फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजगडकरी-सोलेंची शांतता ही वादळापूर्वीची शांतता आहे का?

गडकरी-सोलेंची शांतता ही वादळापूर्वीची शांतता आहे का?

Advertisements

पदवीधर निवडणूक: कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण:पक्ष् झाला ‘प्रायव्हेट लिमिटेड!’

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १० नोव्हेंबर: भारतीय जनता पक्षातर्फे काल अनपेक्षितपणे विद्यमान आमदार प्रा.अनिल सोले यांना डावलून महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.आतापर्यंत पडद्यामागून पाठीवर वार केले जात हाेते मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरी विरोधात हा ‘मास्टर स्ट्रोक’खेळला असल्याची कुजबुज आज दिवसभर ऐकू आली.कालपासून केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तसेच आ.सोले हे देखील ’शांत व संयत’आहेत,परिणामी ही वादळापूर्वीची शांतता आहे का,असा संशय आता व्यक्त केला जात आहे….!

विदर्भ हा पूर्वापार काँग्रेसचा गड राहीला आहे.विदर्भात काँग्रेसच्या ‘गडाला’ सुरुंग जर कोणी लावला असेल तर ते ‘गडकरीच’असल्याचा इतिहास आहे.विदर्भात गडकरी यांनी पक्ष्ाला मोठं केलं.राममंदिर नंतर पक्ष्ाची विचाराधारा खोलवर रुजली.इतर राज्यात देखील हेच घडले. धडाकेबाज कारभार,धोरणे,परखड स्वभाव यामुळे २०१४ मध्ये दिल्लीत सत्ता मिळताच गडकरी हे पुढे जाऊन डोईजड होतील याचा मोदी-शहा जोडीला अंदाज आला आणि येथूनच गडकरी यांचे पंख छाटणे सुरु झाले.मग महाराष्ट्रात गडकरी विरोधात फडणवीस’ यांना आपसूकच मोठे करणं सुरु झालं. महाराष्ट्राबाबत महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत गडकरी यांना ‘सहेतूक’डावलले जाऊ लागले.‘गटबाजी’ही प्रत्येकच राजकीय पक्षाला लागलेली किड आहे.यातून कोणताही पक्ष् सुटला नाही. आपलं पोट सांभाळून देशासाठी,समाजासाठी जी सामान्य माणसे राजकारणात येऊ पाहतात,ती देखील भाजपसारख्या पक्षात आपल्याच उपराजधानीत पराकोटीची गटबाजी बघून थक्क झाली आहे.

भाजपच्या २०१४ मधील पहील्या टर्ममध्ये गडकरी यांना पहील्या पाच महत्वाच्या मंत्र्यांमध्ये सहभागी करावे,अशी संघाचीच सूचना होती,असे सांगितले जात आहे.यामुळेच महाराष्ट्रात फडणवीस यांना सुनियोजितपणे मोठे करण्यात आले.पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी पुन्हा एकदा आ.सोले यांना मिळावी यासाठी गडकरी आग्रही होते मात्र केंद्रिय निवडणूक समितीने गडकरी यांचा मताचा विचार न करता फडणवीस यांच्या ‘शब्दाची’ बूज राखली.यानंतर आता गडकरी यांचे समर्थक उघडपणे चर्चा करु लागले आहेत.येत्या दोन दिवसात काही तरी ‘नक्कीच’ घडणार आहे,अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये ऐकू आली….!

वंजारी यांचा अर्ज अद्याप का नाही?

संदीप जोशी यांची उमदेवारी जाहीर होताच,ॲड.अभिजित वंजारी यांच्यासोबत अर्ज भरण्यासाठी हजर राहणा-याचा शब्द दिलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष् व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा अचानक नागपूर दौरा रद्द झाला,यामुळे देखील पडद्या मागील बार्गेनिंगबाबतही आज बरीच चर्चा ऐकू आली.चार महिन्यांपूर्वीच काँग्रसे पक्षातर्फे ॲड.अभिजित वंजारी यांचे नाव घोषित करण्यात आले होते,मात्र काल भाजपचा उमेदवार घोषित होताच,थोरातांनी प्रकृतीच्या कारणावरुन दौरा रद्द केला!कुठेतरी खोलवर पाणी मुरतंय अशी शंका घेत ऐनवेळी काँग्रेस पक्ष्ातर्फे उमेदवार बदलल्या जाईल….जोशी यांचा विजय सोपा व्हावा यासाठी कच्चा उमेदवार रिंगणात उतरवण्यात येईल..ही निवडणूक ‘मॅनेज’करण्यात येईल..अशा अनेक शंकांचे पडघम आज भाजप कार्यकर्त्यांमध्येच वाजत होते….!

सामान्य माणूस,पक्ष्ावर निष्ठा ठेवणारा मतदार तसेच कार्यकर्ता हे ‘मामा’बनतात तर मोठे नेते हे ‘मॅनेजमेंट एक्सपर्ट’असतात,हार्ड कोर बार्गेनिंग करुन वेळेवर विरोधी पक्षाला आपला उमेदवारच कसा बदलायला लावतात…याची ही चांगलीच चर्चा आज एेकू आली. ॲड.अभिजित वंजारी हे ज्या क्ष् णी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करतील तेव्हाच लढत खरी मानावी,असे देखील बोलले जात होते….!परवा गुरुवार १२ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे हे विशेष!

