

नागपूर,१४ डिसेंबर: : विधानपरिषदेच्या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे अपेक्षेपेक्षाही जास्त मतांनी विजयी झाले. कॉंग्रेसच्या अहंकाराला धुडकावून भा.ज.प. च्या ३१८ मता पेक्षा अधिक मते घेऊन ३६२ वर आकडा पोहोचला व महाराष्ट्रात सर्वात जास्त मताने निवडून येण्याचे सौभाग्य बावनकुळे यांना प्राप्त झाले.येत्या मनपाच्या निवडणूकीत काँग्रेसची अधिक वाईट स्थिती होणार असल्याची टिका आ.कृष्णा खोपडे यांनी केली.
बावनकुळे ५ वर्ष मंत्री असताना संपूर्ण राज्याला मेट्रोपेक्षाही जास्त गतीने विकासकामे करून संपूर्ण राज्याला न्याय दिला. आता विधानसभेत कॉंग्रेसला धडा शिकविण्यासाठी ‘समृद्धी’महामार्गा प्रमाणेच गती वाढवून या सरकारला धारेवर धरण्याचे काम बावनकुळे करतील,असे विधान आ.कृष्णा खोपडे यांनी पत्रकाद्वारे केले.
कॉंग्रेसला चिंतन करण्याची गरज-
कृष्णा खोपडे पुढे म्हणाले की, या निवडणुकीत जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या दोन मंत्र्यांनी प्रदेश अध्यक्षांनी दिलेला उमेदवार धुडकावून लावला व ऐनवेळी उमेदवार बदल करून नाना पटोले यांची मुजोरी कायमची बंद केली. पटोले हे आपल्या उलट-सुलट वक्तव्यामुळे आपली सीमा ओलांडून केंद्रीय नेतृत्वाबद्दल वाईट शब्दावलीचा प्रयोग करून आपल्या मानसिकतेचा परिचय देत असतात. नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये एकत्रित करणे, त्यानंतर त्यांच्या हातात लिफाफे देने, त्यानंतर सुद्धा कॉंग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी या नेत्यांचे ऐकले किंवा नाही, असाच संभ्रम आहे. ११४ वर्ष जुनी कॉंग्रेस आज कुठे चालली आहे. यावर चिंतन करण्याची गरज आज कॉंग्रेसला असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेस प्रवक्त्यांची अवस्था “अति शहाणा, त्याचा बैल रिकामा” अशी
कॉंग्रेस प्रवक्त्यांची महानगर पालिका निवडणूक लढण्याची ताकत नाही, मात्र शहाणपणा सा-या गावाचा त्यांच्यात आहे अशी खरमरीत टिका करीत, नेत्यांची चमचेगिरी करून पद प्राप्त करने, हा एकमेव त्यांचा धंदा असल्याचे ते म्हणाले. विकासकामाशी दूरदूर पर्यंत संबंध नसलेले हे प्रवक्ते मिडिया समोर जाऊन स्वस्त लोकप्रियता मिळवण्यासाठी काम करीत असतात. कुणाबद्दल बोलताना अनाप-शनाप बोलणे व शहाणपणा शिकविणे, हाच धंदा त्यांचा उरलेला असल्याची टिका त्यांनी केली.

आमचे चॅनल subscribe करा