Homeनागपूर न्यूजमहामेट्रो आता खासगी कंपन्यांच्या घश्‍यात!मेट्रोसाठी घेतलेल्या मोक्याच्या जमिनींवरही आता डोळा

महामेट्रो आता खासगी कंपन्यांच्या घश्‍यात!मेट्रोसाठी घेतलेल्या मोक्याच्या जमिनींवरही आता डोळा

Advertisements


‘जय जवान जय किसान’संघटनेचा आरोप

नागपूर,ता.१४ डिसेंबर: नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूक व एमएसएमई व्यवहार मंत्री नितीन गडकरी यांनी एका प्रकल्पाच्या उद् घाटनाप्रसंगी महामेट्रो रेल्वेचा अधिक फायदा ‘वापरा व हस्तांतरण करा’(बीओटी)तत्वावर अर्थात खासगी कंपन्यांमार्फत होऊ शकतो,असे विधान केले.त्यांचे हे विधान अत्यंत धक्कादायक असून मेट्रो रेल्वेच्या नागपूरच्या अहावालात(डीपीआर) मेट्रो ही नफ्यामध्ये धावणार असा स्पष्ट उल्लेख आहे,मग अश्‍या नफ्यामध्ये धावणारा मेट्रो प्रकल्प खासगी कंपन्यांना बीओटी तत्वावरच दिल्यास नफा मिळू शकतो,असे गडकरी यांचे विधान म्हणजे आतापर्यंत ‘जय जवान जय किसान’संघटनेतर्फे मेट्रोच्या प्रकल्पात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून आता संपूर्ण मलिदा खाऊन संपल्यानंतर,दुभत्या गायीचे दूध संपल्यानंतर खासगी कंपन्यांना हस्तांरीत करण्यात येणार,या आरोपावर गडकरी यांनी केलेले शिक्कामोतर्बच असल्याचा अारोप ‘जय जवान जय किसान‘संघटनेचे अध्यक्ष् व राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी आज पत्र-परिषदेत केला.

याप्रसंगी बोलताना प्रशांत पवार म्हणाले की,गेल्या दोन वर्षांपासून आम्ही व आमची संघटना ही महामेट्रो प्रकल्पामध्ये तब्बल अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्या असल्याचा दावा करीत होतो,तो दावा आता गडकरी यांच्या विधानाने सिद्ध झाला.शहरातील मेट्रो सेवा ही आता येणा-या ५० वर्षांत ही नफ्यात येऊच शकत नाही हे गडकरी यांनी देखील मान्य केले.तब्बल १० हजार कोटींच्या या महामेट्रोच्या प्रकल्पाचा मग नागपूरकरांना कोणता फायदा झाला?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

गडकरी यांनी केलेल्या विधानानुसार विकास कामांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध नाही.म्हणूनच विकास प्रकल्पांसाठी बीओटी तत्वावर कामांना वेग देणे गरजेचे असून मेट्रो रेल्वेचाही अधिक फायदा बीओटी तत्वावर अर्थात खासगी कंपन्यांमार्फत होऊ शकतो,असे गडकरी म्हणाले.गडकरी यांच्या या विधानाचा सरळ-सरळ अर्थ नागपूरकरांसाठी अतिरंजित स्वप्न दाखवून तब्बल दहा हजार कोटींची मेट्रो रेल्वे आता खासगी कंपन्यांच्या घशात घालून सर्वसामान्य कामगार वर्ग व नागपूरकरांच्या खिशाला भुर्दंड नाही का?असा प्रश्‍न त्यांनी विचारला.

याप्रसंगी बोलताना या संपूर्ण महामेट्रोच्या प्रकल्पात सुमारे अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आमची संघटना ही आधीपासूनच करीत असल्याचे ते म्हणाले.ही मेट्रो कधी नफ्यात धावणार नसल्याचा दावा आम्ही पहील्या दिवसापासूनच केला होता मात्र आम्ही केलेल्या असंख्य आरोपांकडे सर्वच सरकारांनी दूर्लक्ष् केले.

शहरातील मनपा व नासुप्रच्या जागांवरही डोळा-
महामेट्रो प्रकल्पासाठी शहरातील अत्यंत मोक्याच्या जागेवरील हजारो चौ.मी.भूखंड मेट्रोच्या घश्‍यात घालण्यात आला,आता मेट्रोच विकायला काढली आहे तर हे सर्व भूखंडा देखील खासगी कंपन्यांच्या घश्‍यात घालून ‘भ्रष्टाचारावर आणखी एका भ्रष्टाचाराची‘परंपरा निर्माण करण्याची शंका यावेळी प्रशांत पवार यांनी व्यक्त केली. मेट्रो प्रकल्पासाठी मनपा व नागपूर सुधार प्रन्यासच्या मालकीच्या सुमारे १० हजार कोटींच्या जागा मेट्रोला हस्तांतरित केल्या गेल्या आहेत.परिणामी मेट्रो रेल्वेच्या खाजगीकरणासोबतच सुमारे दहा हजार कोटींची ही जागा देखील बळकविण्याची योजना तयार असल्याची शंका पवार यांनी व्यक्त केली वखासगीकरण करायचे असल्यास जनतेकडून वसूल करण्यात येत असलेली १ टक्का स्टॅम्प ड्यूटी परत करावी अशी मागणी केली. मेट्रोच्या खाजगीकरणात शहरातील कुठल्याही जमिनी खासगी कंपन्यांना हस्तांतरित करण्यात येऊ नये,अशी मागणी करीत आमची संघटना ती होऊ देणार नसल्याचे ते म्हणाले.
कोणत्याही एजंसीवर विश्‍वास नाही,फक्त न्यायालयीन चौकशी व्हावी-

