Homeनागपूर न्यूजमहामेट्रो रेल्वेमध्ये बर्थडे पार्टी,आर्थिक डबघाईचे लक्ष् ण: प्रशांत पवार यांचा आरोप

महामेट्रो रेल्वेमध्ये बर्थडे पार्टी,आर्थिक डबघाईचे लक्ष् ण: प्रशांत पवार यांचा आरोप

Advertisements

तेरवीच्या कार्यक्रमासाठी देखील महामेट्रो रेल्वे भाड्याने देणार का?

नागपूर,ता. २६ नोव्हेंबर: नुकतेच महामेट्रोच्या एका मोठ्या अधिका-याने त्याच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी महामेट्रो रेल्वेच भाड्याने घेतली,व धावत्या रेल्वेमध्ये वाढदिवस साजरा केला,या बर्थ डे पार्टीची छायाचित्रे देखील महामेट्रोच्या अधिकृत फेसबूक पेजवर टाकण्यात आली,जनतेच्या सोयीसाठी ८ हजार ६०० कोटींचा मेट्रो प्रकल्प अट्टहासाने नागपूरात आणण्यात आला,मात्र पाच वर्षातच हा प्रकल्प म्हणजे पांढरा हत्ती सिद्ध होत आहे व महामेट्रोला आता आपले आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी महामेट्रो रेल्वेच प्रवाश्‍यांऐवजी खासगी कार्यक्रमासाठी भाडेतत्वावर देण्याची वेळ आली आहे याचा अर्थ येत्या एका वर्षात महामेट्रो खासगी कंट्राटदाराला चालवण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला असल्याचा सणसणीत आरोप राष्ट्रवादी नेते व ‘जय जवान जय किसान’संंघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी आज गुरुवार दि. २६ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्र परिषदेत केला.

२६ नोव्हेंबर २०१९ रोजी आमच्या संघटनेने महामेट्रोच्या आर्थिक उत्पन्नाला हातभार लावण्यासाठी मेट्रो रेल्वेमध्ये १०० जणांचा भजन मंडळींचा भजनाचा कार्यक्रम करण्याची परवानगी मागितली होती मात्र मेट्रो स्टेशनवरच आम्हाला नियम दाखवण्यात आणि सांगण्यात आले.यात मेट्रोमध्ये ध्वनिप्रदुषण,ज्वलनशील पदार्थांचा वापर,फोटो शूट.इ.वर्ज्य असल्याचे सांगण्यात आले मग मेट्रोच्या अधिका-याच्या मुलीच्या वाढदिवसाच्या केकवर ज्वलनीशील नसलेल्या मेणबत्त्या पेटवण्यात आल्यात का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.संपूर्णपणे फक्त आणि फक्त नागपूरकर प्रवाश्‍यांच्या सेवेसाठी मेट्रो प्रकल्पाची परवानगी घेण्यात आली असताना आता खासगी उपक्रमांसाठी मेट्रो भाडेतत्वावर दिली जात असल्याने २९ नोव्हेंबर रोजी एका इसमाने मेट्रोमध्ये तेरवीचा कार्यक्रम करण्याची परवानगी मागितली असल्याचा अर्जाची माहिती आमच्याकडे आलाी आहे,अशी माहिती पवार यांनी दिली.ज्यांनी बर्थ डे पार्टी केली ते स्वत: करोनाबाधित असल्याची माहिती आमच्याकडे आली असल्याचा दावाही त्यांनी केला.

