

(भाग-२)
नागपूर,ता. १५ ऑक्टोबर: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्र व्यवहाराचे वादंग आता हैदराबादच्या एआयएमचे अध्यक्ष् असदुद्दीन ओवेसी यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले व त्यांनी देखील या वादात शीघ्रतेने उडी घेत ‘महाराष्ट्राच्या राज्यापालांकडून केलेले वक्तव्य हे खूपच दुर्देवी आहे. संविधानाच्या शपथेसाठी ‘हिंदुत्वाच्या’ परीक्ष्ेची आवश्यकता नव्हती,मुख्यमंत्र्यांकडून या पद्धतीची अपेक्ष्ा करणे अप्रासांगिक असून असे व्हायला नको’अशी टिका केली.सध्या याच वादंगामुळे अवघे महाराष्ट्र ढवळून निघाले असून राज्यात तसेच देशात राजकीय नेते यांच्या वाचाळपणा किवा राजकीय टिपण्णीमुळे असे बरेच वादळ येऊन गेले आहेत. ‘सत्ताधीश’ने खास या वादांची केलेली उजळणी-
सर्वाधिक राजकीय वाद रंगला तो म्हणजे हनुमानाच्या जाती-धर्मावरुन!ब्राम्हण सेनेने रामभक्त हनुमान हे दलित,मुस्लिम किवा चिनी नव्हते तर ते ब्राम्हण आहेत,असा दावा केला होता.भाजपचे आमदार बुक्कल नवाब यांनी भगवान हनुमान हे मुस्लिम होते आणि त्यांच्या नावावरुनच मुस्लिमांमध्ये रेहमान,रमजान,फरमान,झिशान किवा कुर्बान यांसारखी नावे ठेवली जातात’असे विधान करुन या वादाला तोंड फोडले.या विधानावर उत्तर प्रदेश सरकामधील मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी ’हनुमान जाट होते’ असे विधान केले.तर भाजपचे खासदार व माजी किक्रेटपटू किर्ती आझाद यांनी ‘हनुमान हे चिनी होते’असा टोला हाणला होता.
नेते…वाचाळपणा आणि…रंगलेला वाद!(भाग-१)https://sattadheesh.com/?p=9093
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानमध्ये हनुमान हे दलित व वंचित होते’असे म्हटले होते. आचार्य निर्भय जैन यांनी ‘हनुमान हे जैन होते’असा दावा केला,केंद्रिय मंत्री सत्यपाल सिंह यांनी रामायणाचा संदर्भ देऊन ‘हनुमान आर्य होते’ असे म्हटले तर राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष् नंदकुमार साय यांनी आदिवासींमध्ये हनुमान गोत्र असल्याने ‘हनुमान आदिवसी होते’ असे सांगून धमाल उडवून दिली होती.
२०१५ साली मंत्रीपदी असताना शिवपाल यादव यांनी ‘हिंदूनी जास्त मुले पैदा करावी’असे वादग्रस्त विधान करताच त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत ‘साध्वी आणि साक्ष्ी महाराज देखील असे करतील का?’असा प्रतिप्रश्न त्यांना विचारण्यात आला!
तृणमूल काँग्रेस सभापती अरुप चक्रवर्तींचे निवडणूकी पूर्वीचे विधान होते’’अगर तुम्हारे घर कोई भी घूसे उसका गला काट कर फेक देना!उसके बाद जो भी होगा मैं देख लूंगा!(ही मुक्ताफळे उधळीत असताना त्या सभेत कोलकत्ता पोलीस देखील उपस्थित होते)
१९ एप्रिल २०१४ रोजी केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह यांनी ’जो मोदी को रोकने की कोशिश कर रहे है वो पाकिस्तानपरस्त है,उनके लिये भारत में कोई जगह नही है,उनका मदिना तो पाकिस्तान है’ याच मंत्र्यांनी १ एप्रिल २०१५ रोजी ‘राजीव गांधींनी जर नायझेरियन स्त्रीशी लग्न केले असते,ती सुंदर आणि गोरी,स्लीम असती तर काँग्रेस अध्यक्ष् म्हणून तिचाही स्वीकार केला असता’असे अतिशय वादग्रस्त विधान केले होते.
रेणूका चौधरी यांनी संसदेत बलात्कारासारख्या अतिशय संवेदनशील विषयावर बोलताना चक्क फिल्मी अंदाज मध्ये ‘रेप तो छोटी बात है इतने बडे देश में..कितने आदमी थे?हा डॉयलॉग मारला,त्यांच्या या विधानावर माध्यमांमध्ये तीव्र नापसंदी उमटली होती.
केंद्रिय मनुष्यबळ व विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील पुणे येथील कार्यक्रमात ‘शाळेच्या विकासासाठी शिक्ष् कांनी भीक मागू नये’असे वक्तव्य करुन देशाचे भविष्य घडविणा-या शाळेलाच भिका-यांच्या कक्ष्ेत आणून उभे केले होते.
