Homeनागपूर न्यूजजग गेलं खड्ड्यात:ट्रांस जेंडर्संनी निर्भिडपणे समाजा पुढे यावे

जग गेलं खड्ड्यात:ट्रांस जेंडर्संनी निर्भिडपणे समाजा पुढे यावे

Advertisements

सारथी‘ ट्रस्टकडून वैदर्भीय ट्रांस जेंडर्सची पहीली मार्गदर्शन कार्यशाळा संपंन्न

नागपूर,ता. ११ फेब्रुवारी: ट्रासं जेंडर्स शब्द त्या लाेकांसाठी वापरला जातो ज्यांची लैंगिक ओळख किवा अभिव्यक्ती ही त्या लैंगिक ओळखीपेक्ष्ा वेगळी असते जी त्यांना जन्माच्या वेळेस मिळत असते,ट्रांस जेंडरचा अर्थ गूगलमध्ये शोधल्यास ‘किन्नर’असा अतिशय चूकीचा अर्थ वाचायला मिळतो. मूल जन्माला घालणा-या प्रत्येक आई-वडीलांना तेव्हा मानसिक धक्का बसतो जेव्हा त्यांचा मुलगा किवा मुलगी इतर सामान्य मुलांसारखा लैंगिक समानता असणा-या मुलांमध्ये मिसळत नाही,खेळत नाही,उलट मुलाला किवा मुलीला विरुद्ध लिंगीसोबत जास्त सोयीस्कर वाटतं.अश्‍या मुला किवा मुलीमध्ये स्त्री आणि पुरुष दोघांचेही लक्ष् णे आढळतात.

गर्भावस्थेच्या पहील्या तीन महिन्यात लिंगनिश्‍चती-
वैद्यकीय क्ष्ेत्रातील तज्ज्ञांच्या मते गर्भावस्थेच्या पहील्या तीन महिन्यातच गर्भाची लिंग निश्‍चिती होत असते.अश्‍यावेळी एखादा अपघात,विषारी किवा हानिकारक खाणे-पिणे,गुणसूत्रांची झालेली गडबड यामुळे पुरुष किवा स्त्री घडण्याऐवजी दोन्ही लिंगाचे गुणसूत्र गर्भातील बाळात घडतात.तज्ज्ञांच्या मते जेव्हा मूल हे वयात येतं तेव्हाच त्याच्या मेेंदूमध्ये जो स्त्राव स्त्रवत असतो,त्याकाळात जेव्हा मूल आपल्या स्त्रीलिंगी किवा पुरुषलिंगी नैसर्गिक स्वभावगुणधर्माने वागण्या ऐवजी विरुद्ध लिंगी आवड दर्शवित असेल तर त्याचे हे वागणे तो ट्रांस जेंडर असल्याचा सूचक इशारा असतो.

अश्‍यावेळी मूलांना मूलींसारखे राहणे,खेळणे,भावना व्यक्त करणे तसेच मूलींना मूलांसारखे रहायला,खेळायला आवडतं तेव्हा पालकांनी त्यांच्या या स्वभाव गुणांकडे विशेष लक्ष् देण्याची गरज असते ना की त्यांना या नैसर्गिक व उपजत गोष्टीसाठी घालून पाडून बोलण्याची ,टोमणे मारण्याची.

तज्ज्ञ सांगतात स्वच्छतागृहाची निवड आणि बोलण्या,वागण्याची त-हा यावरुन तुम्हाला तुमची मुले ही गर्भावस्थात्या पहील्या तीन महिन्यातील गूणसूत्रांच्या जुळवणीवेळीस झालेल्या संप्रेरकांच्या गडबडीमुळे तो ट्रांस जेंडर झाला आहे,हे सत्य स्वीकारता आलं पाहिजे,मात्र आज २१ सा व्या शतकाच्या तिस-या दशकात आपण प्रवेश केला असतानाही आपण खरंच त्यांच्या बाबातीत संप्रेरकांची ही नियतीने केलेली गडबड समजून घेण्याची पात्रता ठेवतो का?

