

नागपूर,ता. १५ जानेवारी: नायलॉन मांजामुळे होणारे प्राणघातक अपघात रोखण्यासाठी २०१५ मध्ये काढलेल्या आदेशांची तसेच राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या?अशी परखड विचारणा पर्यावरण खात्याच्या सचिवांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली.
ज्ञानेश्वर नगर येथील तरुण प्रणय प्रकाश ठाकरे याचा १२ जानेवारी रोजी सायकांळी ५.३० वा.नायलॉन मांजामुळे हकनाक बळी गेला.या घटनेची गंभीर दखल घेत न्या.सुनील शुक्रे आणि न्या.अविनाश घरोटे यांनी स्वत:हून जनहित याचिका दाखल करण्याचा आदेश दिला.
त्या
नुसार,या प्रकरणी न्यायालय मित्र ॲड.देवेन चौहान यांनी जनहित याचिका दाखर केली.त्यावर हायकोर्टात सुनावणी झाली.न्यायालयमित्र चौहान म्हणाले‘पर्यावरण खात्याच्या सचिवांनी २०१५ मध्येच नायलॉन मांजावर बंदी घालणारा आदेश दिला होता.त्यानंतरही प्रशासकीय आदेश काढण्यात आले होते.
तरीही या मांजाची राज्यात सर्रास विक्री होत आहे.या मांजामुळे केवळ माणसालाच नव्हे तर पक्ष्यांना देखील प्राणघातक जखमा होत आहेत.त्यामुळे नायलॉन मांजा बदीवर तातडीने प्रभावी अंमलबजावणी व्हावी.
दरम्यान,हायकोर्टाने राज्याचे पर्यावरण सचिव,पोलिस आयुक्त,जिल्हाधिकारी व इतर प्रशासकीय अधिका-यांना नोटीस बजावली.तसेच नायलॉन मांजाच्या बंदीकरीता देण्यात आलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीकरीता आतापर्यंत काय केले?तसेच भविष्यात नायलॉन मांजामुळे प्राणघज्ञतक अपघात होणार नाहीत,यासाठी कोणत्या उपाययोजना केल्यात?अशी विचारणा राज्याच्या पर्यावरण सचिवांना करण्यात आली.त्यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे.

आमचे चॅनल subscribe करा