
बावकुळेंनी बायकोच्या मावस भावाचीही संपत्ती हडपली
सूरज दामोदर तातोडे यांचा पत्र परिषदमध्ये खळबळजनक आरोप
तीस लाखांचा हिशेब बेतला जीवावर
कंत्राटदार कोट्यावधी रुपये बावणकुळेंच्या बंगल्यावर पोहोचवतात:तातोडे यांचा अारोप
मंत्री झाल्यावर बावणकुळेंनी जमवली जवळपास पाच हजार कोटींची माया:ॲड.सतीश उके यांचा आरोप
बावणकुळेंमुळे निखिल रोकडे यांच्यासह दोनशे घरांवर चालणार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा बुलडोजर!स्वत:ची पाच एकर जागा वाचवण्यासाठी नकाशाच बावणकुळेंनी बदलला:पिडीत निखिल रोकडे यांचा आरोप
उकेंवर करणार पन्नास कोटींचा मानहानिचा दावा: बावणकुळेंनी आरोप फेटाळले
नागपूर,ता. ३१ जानेवारी २०२२: माजी उर्जामंत्री व विद्यमान भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांच्यावर त्यांच्याच पत्नीच्या सख्ख्या मावस भावाने सूरज दामोदर तातोडे याने प्रेस क्लब येथे आयाजित पत्र-परिषदेत गंभीर आरोप केले.बावणकुळे यांच्या काेराडी तसेच मुंबईच्या बंगल्यावर एसजी इन्फ्रा,केकेसी,सरस्वती कन्ट्रकशन इ.कंपन्यांकडून कोट्यावधीचा निधी पोहोचवला असून आपल्या समाेरच विविध कंत्राटदारांकडून १०० कोटी रुपये घेण्यात आल्याचा खळबळजनक आरोप तातोडे यांनी केला. काेराडी येथील बंगल्यावरील संपूर्ण हिशेब मी सांभाळत होतो,कोणाकडून किती रक्कम घ्यायची आहे, कोणाला किती रक्कम पोहोचवायची हा संपूर्ण हिशेब बावणकुळेंनी विश्वासाने माझ्यावर सोपवला होता. मात्र एका कंत्राटदाराकडून बावणकुळे यांनी साढे सात कोटींची रक्कम घ्यायची आहे असे सांगितले असता त्या कंत्राटदाराने वेळोवेळी कधी एक कोटी,कधी तीस लाख अशी रक्कम माझ्याकडे आणून दिली.एकदा त्याने दिलेल्या एक कोटीमधून तीस लाखांची रक्कम बावणकुळे यांच्या सांगण्यातून कोणाला तरी मी दिली मात्र यानंतर त्याची डायरीमध्ये नोंद करण्यास विसरलो,जेव्हा बावणकुळे यांनी त्या तीस लाखांचा हिशेब मागितला तेव्हा मला कोणाला ते तीस लाख रुपये दिले हे नाव न लिहल्यामुळे वेळेवर आठवले नाही,परिणामी बावणकुळे व त्यांच्या पत्नीने,मुलाने,मुलीने माझ्यावर आरोप-प्रत्यारोप सुरु केले,मी गेल्या अठरा वर्षांपासून बावणकुळे यांचा विश्वासू आणि जवळचा नातेवाईक आहे,एवढ्या वर्षात कधीही एका ही पैशांचा गैरव्यवहार करण्याचा माझ्यावर डाग नाही,त्यामुळे बावणकुळे यांनी मी त्यांचा पैसा खालल्याचा आरोप करताच माझा रक्तदाब वाढला व मला अर्धांगवायूचा झटका आला.