याचे उत्तर दूर्देवाने ‘नाही’असेच द्यावे लागत असून उलट आपण त्यांचा जीवघेण्या सामाजिक दडपणातून कोंडमारा करतो,त्यांची थट्टा करतो,त्यांची लाज बाळगतो,प्रसंगी त्यांना घरातून परांगदा ही करतो!

आज गुरुवार दि. ११ फेब्रुवरी रोजी बर्डी येथील लता मंगेशकर रुग्णालयातील ‘सारथी‘च्या कार्यालयात ट्रांस ज़ेंडरर्ससाठी विशेष मागदर्शन कार्यशाळा पार पडली.या कार्यशाळेत ट्रांस जेंडर्सच्या सामाजिक,आर्थिक,आरोग्य विषयक समस्या,शस्त्रक्रियेची माहिती,ट्रांस जेंडर्ससाठी अस्तित्वात असणारे कायदे,न्यायालयीन निकाल,जनजागृतीची निकडीची गरज,अधिकार इ विषयांवर मेडीकलचे वरिष्ठ डॉक्टर आनंद सावजी, एनसीसीआयचे विजयन पिल्ले, नरेश पालानपवार,गणेश पराते तसेच ट्रांस जेंडर राज कनोजिया,डॉ.भावेश जैन तसेच आंचल वर्मा इ.यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

राज कनोजिया हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.सुप्रिया सुळे निर्मित एलजीबीटी सेलचे प्रमुख आहेत. याप्रसंगी त्यांनी उपस्थित,गोंधळलेल्या,विमन्सक ट्रांस जेंडर तरुणाईसमोर संपूर्ण मर्म उलगडले.आज या कार्यशाळेत उपस्थित तरुणाई यात मुले आणि मुले दोन्ही होती,यांच्या मनावरील ताण,दडपण हे त्यांच्या डोळ्यातही स्पष्ट दिसत होते.अश्‍यावेळी कनोजिया यांनी अश्‍या कार्यशाळेची यासाठीच गरज असल्याचे प्रतिपादीत करुन आपले लिंग परिवर्तन करुन घेणे हे काही गैरकृत्य नसल्याचे सांगितले.

संविधान आम्हाला आपल्या मताप्रमाणे इतर नागरिकांसारखाच जगण्याचा अधिकार देतो असे ते म्हणाले.नियतीने गर्भात असताना केलेल्या चूकीची लाज आम्ही का म्हणून आयुष्यभर बाळगावी?आम्ही तेच करणार जे आम्हाला नियतीची चूक सूधारुन आवडीचे जगणे करणे शक्य आहे.मुलामध्ये मुलीची संप्रेरके जास्त आल्यास त्याला लिंग परिवर्तन करुन मुलीसारखे सामान्य जगण्याचा हक्क आहे.यासाठी शस्त्रक्रियेची गरज असते मात्र खासगी रुग्णालयात यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात तर भारतात फार कमी रुग्णालयात अशी शस्त्रक्रिया होते ती ही नागपूरात होत नाही.

एकत्रितरित्या येऊन,संघटीत होऊन एकमेकांना सहाय्य करण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.यासाठी नागपूरमध्ये वेगवेगळ्या जागेवर भेटा,उमंगसारख्या व्हॉट्स ॲपवर जॉईन व्हा,यामुळे आपल्या आंतरिक,भावनिक समस्या मांडण्याचं बळ मिळेल.

आपले पालक आपल्याला समजून घेत नाही ही आपली तक्रार असते मात्र पालक तरी कुठे चूकतात?ते आपल्याला घालून पाडून बोलतात कारण त्यांना आपली काळजी असते.आधी ‘स्वत:स्वत:चा स्वीकार करा’मगच जग तुम्हाला स्वीकारेल असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

ट्रांस जेंडर नंतर विद्यापीठातून कागदपत्रे बदलविण्याची प्रक्रिया ही त्यांनी समजावून सांगितली.गुजरातचे डॉ.मानवेंद्र सिंह गाेयल,डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज,इग्नू विद्यापीठाद्वारे ट्रांस जेंडर्ससाठी राबविले जाणारे उपक्रमांची माहिती दिली.

