
‘थाली बजाओ सरकार जगाओ’आंदोलन
नागपूर,ता. ८ मार्च: राज्यात करोना संसर्ग वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लादणार असल्याचे आपल्या आभासी संवादात स्पष्ट केले हाेते मात्र त्यांनी जेथे आवश्यकता आहे तिथेच ठाण बंदी लागू करण्याचे देखील निर्देश जिल्हाधिका-यांना दिले होते.ठाणबंदी लागू करण्याची आपली मुळीच ईच्छा नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले होते.लॉक डाऊन लावल्यास त्याची कारणे आधी जनतेला समजावून सांगा अशा निसंदिग्ध सूचना दिल्या असताना देखील नागपूरात ४ एप्रिल रोजी रात्री ८ वा.पासून संपूर्ण ठाणबंदी लागू करण्यात आली.
एवढेच नव्हे तर पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिवसा काही तास अत्यावश्यक सेवेशिवाय इतर ही व्यवहार सुरु राहणार असल्याचा सूतोवाच केला होता मात्र नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी वेगळा आदेश काढून अचानक मनपा हद्दीत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण ठाणबंदी लागू केली.या विरोधात व्यापा-यांमध्ये तीव्र संताप उमटला आहे.शुक्रवारपासून सर्व दूकाने सुरु करण्याचा व्यापारी महासंघाने सरकारला थेट इशारा देत काल बुधवारी आंदोलन केले तर आज सरकारविरोधात ‘थाली बजाओ सरकार जगाओ’आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करणारे फलक घेऊन व्यापारी वर्गाने आज घंटानाद करीत तीव्र निर्दशने केली.‘मत छीनो हमारा कारोबार हमारा भी है घरबार’अशी आर्त साद देखील मायबाप सरकारला घालण्यात आली.सीताबर्डी मर्चट असोसिएशन व व्यापारी प्रतिनिधींनी हे आंदोलन केले.
शहरातील संपूर्ण व्यापारी वर्ग हा रसत्यावर आला असल्याचे व्यापारी प्रतिनिधींनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले त्यामुळेच ‘थाली बजाओ’आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला हा संदेश देण्यात आला, हा लॉकडाऊन त्यांनी मागे घ्यावा,झोपलेल्या सरकारने जागे व्हावे,व्यापा-यांच्या विविध समस्यांविषयी जागरुक व्हावे आणि आम्हाला काही तासांची तरी व्यापारासाठी माेहलत प्रदान करावी,अशी मागणी त्यांनी केली.
आज इतवारी,महाल,सराफा बाजार,सीताबर्डी,धरमपेठ,कमाल चौक,,जरीपटका इ. ठीकाणचे सर्व व्यापारी असोसिएशन रस्त्यावर आलेला आहे व सर्वांची एकच मागणी आहे हे लॉकडाऊन परत घ्या आणि आम्हाला आमचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्याची परवानगी द्या.
१३ महिन्यांपासून आम्ही शासन व प्रशासनाला करोनाच्या लढाईत सर्वतोपरी सहकार्य केले मात्र आता आमची ही क्ष् मता संपली.आता व्यवसाय बंद ठेऊ शकत नसल्याचे ते म्हणाले.आम्ही ९ ता.संपूर्ण बाजारपेठ सुरु करण्याचा इशारा दिला होता मात्र आता मुख्यमंत्री यांच्याकडून मिळालेल्या सूचनेप्रमाणे ते काही तरी मार्ग या संदर्भात काढणार अाहेत. त्यांनी त्वरीत व्यापा-यांची या ठाणबंदीतून सूटका करावी.त्यासाठी आम्ही थोडं थांबायला ही तयार आहोत.
मात्र आम्हाला आता संपूर्णत: मोकळीक हवी.काही तास किवा सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत रणरणत्या उन्हात नागपूरात व्यवसाय होऊ शकत नाही.सायंकाळी देखील दूकाने उघडी ठेवण्याची मोकळीक आम्हाला सरकारकडून हवी असल्याची मागणी त्यांनी केली.फक्त तोंडदाखल मोकळीक किवा नावापूरते रिलीफ न करता खरोखरचा रिलीफ सरकारकडून अपेक्ष्ति असल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्हाला शासन व प्रशासना विरोधात जाऊन दूकाने उघडावीच लागेल,आमची ईच्छा प्रशासनाच्या विरोधात जाण्याची नसली तरी आमच्याकडे इतर कोणताही विकल्प नसल्याचे ते म्हणाले.
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या जनतेसाेबतच्या संवादात लॉकडाऊन नव्हे तर कठोर निर्बंध,या त्यांच्या शब्दावर जनतेने विश्वास टाकला होता मात्र प्रत्यक्ष्ात कडक ठाणबंदीच लागू करण्यात आल्याने नागरिकांसह व्यापारी वर्गात देखील फसविल्या गेल्याची भावना उमटली आहे.
पहील्याच लॉक डाऊनचे चटके आतापर्यंत सहन करीत असणा-या नागरिकांना व व्यापारी वर्गाला पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी सर्वस्वी कागदी पुस्तकांचे ज्ञान असणा-या मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी अश्या प्रशासकीय अधिका-यांच्या तावडीत सोपविल्याने तीव्र असंतोष उमटणे स्वाभाविक होते.सरकारने पहील्या लॉकडाऊनपासून काहीही बोध घेतला नसल्याचेच हे द्योतक अाहे.
वाढत्या करोना संसर्गावर सरकारकडे कोणतीही ठोस उपाययोजना नसल्यानेच वारंवार एकाच पठडीतील उपाय योजना म्हणजे ठाणबंदीचे हत्यार सरकार नागरिक व व्यापारी वर्गावर वारंवार उपसत आहे.विशेष म्हणजे पालकमंत्री हे या ठाणबंदीला ठाणबंदी शब्द न वापरता कठोर निर्बंधच मानतात.मात्र ही अघोषित ठाणबंदी असल्याचे जगजाहीर झाले आहे.
व्यापार क्ष्ेत्रात ५६ टक्के रोजगार आहे.तब्बल २५ दिवस म्हणजे ३० एप्रिलपर्यंत दूकाने बंद ठेवावी लागल्यास व्यापरी वर्गाचे कंबरडेच मोडणार आहे.मोमिनपु-यात टाळेबंदीच्या विरोधात काल तीव्र आंदोलन झाले.यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला.यावरुन मुख्यमंत्री यांनी सांगितल्यानंतर देखील जनतेला विश्वासात न घेता लागू केलेल्या या अघोषित ठाणबंदी विरोधात शहरातील संपूर्ण व्यापारी वर्ग आता दररोज रसत्यावर उतरत असल्याचे चित्र उमटले आहे. मुख्यमंत्री यात कोणता दिलासा देणार आहे?याकडे व्यापरी वर्गाचे आता लक्ष् लागले आहे.
१४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच याच महिन्यात येणारी रामनवमीनिमित्त होणारी गर्दी लक्ष्ात घेता सरकार चांगलेच धस्तावले आहे त्यामुळे सरकार या महिन्याच्या शेवटपर्यंत जनतेला व व्यापारी वर्गाला खूप काही मोकळीक देतील,याची आशा धूसरच आहे.

आमचे चॅनल subscribe करा