Homeनागपूर न्यूज‘मोदी-पटोले’प्रकरणात भाजपने मांडले ‘अर्धसत्य’:न्यायालयाची केली दिशाभूल

‘मोदी-पटोले’प्रकरणात भाजपने मांडले ‘अर्धसत्य’:न्यायालयाची केली दिशाभूल

Advertisements

देशात भय आणि भीतीदायक वातावरण: ॲड.रवी जाधव

न्या.लोया गूढ हत्येत नवीन पुरावे आले समोर:प्रोटेस्ट पिटीशन दाखल: जिल्हा पातळीवरही नेणार विषय

नागपूर,ता.२३ फेब्रुवारी २०२२: वीस ते तीस वर्षांपूर्वी आपल्या देशात ‘मेरी आवाज सूनो’हा आवाज आंदोलनांचा आवाज म्हूणन निनादत होता,कविवर्य नामदेव ढसाळ यांनी तर ‘वतन जाये भाड में हमे तो बस जीना है‘अशी जहाल कविता तत्कालीन परिस्थितीवर लिहली होती.आजच्या परिपेक्षात देखील त्यांचे शब्द तितकेच खरे ठरतात.आजची परिस्थिती तर आणखीनच वाईट असून कोण आवाज काढणार?’चोर तर चोर वरुन शिरजोर’अशी अवस्था असून न्यायलयीन प्रक्रियेत देखील सोयीस्कर ‘अर्धसत्य’मांडले जात असून याचे प्रमाण वाढले आहे,देशात भय आणि भीतीदायक वातावरण असल्याचे विधान महाराष्ट्र लीगल सेल व माहिती अधिकार सेलचे प्रमुख ॲड.रवि जाधव यांनी केले.ते आज बुधवार दि.२२ फेब्रुवरी रोजी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.याप्रसंगी मंचावर ॲड.सतीश उके व वकीली क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ॲड.जाधव म्हणाले,की मोदी-पटोले विधान प्रकरणातही उमेश घरडे नावाचा ज्याचे नाव टोपण नाव ‘मोदी’ आहे तो माध्यमांच्या समोर आला,गावात त्याला सर्व मोदी नावानेच ओळखतात कारण त्याची बायको त्याला सोडून गेली होती,त्याची पत्नी या देखील माध्यमांच्या समोर आल्या व तिच्या लहरी स्वभावाच्या नव-याला गावात मोदीच म्हणतात याची पुष्टि केली,पोलिसांच्या एफआयआरमध्ये देखील ’उमेश घरडे उर्फ मोदी’असा स्पष्ट उल्लेख करुन त्याच्याविरुद्ध फार पूर्वी गुन्ह्याची नोंद झाली होती,एवढे सारे पुरावे असताना देखील मुंबईत भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजंदर तिवाणा यांनी न्यायालयाची दिशाभूल केली व नाना पटोले यांचे ते विधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच उद्देशून केले असल्याची याचिका मुंबईच्या न्यायालयात दाखल केली.न्यायालयासमोर हे प्रकरण आले असता आम्ही भाजपच्या त्या नेत्याने न्यायालयासमोर ‘अर्धसत्य’मांडले असल्याचा प्रतिवाद केला.न्यायालयासमक्ष दिनेश घरडे याचे पत्र परिषदेतील विधान व इतर पुरावे सादर केले,न्यायालयानी या विषयीचे सज्ञान घेऊन भाजपच्या त्या नेत्याची याचिका खारिज केली.

भाजप नेत्याचा तो प्रयास हा न्यायालयाची दिशाभूल याच सदरात मोडतो.उमेश घरडे केसमध्ये ज्याप्रकारे मुंबईच्या भाजप युवा मोर्च्याचे अध्यक्ष याने न्यायालयाची दिशाभूल केली,अश्‍या प्रकारचे अर्धसत्य जर कोणी न्यायालयात मांडत असेल,न्यायालयाला खोटी माहिती देत असेल तर संवैधानिक अधिकाराप्रमाणे कोणालाही मध्यस्थी अर्ज दाखल करता येतो. मोदी-पटोले वाद हा त्यावेळी फक्त निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन उकरण्यात आला होता,भाजपला मतदानात याचा फायदा मिळावण्याकरिता नाना पटोले यांच्याविरुद्ध कटकारस्थान रचण्यात आले होते एवढंच नव्हे तर न्यायालयाला खोटी माहिती देण्यात आली होती.

भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या विरोधात खोट्या तक्रारी करुन त्या व्यक्तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्यात येत असेल तर न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल करता येऊ शकतो.

