Homeनागपूर न्यूजराज्य शासन दिव्यांगांच्या प्रश्‍नांबाबत गंभीर नाही

राज्य शासन दिव्यांगांच्या प्रश्‍नांबाबत गंभीर नाही

Advertisements


संविधान चौकात भाजप आघाडीचे आंदोलन: योजनांपासून लाभार्थी वंचित

नागपूर,ता. ४ डिसेंबर: दिव्यांगांना मिळणा-या आरक्षणाचा लाभ योग्य पद्धतीने दिला जात नाही.शासनाकडून मिळणा-या पेन्शन योजनेतूनही अनेक पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आले.रोजगाराचे प्रश्‍नही भीषण आहेत.राज्य शासन दिव्यांगांच्या प्रश्‍नाबाबत गंभीर नाही,अशी खंत व्यक्त करीत भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने शुक्रवार दि.३ डिसेंबर रोजी संविधान चौकात आंदोलन करण्यात आले.

आमदार प्रवीण दटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात दिव्यांग विकास आघाडीचे श्रीकांत भोंगे,विदर्भ प्रभारी धनंजय उपासनी,महामंत्री मनोज धोटे,मीनाक्षी साहू,दादा मिरे,अजय भूते,आशिष गुरव,भाजपचे शहर महामंत्री सुनील मित्रा,नगरसेवक संजय बंगाले आदींचा सहभाग होता.

यावेळी जिल्हाधिकारी आर.विमला यांना निवेदन देण्यात आले.राज्य शासानाकडे समस्या पाठवून दिव्यांगांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी शिष्टमंडळाला दिले.

दिव्यांगाना समान हक्क मिळवून देणारा शासन निर्णय २०१६ मध्ये काढण्यात आला,मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही.दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्याच्या केवळ पोकळ घोषणाच झाल्या मात्र शासनाकडून प्रत्यक्ष कृती होताना दिसत नाही.

करोनाच्या काळात दिव्यांगांना शासनाकडून कोणतीही मदत करण्यात आली नाही.उलट मिळणा-या पेन्शनपासून अनेकांना डावलण्यात आले.लहान-लहान व्यवसाय सुरु करुन उदरनिर्वाह करणा-या दिव्यांगांनाही नियमांत अडकवून बेरोजगार करण्यात येत असल्याचा रोष आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

दिव्यांगांसाठी व्यवसाय संकुल उभारावे,शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी द्यावी इ.मागण्या करीत ,मागण्या पूर्ण न झाल्यास लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

Latest बातम्या