Homeनागपूर न्यूज‘वागले की दूनिया’नागपूरात अवतरली

‘वागले की दूनिया’नागपूरात अवतरली

Advertisements

मालिकेच्या कलावंतांनी साधला माध्यमांशी संवाद

मध्यमवर्गीय जीवनाशी संबंधित कथानकामुळे लोकप्रिय मालिका

गपूर,ता.२५ मार्च २०२२: नुकतेच तीनशे एपिसोड्चा टप्पा गाठलेली ‘सोनी सब’वरील मालिका ‘वागले की दुनिया’ही मध्यमवर्गीय जीवनाशी संबंधित कथानकामुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.या मालिकेत सामान्य व्यक्तींचे संघर्ष,भारतीय घरामध्ये दिसून येणा-या सामाजिक समस्या आणि महत्वाकांक्षांना स्थान देण्यात आल्याने या मालिकेने प्रचार माध्यमावरील लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडून काढले आहेत.या मालिकेवर प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमाचा वर्षाव पाहून ‘वागले की दुनिया’चे कलाकार हे नागपूर शहराला भेट देत त्यांच्या चाहत्यांना आज भेटले व त्यांच्यासोबत धमाल क्षण व्यतीत केले.मालिकेत राजेश वागलेची भूमिका साकारणारे सुमीत राघवन व वंदना वागलेची भूमिका जगणारी परिवा प्रणती यांच्यासह त्यांच्या चमूचे उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आले.याप्रसंगी हॉटेल रेडिसल ब्ल्यूमध्ये त्यांनी प्रसार-प्रचार माध्यमकर्मींसोबत मनमाेकळा संवाद साधला.

ऐंशीच्या दशकात आर.के.लक्ष्मण निर्मित लोकप्रिय मालिकेचे आधुनिक रुपांतर या मालिकेत करण्यात आले.विशेष म्हणजे ऐंशीच्या दशकातील याच मालिकेतील लोकप्रिय कलावंत ज्यांनी श्री व श्रीमती वागलेची भूमिका वठवली होती ते अंजन श्रीवास्तव व भारती आचरेकर देखील या आधुनिक मालिकेत भूमिका वठवित आहेत.लवकरच ही मालिका आगामी आठवड्यांमध्ये काही लक्षवेधक घटना सादर करण्यास सज्ज झाली असल्याचे राधवन यांनी सांगितले तर या घटना प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रीनवर खिळवून ठेवणार असल्याचे परिवा प्रणती म्हणाल्या.

या मालिकेत वागले दाम्पत्याचा मूलाची म्हणजे अथर्वची भूमिका वठवणारा शालीन कपाही हा त्याचा जुळा भाऊ अभय वागलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे,त्याला वाटतं त्याचे आईवडील त्याच्यापासून मोठे गुपित लपवत आहेत.राजेशचे कामकाजाचे जीवन तनावपूर्ण आहे,जेथे त्याला अवास्तव मागणी करणा-या व विचित्र बॉसचा सामना करावा लागतो.पण वंदनाची त्याला बरोबरीची साथ लाभतेय,ती स्वत:ची आवड जपत त्या आवडीला व्यवसायामध्ये बदलते व तिला कुटुंबाच्या खर्चामध्ये योगदान देण्याचा अत्यंत आंनद होतो.यासोबतच प्रेक्षकांना अधिक उत्कंठावर्धक मनोरंजन या मालिकेत मिळणार असल्याचे या चमूने सांगितले.

राजेशची भूमिका साकारणारे सुमीत राघवन म्हणाले,की एक भूमिका म्हणून राजेश माझ्यासाठी खास आहे,कारण या मालिकेत मला दैनदिन जीवनातील पैलूंना सुरेख पद्धतीने सादर करण्याची संधी मिळत आहे.प्रेक्षकांनी आमच्यावर केलेले प्रेम व दिलेल्या शुभेच्छा बघता हे सगळं काही खूप प्रेरणादायी वाटतं.मला नागपूरला भेट देऊन येथील चाहत्यांसोबत गप्पागोष्टी करण्याचा आनंद होत आहे.मला या शहरात पुन्हा यायला आवडेल.आम्ही अवघड काळात ही मालिका सुरु केली होती आता मात्र बाहेर पडून चाहत्यांचे प्रेम व कौतुकाची थाप पाहून खूपच उत्साहवर्धक वाटतं.आम्ही मालिकेत सर्वोत्तम सादर करण्याचा प्रयत्न करीत असतो.यानंतर देखील प्रेक्षकांना अधिक रोमांचक कथानक बघायला मिळणार आहे.ही मालिका पहात रहा आणि मी खात्री देतो की,वागले तुमचे निखळ मनोरंजन करतच राहील.

वंदनाची भूमिका साकारणा-या परिवा प्रणती म्हणाल्या,की ही मालिका प्रेक्षकांना अगदी सहजपणे पात्रांशी व त्याच्या कथानकाशी संलग्न करते.या मालिकेचे कथानक केवळ मनोरंजन करीत नाही तर संबंधित सामाजिक समस्यांचे निराकरण देखील करते.हे सादरीकरण बघून प्रेक्षकांना त्यावर विश्‍वास बसतो व आपल्या दैनदिन आचरणात या निराकरणाचा अवलंब करण्यास ते प्रेरित होतात.वंदना ही आजची महिला आहे,जी घरातील कामे करते,मुलांचा सांभाळ करते,स्वत:ची आवड देखील जोपासते,आवडीतून अर्थाजनही करते,कुटंूबाला आर्थिक हातभार ही लावते.या सर्व भूमिकांना आज नागपूरकरांकडू जे भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद मिळाला ते बघून अत्यंत आनंद होतो आहे.

‘वागले की दूनिया-नये किस्से नयी पीढी ही मालिका ’सोनी सब या वाहिनीवर दर सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रसारित होते.

Latest बातम्या