सरकारच्या लेखी ट्रांस जेंडर म्हणजे फक्त ‘किन्नर’समुदाय असाच होतो.मात्र ट्रांस जेंडरचा अर्थ किन्नर असा होत नाही. किन्नर हे सरकारकडून आपले हक्क भांडून तरी मिळवतात.ट्रांस जेंडर्सन ही आपला सन्मानाने जगण्याचा हक्क सरकारकडून कायदेशीररित्या मिळवला पाहिजे,असा सल्ला त्यांनी दिला.यासाठी आपल्या आपल्या नावा पुढे ‘ट्रांस’लावण्याची गरज नाही.ही फक्त एक वैद्यकीय शस्त्रक्रिया असते,एका लिंगातून भिन्न लिंगामध्ये परिवर्तन करुन घेणे एवढाच याचा अर्थ आहे.यामुळे ‘माणूस‘म्हणून आपण कुठे बदलतो?

मात्र शासकीय असो किवा खासगी,नोकरीवर रुजू होताना फाईलच्या आत आपलं लिंग परिवर्तन झालं आहे तो कागद मात्र राहू द्या.ज्या सरकारी नोकरीत शारिरीक चाचणीची गरज असते अश्‍या नोकरीमध्ये याचा इश्‍यू होऊ शकतो.सरकार आता ट्रांस जेंडर्ससाठी आरक्ष् णाची तरतूद करणार आहे मात्र आपण आपले भविष्य स्वत:घडवण्यासाठी समर्थ असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी नागपूरच्या पोलीस दलातील एका मुलाने आपण मूलगा म्हणून पोलीस दलात कार्यरत आहोत मात्र त्याला आता लिंग परिवर्तन करुन मुलगी व्हायचं आहे तर त्याने काय करावे?पोलिस खात्यात हे कळलं तर सरकारी नोकरी जाऊ शकते का?या नोकरीची त्याला खूप गरज असल्याचे त्याने सांगितले.या प्रश्‍नावर राज कनोजिया यांनी त्याने आपल्या वरिष्ठांना याबाबत आधी कल्पना द्यावी,विशेष म्हणजे ट्रासं जेंडर्संना नोकरीवरुन काढता येत नाही,असेच निकाल आजपर्यंत विविध न्यायालयांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नोकरीची तमा न बाळगता आतील घूसमटीतून आधी मुक्त हो,असा सल्ला त्यांनी दिला.

३७७ कायदा म्हणजे अनैसर्गिक संभोग यातून समलैंगिकांना वगळण्यात आले मात्र कायदा अजून तसाच असल्याचे ते म्हणाले.यावेळी लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया विदर्भात सर्वात मोठे रुग्णालय असणारे मेडीकल मध्येही व्हावी अशी मागणी ही त्यांनी केली.यासाठी योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करु,असे ते म्हणाले.

लिंग परिवर्तन करणारे यांच्यासाठी भारतात  योग्य मानसोपचारतज्ज्ञांची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.डॉक्टर्स ही या बाबतीत अज्ञानी असल्याचे त्यांनी सांगितले.सामान्य वर्गातील मुले किवा मुली चार चार लाख रुपये लिंग परिवर्तनासाठी देऊ शकत नाहीत,यामुळे केवळ घुसमट त्यांच्या वाटेला येते असल्याचे ते म्हणाले.

आपल्या मनाने संप्रेरके घेऊ नका याचा किडनीवर परिणाम होतो,असा इशारा त्यांनी दिला.तज्ज्ञांच्या सल्ल्यानीच औषधोपचार करावे असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना डॉ.भावेश जैन यांनी विदर्भातून लिंग परिवर्तीत करणारा म्हणून मी एकटाच धाडसाने समाजासमोर आल्याचे सांगितले.विदर्भात कुठेही ही शस्त्रक्रिया होत नसून मुंबईच्या एकमेव सायन रुग्णालयातच धाव घय्ावी लागत असल्याचे ते म्हणाले.विदर्भात मात्र मेडीकलचे डॉ.आनंद सावजी समोर आले याचा आंनद झाला असे ते म्हणाले.

