मुलांच्या फूफ्फूसांसाठी दिल्लीतील प्रदुषण हे घातक ठरत होतं.केवळ दिल्ली नव्हे तर ऑस्ट्रेलियासारख्या देशातून देखील अनेक नागरिक नागपूरला परतली आहेत कारण त्यांच्या मुलांना प्रदुषणामुळे कायम,अस्थमा,दमा,सर्दी,खोकल्याचा त्रास वारंवार होत आहे,आता याला जवाबदार कोण?प्रदुषणाच्या बाबतीत नागपूरचं देखील ‘दिल्ली’ होऊ नये व शहर स्वस्थ रहावे तसेच लहान मुलांचे, मानवी फूफ्फूसांचे ‘स्वास्थ‘ स्वस्थ झालीच पाहिजे.लहान मुलांची फूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूफ्फूसे विकसित होत असताना त्यांना भरपूर व शुद्ध हवेची गरज असते.करोनाकाळात आपल्याला प्राणवायूचे महत्व कळालेच आहे.
वृक्षतज्ज्ञ प्राची माहूरकर यांनी अजनी हे ‘वन’ नाही असे उपहाासात्मक बोलल्या जातं,अनेक खुल्या व्यासपीठावर शहरातील राजकीय नेत्यांनी याची टिंगल देखील उडवली.शहरी वन ही देखील एक संकल्पना असते.शहरी वन म्हणजे ‘झाडांचा समूह’अजनीवनच्या पहील्याच टप्प्यात एक हेक्टर जागेवरच हजारो झाडे आज अस्तिवात आहेत,ती अचानक तर त्या जागेवर नाही आली?त्यातील अनेक झाडे ही तर ५० वर्षे जुनी असून महाराष्ट्र कायदा १९७५ तसेच २०२१ च्या हेरिटॅज झाडांच्या व्याखेत चपखळ बसतात.आता ही झाडे किती वर्षे वयाची आहेत हे मोजण्यासाठी यंत्रांची गरज आहे.या एक हेक्टर जागेवरच धावडा,विद्या,वड,पिंपळ यासारखी अनेक झाडे असल्याचे त्यांनी सांगितले.ही वृक्षेच आजपर्यंत पावसाला आपल्या भागात खेचून आणण्यात मोठी भूमिका बजावत आहेत.पाऊस पडतो तेव्हा वारा किती किलोमीटर ढगांना दूर ढकळतो?४०० ते ४५० किलोमीटर ढगांना वारा हा दूर ढकळत असतो मात्र झाडे ही ढगांना ८०० किलोमीटर अात खेचून आणण्याचे काम करीत असतात.
माधूरी कानिटकर म्हणाल्या की,या ठिकाणी फक्त निरुपयोगी असे सूबाळूलचीच झाडे सर्वाधिक आहेत असा बचाव अजनीवन प्रकल्प समर्थक ‘सोयीस्करपणे’ करतात.पण सुबाभूळ हा देशी बाभूळ असून गुरांच्या पौष्टिक चा-यासांठी उपयोगात आणली जातात.१९८० पासूनच सुबाभूळ हा गुरांचा हाय प्रोटिनयुक्त चारा असल्याचे सिद्ध झाले आहे.या सुबाभूळचे आयुर्वेदात देखील अनन्यसाधारण महत्व असल्याचे पंचागाचा वापर करणा-यांनाही माहिती आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे सुबाभूळची ही शेकडो झाडे जमीनीसाठी ग्रीन कव्हरचे काम करतेच अाहे ना?सूर्याची अल्ट्रा किरणे सरळ जमिनीवर पडण्यापासून राेखतेच ना?पाच वर्षांंपूर्वी सरकारच या सुबाभूळचे बहूपयोगी महत्वाचे गोडवे गात होती मात्र अचानकपणे सरकारने गेल्या पाच वर्षांपासून सूबाभूळचे गोडवे गाणे बंद केले!ही प्रजाति नैसर्गिक आहे विशेष म्हणजे एका झाडापासून अनेक झाडांची निर्मिती होत असल्याने भराभर चांगली हिरवाई तयार होत असते.सर्वात महत्वाचे म्हणजे ही झाडे देखील माणसाला प्राणवायुचा पुरवठा करतेच ना?मात्र सरकारने आपल्या धोरणातच सुबाभूळला निरुपयोगी करुन टाकले व कापण्यायोग्य झाडांच्या श्रेणीत टाकून दिले,याला सरकारचे अज्ञानच म्हणावे लागेल.सूबाभूळ ही ’कू’बाभूळ नाही.अनेक पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास त्या झाडांवर आहे.आम्ही केलेल्या सर्वेक्षणात पाच प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास व त्यांची घरटी या झाडांवर आहे.शुक्रवारी तलाव जवळ असल्याने पक्ष्यांनी घरटी करुन राहण्यासाठी या झाडांना स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले.सुबाभूळमुळेच जमीनीला नायट्रोजन मिळतंय,मानवाला प्राणवायू मिळतोय तरी देखील पूर्वग्रहदूषित होऊन या झाडांचे महत्व एका ‘भौतिक’ प्रकल्पासाठी नाकारता?असा सवाल त्यांनी केला.