पटोले-मोदी विवादात भाजपच्या त्या पदाधिका-याने तर देशाचे सन्मानीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव या प्रकरणात इतक्या वेळा वापरले की देशाच्या पंतप्रधानाच्याच प्रतिष्ठेलाच बाधा पोहोचवली.यासाठी भाजपच्या त्या पदाधिका-याच्याच विरोधात गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता.असे जर का घडले तरच न्यायालयीन प्रक्रियेला गढूळ करण्याची हिंमत पुन्हा कोणी करणार नाही.याच महिन्यात ११ फेब्रुवरी २०२२ रोजी न्यायालयाने पटोले विरुद्धची त्या पदाधिका-याची योचिका फेटाळून लावली मात्र एका मराठी वाहिनीशिवाय एवढ्या महत्वाच्या न्यायालयीन निर्णयाची दखल प्रसार-प्रचार माध्यमांनी घेतलीच नाही,अशी खंत याप्रसंगी ॲड.रवी यांनी व्यक्त केली.माध्यमांनी सत्याची साथ देत अश्‍या वृत्तांना प्रसिद्धी दिल्यास जे अश्‍या प्रवृत्तीविरुद्ध लढत आहेत त्यांना लढण्याची हिंमत मिळेल,न्यायालयाच्या प्रशासकीय निर्णयाला देखील मदत होऊ शकेल व किमान ‘अर्धसत्य’थांबेल,असे ते म्हणाले.

मॅन्यूपॅलेटेड इंडिया,फेक इंडिया यात जगासाेबतच आज भारत देश देखील भरडला जात असल्याचे ॲड.रवि यांनी सांगितले.अद्यावत तंत्रज्ञान हे आज जेवढे फायद्याचे आहे तेवढेच घातक देखील ठरत असल्याचे ते म्हणाले.नुकतेच आपल्या राज्यात दहावी,बारावीच्या परिक्षा ऑफ-लाईन ऐवजी ऑन-लाईन करण्याच्या वादातून एका ‘हिंदूस्थानी भाऊ‘ने या तंत्रज्ञानाच्या जोरावरच संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांना हिंसक आंदोलनासाठी प्रेरित केले. आज देशात भय आणि भितीचे वातावरण असून ॲड.सतीश उके यांच्यासारखे समाजाप्रति तळमळ असणा-यांचीच आज खरी गरज आहे.जो कोणी असंवैधानिक,बेकायदेशीर टिका,खोट्या केसेस न्यायालयात दाखल करेल,त्याला संवैधानिक प्रक्रियेनेच उत्तर दिले जाईल.आमच्याकडे तज्ज्ञ लोकांची चमू आहे.प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयापासून तर सत्र,उच्च व सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही अश्‍या प्रवृत्तीविरुद्ध लढा देणार असल्याचा निर्धार याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.

आज ‘व्हॉट्स ॲप,फेसबूक विद्यापीठात’समाजाला लागलेली कीड सर्वदूर आढळून येते.पत्रकारांची देखील ट्रोलिंग होतेय.अतिशय घाणेरड्या शब्दात त्यांचे खच्चीकरण केल्या जात असतं.यावर पायबंद घालण्यासाठी आम्ही राजीव गांधी नॅशनल लीगल हेडच्या माध्यमातून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात व तालूकास्तरावर पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.ही आपली सर्वांची सामुहिक जवाबदारी असून आता नाही लढलो तर ’भारताचा अफगानिस्तान होईल’ असा इशारा देत एक शक्ती पूर्ण देशच काबिज करेल असे ते म्हणाले.आज देशात तंत्रज्ञानाचा मोठ्याप्रमाणात गैरवापर होत आहे.क्रिप्टो करन्सी,डिप वेव्ह,डार्क व्हेव समोरे सर्वांना जावे लागणार आहे.कोणालाही वाटत असेल इथे खोटेपणा होत आहे तो कोर्टात याचिका दाखल करु शकतो.माहितीचा अधिकार असो किवा शिक्षणाचा अधिकार(आरटीई)असो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचा लीगल हेड प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