ट्रांस जेंडर्सच्या मानसिक,भावनिक,शारिरिक आणि आर्थिक समस्या समाजाने आधी समजून घेण्याची गरज असल्याचे सांगून यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे ते म्हणाले.

घूसमटीत जगण्यापेक्ष्ा शस्त्रक्रिया करुन घ्या आणि आपल्या आवडीचे जिवन जगा असा सल्ला त्यांनी दिला.

ट्रांस जेंडर केलेल्या आंचल वर्मा यांनी ट्रांस जेंडर असणे म्हणजे किन्नर हा गैरसमज सर्वात आधी समाजाने दूर करावा अशी आशा व्यक्त केली.ट्रांस जेंडर म्हणजे स्त्री हा पुरुष तर पुरुष हा स्त्री होऊ शकतो एवढा त्याचा साधा सोपा जैविक आणि नैसर्गिक अर्थ आहे.

समाजाचा गैरसमज दूर व्हावा यासाठी ट्रांस जेंडर केलेल्यांनी मोठय्ा प्रमाणात समाजासमोर येण्याची गरज तिने प्रतिपादीत केली.ती जन्माने मूलगा होती.अश्‍विन असे तिचे नाव होते मात्र लिंग परिवर्तन करुन घेतल्यानंतर तिने तिचे नाव आंचल ठेवले.आज मी माझ्या या ओळखीवर संतुष्ट असल्याचे तिने सांगितले.२० वर्षा पूर्वी दिल्ली येथे केलेली शस्त्रक्रिया सोपी नव्हती.शारिरीक आणि भावनिक दृष्टया खूप कठीण असल्याचे तिने सांगितले.यासाठी तिचा पहीला संघर्ष तिच्या कुटुंबियांशी घडला.

मुलगा असून तू मुलीसारखा का वागतोस म्हणून फक्त ५ वीत शिकत असताना तिच्या कुटुंबियांनी तिला घरातून हाकलून दिले.यानंतर रस्त्यावरचे जिने नशीबी आले पण…हार नाही मानली.आयुष्याच्या भटकंतीने तिला दिल्लीत पोहोचवले. डॉ.संजीवनी रुग्णालयातील डॉ.संजीव यांनी पूर्णपणे नि:शुल्क तिचे लिंग परिवर्तन केले,तिला स्त्रीचे रुप दिले.आज मी माझ्या आयुष्यावर पूर्णपणे संतुष्ट असून ‘सारथी‘मध्ये जनजागृतीसाठी सल्लागार म्हणून काम करीत असल्याचे तिने सांगितले.

थोडक्यात सारथी किवा हमसफरसारख्या संस्था ट्रांस जेंडर्स असोत,किन्नर समाज असो किवा समलिंगी समुदाय असाे, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा सपशेल चूकीचा दृष्टिकोण बदलण्याचा प्रयत्न करीत आहे.खरे तर एखाद्या मंदिरात देवासमोर प्रल्वलित होणारी दिव्यांची ज्योत जेवढी पवित्र असते तेवढेच पवित्र मानवी समाजातील हे सर्व समुदाय देखील आहेत मात्र आम्ही त्यांची जैविक,गुणशास्त्रीय,वैद्यकीय,नैसर्गिक असंतुलने समजून न घेता त्यांना समाजातील अनैतिक घटक म्हणून दुत्कारत असतो,तिरस्कृत करीत असतो.हा खरा तर आमचाच दोष.तो कोणत्या शतकात आम्ही बदलणार आहोत?हा प्रश्‍न आम्हीच स्वत:ला विचारयला हवा….!

सत्ताधीश’चा त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा.

Latest बातम्या