

– सत्कार समारंभात रंगला आठवणींचा सोहळा
नागपूर : स्वातंत्र्यविर सावरकरांप्रमाणे मराठीला नव्या शब्दांची देणगी देणाºयात जर कुणाचे नाव आदराने घेतले जात असेल तर ते निसर्गऋषी मारुती चितमपल्ली यांचे. निसर्गवाटेत अवघे आयुष्य घालविणाºया या मुळ तेलगू भाषिक निसर्गऋषीने तब्बल एक लाख शब्दमोती मराठी मातीला दिले. वन, वन्यजिव, वनस्पतींची खडा न खडा माहिती त्यांना आहे. त्यांचे हे सगळे संशोधन विदर्भातच झाले असल्याने त्यांना विदर्भाने ‘निसर्गवेडा’ ही बिरुदावली दिली. निसर्गाचा हा सगळा खजिना घेऊन म्हणा वा भविष्याकडे सोपवून ते आपल्या गृहनगराकडे अर्थात सोलापूरकडे प्रस्थान करत आहेत.
वनांच्या अभ्यासात बरीच वर्षे विदर्भात घालविल्यानंतर मारुती चितमपल्ली रविवारी सकाळी नागपुरातून सोलापूरकडे प्रस्थान करत आहेत. आपले उर्वरित आयुष्य ते सोलापूरमध्ये आपल्या पुतण्याकडे घालविणार आहेत. त्यानिमित्ताने शनिवारी शेवाळकर कुटूंबीयांनी विदर्भवासीयांच्या वतीने त्यांच्या प्रस्थान सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.
ज्येष्ठ लेखिका आशाताई बगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी चितमपल्ली यांनी विदर्भातील संशोधनविषयक बºयाच आठवणींना उजाळा दिला. पक्षी, वन्यप्राणी म्हणा वा वनस्पती यांवरील लिखाण असो वा भविष्यवेधी विद्यार्थ्यांना शिकवणी असो यावर पुसटशा आठवणी ते व्यक्त करत होते. नागझिरा येथील वनसंपत्तीने मोहिनी घाल्यावरच आपल्या लिखाणाला नवे वळण मिळाल्याचे ते यावेळी म्हणाले.
विदर्भाऐवढी वनसंपदा जगात कुठेच नाही. मात्र, या संपदेचे संरक्षण करता आले पाहीजे, असे कोडे यांनी सोलापूरकडे जाता या प्रस्थान निरोप समारंभात टाकले. यावेळी माहिती विभाग संचालक हेमराज बागूल, जिल्हा माहिती अधिकारी (विशेष कार्य)अनिल गडेकर, आशुतोष शेवाळकर, विजयाताई शेवाळकर, मनिषा शेवाळकर उपस्थित होते.
———–




आमचे चॅनल subscribe करा