राज्याच्या उपराजधानीत मेट्रो प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा झाला असताना,आम्हाला सरकारकडून कोणत्याही समितीमार्फत होणा-या चौकशीवर विश्‍वास नसून फक्त माननीय न्यायालयाने स्वत: सूमोटो अंतर्गत या कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व या प्रकल्पाअंतर्गत जे जे अधिकारी नेमण्यात आले त्यांची प्रकल्पात रुजू होण्यापूर्वी व प्रकल्प आता असा अर्धवट असताना झालेल्या सापंत्तिक वाढीची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी यावेळी प्रशांत पवार यांनी केली.राज्यातील ही संपत्ती अडाणी,अंबानीसारख्या खासगी समुहाच्या घश्‍यात जाण्यापासून शासनाला थांबवावे. मेट्रो ही नागपूरकर जनतेसाठी आणण्यात आली होती,आता संपूर्ण मलिदा संपल्यानंतर, तोट्याचे कारण सांगून खासगी कंपन्यांच्या घश्‍यात हा महत्वाकांक्षी प्रकल्प घालण्याचा घाट ‘जय जवान जय किसान’संघटना पूर्ण होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी प्रशांत पवार यांनी दिला.

 

गडकरींचे दिक्षीत स्तुतीगानामागील गौडबंगाल काय?
या प्रकल्पातील सर्वाधिक भ्रष्टाचार जर कोणी केला असेल तर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दिक्षीत यांनी केला,असा उघडपणे आरोप करताना गडकरी हे नेहमी अनेक वेळा सार्वजनिक मंचावरुन अश्‍या या भ्रष्टाचारी अधिका-याची स्तुती गान करताना दिसतात,यामागील गौडबंगाल काय?याचा आता जनतेनीच विचार करावा,असे सूचक विधान पवार यांनी केले.एकीकडे गडकरी हेच, जे अधिकारी विकास प्रकल्प फेल करतात त्यांना जोड्यांनी मारले पाहिजे,अशी भाषा वापरतात दूसरीकडे उपराजधानीतील संपूर्ण महामेट्रोचा प्रकल्पच ज्या दिक्षीतांनी फेल केला,मेट्रो तोट्यात आणली,व आता जो प्रकल्पच खाजगी कंपन्यांना बीओटी तत्वावर चालविण्याचा घाट घालीत आहे,अश्‍या भ्रष्ट अधिका-याची वारंवार स्तुती गडकरी का करतात?याचे उत्तर गडकरी यांनीच आता जनतेला द्यावे,असे ते म्हणाले.

मेट्रोसारखा प्रकल्प ख-या अर्थाने शहरात सुरु झालाच नाही नुसती रंगरंगोटी करण्यात आली,अश्‍या प्रकल्पाची गडकरी स्तुती करतात,याचे आश्‍चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले.गडकरींनीच आता मेट्रोला हवेतून जमिनीवर आणावे,‘पॅलेस ऑन व्हील’सारखा उपक्रम राबवावा,यातून तोट्यात असणारी मेट्रो नफ्यात येईल,असा टोला पवार यांनी हाणला.ज्या दिक्षीतांकडे कर्मचा-यांचा पगार द्यायलाही आता पैसे नाहीत,अनेक कर्मचारी कामावरुन काढण्याच्या ते तयारीत आहेत,अश्‍या दिक्षीतांची कमालीची स्तुती गडकरी हे कसे करु शकतात?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शासकीय प्रकल्प तोट्यात आणनारे बृजेश दिक्षीत हे कौतूकाचे धनी होतात.ज्या प्रकल्पाच्या अहवालात हा प्रकल्प नफ्यात येईल असे सांगितल्यावरच प्रकल्पाला मंजूरी प्रदान झाली, हा प्रकल्प आर्थिक बाबीवर सक्ष् म असल्याचा अहवाल असल्यामुळेच राज्य व केंद्र शासनाने याला मंजूरी दिली,यात राज्य व केंद्राने आपला आर्थिक वाटा देखील वेळेवर दिला,तरी देखील हा प्रकल्प पूर्ण झालाच नाही,मार्च २०१९ मध्येच हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे अहवालात नमूद आहे,मात्र अजून ही महामेट्रोचे ४० टक्के काम अपूर्ण अाहे,महत्वाचे म्हणजे या संपूर्ण प्रकल्पाचा पैसा काम अपूर्ण असले तरी अाधीच पूर्ण खर्च झाला आहे,असा, प्रकल्प अर्धवट ठेवणा-या,प्रकल्प तोट्यात चालवणा-या तसेच प्रकल्पात प्रचंड भ्रष्टाचार करणा-या महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दिक्षीत यांची स्तुती गडकरी हे वरील बाबींसाठीच करतात का?हे देखील जनतेसमोर स्पष्ट झाले पाहिजे,असे आवाहन याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी केले.

मेट्रो घेता का मेट्रो?कोणीतरी विकत घ्या हो मेट्रो! अशी जाहीरात जर मेट्रो देणार असेल तर त्यांनी आमच्या संघटनेचे मार्गदर्शन घ्यावे आम्ही त्यांना नफ्यात मेट्रो चालविण्यासाठी चांगले मार्गदर्शन व उत्तम सूचना करु,असा टोला देखील त्यांनी हाणला.गेल्या दोन वर्षात आमच्या संघटनेने जवळपास ११५ माहितीच्या अधिकारात अर्ज दिलेत मात्र मेट्रोकडून एकाही अर्जाला अद्याप उत्तर मिळाले नाही.जिथे भ्रष्टाचार होतो त्या ठिकाणी माहिती अधिकारात माहिती दडवली जाते,असा ही आरोप यावेळी त्यांनी केला.

Latest बातम्या