Advertisements

(पदवीधर निवडणूक-२०२६)
पदवीधर बेरोजगारांच्या निश्चित रोजगारासाठी कटिबद्ध; काँग्रेसचे अभिजित वंजारी यांचे आश्वासन
नागपूर : पदवीधर मतदारसंघातील मतदारांच्या अपेक्षा जाणून घेणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या विधिमंडळात प्रभावीपणे मांडणे याला आपले प्राधान्य राहील. यासोबत पदवीधर बेरोजगारांच्या रोजगारासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी केले.
निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने अभिजित वंजारी यांनी नागपूर शहर व जिल्ह्यातील विविध संस्था आणि संघटनांना भेटी देत पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांशी संवाद साधला, याप्रसंगी ते बोलत होते. या भेटींच्या माध्यमातून त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली, तसेच निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.
पदवीधर, शिक्षक आणि कर्मचारी वर्गाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
अभिजित वंजारी यांनी व्हिनस स्पोर्ट्स असोसिएशन, रेशीमबाग, नागपूर येथे सदिच्छा भेट देऊन वंजारी यांनी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांशी संवाद साधला. यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
वाठोडा आणि रेशीमबाग, नागपूर येथे निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकांमध्ये सहभागी होत त्यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
श्री संताजी महाविद्यालय, नागपूर येथे आयोजित आढावा बैठकीतही वंजारी सहभागी झाले. यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत निवडणुकीच्या नियोजनाबाबत चर्चा केली.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंजारी यांनी विविध संस्था, संघटना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत प्रचाराला गती दिली आहे.
………………………………………