याच पुरोगामी महाराष्ट्रात ७ ऑक्टोबर २०१८ रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची ही जीभ घसरली आणि ’लघूशंका करणारा शाळेतील खोडकर मूलगा आहे देवेंद्र फडणवीस तर मोदी हे खिडकी बाहेर लघूशंका करणारे..!’असे लज्जास्पद व महाराष्ट्राच्या संस्कृतीला न भूषणारे विधान त्यांनी मालेगांव येथे जनसंघर्ष यात्रेदरम्यान केले होते!
उत्तर प्रदेशच्या मुघलसराई येथून भाजप आमदार साधना सिंह यांनी मायावतीवर प्रहार करताना ‘मायावती यांनी सत्तेसाठी आपली प्रतिष्ठा विकली असून,त्यांना अजिबात किंमत न देणा-यांसोबत हातमिळवणी केली आहे,त्या महिला प्रजातीवरील कलंक आहेत,स्त्री आणि पुरुषांमध्ये त्यांची तुलना होत नसून,त्या तृतीयपंथीपेक्ष्ाही वाईट म्हणता येईल…!त्यांच्या या विधानावर मित्रपक्ष्ांसह विरोधकांनी देखील जोरदार हल्ला चढवला होता,महिला आयोगाने देखील त्यांन नोटीस जारी केली होती.
महाराष्ट्र राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी महाविकास आघाडीने फसवणूक केल्याचा आरोप करीत,परतूरमध्ये काढण्यात आलेल्या मोर्च्यात महीला तहसीलदारांच्या उल्लेख ‘हिरोईन’असा केला होता. त्यांच्यावर नंतर टिकेची झोड उठली होती.यानंतर हिरोईन याचा अर्थ ‘लढाऊ महिला’असा असल्याची सारवासारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी झारखंड निवडणूकीदरम्यान भारत देशाचा उल्लेख चक्क ’रेप इन इंडिया’असा केल्याने निवडणूक आयोगाने अहवालच मागितला होता. केंद्रिय मंत्री स्मृती इराणाी यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
अमृता फडणवीस व शिवसेना यांची शाब्दिक जुगलबंदी ही फार जुनी आहे ‘फक्त ‘ठाकरे’ आडनाव लावले म्हणून कोणी ‘ठाकरे’ यांच्यासारखे होत नाही’अशी टिका केली होती,शिवसेनेने जशास-तसे प्रत्युत्तर दिले होते. अमृता फडणवीस यांनी ट्टिटरवर ’एक ‘ठाकरे’ ज्यांनी कायम सत्य,आपली तत्वे आणि लोकांचा विचार केला,पक्ष् व कार्यकर्त्यांचा विचार करताना कुटुंब अाणि सत्ता याला दुय्यम स्थान दिले,सावरकरांच्या मुद्दावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी १७ जानेवरी २०२० रोजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांची भेट झाली होतीटअसे सांगून राज्यभरात राजकीय धुरळा उडवला होता.यानंतर राऊत यांनी माघार घेतली.
काँग्रेसच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील‘सध्या मी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे,आणखी आमचे खिसे गरम व्हायचे आहेत,मात्र जे जुने सत्ताधारी आहेत,त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे,त्यांच्याकडून ‘लक्ष्मीदर्शन‘करुन घ्या,मात्र मतदान काँग्रेसला करा’असे धक्कादायक विधान केले होते.माजी काँग्रेस अध्यक्ष् माणिकराव ठाकरे देखील या सभेत उपस्थित होते.राज्यातील पाच जिल्हा परिषदा व पंचायत समितींच्या निवडणूकीत त्यांनी हे वादग्रस्त विधान केले होते.याच मंत्री यशोमती ठाकूर यांनी गायीवरुन हात फिरविल्याने नकारात्मक विचार जातात असे विधान करुन टिका ओढवून घेतली होती,हे विधान त्यांनी तिवसा येथील सार्शी येथे गावाचे देवस्थान समजल्या जाणा-या एका दिवंगत गायीच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमात भरगच्च गर्दीसमोर विधान केले होते.
उत्तर प्रदेशचे भाजपचे नेते रघुराज सिंह यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन देशभरात रान उठले असताना ‘मोदी व योगींविरुद्ध घोषणा कुणी घोषणा दिल्या तर देणा-यांना जिवंत गाडले जाईल’,अशी धमकीची भाषा वापरली होती,अलिगढ मुस्लिम विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जोरदार निर्दशने सुरु असताना त्यांनी वरील विधान केले होते. दाऊदकडून पैसे घेऊन आमच्या अधिका-यांना त्रास देणा-यांनाही बेदम चोपले जाईल,असे उद् गार त्यांनी काढले होते.,यावर भाजपने लगेचच,सिंह हे काही उत्तर प्रदेशचे मंत्री नाहीत,साधे आमदारही नाही,असा बचावाचा पवित्रा घेतला होता.
