

परिक्षा रद्द करण्यासाठी आयते मिळाले कमर्चा-यांच्या संपाचे कारण
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १ ऑक्टोबर: राष्ट्रसंत तुकडोजी महराज नागपूर विद्यापीठात कर्मचा-यांचा संप असल्याने प्रवेश पत्र पोहोचले नाही,या सबबी खाली रातूम नागपूर विद्यापीठाने आज १ ऑक्टोबर रोजी होणारी अंतिम वर्षाची ऑन-लाईन परिक्षा रद्द केली मात्र अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रोफाईलमध्येच ‘विषयांचे’ गौडबंगाल विद्यापीठाद्वारे झाल्याने परिक्षा रद्द करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शहरातील अनेक महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना विद्यापीठाने आधी पाठवलेले विषयानुसारचे वेळा-पत्रक(टाईम टेबल)हे बरोबर होते.या वेळा पत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांनी अभ्यास देखील केला मात्र दुस-यांदा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने जे परिक्षेचे प्रोफाईल पाठवले त्यात दोन विषय असे देण्यात आले जे विषय विद्यार्थ्यांनी अभ्यासलेच नाही! हे दोन्ही विषय पदवीच्या प्रथम वर्षी अभ्यासले गेले असल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर विद्यार्थी सांगतात मात्र अचानक त्या दोन विषयांचा समावेश विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या या शेवटच्या परिक्ष्ेत केल्याने विद्यार्थ्यांची भंबेरी उडाली.
विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दोन इलेक्टीव्ह विषय निवडण्याची मुभा होती, वाणिज्य शाखेतील अनेक विद्यार्थ्यांनी ‘ह्यूमन रिर्सोसेस मॅनेजमेंट‘(एचआरएम) तर अनेकांनी’ एडवान्स स्टॅटिक्टीस ‘हा विषय निवडला मात्र प्रोफाईलमध्ये त्यांना लॉ आणि शिक्ष् ण यासारखे विषय ऍपद्वारे पाठविण्यात आलेल्या प्रोफाईलमध्ये टाकण्यात आले!यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला.
परिक्ष्ेला केवळ चार दिवस शिल्लक असताना हे दोन्ही विषय पुन्हा अभ्यासणे अशक्य कोटीतील बाब असल्याने अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी हे तनावात गेले. शेवटच्या सेमिस्टरमध्ये या दोन्ही विषयांचा समावेश नसताना विद्यापीठाने परिक्षेसाठी हे दोन्ही विषय समाविष्ट करुन विद्यार्थ्यांमधील दडपण वाढवले. विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारावर अनेक महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे रितसर तक्रार नोंदवून झालेली चूक निदर्शनास आणून दिली.परिणामी कर्मचारी संपावर गेल्याच्या सबबी खाली विद्यापीठाने आपली चूक अश्याप्रकारे झाकली,अशी चर्चा आहे.
वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचा पेपर!
ऑन-लाईन परिक्ष्ेपूर्वी विद्यार्थ्यांकडून मॉक टेस्ट परिक्षेच्या चार दिवसांपूर्वी सोडूवन घेण्यात आले.या मॉक टेस्टमध्ये विद्यार्थ्यांनी कसा पेपर सोडवायचा इ.चे प्रात्यक्षिक होणार होते मात्र वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेचा पेपर सोडवण्यासाठी देण्यात आला!त्यामुळे विद्यापीठाद्वारा आयोजित या मॉक टेस्टचा देखील फज्जा उडाला.
परिणामी अनेक महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन विद्यापीठाला परिक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. आज अनेक महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावून घेतले व त्यांच्याकडून त्यांच्या विषयांची पुन्हा योग्य माहिती भरुन घेतली.येत्या सात दिवसात परिक्ष्ेची नवी तारिख कळवली जाईल,असे त्यांना सांगण्यात आले.
ऑफ-लाईन हवी परिक्ष्ा-
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परिक्षेबाबत कोविड काळाच्या सुरवातीपासूनच राजकीय आणि शैक्ष् णिक दोन्ही फटके बसत आहेत. परिक्षा नकोच अशी भूमिका घेणा-या राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या परिक्षेची तयारी सुरु करावी लागली. यापूर्वी दोन-तीन महिने महाराष्ट्र वर्सेस दिल्ली हा चांगला च कलगीतुरा रंगला,व्हाया राज्यापाल ते विद्यापीठ अनुदान आयोग ते केंद्रिय शिक्ष् ण मंत्रालय,अशी बरीच मोठी लढाई अस्मितेच्या पातळीवर लढल्या गेली,यात भरडला मात्र गेला तो अंतिम वर्षाचा विद्यार्थी!
राज्य सरकारने ही परिक्ष्ा ऑन लाईन घेण्याचे ठरवले व ती तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच विद्यापीठ तसेच महाविद्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांनी यांनी आंदोलन सुरु केले.यामुळे परिक्षेची तयारी प्रभावित झाली.संपामुळे परिक्षेचे महत्वपूर्ण काम आधीच पाच दिवसांपासून रखडून असल्यामुळे तूर्त ही परीक्षा घेणे अशक्य असल्याचे सांगून नागपूरसह अमरावती,औरंगाबाद विद्यापीठाने परिक्षाच रद्द केल्या.
याचाही फटका अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाच बसला. कारण परिक्ष्ा होणार म्हणून गेला संपूर्ण आठवडा त्यांनी दिवसाची रात्र अभ्यासाठी केली होती. पुन्हा त्यांच्या अभ्यासाच्या एकाग्रतेमध्ये व्यत्यय आला.पुन्हा आता त्यांना मानसिक तयारी करावी लागणार,या सर्व गोंधळात त्यांची एकच मागणी आहे,हे अंतिम वर्ष असल्याने शेवटी पदवी ही तिन्ही वर्षांचे गूण मिळून प्राप्त होणार असल्याने अंतिम वर्षाची परिक्ष्ा विद्यापीठाने ऑफ-लाईनच घ्यावी.कोविडचे सगळे निकष पाळून जर जेईईई तसेच तत्सम इतर राष्ट्रीय पातळवरील परिक्षा पार पडू शकतात तर पुढील संपूर्ण शैक्ष् णिक भविष्य निर्भर असणा-या अंतिम वर्षाची परिक्षा ही ऑफ लाईन का होऊ शकत नाही?
केंद्र सरकारने ५ व्या अनलॉकमध्ये आता १५ ऑक्टोबरपासून शाळा,महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी दिलीच आहे.परिणामी १ ते १९ ऑक्टोबर दरम्यान होणा-या परिक्षा या पुढे ढकलल्या गेल्याच आहेत तर त्या आता ऑफ लाईन घ्यावा अशी बहूतांश विद्यार्थ्यांची मागणी आहे. संभ्रम आणि मनस्ताप यातून आता तरी राज्य सरकारने विद्यार्थ्यांची सुटका करावी,असा संताप देखील ते व्यक्त करतात.




आमचे चॅनल subscribe करा
