Homeनागपूर न्यूज‘रायबा इमानदार’चित्रपटाची निर्मिती ठरणार राज्यात अव्वल:बावणकुळे

‘रायबा इमानदार’चित्रपटाची निर्मिती ठरणार राज्यात अव्वल:बावणकुळे

Advertisements

नागपूर,ता.२२ फेबुवारी २०२२: चित्रपट निर्मिती हे अशातशांचे काम नाही,यासाठी धाडस,धैर्य व कल्पकता हे गुण अंगी असावे लागतात.हे वास्तव असताना देखील चित्रपटाची कथा स्वत: लिहून ’रायबा इमानदार’हा मराठी चित्रपट निर्माण होतो आहे.चित्रपट निर्मिती करणारे हुडकेश्‍वर खूर्द येथील युवा उद्यमशील तरुण सचिन घोडे याच्या प्रयत्नांना यश लाभो व त्याचा चित्रपट राज्यात अव्वल ठरो,अशी सदिच्छा आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांनी व्यक्त केली.ते ’रायबा इमानदार’चित्रपटाच्या मुर्हुताप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.

टेलिफोननगर स्थित विनोद बोन्द्रे यांच्या निवासस्थानीर रविवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता चित्रपटाचा मुहूर्त आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांच्या हस्ते पार पडला.याप्रसंगी विनोद बोन्द्रे,रुपाली मोरे,नगरसेवक पिंटू झलके,सचिन घोडमाने,नामदेव नांदूरकर,सतीश यादव आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना बावणकुळे म्हणाले,की सचिन घोडे हा धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता असून,त्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच गाडगे महाराज यांचा वारसा जपून नागपूर ग्रामीणसह संपूर्णृृृृृृृृृ विदर्भात स्वच्छतेबाबत नि:स्वार्थपणे समाजकार्याला वाहून घेतले आहे.कोरोना काळात गरजू व गरिबांना मोठ्या प्रमाणात त्याने मदतीचा सढळ हात दिला.तरुणाईसमोर त्याने आदर्श निर्माण केला.त्यांच्या इतर समाजकार्याप्रमाणेच ‘रायबा इमानदार’हा चित्रपट नक्कीच राज्यातील ’पुष्पा’ठरणार,अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली.

‘रायबा इमानदार’या चित्रपटाचे निर्माते सचिन घोडे असून,श्री श्री फिल्मसची निर्मिती आहे.दिग्दर्शक सईद अख्तर,संगीत भूपेश सवाई यांचे आहे.कलाकारांमध्ये संजय खापरे,प्रणाती राऊत,विनोद राऊत,नितीन पात्रीकर,देशमुख आदींचा समावेश आहे.

Latest बातम्या