फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजकोविड काळात पहील्यांदाज मेडीकलमध्ये डॉक्टरांना मिळाली मिठाई!

कोविड काळात पहील्यांदाज मेडीकलमध्ये डॉक्टरांना मिळाली मिठाई!

Advertisements

मेडीकलमधून ९५ वर्षाचे आजोबा व ८५ वर्षीय आजी यांनी केली करोनावर मात:नातीने वाटली मिठाई

नागपूर,ता. ४ सप्टेंबर: ‘करोना पाॅझिटीव्ह’या शब्दानेही काळजात धस्स होतं. माणूस हा करोना रोगाने जेवढा धस्तावलेला नसतो तेवढा पुढील उपचार वेळेवर मिळेल की नाही?शरीरातील प्रायवायूचा स्तर संतुलित राहील की नाही?रुग्णालयातून सुखरुप मी घरी परत येणार की नाही?माझ्या कुटुंबियांचं माझ्या मागे काय होणार?इ.अनेक प्रश्‍नांची धास्ती करोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या मनाला आणि मेंदूला छळत असल्याने अनेकांचा मृत्यू हा तर फक्त भीतीमुळे झाला असल्याचे अनेक डॉक्टर्स यांचेच मत आहे मात्र मेडीकलमध्ये नागपूरातील एका ९५ वर्षीय आजोबा व ८५ वर्षीय आजीने चक्क करोनावर मात करुन नागपूरकरांसमोर आदर्श निर्माण केल्याची सुखदायक घटना घडली.

आपले आजी व आजोबा यांना मेडीकलमधून ‘याची देही याची डोळा’ डिस्चार्ज मिळताना बघून त्यांच्या नातीने चक्क मेडीकलमधील डॉकस्टर्सला मिठाई वाटली. गेल्या मार्च महिन्यापासून मेडीकलमधील डॉक्टर्स हे अहोरात्र कोविड रुग्णांच्या सेवेत झटत आहेत. पहील्यांदा कोणीतरी त्यांच्या सेवेची दखल घेत त्यांच्यासाठी आर्वाजून मिठाई आणून दिल्याने डॉक्टर्स यांच्या डोळ्यातही पाणी तरळले.करोना पॉझिटीव्ह निघाल्याने ८५ वर्षीय आजीला १९ ऑगस्ट रोजी मेडीकलमध्ये भरती करण्यात आले होते त्यांना परवा ४ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज मिळाला तर ९५ वर्षीय आजोबा २३ ऑगस्ट रोजी भरती करण्यात आले होते त्यांना ३१ ऑगस्ट रोजी सुटी झाली.

सप्टेंबर महिना आज कोविडसाठी ’भंयकर’असणार आहे असाच उल्लेलख वैद्यकीय वर्तुळात केला जात आहे.आता प्रत्येकालाच करोनाचा विळखा पडत आहे.यातून सुखरुप बाहेर पडायचे असल्यास फक्त आणि फक्त सकारात्मक विचारच तुमचा प्राण वाचवू शकतो,असे आता तत्ज्ञ मंडळी सांगत आहे. करोना हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे.नागपूरात आतापर्यंत २५,४५७ रुग्णांनी करोनावर मात केली असून यात वयोवृद्धांपासून तर गर्भवती महिला तसेच २ ते ४ वर्षांचे चिमूरडे यांचा देखील समावेश आहे.

आताही नागरिकांनी तीन गोष्टी पाळल्या तरी करोना आटोक्यात येऊ शकतो,असे मेडीकलचे वैद्यकीय अधि क्ष् क डॉ. अविनाश गावंडे सांगतात.मास्क वापरा,सुरक्षित अंतर राखा आणि वारंवार हात सॅनिटाईझ करा, या तीन गोष्टी जरी पाळल्या तरी आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होण्यास खूप मदत होईल,अशी  कळकळून विनंती त्यांनी नागपूरकरांना केली आहे.किडनीचा विकार,दारु सारख्या व्यसनामुळे किडनीची कमी झालेली क्ष् मता, मधूमेह आणि जास्त वयाच्या रुग्णांनी मात्र काळजी घेणे हे गरजेचं आहे. सध्या करोनावर उपचार करणा-यांपैकी अश्‍याच रुग्णांना ऑक्सीजन आणि वेंटिलेटरची गरज पडत आहे.

लक्ष् णे दिसताच उपचारासाठी पुढे या.एक्सरे काढा,वारंवार चाचण्या,योग्य आहार, प्रॉपर हायजिन,मेडिटेशन या सर्व गोष्टींमुळे करोनावर सहज मात करु शकतो,असं ते सांगतात.

आज फक्त नागपूर शहरतीलच नव्हे तर ग्रामीण भाग तसेच मध्य भारतातून येणा-या रुग्णांची संख्या ही लक्ष् णीय आहे.मेडीकल असो किवा मेयो रुग्णालय या दोन रुग्णालयातील डॉक्टर्स तसेच इतर सेवा देणारे योद्धे यांना आता रात्र रात्रभर जागरण होत आहे.याचा त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. करोना ही महामारी नवीन आहे. शतकातील पहीलीच महामारी असल्यामुळे योग्य नियोजन व योग्य निर्णयांच्या अभावामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच नागपूरात कोलमडून पडली आहे.

वारंवार डॉक्टर्स यांच्यावर नातेवाईकांचे होणारे हल्ले, त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात केल्या जाणा-या तक्रारी इ.बाबींमुळे या नोबेल क्ष्ेत्रात काम करणा-या डॉक्टर्स यांचे देखील मनोबलाचे खच्चीकरण होते. आपापल्या परिने सर्वजण शर्थीने ही भयावह परिस्थिती ओटाक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप योग्य नसल्याचे डॉक्टर्स यांचे म्हणने आहे. किमान सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स यांच्याप्रति जनतेने आदर व सहानूभूती ठेवल्यास गोंधळाची परिस्थिती बरीच आटोक्यात येईल,असे म्हटले जात आहे.मेडीकलमध्ये तर स्वच्छता निरीक्ष् कांपासून तर कक्ष् सांभाळणा-या कर्मचा-यांपर्यंत सर्वांनाच करोनाच्या विळख्यात जगावे लागत आहे.त्यांना देखील कुटुंबिय आहे.

परिणामी प्रत्येक रुग्णाची करोनाविरुद्धची लढाई ही आपली लढाई आहे असे समजून नागपूरकरांनी शासनाचे दिशानिर्देश पाळावे,संपर्क टाळावा,सकारात्मक राहवे आणि करोनाला कायमचे नागपूरातून हद्दपार करण्यास प्रशासनाला मदत करावी,अशी अपेक्षा मेडीकलमधील वैद्यकीय वर्तुळातील योद्धे व्यक्त करतात.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या