अश्या परिस्थितीत माझ्यावर रोबो उपचार करण्या ऐवजी माझीच संपूर्ण संपत्ती त्यांनी माझ्या स्वाक्ष-या घेऊन त्यांनी पत्नी ज्योती,मुलगा संकेत,मुलगी पायल व आपल्या स्वीय सहायकांच्या नावे करुन घेतली असल्याचा खळबळजनक आरोप सूरज तातोडे यांनी केला.याप्रसंगी मंचावर ॲड.सतीश उके व निखिल रोकडे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना तातोडे यांनी सांगितले की,आम्ही कुणबी समाजाचे असून बावणकुळे हे तेली समाजाचे आहेत.माझ्या आईच्या मोठ्या बहीणीचे लग्न चंद्रशेखर बावणकुळे यांच्यासोबत झाले आहे.बावणकुळे यांची पत्नी ज्योती बावणकुळे या माझ्या सख्ख्या मावशी आहेत.गेल्या अठरा वर्षांपासून बावणकुळे यांच्याच घरा जवळच मी त्यांचे काम बघता यावे यासाठी स्वखर्चाने घर बांधून राहत होतो. त्यांचा संपूर्ण आर्थिक व्यवहार मी सांभाळत होतो.माझा स्वत:चा ट्रांसपोर्टटेशन,बांधकाम,बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय होता.या व्यवसायातून मी नाेएडा येथे,रामदासपेठ येथे तीन फ्लॅट्स,धरमपेठ येथे फ्लॅट्स घेतले.कामठीत तीन मजली घर आहे.चार चारचाकी व दहा ट्रक आहेत.ही संपूर्ण संपत्ती मी माझ्या व्यवसायातून कमावलेली असून आमच्या सनदी लेखपालाने संपूर्ण हिशेब अायकर विभागालाही सादर केला आहे. याशिवाय बावणकुळे हे मला त्यांचा संपूर्ण बेकायदेशीर आर्थिक हिशेब सांभाळत असल्यामुळे पंचवीस हजार रुपये पगार देत होते.मात्र फक्त एकच वेळा तीस लाख रुपयांचा हिशेब मी वेळेवर देऊ शकलो नाही आणि संपूर्ण बावणकुळे कुटुंबिय माझ्यावर तुटून पडले,यामुळे माझा रक्तदाब शूट झाला मला अर्धांगवायूचा झटका आला,हे माझ्याच कर्माचे फळ आहे,तू आमचा पैसा खालला,असे मला बोल लावण्यात आले.ऑरेंज सिटी रुग्णालयात मी भर्ती असताना त्यांचे खास समर्थक नरेश मोटघरे यांच्याकडून रुग्णालयातच मला दमदाटी करण्यात आली,माझ्या संपत्तीच्या कागदांवर सह्या करण्याची जबरदस्ती करण्यात आली मात्र मी नकार दिल्याचे तातोडे यांनी सांगितले.
बावणकुळे यांनी काेराडी येथे जो बंगला बनवला आहे त्यात संपूर्ण सामान चायनामधून मागवण्यात आले असून त्यांच्या कोराडी येथील बंगल्यातील एक-एक झुंबर हे लाखो रुपयांचे असल्याचे तातोडे म्हणाले.याशिवाय मुंबईत जैतवन बंगल्यात देखील झालेल्या अनेक आर्थिक व्यवहारांचा देखील मी साक्षीदार असल्याचे तातोडे यांनी सांगितले.कंत्राटदार,विविध बँकेचे अधिकारी,एमएसईबीचे अधिकारी यांची संपूर्ण उठबस मीच हाताळत होतो.