पंतप्रधान मोदी यांनी इंधन दरवाढीवर बोलताना काँग्रेसच्या काळात इंधन दरवाढीचा संबंध माजी पंतप्रधान मनमोहर सिंह यांच्या वयाशी जोडला,यावर राज बब्बर यांचीही जीभ घसरली व त्यांनी’आज रुपयांचे अवमूल्यन होत आहे ते मूल्य मोदी यांच्या आईच्या वयाच्या जवळपास पोहोचले आहे’असे वादग्रस्त विधान केले होते.
राजस्थानमधील काँग्रेसचे प्रतापगडचे आमदार रामलाल मीणा यांनी ‘राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे दारुच्या बाटल्या उघडण्यामध्ये व्यग्र होत्या,त्यामुळेच राज्यातील विकासकामांना फटका बसला’असे वादग्रस्त विधान करीत असल्याचा व्हिडीयोच व्हायरल झाला होता.या विधानाचा त्यांना उलट फायद्याच झाला,ते पहील्यांदाज आमदार बनले,त्यांनी भाजपच्या हेमंत मीणा यांचा १६ हजार ६८० मतांनी पराभव केला!
राफेल करारावर संसदेत बोलताना राहूल गांधी यांनी मोदी यांनी स्वसंरक्ष्णासाठी एका महिलेचा आधार घेतला’अशी खोचक टिका केली होती.संरक्ष् ण मंत्री निर्मला सीतारमण यांच्याबाबत स्त्रीद्वेष्टी व अनैतिक स्वरुपाची टिपण्णी करीत जयपूर येथे जाहीर सभेत ‘मोदीजी ने एक महिला से कहा मेरी रक्ष्ा किजिये!’असे उद् गार काढले होते,यासाठी त्यांना महिला आयोगाची नोटीस ही बजावण्यात आली होती.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी ‘वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसते’असे अतिशय आक्ष्ेपार्ह्य विधान करुन समस्त स्त्री जातीचाच अपमान केला होता.सोशल मिडीयावर त्यांच्या या विधानावर अतिशय शेलक्या शब्दात निंदा करण्यात आली होती.
लेखिका अरुंधती रॉय यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत बोलताना ’आपले खरे नाव व पत्ते न सांगता रंगा-बिल्ला यासारखे खोटे नाव व पत्ते सांगावे’असे विधान करुन खळबळ उडवून दिली होती.
सैनिकांच्या पत्नीबाबत भाजप पुरस्कृत अपक्ष् आमदार प्रशांत परिचारक यांनी अतिशय आक्ष्ेपार्ह्य विधान केले होते.त्यांच्या या विधानावर देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.विधानसभेततर दिवाकर रावते यांनी गैरसमजातून सभापतींच्या दालनात जाऊन असभ्य भाषा वापरली होती. यानंतर त्यांनी माफी देखील मागितली होती.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ‘रामनाथ काेविंद हे जातीमुळेच राष्ट्रपती बनलेत’’यावर देखील देशभरात चांगलाच गदारोळ उठला.
समाजवादी पक्ष्ाचे नेते आझम खान यांनी रामपूर येथे निवडणूकीदरम्यान जयाप्रदा यांचे नाव न घेता असभ्य भाषेत टिका केली होती.त्यांच्यावर कलम ५०९ अंतर्गत एफआयआर देखील दाखल करण्यात आली होती.महिला आयोगाकडून देखील त्यांना नोटीस बजावण्यात आली होती.
भाजपच्या मंत्री मनेका गांधी यांनी देखील निवडणूकीदमर्यान ’जशी मते तसे काम’असे वादग्रस्त विधान केले होते.सुलतानपूर मतदारसंघातील प्रचार सभेत त्यांनी वरील विधान केले होते.
नागपूरचे हेव्हीवेट मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपल्या बोलघेवड्या स्वभावामुळे अनेक वेळा वाद ओढवून घेतले आहेत,गडकरी यांनी एकदा ’एकवेळ हिजड्यासोबत लग्न केलं तर त्यांना मुलं होतील,पण जलसिंचन योजना पूर्ण होणार नाही’असे मिश्कीलीने केलेले विधान पुढे जाऊन खूप गाजले. तृतीयपंथी संघटनांनी नाराज होऊन त्यांना चांगलेच धारेवर धरले व पत्र लिहले.
राजुरा येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार घटनेप्रकरणी पीडित मुलींच्या पालकांबाबत काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांच्या विराधात अट्रासिटीचा गुन्हा तर दाखल झालाच त्याच बरोबर त्यांना चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष् पदावरुन राजीरामा देखील द्यावा लागला.
(समाप्त)




आमचे चॅनल subscribe करा