याप्रसंगी डॉ.हर्षा सिंघानी यांनी सांगितले,की नागपूरात प्राणवायू वेळेवर न मिळाल्यामुळे एकेका दिवसात शंभर-शंभर मृत्यू कोरोना विषाणूमुळे झालेला नागपूरकरांनी अनुभवला आहे.या विषाणूने आपल्याला काय शिकवले तर ‘सांसे हो रही है कम आओ पेड लगाये हम’एकीकडे आपण झाडे लावण्याची वलग्ना करतो दूसरीकडे लागलेली,जगलेली,रुजलेली आणि मानवी जिवनाशी एकरुप झालेली चाळीस हजार झाडे चार टप्प्यात कापण्यास तत्पर होतो?सूर्याची अल्ट्रा रेंज हीच झाडे थांबवित असतात.यामुळे आपल्याला त्वचेचा विकार होत नाही.सूर्याच्या प्रखर किरणांमुळे एक्झीमा वाढतो.शुद्ध हवा,पाण्याचे संतुलन ही फक्त वनेच राखू शकतात.वनातच आपल्याला याचा प्रत्यय येत असतो.वने नष्ट होताच मानवी शरिरावर त्याचे दुष्परिणाम होतात.ॲसिडिटी वाढते,एवढंच नव्हे तर आज अजनीवनातील झाडांमुळेच किटक,मच्छर हे झाडांच्या आश्रयाने राहतात,तीच जर नष्ट झाली तर ते किटक व मच्छर माणसाच्या घरात आश्रयाला येतील.या किटकांपासून विविध आजार वाढतील.‘नागपूर ही तर डेंग्यूची राजधानी होऊन जाईल’.ज्याप्रमाणे अमेरिकेत झिका आणि सॉर्स विषाणूने धुमाकूळ घातला त्याचे कारण पर्यावरणच आहे.हे विषाणू आता तिथे वातावरणाचा एक भाग झालेले आढळतात.आता तर कारोना विषाणू हा मानवी जीवनाचा एक भाग होऊ पाहतोय आणि या विषाणूपासून मानवी फूफ्फूसाचे संरक्षण करायचे असल्यास वातावरणातील प्राणवायुचे जतन व रक्षण करने किती गरजेचे आहे,हे वेगळे सांगायलाच नको. हवा आणि पाण्यात बदल नको.हवा संपली तरी पाणी देखील संपेल.जगभरातील सायक्रेटीक्स हेच सांगतात,मानवी मनाला आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा डोळ्यांसमोर हिरवळ असते.यामुळे मनावरचा तनाव निवळतो.अमेरिका,जापान या देशातील संशोधन हेच सांगतात हिरवळीमुळे डोळ्यांनाही स्वस्थता लाभते.हेमलकसामध्ये स्वत:डॉ.प्रकाश आमटेंनी ‘ग्रीनोथॉन’ची संकल्पना मांडली आहे.चालत राहा आणि जिथे थांबाल त्या ठिकाणी एक झाड लावावं लागेल.अजनीवनाची झाडे ती ही हॅरिटेज झाडे हीच आम्हाला आजपर्यंत वाचवत आली आहे.बंगलौर सारखे आयटी हब झालेले शहर आज कर्करोगाचे देखील शहर झाले आहेत याचे कारण हिरवळ नष्ट करुन प्रदुषण वाढवणे हेच आहे.