२०१८ साली सावनेर रोडचे बांधकाम होत असताना ओरिएंटल कन्सट्रक्शनचे सोमनाथ शर्मा यांनी साढे सात कोटींमधील एक कोटी माझ्या जवळ दिले होते. त्याच पैशांतील तीस लाखांचा हिशेब मी विसरलो आणि माझ्यावर बावणकुळे यांच्या कुटुंबियांनी जे दडपण आणले ते मला सहन झाले नाही व माझा रक्तदाब इतका वाढला की मला अर्धांगवायूचा झटका आला.माझ्यावर उपचार करण्या ऐवजी किवा मला मुंबईत नेऊन अद्यावत उपचार करण्याची सोय उपलब्ध करुन देण्या ऐवजी,तू आमचे पैसे खालले म्हणून तुला हे फळ भोगावे लागत आहे,आतापर्यंत किती पैसे खालले,तुझी संपत्ती आमच्या नावाने करुन दे,असे बोल मला लावण्यात आले.नंतर ते तीस लाख कोणाजवळ दिले हे मला आठवलं व त्या व्यक्तीने देखील बावणकुळे यांच्याकडे कबुली दिली कि मी त्यांच्याकडे ते पैसे पोहोचवले होते मात्र बावणकुळे यांचा विश्वास आता माझ्यावर उरला नव्हता,माझ्या संपूर्ण संपत्तीसोबतच माझे शेअर्स देखील त्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने करुन घेतले.
ही संपत्ती त्यांनी विधान परिषदेच्या निवडणूकीत वारसा हक्काने मिळवली असल्याचे दाखवले आहे.ही संपत्ती त्यांना कोणत्याही वारसा हक्काने किवा बक्षीस म्हणून मिळाली नाही.माझ्याच चारही लक्सझुरियस आलिशान गाड्याही बळकावून घेतल्या.त्यांना मी माझ्या गाड्या परत मागतो तेव्हा त्या गाड्यांचे तुकडे करुन कारोडी तलावात फेकून देईल असा दम मला दिला जातो,माझी अशी शारिरीक अवस्था असताना माझे शेअर्स देखील त्यांनी बळकावून घेतले,असे तातोडे यांनी सांगितले.नरेश मोटघरे,महेश जोरे यांनी माझ्याकडून बळजबरीने सगळं लिहून घेतलं.माझ्याजवळ आता उपचारासाठीही पैसे नाही,मी एवढा गर्भश्रीमंत असताना आता मी हलाकीचे जीवन जगण्यास बाध्य झालो.
याप्रसंगी तातोडे यांनी त्यांच्या संपूर्ण फ्लॅट्स व संपत्तीच्या नोंदणीकृत सेल डीड व गाड्यांचे आर.सी.या त्यांच्या नावावर असल्याचा पुरावा माध्यमांना दाखवला.बावणकुळेंनी माझी संपत्ती संकेत बावणकुळे या त्यांच्या मुलांच्या नावे करुन दिली.रामदासपेठेतील माझे तीन फ्लॅट्स मुलगी पायल बावणकुळेंच्या नावे केली.नाेएडा मधील फ्लॅट,मौजा बाभूळखेडामधील संपत्तीवर देखील कब्जा केला.याप्रसंगी तातोडे यांनी सुरगाव ते दहेगाव रस्त्याच्या बांधकामात एसीसी कन्सट्रक्शन कंपनीकडून १ कोटी,एसीसी कडून ५ कोटी,एन.जी इन्फ्राकडून ५ कोटी,ओरिएंटल कडून साढे सात कोटी रुपये बावणकुळे यांच्या सांगण्यावरुन जमा केल्याचे सांगितले.
नागपूरातील नैवेद्यम हॉटेलच्या बाजूला मला बावणकुळेंसाठी १ कोटींची कॅश देण्यात आली.नैवेद्यम जवळील हा प्रकल्प किमान १० ते १२ कोटींचा आहे मात्र बँकेला हा प्रकल्प ५ कोटींचा दाखवण्यात आला.बावणकुळे यांचा काेराडी येथील बंगला १५ कोटींचा असून या बंगल्यातील प्रत्येक झुंबरच लाख-लाख रुपयांचे असून इंटिरियर डेकोरेशनचे संपूर्ण सामान बावणकुळे यांनी चायनावरुन मागवले असल्याचे तातोडे यांनी पत्र परिषदेत सांगितले.कोराडी येथील बंगला १५ कोटींचा असताना त्याची किंमत उमेदवारी अर्ज भरत असताना प्रतिज्ञा पत्रात ५ कोटी अशी दाखवण्यात आली आहे.
