Homeनागपूर न्यूजपोलिसांची भूमिका आरोपी शोधण्यासाठी असावी:आ.विकास ठाकरे

पोलिसांची भूमिका आरोपी शोधण्यासाठी असावी:आ.विकास ठाकरे

Advertisements

जनप्रतिनिधींकडे जाने हा जनतेचा अधिकार

कुकरेजाने गडर की राजनीती को धर्म की राजनीती से जोड दिया:बाबू खान

अट्रासिटीच्या गुन्हेगाराला अटक न केल्यास राष्ट्रीयस्तरावर नेणार मुद्दा: अनिल नगराळे

नागपूर,ता.१ मार्च २०२२ : रविवारी भाजपचे प्रभाग क्र.१ चे नगरसेवक विकी कुकरेजा यांच्या कार्यालयात जी घटना घडली त्या संबधात मला कार्यकर्त्यांचे फोन आले आणि काँग्रेसचा शहराध्यक्ष या नात्याने मी जरीपटका पोलिस ठाण्यात गेलो होतो,जी जनता जनप्रतिनिधींना मत देते,निवडून देते त्या जनप्रतिनिधींकडे जनतेला आपल्या समस्या जाऊन सांगण्याचा अधिकार आहे.अश्‍या वेळी जनतेच्या आवेशासमोर परिस्थिती नियंत्रणात ठेवणे हे जनप्रतिनिधीचे काम आहे.बाबू खान व चार महिलांसोबत कुकरेजा यांच्या कार्यालयात जो प्रकार झाला तो अत्यंत दूर्देवी असल्याचे विधान काँसेस शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी केले.

बाबू खान व महिलांसोबत मारहाण झालेली असताना भाजपचे लोक त्यांना मारहाण झाल्याचा आरोप करीत आहेत.मी पोलिस ठाण्यात गेलो तेव्हा दोन्ही पक्ष तिथे होते.पोलिसांची भूमिका ही नेहमी आरोपी कोण आहे ते शोधण्यासाठीची असावी.पोलिसांनी या संपूर्ण घटनेची नि:पक्ष चौकशी करावी,महीलांवर जर हात उचलल्या जात असेल तर ही फार गंभीर बाब असल्याचे ठाकरे हे म्हणाले.या महिला आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे गेल्या होत्या मात्र त्यांच्यावरच हात उचलल्या गेला,ज्यांनी कोणी हे कृत्य केले त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.

येणा-या दिवसांमध्ये नागपूर महानगरपालिकेची निवडणूक आहे,उत्तर नागपूर हा पालकमंत्री नितीन राऊत यांचा मतदार संघ आहे आणि त्यांच्याच मतदारसंघात असे काही घडत असेल तर ती निखंदून काढणे ही पोलिसांची जवाबदारी आहे मात्र आपली जवाबदारी योग्यरितीने पार पाडण्या ऐवजी एक पोलिस अधिकारी तर काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला धमकी देतो ’तेरे को चुनाव तक अंदर डाला दूंगा मै,यहा पे दिखना नही’, या पद्धतीची भाषा एखाद्या पोलिस अधिकारी वापरत असेल तर त्यालासुद्धा पोलिस आयुक्तांनी जाब विचारला पाहिजे आणि आमचे कार्यकर्ते लावारिस रस्त्यावर पडलेले नाही ज्यांना विचारणारे कोणीच नाही,असे पोलिसांनी समजू नये,असा इशारा ठाकरे यांनी पोलिसांना दिला.ज्यांच्या विरोधात एफआयआर नाही,गुन्हे दाखल नाही,जनतेच्या समस्यांसाठी ते जर आंदोलन करीत असतील आणि त्यांना जर पोलिस अधिकारी म्हणत असेल की ’तेरे को चुनाव तक अंदर कर दूंगा’,तर ही चुकीची घटना असून पोलिस आयुक्तांनी तातडीने याची चौकशी करावी,कोण आरोपी आहे,कोणाची चूक आहे त्यांना शिक्षा दिली पाहिजे.

दलित समाजाच्या महिलांवर हात उचलला जातोय,ही नागपूर शहरासाठी भूषणावह बाब नाही,अंबाझरी येथे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे कोणतीही,कोणाचही परवानगी न घेता स्मारक भवन तोडण्यात आले आणि खासगी कंत्राटदारांच्या घश्‍यात ती जागा देण्यात आली.एका विशिष्ट समाजाच्याप्रति अशी वर्तवणूक योग्य नाही,निवडणूकीच्या आधी नेमकं भाजपला नागपूर शहरात साधायचं काय आहे?हाच एक मोठा प्रश्‍नचिन्ह आहे,पोलिसांनी दोषींवर योग्य ती कारवाई केलीच पाहिजे,अशी मागणी याप्रसंगी आ.विकास ठाकरे यांनी केली.

