

महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष् निवडणूकीला घेऊन गंभीर:आ.सोले हे खोटे बोलतात!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. ८ नोव्हेंबर: विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने ॲड.अभिजित वंजारी यांच्या नावावर तब्बल सहा महिन्यांपूर्वीच माेहोर उमटवली.उद्या साेमवारी ते नामांकन अर्ज देखील दाखल करणार आहेत.महाविकासआघाडी सरकारची ही पहिलीच निवडणूक असून आघाडी म्हणून ते मतदारांसमोर कसे जाणार?विदर्भात शिवसेना-राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व नसताना काँग्रेस पक्षालाच निवडणूकीत एक हाती लढावं लागणार आहे का?सहा जिल्यांचा मतदार संघ असून प्रत्यक्ष् काम करायला एक महिना देखील मिळाला नाही,एकेका मतदार संघात १० दिवस ही देता येणार नाही,कसे मांडणार आपले मुद्दे मतदारांसमोर?भाजपचे प्रा.अनिल सोले यांनी पदवीधर मतदार संघाचे आमदार म्हणून आपल्या कामांच ठसा उमटवला असल्याने ॲड.अभिजित वंजारी हे मतदारांना कोणती कल्पक योजना देणार?नुकत्याच पार पडलेल्या बिहारच्या निवडणूकीच्या प्रचारातून ‘विकास’मुद्दा गायब झाला व संपूर्ण त:प्रचाराच मुद्दा हा १६ लाख रोजगारावर केंद्रित झाला,हाच मुद्दा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत देखील गाजणार का?अश्या अनेक प्रश्नांबाबत खास ‘सत्ताधीश’ने ॲड.अभिजित वंजारी यांना बोलते केले.
आपला दिलखुलास अंंदाज व चिरपरिचित सुहास्याने अतिशय व्यस्त असताना देखील ॲड.अभिजित वंजारी यांनी या सर्व प्रश्नांबाबत मनमोकळेपणाने उत्तरे दिलीत.ही निवडणूक जोरात रंगणार आहे कारण महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष् काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना हे पदवीधर निवडणूकीला घेऊन गंभीर आहेत.केवळ हे तिन्ही पक्ष च नव्हे तर आरपीजे,कवाडे गट,गवई गट,बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष् ,मुंबईचे अपक्ष् आमदार कपिल पाटील,शिक्ष् क संघटना इ.सर्वच प्रचारात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
घोषित झालेल्या पाचही पदवीधर मतदारसंघात नागपूर,औरंगाबाद,पुणे येथील पदवीधर तसेच अमरावती तसेच पुणे विभागातून शिक्ष् क मतदारसंघात आम्ही महाविकासआघाडी म्हणून लढणार आहोत.या पाचही ठिकाणी आघाडीचे उमेदवार जाहीर ही झालेत.आमचे संपर्क मंत्री,पालक मंत्री यांच्या देखरेखीखाली तसेच प्रदेश काँग्रेसच्यावतीने सुद्धा मंत्रीमंडळाच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक ‘एकदिलाने’ लढवली जात असल्याचा खुलासा त्यांनी केला.
काँग्रेस पक्ष् हा विखुरलेला आहे,गटातटात गुंतलेला आहे हा अपप्रचार केला जात आहे.आमचे मंत्री,माजी मंत्री,जिल्हा परिषद सदस्य,महानगरपालिकेतील नगरसेवक,पंचायत समितीचे कार्यकर्ते बूथवर दिसतील,असे आश्वासक विधान वंजारी यांनी केले.
विदर्भात राष्ट्रवादी किवा शिवसेनेचे अस्तित्व नाही,असे म्हणने चूक आहे.या सहाही जिल्यांमध्ये काँगेस सोबतच या दोन्ही पक्ष्ांचा देखील प्रभाव आहे.हिंगणा नागपूरचे रमेश बंग,भंडा-यातील माजी केंद्रिय मंत्री प्रफूल्ल पटेल यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे,हे विसरता येत नाही.भंडारा,गोंदिया या संपूर्ण जिल्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व दिसून पडतं.रामटेकमध्ये शिवसेनेचे आ.कृपाल तुमाने आहेत,शिवसेनेचेच आ.दुष्यंत चतुर्वेदी हे देखील खांद्याला खांदा लावून पदवीधरसंघाची ही निवडणूक लढणार असल्याचा खुलासा त्यांनी केला.या तिन्ही पक्षाची यंत्रणा या निवडणूकीत मतदारांना दिसणार आहे,असे ते म्हणाले.
निवडणूक घोषित झाल्यावर हे खरे आहे की सहाही जिल्हयात प्रचारासाठी अल्प वेळ मिळणार असला तरी आमच्या पक्षाने माझी उमेदवारी ही ६-८ महिन्यांपूर्वीच घोषित केली. १ नोव्हेंबर २०१९ रोजी आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष् तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माझी उमेदवारी निश्चित केली. आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष् राहूल गांधी यांनी १२ मार्च २०२० रोजी माझी उमेदवारी जाहीर केली.अगदी कराेनाच्या काळात देखील आमचा पक्ष् या निवडणूकीला घेऊन गंभीर होता,हे निर्दशनास येतं.६ लोकसभा,३२ विधानसभा,६३ तालुक्यांचा हा मतदारसंघ असून मला उमेदवारी लवकर जाहीर झाल्याने याचा लाभ मिळाला.