२०१८ मध्ये जेव्हा बावणकुळे हे उर्जामंत्री पदावर होते तेव्हा महाल येथील राजेश रोकडे यांच्या रोकडे ज्वेलर्समधून मी स्वत: एक किलो सोने बावणकुळेंसाठी घेऊन गेलो.यात दहा-दहा ग्रामचे सोन्याचे बिस्किटे होती.इतकं सगळ करुन ही आज ही माझं राहतं घर तोडण्यासाठी बुलडोजर पाठवण्यात आले.उर्जा मंत्री असताना एमएसईबीमधील ६० कोटींचा भंगार ४ कोटींमध्ये विकला.
विजय वर्गीय हा बावणकुळेंचा आणखी एक राजदार असून मुंबईच्या बंगल्यावर होणारे सर्व आर्थिक व्यवहार तो सांभाळतो.बावणकुळे यांची देशात व परदेशात जवळपास पाचा हजार कोटींची बेनामी संपत्ती असल्याचा खळबळजनक आरोप याप्रसंगी तातोडे यांनी केला.
याप्रसंगी बोलताना ॲड.सतीश उके यांनी सांगितले की गेल्या अनेक महिन्यांपासून सूरज तातोडे हा त्यांच्याशी संपर्क साधत आहे.मात्र हा घरगुती वादाचा विषय असल्याने मी तातोडे यांना भेटण्याचे व या वादात पडण्याचे टाळले.मात्र मला अनेकांचे फोन आले.तातोडे हे प्रामाणिक असून त्यांनी फक्त बावणकुळे यांचा ‘सांगकाम्या’म्हणून कामगिरी पार पाडली होती.त्यांच्यावर खराेखरंच अन्याय झाल्याचा विश्वास झाल्यानेच मी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले व त्यांच्यावर एका माजी उर्जामंत्री व विद्यमान आमदार यांच्याकडून होणा-या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच तातोडे यांना माध्यमांसमोर आणल्याचे उके यांनी सांगितले.
नुकतेच विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूक पार पडली.यात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्याच पक्षातील चांगले उमेदवार डावलून बावणकुळेंना केंद्रिय नेतृत्वाकडून तिकीट मिळवून देण्यात यश प्राप्त केलं.कारण त्यांच्या नजरेत पक्षातील प्रामाणिक व चांगल्या उमेदवारापेक्षा बक्कळ पैसा निवडणूकीत खर्च करु शकणाराच उमेदवार तिकीट मिळविण्यास पात्र ठरतो.हे त्यांनी भट सभागृहात उघडपणे बोलून ही दाखवलं की फक्त प्रामाणिक असणे हे आताच्या काळात पुरेसं नाही तर त्यासोबत ‘चतराई‘देखील असावी लागते.बावणकुळे हे गडकरींच्या या निकषावर खरे उतरतात त्यामुळेच त्यांच्यावर गडकरी यांचा एवढा जीव आहे आणि ३४ वर्षे भाजपमध्ये असणारे डॉ.छोटू भोयर किवा विद्यमान आमदार गिरीश व्यास यांना डावलून बावणकुळेंसाठी गडकरी यांनी तिकीट खेचून आणली.शेकडो कोटींचा भ्रष्टाचार करणारे चंद्रशेखर बावणकुळे हे निवडणूकीत आरामाम पैसा खर्च करु शकत होते,भाजपची सीट राखू शकत होते.
