Homeराजकारणमुली व महिलांवरील अत्याचार, हल्ले थांबविण्यासाठी 'शक्ती कायदा' त्वरित लागू होणे आवश्यक

मुली व महिलांवरील अत्याचार, हल्ले थांबविण्यासाठी ‘शक्ती कायदा’ त्वरित लागू होणे आवश्यक

Advertisements

डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी

तळेगाव येथे एकतर्फी प्रेमातुन मुलीवर जीवघेणा हल्ला

पुणे दि.२८ जानेवारी २०२२ : तळेगाव जिल्हा पुणे येथे एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तरुणाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत पोलीसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचे समुपदेशन करून, पुढे असे गुन्हा करणार नाही असे बॉण्ड लिहून घेतले होते. यामध्ये पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले. तरी देखील अशा घटना थांबविण्यासाठी ‘शक्ती कायदा‘ लवकरात लवकर लागू होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच कुटुंबातून देखील मुलांवर योग्य संस्कार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. एखादी गोष्ट मिळाली नाही तर मुले आक्रस्ताळेपणा करतात. त्यावेळी पालकांनी मुलांमध्ये संयम व विवेक राहण्यासाठी संस्कार रुजवणे आवश्यक असल्याचे मत देखील डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केले.

असे होत नसेल तर मुलींच्या सुरक्षेसाठी ‘शक्ती’ कायदा लवकर लागू होणे आवश्यक असल्याचा पुनरुच्चार डॉ. गोऱ्हे या घटनेच्या अनुषंगाने केला.

Latest बातम्या