न्यायालयीन प्रक्रियेत नवीन पुरावे आले तर पुन्हा नव्याने ती केस रि-ओपन होऊ शकते,त्यासाठी समिती गठीत होऊ शकते.न्यायमूर्ती लोया प्रकरणात नवीन पुरावे समोर आल्याने एसडीएम कार्यालयात प्रोटेस्ट पिटीशन फाईल करण्यात आली असून आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रात हे पुरावे घेऊन जाणार आहोत.दोषी हा कितीही मोठा असला तरी तो आपल्या गुन्ह्याचा कोणता ना कोणता पुरावा मागे सोडूनच जातो.न्या.लोया प्रकरणी देखील दोषींनी असा पुरावा मागे सोडलेला आहे.न्यायालयाने तांत्रिक बाबीचा पाठपुरावा करावा,निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने याची चौकशी करावी,या प्रकरणाचा पुन्हा नव्याने पुर्नतपास करावा,अशी मागणी आमचा लीगल सेल करणार असल्याचे ॲड.रवी यांनी सांगितले.या प्रकरणात ॲड.सतीश उके यांनी खूप मेहनत घेतली असून केवळ मेहनतच नव्हे तर मागच्या सरकारने त्यांना खूप दाबवण्याचा प्रयत्न केला,धमकावण्याचा प्रयत्न झाला,खोटे गुन्हे दाखल केले,एवढंच नव्हे तर वेळोवेळी त्यांच्यावर पाळत ही ठेवण्यात आली आणि हेरगिरीपण झाली.परंतू त्यांनी खूप धाडसीपणाने या प्रकरणातील फार महत्वाचे काही पुरावे प्राप्त करण्यात यश मिळवलं,असे गौरवोद्गार काढले.

यावेळी त्यांनी भाजपच्या ‘४० पैसे पर ट्रोलिंग सेनेवर’ देखील सडकून टिका केली,आता या ट्रोलिंग सेनेचे रेट वाढून दोन रुपये झाले असल्याचे सांगितले.याप्रसंगी न्यायालये ही हल्ली राजकीय दवाबात काम करीत आहे का?असा प्रश्‍न विचारला असता,या प्रश्‍ना ऐवजी लोकांनी काय करायला पाहिजे हे बघायला हवे,आपली न्यायव्यवस्था ही मजबूतच असल्याचे त्यांनी सांगितले.देशातील विधी मानवाधिकार तसेच माहिती अधिकार कार्यकर्त्यांना विनंती करीत या मोहीमेत सहभागी व्हा,असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलापुरे व ॲड.अभियान बाराहाते यांचा सत्कार ॲड.रवि जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
.

जबलापुरे यांनी संघाच्या विरोधात चार याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत.याशिवाय दोन याचिका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दाखल असून संघाच्या विरोधात आयकर विभाग,अंमलबजावणी संचनालय,जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलिस ठाण्यात एकूण २२ तक्रारी जबलापुरे यांनी दाखल केल्या आहेत.२००१ सोली काही युवकांनी संघ इमारतीवर राष्ट्रीय ध्वत फडकवण्याचा प्रयत्न केला होता.त्या विरोधात हेडगेवार स्मारक समितीचे व्यवस्थापक श्री.काठोडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.या घटनेत तीन युवकांना अटक देखील झाली.प्रथम श्रेणी न्याय दंडाधिका-यांनी देशाचा राष्ट्रीय ध्वज संपूर्ण सन्मानासह जिल्हाधिकारी यांना सोपविण्याचे आदेश ही दिले होते मात्र २०१३ साली दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी अद्याप ही झाली नसल्याने जबलापुरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे,येत्या २० फेब्रुवारी रोजी यावर सुनावणी देखील होणार आहे.

(छायाचित्र-सामाजिक कार्यकर्ता मोहनीश जबलापुरे यांचा सत्कार करताना ॲड.रवी जाधव)

ॲड.अभियान बाराहाते यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावाने संजय फडणवीस यांनी जिवानिशी मारण्याची धमकी दिली होती,त्या विरोधात बाराहाते यांनी फडणवीस यांची सरकार असताना त्यांच्या भावाच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे धाडस दाखवले होते.याशिवाय नागपूर महानगरपालिकेच्या एलईडी घोटाळ्याचा भंडाफोड बाराहाते यांच्या सजग जागरुकतेमुळे झाला.साढे तीनशे रुपयांचा एक एलईडी लाईट मनपातील भाजपच्या सत्ताधा-यांनी तब्बल ११ हजार रुपयात घेतला होता.जवळपास साढे तीनशे कोटींचा हा घोटाळा होता.

(छायाचित्र-ॲड.अभियान बाराहाते यांचा सत्कार करताना ॲड.रवि जाधव)

भारतात विशेषत: महाराष्ट्रात समाजाचे भले करणारे अश्‍या लोकांचा सन्मान करताना अभिमान वाटतो असे ॲड.रवि याप्रसंगी म्हणाले.संविधानातील कलम ५१ अन्वये भारताच्या नागरिकांना जे अधिकार प्रदान करण्यात आले त्यासोबतच कर्तव्य देखील सांगण्यात आले आहे.आपले संवैधानिक कर्तव्य चोखपणे निभवणा-या या दोन्ही लोकांचा सत्कार माझ्या हातून झाला याचा विशेष आनंद झाला असल्याचे ॲ.रवि जाधव म्हणाले.

प्रास्ताविक ॲड.सतीश उके यांनी केले.आभार ॲड.नफीस खान यांनी मानले.

Latest बातम्या