आज तातोडे यांनीच बावणकुळे हे भाजपसाठी किती योग्य उमेदवार होते हे जगासमोर आणले.कायद्याच्या लेखी आय-विटनेस हा कोणत्याही गुन्ह्यात कागदोपत्री पुराव्या इतकाच महत्वाचा ठरत असतो, त्यामुळे बावणकुळे यांच्या शेकडो कोटींच्या भ्रष्टाचारा संदर्भात तातोडे यांनी जे काही प्रत्यक्षदर्शी म्हणून कथन केलं त्याला देखील कायद्यात महत्व आहे.बावणकुळे यांनी त्यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात कायदे,नियम आणि नीतीमत्ता यांना गुंडाळून ठेवीत विद्यमान राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या भारतीय विद्या भवन शाळेला अगदी मुख्य रस्त्यावरची जागा देण्यासाठी काेराडी येथील थर्मल पॉवर स्टेशनसाठी राखीव जागा पेंच नदीत धरण टाकून पुरोहित यांच्या घश्यात घातली.यासाठी सर्व स्तरावर शासकीय कागदपत्रे,जागेचे आरक्षण आणि सात-बारा बदलले.कोराडी मंदिरातील ५ एकर जागा पुरोहित यांच्या संस्थेला दिली.डिफेन्स,महाजेनकोची जमीन बनवारीलाल पुरोहित यांना मिळवून दिली.पोलिसांच्या घरांसाठी राखीव जागा असणारी हजारी पहाड टेकडी देखील बळकावली व पुरोहित यांच्या रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी प्रिव्हिलेज कमेटीचे अध्यक्ष असताना मिळवून दिली.
एवढंच नव्हे तर काेराडी जगदंबा मंदिराचे हक्काचे,अधिकाराचे ५६ कोटींचे यात्री निवास स्वत:च्या संस्थेच्या घश्यात घालण्याचा घाट सुरु आहे.नासुप्रच्या येत्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याची माहिती उके यांनी याप्रसंगी दिली.यामुळे शासनाचा कराचा पैसा कोराडी संस्थानाला नाही तर बावणकुळे यांच्या संस्थेला मिळेल.याच ठिकाणची पाच एकर जागा पुरोहित यांनी संग्रहालयाच्या नावावर लाटली.कोराडी मंदिरात टी.व्ही वर २४ तास सुरु असणा-या लाईव्ह प्रक्षेपणात देखील खाली जाहीरात सुरु असते.या जाहिरातीतून दहा टक्के कोराडी संस्थानला व ९० टक्के वाटा बावणकुळेंना मिळतो.बावणकुळे हे कोराडी देवीपेक्षाही महत्तम आहे ते देवीपेक्षाही जास्त म्हणजे ९० टक्के वाटा स्वत:कडे ठेवतात आहेत आणि देवीला फक्त १० टक्के वाटा मिळत आहे.
गडकरी यांच्या अख्यत्यारितीत येणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कावरापेठेतील एक पूलाचे बांधकाम चांगल्या व प्रामाणिक कंत्राटदाराकडून काढून घेतले व बावणकुळे यांच्या मर्जीतल्या कंपनीला दिले.हा प्रकल्प केंद्र सरकारचा होता,या पुलासाठी केंद्राने पैसे खर्च केले होते.या ठिकाणी ३६ मीटरचा रेल्वेखालचा पूला निर्माण होणार होता.सार्वजनिक बांधकाम विभागातील एक भ्रष्ट अधिकारी भानोसे यांनी बदमाशी केली.त्यांनी हा पूल ३० मीटरचा केला.मूळ करारात एकाच ठिकाणी हा ३६ मीटरचा पूला अंडर व ओव्हर ब्रिज असा बनणार होता मात्र इमानदार कंत्राटदाराला बाहेरचा रस्ता दाखवून गडकरी यांच्या एनएचआयने हा पूल ३० मीटरचा केला ते ही ओव्हर ब्रिज वेगळा व अंडल ब्रिज वेगळा बांधला!अशी माहिती उके यांनी दिली.हे तर फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे,नागपूरात देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अनेक अश्याच कंपन्यांना टेंडर देऊन पुलांची निर्मिती केली आहे.त्यातील एक पारडी येथील पूलाचे गर्डर नुकतेच घरंगळले होते,हाच पूला आणखी दोन ठिकाणी खाली कोसळणार आहे,असेच दोन उड्डाण पूलांचे नागपूरात गर्डर कोसळणार असल्याचा दावा उके यांनी केला.