मेट्रोमध्ये तब्बल अडीच हजार कोंटींचा भ्रष्टाचार झाला असल्यानेच मेट्रोवर अशी वेळ आली असल्याचा आरोप पवार यांनी केला.८ हजार ६०० कोटींची गुंतवणूक करुन देखील महामेट्रोकडे आज आपल्या कर्मचा-यांचे पगार देण्यासाठी सुद्धा पैसा शिल्लक नाही,येणा-या ५० वर्षामध्येसुद्धा मेट्रोचे आर्थिक उत्पन्न वाढण्याचे कोणतेही साधन नाही त्यामुळे आता मेट्रो रेल्वेचे कोच,स्टेशन,इमारती भाड्याने देऊन त्यात बर्थ डे पार्टी,लग्न,मुंज,बारसे,कवी संमेलन,तेरवीचा कार्यक्रम,व्याख्यान इ. कार्यक्रमांसाठी महामेट्रो रेल्वे तसेच इमारतींचा वापर होऊ शकतो,एवढेच नव्हे तर नुकतेच जुगाराला शासनाकडून अधिकृत मान्यता प्राप्त होणार असल्याची माहिती आहे,महामेट्रोने रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत परवानगी प्राप्त जुगाराचे देखील अायोजन केल्यास मेट्रोच्या कोचसारखे सुरक्ष्ति ठिकाण जुगारी यांच्यासाठी दुसरी नसणार नाही,अशी टिका करीत महामेट्रोच्या कारभाराचे वाभाडे काढले.

मेट्रोच्या नियमातच मेट्रोमध्ये कुठलेही सेलिब्रेशन करु शकत नसल्याचे स्पष्टपणे नमूद असताना नागपूरची महामेट्रो मुंबईच्या लोकलच्या धर्तीवर लोकलमध्ये ज्याप्रमाणे भजन वा इतर कार्यक्रम प्रवासादरम्यान पार पडतात तसे करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र,मुंबईची लोकल ही हाऊसफूल धावते,तिथे उत्पन्नाचा प्रश्‍नच उद् भवत नाही,परिणामी लोकलमध्ये दोन तासांच्या प्रवासादरम्यान तेथील नागरिक भजन किवा तत्सम कार्यक्रम करीत असतात.नागपूरातील महामेट्रोने मुंबईच्या लोकलचे अनुकरण करु नये,असा सल्ला देखील प्रशांत पवार यांनी यावेळी दिला.

पहाटे ज्याप्रमाणे सोनेरी तांबडे फूटत असतं,तसेच आता भ्रष्टाचाराची रात्र सरली असून आर्थिक डबघाईचे तांबडे महामेट्रो प्रकल्पासाठी फूटले असल्याचे ते म्हणाले.महामेट्रोला एवढेच आर्थिक अस्थैर्य आले आहे तर त्यांनी दीक्ष्ा भूमीसमोरील आलिशान मेट्रोचेच कार्यालय भाडेतत्वावर देऊन लहान कार्यालयात शिफ्ट व्हावे,ते ऑफिस सेलिब्रेशनसाठी दया,असा सल्ला त्यांनी दिला.येत्या एका वर्षात नागरिकांच्या नावावर सुरु करण्यात आलेला हा प्रकल्प खासगीरित्या चालविला जाण्याच्या वाटचालीची सुरवात झाली असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आणि हे जगातले,एखाद्या प्रकल्पाचे सर्वात मोठे व ऐतिहासिक अपयश ठरणार असल्याचे ते म्हणाले.

मनीष नगर रेल्वे आर.ओ.बी बांधकाम,आधी बांधकाम नंतर मंजूरी!
मेट्रो रेल्वेकडून बांधकाम करण्यात आलेल्या मनीष नगर रेल्वे आर.ओ.बीमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी असल्याचा आरोप पवार यांनी केला.महानगरपालिकेच्या अंतर्गत येणा-या या आर.ओ.बीचे बांधकाम मेट्रो रेल्वने केले व जवळपास मंजूरी न घेताच २०१९ पर्यंत ६२ कोटींचे बांधकाम एका खासगी एजंसीच्या माध्यमातून केल्यानंतर डीपीआर शासनाकडून मंजूर करुन घेण्यात आल्याचा घणाघाती आरोप पवार यांनी केला.परिणामी फक्त तांत्रिक दोषच नव्हे तर संपूर्ण बांधकामच गैरकायदेशीर व अवैध असून शासानाकडून या पुलाला मान्यताच प्राप्त नसल्याचा आरोप पवार यांनी केला.ही कोणती एजंसी आहे यासाठी पाच महिन्यात आम्ही १०० च्या वर माहिती आधिकार कायद्या अंतर्गत माहिती मागत आहोत मात्र सुरक्ष्ेचे कारण सांगून आम्हाला ती पुरविण्यात आली नाही,आम्ही अपीलात देखील गेलो मात्र आमची कुठेही सुनवाई झाली नाही.‘पैसा जनतेचा आणि सरकार झोपलेले’असेच आता म्हणावे लागेल.