जुलैपासूनच सोलेंना ‘आश्‍वासन’ नव्हे तर ‘कंन्फरमेशन’ मिळाले होते!
जुलै महिन्यात पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्याची मुदत संपताच आ.सोले यांनी पक्षातील वरीष्ठ नेत्यांना एकच प्रश्‍न विचारला ‘सुस्पष्ट सांगा!हो किवा नाही?नाही असले तरी….हरकत नाही,तिकीट नसेल द्यायचे तरी मी हा निर्णय मंजूर करेल’मात्र सोलेंना ‘सुस्पष्ट‘उत्तर मिळाले ‘कामाला लागा…चिंता करु नका!’आणि…सोले कामाला लागले…सामान्य नागरिकांना यातील राजकारण काहीच कळत नाही.त्यांना पक्ष् कळतो,पक्ष्ाचं चिन्ह कळतं,पक्ष्ाची विचारधारा कळते,त्यावर तो नितांत श्रद्धा ठेवतो.मात्र ज्या उमेदवाराने गेल्या ४५ वर्षांपासून पक्ष्ात संगठनाचे काम केले,संघटनेच्या कामासाठी दौरे करुन अनेक जिल्हे पिंजून काढले,त्या विद्यमान आमदारांची अचानक तिकिट कापून ‘जवळच्या’माणसाला देता!पक्ष् म्हणजे आता एकाच नेत्याची ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’झाली आहे का?’असा संताप आज भाजपच्याच काही कार्यकर्त्यांमध्ये ऐकू आला.गडकरी यांचे पंख छाटण्यासाठी एका प्रामाणिक माणसाच्या स्वाभिमानाचा बळी घेण्यात आल्याचे बोलले जात होते.आ.सोले हे गडकरी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात.माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनाही गडकरी यांचा विश्‍वासू होणे भाेवले,असे बोलले जात आहे.सोयीस्करपणे गडकरी यांच्या विश्‍वासू माणसांचे तिकीट कापून गडकरी यांच्या नेतृत्वाला उघडपणे आव्हान दिले जात असल्याची भावना आज कार्यकर्त्यांमध्ये उमटली.

विशेष म्हणजे आ.सोले यांची तिकीट कापण्यामागे कोणतेही स्पष्टीकरण देखील पक्ष्ातर्फे देण्यात आले नाही.ते भ्रष्टाचारी होते?त्यांचे स्कॅण्डल उघडकीस आले?सहा वर्षे त्यांची आमदार म्हणून कारर्कीद वादग्रस्त राहीली आहे?किवा त्यांनी कामकागज केले नाही?ते अकार्यक्ष् म होते?त्यांनी पक्ष् विरोधात काम केले?हे काहीच घडले नाही तर एवढ्या अपमानकारकरित्या एका स्वाभिमानी माणसाचे तिकीट पक्षाने अचानक का कापले?

हे प्रश्‍नही भाजपच्या अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांना आज दिवसभर छळत होते….!

मूळात पदवीधरसाठी सहा जिल्हे असताना नागपूरमधूनच उमेदवारी का दिली जाते?कारण या ठिकाणी सर्वाधिक मतदार आहेत.पदवीधर मतदार संघ सहा जिल्ह्यात पसरला असल्याने कोणत्याही पक्ष्ाचा कस लागतो.नागपूरातून एकगठ्ठा मते मिळतात आणि हमखास निवडून येण्याची शक्यता असते म्हणून नागपूर मधूनच उमेदवार दिला जातो.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासोबत झालेल्या वादांमुळे तसेच मुंढे यांच्या गच्छंतीमुळे संदीप जोशी यांची ‘प्रतिमा’ बरीच मलिन झाली असल्याचे भाजपचेच अनेक कार्यकर्ते सांगतात.अश्‍यावेळी विद्यमान आमदारांना डावळून जोशी यांना उमेदवारी दिली गेल्याने अनेकांचे काळजाचे ठोके चुकले आहेत.नागपूर शहराचे राजकारण सोडता इतर जिल्ह्यांमध्ये आजही ’जात’हे फॅक्टर प्रभावी मानल्या जातं,अश्‍यावेळी ओपन कॅटगिरीचा उमेदवार दिल्याने याचा देखील इतर जिल्ह्यात परिणाम होणार असल्याचे देखील बोलल्या जात आहे.

(टिपण- रात्री ही बातमी व्हायरल होताच खात्रीशीर सूत्रांकडून लगेच माहिती कळली,उद्या बुधवार दि. ११ नोव्हेंबर रोजी प्रा.अनिल सोले हेच  अर्ज भरणार आहेत!परिणामी आता मतदारांचीही उत्सुक्ता शिगेला पोहोचली असून १२ नोव्हेंबर पूर्वी अखेर उमेदवारी अर्ज भरण्याचं भाग्य कोणाला मिळतं याकडे आता मतदारांचे लक्ष् लागले असून आ.सोले यांनी उमेदवारी अर्ज भरल्यास महापौर संदीप जोशी यांची मग पक्ष् ‘पुर्नस्थापना’कशी व कुठे करतील?कारण येत्या २२ नाेव्हेंबर पासून फिफ्टी-फिफ्टी वायद्याप्रमाणे त्यांना हे पद ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांना सोपवावे लागणार आहे….!कि…प्रा.सोले हे बंडखोरी (छूप्या पाठींब्याने) करीत उमेदवारी अर्ज भरतील?

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या