वासुदेव मेश्राम यांनी यावेळी रेल्वे लॅण्ड डेव्हलपमेंट ॲथोरिटी व गडकरी यांचे मंत्रालय असणारे नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडियामघ्ये झालेला ‘मेमोरेंडम ऑफ अंडरस्टॅडिंग’(एमओयू)वाचून दाखवला.यात या प्रकल्पाचा पहीला टप्पा एकूण ४४ एकरमध्ये होणार असून संपूर्ण प्रकल्प हा ४४६ एकरमध्ये होणार असल्याचे नमूद आहे.याचा अर्थ फक्त स्टेशन नाही तर कमर्शियल बांधकाम होणार असल्याचे यात नमूद आहे.आता महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात समाविष्ट झालेल्या नव्या कायद्यानुसार झाडांच्या बाबतीत, प्रकल्पाच्या एका टप्प्या-टप्प्पयासाठी नाही तर संपूर्ण प्रकल्पासाठीच एकसाथ परवानगी घेण्याचे नमूद आहे.मात्र अजनीवनच्या प्रकल्पात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पहील्या टप्प्यासाठीच ४४ एकरमधील झाडे कापण्याची परवानगी मागितली आहे जी नव्या कायद्यानुसार अवैध ठरते.आता या प्रकल्पासाठी या विभागाला एकसाथ संपूर्ण प्रकल्पासाठी किती हेरिटॅज झाडे कापावी लागणार आहे याची माहिती द्यावी लागणार आहे.टप्प्या-टप्प्याच्या परवानगीत ती संख्या ‘लपली व लपवली’ जात होती.नागपूर महानगरपालिकेने ४४ एकरच्या पहील्याच टप्प्यासाठी एकूण ६ हजार ९५३ झाडे कापण्यासाठी जाहिरात देऊन आक्षेप मागितले होते यावरुन चार टप्प्यातील या प्रकल्पात चाळीस हजारच्या वर झाडे कापली जाणार असल्याचे मेश्राम याने सांगितले.
संदीप पथे याने म्हटले,की हा प्रकल्प सोयीस्कर वाहतूक जोडीसाठी होत असल्याचे म्हटले जात आहे मात्र यामुळे रोजगार किती निर्माण होणार आहेत?असा प्रश्न उपस्थित केला.अापल्यापेक्षाही औरंगाबाद हा पुढे गेला आहे.तुम्हाला नागपूरात खरोखरच रोजगार निर्माण करायचे असल्यास हा प्रकल्प खापरी येथे उभारा ज्यामुळे मिहानला बुस्ट मिळेल.बुटीबोरी,एमआयडीसीसाठी तो लाभकारक होईल.मोड ऑफ ट्रांसपोर्टचा नेमका अर्थ काय आहे?जिथे खूप गर्दी होते,वाहतूकीची कोंडी होते ती गर्दी शहराबाहेरच थांबवावी,तुम्ही तर शहराच्या मधोमधच गर्दीचा ‘गेट-वे’ निर्माण करीत आहात.२०५० साली जेव्हा नागपूरची लोकसंख्या ही दुपटीने वाढलेली असेल तेव्हा अजनीमधील इंटर मॉडल स्टेशनमुळे कल्पना ही करता येणार नाही एवढी ट्राफिक कोंडी प्रकल्पातील अंडर व ओवर ब्रिजमुळे होणार असल्याचा अभ्यास त्यांनी मांडला.