या बांधकामांच्या निविदाच काढण्यात आल्या नाहीत.सरळ कामालाच सुरवात करण्यात आली.महामेट्रोने शासनाच्या धोरणालाच हरताळ फासल्याचे हे उदाहरण आहे.जर पुलाचा डीपीआर मंजूर झाला असता तर आज त्या पुलाला ‘वन-वे’करण्याची गरजच पडली नसती. पुलाचे बांधकाम धोकादायक झाले नसते.जसा टेकडी गणपतीसमाेरचा पूल हा तोडण्यात येऊन पुन्हा बांधण्यात येणार आहे तसेच या मनीष नगर पुलाचे देखील होणार असल्याची शंका त्यांनी जाहीर केली.या सदोष पुलाच्या बांधकामांचा संपूर्ण खर्च महामेट्रोच्या अधिकारी व प्रशासनातील अधिकारी यांच्याकडून वसूल करण्यात यावा,अशी मागणी त्यांनी केली.एनएचअायने आधीच या पुलाच्या बांधकामासाठी ३५० कोटी महामेट्रोला दिले असताना नागरिकांच्या जीवाशी खेळणारा सदोष पुल बांधण्यात आला,असा आरोप त्यांनी केला.

फेज-१ पूर्ण न होताच फेज-२च्या कामांना मंजुरी!
महामेट्रोच्या फेज-१ चा प्रकल्प हा २०१८ मध्ये प्राथमिक टप्प्यावर तर २०१९ मध्ये पूर्णत: पूर्ण होणे क्रमप्राप्त असताना अद्यापही फेज-१ चा प्रकल्पच पूर्ण झाला नाही,हा फेज-१ चा प्रकल्पच पूर्ण होण्यास जवळपास आणखी ५ वर्षे लागतील,असे असताना महामेट्रोने नुकतेच भंडारा,काटोल,हिंगणा,बुटीबोरी येथील फेज-२च्या प्रकल्पास सुरवात केली.मूळात नागपूरातील प्रकल्पच पूर्ण नाही.५ डी बीम सॉफ्टवेअरच्या माहितीनुसार प्रकल्प अपूर्ण असून प्रकल्प निधी मात्र ‘पूर्ण’खर्च झाला आहे!महामेट्रोकडे पुण्याच्या देखील महामेट्रोचे काम असल्याने फेज-२ मध्ये आता पुण्याच्या प्रकल्पातील पैसा ओतला जात आहे का?असा सवाल त्यांनी केला.

फेज-२ च्या कामांचे सोंग करुन व काेविडचे कारण पुढे करुन पैशांची जुळवाजुळव महामेट्रो करीत असल्याचे पवार यांनी सांगितले.प्रकल्पाची किंमत वाढवूनसुद्धा कर्ज वाढविल्या जाऊ शकते त्यामुळे शासनानेच या आर्थिक बाबीकडे लक्ष् देण्याची मागणी त्यांनी केली.फेज-१ पूर्णपणे सुरु न करता फेज-२ च्या कामांना मंजुरी देणे अत्यंत धोकादायक असून प्रशासकीय मंडळीच्या आर्थिक गैरव्यवहारासाठी नवे कुरण उपलब्ध करुन देण्यासारखे असल्याचे ते म्हणाले.‘जय जवान जय किसान’ही संघटना फेज-१ च्या कामांची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी आघाडी सरकारला करतेय.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा या संपूर्ण घोटाळ्यात लक्ष् घालून महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्ष्रीत यांच्या संपूर्ण निविदांची चौकशी करावी व जनतेच्या अपेक्ष्ा पूर्ण कराव्या ,अशी आशा प्रशांत पवार यांनी व्यक्त केली.

पत्र परिषदेत मिलिंद महादेवकर,रविंद्र ईटकेलवार,हरिश नायडू,माजी नगरसेवक तसेच अशोक शिंदे हे उपस्थित होते.

Latest बातम्या