याप्रसंगी मंचावर उपस्थितीत निखिल रोकडे यांनी देखील आपली व्यथा मांडली.छिंदवाडा रोड पासून दोन तीन किलोमीटरच्या आत आऊटर रिंगरोड बनत आहे.या रस्त्याचा संपूर्ण नकाशाच बावणकुळे यांची पाच एकर जमीन वाचवण्यासाठी बदलण्यात आला.पूर्वीचा नकाश्यात बावणकुळे यांची जमीन या प्रकल्पात जात होती परिणामी त्यांनी तो रस्ता पश्चिमेकडे सरकवून घेतला.त्यांच्या या कृतीमुळे माझ्यासह २०० कुटुंबांची घरे आता तोडण्यात येणार आहे.बावणुळे यांचा उजवा हात मोटघरे हे तेथील स्थानिकांना धमक्या देण्याचे काम करीत आहेत.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी देखील बावणकुळे यांच्याच सल्ल्याने चालतात.कंत्राटदार हा हतबल आहे.तो सांगतो बावणकुळे यांचे काम थांबवणे मला शक्य नाही,एवढी बावणकुळे यांची धास्ती कंत्राटदाराला आहे.कंत्राटदाराचे हे बोलणे माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड आहे. बावणकुळे हे गर्भश्रीमंत आहेत,फक्त पाच एकर जागा रस्त्यात गेली तरी फरक पडणार नाही,त्यांना राहायला एक नव्हे तर दोन दोन आलिशान बंगले आहेत मात्र आमचे २०० लोकांचे कुटुंब हे उघड्यावर येणार आहे.आमची घरे तोडून मुरुम,गिट्टी टाकण्याचे प्रकार सुरु आहे. बावणकुळे यांचा उजवा हात नरेश मोटघरे हा जातीने लक्ष घालतोय.विशेष म्हणजे या संपूर्ण जागेची मोजणी आणि नकाशा १९९८ मध्येच तयार व मंजूर झाला होता,आता हा संपूर्ण रेकॉर्डच मोजणी कार्यालयातून गहाळ झाला आहे!बावणकुळे याच्या एका खास ठेकेदाराचे घर देखील या रस्त्याच्या कामात जाणार होते,बावणकुळे यांनी शासकीय यंत्रणा हाताशी धरुन २०० फूट रस्ता हा पश्चिमे कडेसरकवला यात त्यांच्या ठेकदाराचेही घर वाचले आणि त्यांची पाच एकर जमीन पण वाचली,पण आम्ही उघड्यावर पडणार आहोत,आमची कुठेच सुनवाई नाही का?
बावणकुळे यांच्यासह नरेश मोटघरे,धनराज बरडे,अजय विजयवर्गीय,अभि इंजिनअरिंग या सर्वांचीच चौकशी झाली पाहिजे,त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी तातोडे,रोकडे व ॲड.उके यांनी केला.
उके यांच्यावर ठोकणार ५० कोटींचा मानहानिचा दावा:बावणकुळे
सूरज तातोडे हा आमचा नातेवाईक आहे.बेरोजगार असल्याने त्याला काम दिले.ब्रेन हॅमरेज झाले तेव्हा उपचार करुन त्याचा जीव वाचवला.आता ते सतीश उकेंच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून मला त्रास देत आहेत.मी त्याची कुठलीही मालमत्ता घेतली नाही. माझ्या परिवारात कोणी घेतली असेल तर त्याची रजिस्ट्री नोंदणी कार्यालयात जाऊनच झाली असेल.हा मला व माझ्या परिवाराला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे,त्याला गांर्भीयाने घेण्याची गरज नाही.मी उके यांच्यावर फौजदारी खटला दाखल करणार असून आजच त्यांच्यावर ५० कोटींचा मानहानिचा दावा ठोकणार आहे.

आमचे चॅनल subscribe करा