भाजप नगरसेवक विकी कुकरेजा याच्या विरोधात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल असताना त्यांना अद्याप अटक झाली नाही,पोलिसांच्या लेखी तो ‘सापडत नाही’ मात्र प्रेस क्लबमध्ये येऊन ते सर्रास पत्र परिषद घेत असल्याची टिका अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय समन्वयक अनिल नगराळे यांनी सोमवारी पत्र परिषदेत केली.हूडको कॉलनीतील महिला या बाबू खान याच्यासोबत गडरचे तुंबलेले चेंबर व उग्र दुर्गंधीबाबत समस्या घेऊन गेल्या असता त्यांनाच मारहाण होते,त्यांचे मोबाईल हिसकले जातात,जगदीश वंभानी,खेमराज धमाय हे महिलांना धक्काबुक्की करतात,स्वत:कार्यालयाची तोडफोड करतात,सीसीटीव्ही नसल्याचे खोटे सांगतात,जरीरपटका मार्केट बंद करतात,चौकात टायर जाळतात,भाजपचे माजी आमदार डॉ.मिलिंद माने हे आमच्या गौतम अंबाली या कार्यकर्त्याला कमरेखालच्या शिव्या देतात,पोलिस देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याऐवजी, आम्ही मेडीकलच्या अहवालासाठी थांबलो असे थातूरमातूर उत्तर देतात,या सर्व घटनेची नि:पक्षपाती चौकशी झाली पाहिजे अन्यथा राष्ट्रीयस्तरावर हा विषय घेऊन जाऊ आणि येत्या काळात आंदोलन तीव्र करु,असा इशारा नगराळे यांनी दिला.

निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण सिंधी समाजाला संभ्रमित करने,त्यांना चुकीचे मॅसेज फॉरवर्ड करने,जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करने अश्‍या गंभीर कृत्याविरोधात कुकरेजावर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली

कुकरेजा यांनी जरीपटका व्हॉट्स ॲप ग्रूपवर ’एक हिंदू नगरसेवक के कार्यालयमे एक मुसलमानने तोडफोड की’असे मॅसेज फॉरवर्ड केले,सर्वांनी त्वरित वसंतशाह चौकात जमा होण्यासाठी व जरीपटका पोलिस ठाण्यात माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी चलावे असे कुकरेजाने आवाहन केले.कुकरेजाने ‘गडर की राजनीती को धर्म की राजनीती से जोडा’असा आरोप बाबू खानने केला.माझ्या वस्तीत मी एकटा मुस्लिम असून सर्व हिंदू व सिंधी बांधव माझ्या वस्तीत राहतात.त्यांच्या सर्व धार्मिक कार्यक्रमात मी सहभागी होतो.भाजप नगरसेवक संजय चौधरी यानेच माझ्यावर हात उचलला होता वरुन माझ्यावरच खोटे आरोप केले की मी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली.मी भाड्याने महिला कुकरेजाच्या कार्यालयात आणल्या असा आरोप केला जातोय,या महिला कुकरेजा यांच्याच मतदारसंघातील असून त्या अनुसूचित जातीच्याच आहे त्यांच्याकडे आधारकार्ड आहेत,या समता नगरमधील महिला मतदार असून ‘कुकरेजा अब बौखला’गया है’असे बाबू खान म्हणाला.कुकरेजा सभी को खरीदने की ताकद रखता हैे,मला ही त्याने व्हॉटस ॲपवर कॉल करुन ’तू मेरे लिये शॉर्ट फिल्म बना,उसमे मैने समता नगर,हूडको कॉलनी में अच्छा काम किया है,ऐसा बोल’अशी धमकी दिल्याचा आरोप बाबू खानने केला.

याप्रसंगी उपस्थित महिलांनी त्यांच्यासोबत घडलेला घटनाक्रम सांगितला.कोणाचं मंगळसूत्र तुटलं,कोणाच्या हाताला मार लागला,कोणाचे कानातले पडले तर कोणाच्या ब्लाऊजचा बंद तुटला,कुकरेजा याचे १५-२० कार्यकर्ते बाबू खानचे केस धरुन मारत असताना आम्ही त्याला वाचवायला मध्ये पडलो त्यामुळे आम्हाला देखील अयोग्य,असभ्य व अशोभनीय वागणूक कुकरेजाच्या कार्यकर्त्यांकडून मिळाली असल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले.

आ.विकास ठाकरे यांनी या महिलांच्या आपबितीनंतर खेद व्यक्त करीत ही फार चुकीची पद्धत असून नागपूर शहरातले नागरिक हे फार समंजस असून सामंजस्याने राहणारे असल्याचे सांगितले.निवडणूक ही १५ दिवसांची असते,असे असताना महिलांसोबत असा दुर्व्यवहार योग्य नाही,ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे,असे ते म्हणाले.

कुकरेजांच्या जामिनासाठी फडणवीस यांच्या वकीलांचे वकीलपत्र-
या सर्व घडामोडीनंतर अटकपूर्व जामिन मिळवण्यासाठी कुकरेजा यांनी न्यायालयात धाव घेतली.कार्यालयात झालेल्या वादानंतर महिलेच्या तक्रारीवरुन कुकरेजा व त्यांच्या समर्थकांविरुद्ध विनयभंग,शिवीगाळ व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.कुकरेजांनी त्यांचे वकील ॲड.उदय डबले आणि ॲड.प्रफूल्ल मोहगावकर यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कुकरेजांना अंतिम दिलासा देण्यास नकार दिला असून या अर्जावर आता ३ मार्च रोजी सुनावणी होणे अपेक्ष्त आहे.

Latest बातम्या