कुणाल मोर्य याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पेंचच्या टायगर कॅपिटलच्या उमरेड महामार्गावर वीस हजार झाडे कापली.पुर्नरोपणासाठी वन विभागाला न्यायाल्याच्या दणक्यानंतर आठ कोटी रुपये दिले.वन विभागाने एक लाख वीस हजार झाडांचे रोपण केले त्यापैकी आज शंभर टक्के म्हणजे पूर्णच्या पूर्ण झाडे मेली असल्याचे सांगितले.त्यामुळे गडकरी सांगतात अजनीवनातील झाडे कापली जाणार नाही तर त्यांचा विभाग त्याचे ‘पुर्नरोपण’ करणार आहे ही अशक्यप्राय व आतार्किक गोष्ट आहे.हे तर हिमनगाचे एक टोक आहे,गडकरींच्या विभागाने असे अनेक ठिकाणी याच अनुभवाची पुनरावृत्ती केली आहे.अश्या अनेक जागा आहेत जिथे पुर्नरोपण अयशस्वी झाले आहे.आता अजनीवनातील चाळीस हजार झाडे कापून नागपूर शहरातील प्रदुषणात भर घालणार आहेत वरुन या प्रकल्पामुळे रोजगार वाढेल असा दावा करता,रोजगार तर कुठे ही मिळू शकतो पण अजनीवनाची जागा यासाठी पर्याय होऊ शकत नाही.गडकरी यांच्या या ड्रीम प्रोजेक्टसाठी शहरात अनेक विकल्प आहेत त्यावर त्यांनी विचार करावा,अशी मागणी मोर्य यांनी केली.
याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने ज्येष्ठ पर्यावरणवादी डॉ.शरद पालिवाल हे देखील उपस्थित होते.
द्वारकाची स्टोरी‘अर्धसत्य’-
गडकरी हे नेहमी आपल्या भाषणात त्यांनी द्वारका येथे रसत्यांच्या निर्मितीसाठी कापण्यात आलेल्या झाडांचे यशस्वी पुर्नरोपण केल्याचा दावा करीत असतात मात्र आम्ही त्या ठिकाणी गेलो असता तेथील स्थानिकच सांगतात मोठमोठी झाडे मूळासकट कापून त्याचे तुकडे करुन ट्रकमध्ये भरुन नेली मग पुर्नरोपण कोणत्या झाडांचे झाले?तर ५ ते ७ वर्षांच्या झाडांचे!म्हणजे ५० वर्षे जुनी झाडे समूळ नष्ट केली,७ वर्षे वयाची झाडे पुर्नरोपित केली,त्यातही १० टक्केही झाडे आता शिल्लक नाहीत त्यामुळे गडकरी यांची द्वारकाची स्टोरी ही ‘अर्धसत्य’असल्याचे अनसूया यांनी सांगितले.गडकरी हे हा प्रकल्प २०५० साठीचा असल्याचा दावा करतात,हा प्रकल्प आज जर खापरीला नेला तर २०५० मध्ये खापरी हे देखील शहराच्या मध्यातच येणार असल्याने आताच हा प्रकल्प खापरी येथे नेणे जास्त सोयीस्कर होईल.वाराणसीचे इंटर मॉडल स्टेशन हे आताच तेथील सरकारने शहराच्या ३५ किलोमीटर दूर नेले असल्याचे त्या म्हणाल्या.नागपूरसाठी अभ्यास झालाच नाही,फक्त ‘चर्चेतून आणि स्वप्नातून’हा प्रकल्प कागदावर आला असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.खापरीत तर झाडे देखील कापण्याची गरज पडणार नाही.मेट्रोस्टेशनच्या भिंतीला लागूनच १०० एकर जमीन उपलब्ध आहे.खापरीत हे इंटर मॉडल स्टेशन झाले तर मृतप्राय मिहानला देखील बुस्ट मिळेल.खापरी हा स्पेशल इकॉनोमिक झोन म्हणून तयार होईल.आपण संवेदशनशील कधी होणार आहोत?आताच फेब्रुवारीमध्येच नागपूराची गर्मी ही चटका लावणारी आणि असहनीय असते,पुढील पिढीसाठी राखीव असणारी हिरवळ नष्ट करुन आम्ही नागपूर शहराला आणखी किती आगीच्या भट्टीत झोकणार आहोत?आम्ही ‘मायक्रोस्कोपी मायनॉरिटी’नाही म्हणूनच आम्ही आमच्या घरातील आमच्या शहरातील हिरवळ नष्ट करणा-या प्रकल्पाला इतरत्र हलवण्याची मागणी करीत आहोत.पहले माझं घर,माझं शहर,घरालाच नुकसान होणार असेल तर आवाज बुलंद करणं हा आमचा संवैधानिक अधिकार असल्याचे त्या म्हणाल्या.आम्हाला तुमच्या स्वप्नांचा विरोध करुन आमचा कोणता प्रकल्प त्या जागेवर आणायचा नाही आहे.आहे ते पर्यावरण वाचवणे एवढाच आमचा हेतू असल्याचे त्या म्हणाल्या.