प्रत्यक्ष् पणे मी व माझी चमू,पदाधिकारी हे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचू शकलो.१० महिन्यांपूर्वीच माझ्या प्रचाराची पत्रके मतदारांपर्यंत पाहोचली.माझा कार्यभाग,राजकीय प्रवास,व्हिजन डाॅक्यूमेंट,त्यांचा उमेदवार म्हणून नेमकी कोणती कामे करणार?किंबहूना उमदेवार म्हणून नेमके काय करणार? इ.ची तपशीलवार माहिती मतदारांपर्यंत ‘पारदर्शीपणे’ पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी ‘पारदर्शी’या शब्दावर मात्र त्यांनी चांगलाच जोर दिला….!
आ.अनिल सोले खोटं बोलतात….!
असे सांगण्यात येतं की आ.अनिल सोले यांनी त्यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात ७५० च्या वर प्रश्ने विधान परिषदेत विचारली,यावर भाष्य करताना ॲड.अभिजित वंजारी यांनी आ.अनिल सोले हे चक्क खोटे बोलतात,असा आरोप करीत अधिवेशन हे वर्षातून फक्त तीन वेळा पार पाडतं.हिवाळी,पावसाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशन.याचा अर्थ सहा वर्षात अठरा अधिवेशन पार पडले.एका अधिवेशनात जास्तीत जास्त ४० च्या जवळपास प्रश्ने विचारली जातात.मग एकच आमदार एवढे प्रश्न कसे काय विचारु शकले?मी स्वत: जिल्ह्यातील ६३ तालुक्यात जाऊन आलो,बहूतांश तालुक्यात मला हेच सांगण्यात आले त्यांचे उमेदवार आमदार हे त्यांच्या तालुक्यात गेल्या सहा वर्षात फिरकलेसुद्धा नाही!तिथे गडकरी,भाजप,बसप,राष्ट्रवादीचे नाव माहिती आहे मात्र या आमदारांचे नाव त्यांना माहिती नसल्याचा आरोप ॲड.अभिजित वंजारी यांनी केला.
नाव तर सोडा निधी कुठे दिला?पदवीधरांची कोणती कामे केली? सोले यांनी अगदी ठराविक तरी कामे सांगावी!पुन्हा ते ‘फॉरच्यून फाउंडेशन’चं नाव घेतील मात्र माझ्या नजरेत त्यांचा हा उपक्रम देखील बेरोजगार तरुणाईसाठीचा फार्स आहे!’तरुणाईची अगदी १०० टक्के फसवणूक!त्यांनी आकडे सांगण्यापेक्ष्ा नावे सांगावी….मोबाईल नंबर द्यावीत,खरंच बेरोजगार तरुणाईला या उपक्रमांतून चांगल्या मनासारख्या नोक-या मिळाल्या असतील तर आम्ही लोकमत चौकात सोले यांचा सत्कार करु,असे खुले आव्हान ॲड.अभिजित वंजारी यांनी दिले.
सध्या बेरोजगारीचा प्रश्न हा भारतात अत्यंत ज्वलंत झाला आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात मोदी सरकारने नोटाबंदी जाहीर केली आणि देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली.उद्योग धंदे अडचणीत आले,करोना काळात तर मोठ्या प्रमाणात लोकांचे रोजगार ही हिरावले.आकडेच सांगताच १९४७ मधील फाळणीनंतर पंतप्रधान मोदींच्या काळात देशातील अर्थव्यवस्थेने नीचांक गाठला आहे…!
कदाचित घटनाकारांनी म्हणूनच आधीच पदवीरधर मतदासंघाची रचना केली असावी.विधानसभेचे २८८,विधान परिषदेचे ७८,स्थानिक स्वराज्य संस्था,ग्राम पंचायती हे सर्व त्या त्या क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी निर्माण करण्यात आल्या,त्या धर्तीवर पदवीधर मतदारांचे प्रश्न,शिक्ष् कांच्या प्रश्नांनाही विधीमंडळात योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी या मतदारसंघांची योजना केली.विशेष म्हणजे सहा वर्ष पदवीधरांसाठी इमाने-इतबारे काम करण्यासाठीच निवडणूक लढवित असल्याचा खुलासा त्यांनी केला.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी ४ वेळा तर सोले यांनी १ वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं मात्र भारतीय जनता पक्ष्ांच्या आमदारांनी पदवीधर मतदारांचे नव्हे तर ‘पक्ष्ाचेच’काम केले,असा घणाघाती आरोप ॲड.अभिजित वंजारी यांनी केला….!१९६२ पासून या पदवीधर मतदारसंघाची सुरवात झाली.मात्र एवढ्या प्रदीर्घ काळात एकमेव अमरावती विभागातून निवडून येणारे डॉ.बी.टी.देशमुख यांचे कार्य सोडले तर इतर कोणाच्याही कार्याची दखल घेतली जाऊ शकत नाही.त्यांनी सहा वेळा अमरावतीमधून पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले,त्यांचाच आदर्श आमच्यासमाेर असल्याचे वंजारी यांनी सांगितले.
विदर्भाच्या सहाही जिल्हयांच्या मतदारांसाठी ‘न भूतो ना भविष्यती’असे कल्पक व्हीजन तयार असून नामांकन अर्ज दाखल झाल्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ते प्रसिद्ध करण्यात येईल,अशी माहिती त्यांनी दिली.




आमचे चॅनल subscribe करा
