Homeनागपूर न्यूजबसपाची ‘तटस्थता’ सर्वाधिक ‘क्रियाशील’

बसपाची ‘तटस्थता’ सर्वाधिक ‘क्रियाशील’

Advertisements


(रणधुमाळी विधान परिषद निवडणूकीची भाग-३)

मतदान केंद्रावर सर्वात आधी हजेरी लावणारे ठरलेत मतदार

नागपूर,ता. १० डिसेंबर: डिसेंबरच्या ६ तारखेला विधान सभेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणूकीची रणनीती ठरविण्यासाठी बहूजन समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी धर्मराज सिंह,प्रमोद रैना,प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे,शहराध्यक्ष महेश सहारे आदींच्या उपस्थितीत रवि भवन येथे बैठक पार पडली.

या बैठकीत महानगरपालिकेतील ११ व ग्रामीण मधील ३ असे १४ मतदार सदस्य यांना या निवडणूकीत ‘तटस्थ‘राहण्याची सूचना करण्याची मागणी मनपाचे बसप गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी केली मात्र या निवडणूकीतील संपूर्ण ‘अर्थ गणित’बघता यापैकि किती मतदार सदस्य हे तटस्थ राहतील अशी शंका होती आणि आज तसहील कार्यालयातील मतदान केंद्रावर सर्वात आधी मतदान करणारे बसपचेच मतदार आल्याने बसपाची मुल्याधिष्ठित ‘तटस्थता’ही किती ‘क्रियाशील’ आहे,याचा प्रत्यय वार्तांकनासाठी उपस्थित असणा-या माध्यमकर्मींनाही आला.

घोडेस्वार यांच्या प्रभाग क्र.४ मधील चारही बसप नगरसेवकांनी आज मतदान केले नाही व मतदानावर बहीष्कार घातला मात्र ग्रामीणमधील ३ व इतर महानगरपालिकेतील सदस्यांनी तटस्थतेची भूमिका सर्रास नाकारली.मतदान केंद्रावर त्यांच्या उपस्थितीमुळे काँग्रेससोबत ते ’मॅनेज’झाल्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

काँग्रेस व भारतीय जनता पक्ष हे दोन्ही बसपचे समांतर वैचारिक शत्रू आहेत असे घोडस्वार सांगतात.बसप ही फूले,शाहू,आंबेडकर यांच्या धोरणांवर चालणारा पक्ष आहे.अश्‍यावेळी फक्त आपल्या ‘वैयक्तीक’ लाभासाठी पक्षाची ध्येय-धोरणे वेशीला टांगणा-या नगरसेवकांवर त्यांनी चांगलीच आगपाखड केली.

माझा ग्रामीणमध्ये संपर्क नाही त्यामुळे ते कोणाला ‘मॅनेज’झाले सांगता येत नाही मात्र शहरातील बसप नगरसेवकांनी पक्षाशी,पक्षाच्या ध्येय धोरणांशी प्रतारणाच केल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.

एका आयात केलेल्या उमेदवाराला मतदान करणारे हे जनप्रतिनिधी स्वार्थ पिपासू असल्याची कठोर टिका करीत,वरिष्ठांनी याची दखल घेतली पाहीजे अशी मागणी केली.

तोंडावर आलेल्या मनपाच्या निवडणूकीत त्यांच्या या कृतीमुळे पक्षश्रेष्ठीच दिशानिर्देश देतील असे ते म्हणाले.

पक्ष श्रेष्ठींनी मतदानाबाबत स्थानिक नेतृत्वावरच निर्णय सोपवल्याने,बसपने या निवडणूकीत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षापासून अंतर राखावे,व तटस्थ राहावे या धोरणाच्या पाठपुराव्यासाठी घोडेस्वार यांनी मनपा मुख्याल्यात तातडीची पत्र परिषद देखील घेतली होती मात्र बसपचे नगरसेवकच या पत्र परिषदेला गैरहजर राहीले.

त्यामुळेच ‘पाणि कुठे मुरतंय’याचा अंदाज अनेकांना आला होता.आज सकाळी ८ वाजता मतदानाला सुरवात झाली आणि ‘पहीला ग’ट हा बसपाचाच मतदानासाठी दाखल झाल्याने त्यांच्या ‘तटस्थेची’ही चांगलीच चर्चा आज उपस्थितांमध्ये रंगली.

Latest बातम्या