अनेक झाडे जाळली,कापली-
अफलिंगा एजंसीला या प्रकल्पाच्या डिझाइंगची जवाबदारी सोपवण्यात आली असून ही एजंसी काय करते?तर वाॅटर फिल्टर तयार करते,पाच कोटी या एजंसीचा टर्न ओवर आहे.या एजंसीने या प्रकल्पासाठी कोणताही शास्त्रशुद्ध अभ्यास न करता केवळ कागदावर स्वप्नांचा इमला बांधला.एमओयू साईन झाल्याबरोबर अजनीतील हॅरिटेज असणारी १५ झाडे आधी निर्दयतेने कापण्यात आली. यानंतर १० झाडे चक्क केमिकल टाकून जाळून टाकण्यात आली.पुन्हा १४ मोठी जुनी झाडे कापण्यात आली.१५ झाडे छाटून टाकण्यात आली.नुकतेच ४ हॅरिटेज झाडे तर नागपूर महानगरपालिकेनेच कापली त्यातील दोन झाडे ही सिवर लाईन टाकण्यासाठी कापली!त्या झोनच्या कार्यकारी अभियंताला याबाबत विचारणा केली असता तो ’चालू द्या बघून घेऊ’असे अतिशय असंवेदनशील उत्तर दिले.मनपाच्या उद्यान विभागाला तर नागपूरच्या झाडांच्या जगण्या-मरण्याविषयी काही कर्तव्यच नाही फक्त पद आणि पगार एवढीच त्यांची शासकीय नोकरी आहे,असेच आता म्हणावे लागेल,याशिवाय अजनीवनामध्ये भरपूर खोड दिसून पडतात हे कशाचे द्योतक आहे?खोड आहे पण झाड गायब!उद्यान विभाग हा एफआयआर करीत नाही,दंड ठोठावत नाही,फक्त कारणे दाखवा नोटीस देण्यासाठीच मनपाचा उद्यान विभागासारखा पांढरा हत्ती जनतेच्या कराच्या पैश्यावर पोसण्यात आला असल्याचा संताप अनसूया व्यक्त करतात.
आमदाराच्या पॅडोंलसाठी चार मोठी झाडांची कत्तल-
रविनगर चौकात फक्त पँडोल टाकण्यासाठी चार मोठी झाडांची निघृण कत्तल करण्यात आली.पोलिस ठाण्यात तक्रार केली असता ’एमएलए का पँडोल है जाने दो’असे म्हणून पोलिस विभाग ही हात झटकतो.हे असे लोकप्रतिनिधी जे स्वत: नागपूरच्या रणरणत्या गर्मीचा विचार न करता झाडे नष्ट करतात अश्या लोकप्रतिनिधींची खरंच नागपूरकर जनतेला गरज आहे का?याचा आता विचार करावा लागेल.कारागृह परिसरातील तर शेकडो झाडे कापण्यात आली असून एकेकाळी वर्धा रोडवरुन जाताना अतिशय घनदाट दिसणारे ते जंगल आता बगिचा वाटू लागले एवढी झाडे अवैधरित्या नष्ट करण्यात आली.आमची हीच चूक झाली आम्ही कारागृह परिसरातील झाडांवर देखील लक्ष ठेवायला हवे होते परंतू आम्हाला वाटलं प्रकल्पासाठी प्राधिकरणाने फक्त पहील्या टप्प्याचीच परवानगी मागितली असल्याने कारागृहापर्यंत ते सध्या तरी जाणार नाही मात्र असे घडले नाही.या पुढे मात्र कारागृह परिसरातील उरलेल्या झाडांची जवाबदारी आता ‘सेव्ह अजनीवन’च्या कार्यकर्त्यांची असल्याची माहिती त्यांनी दिली.

आमचे चॅनल subscribe करा