फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजनागपूरात साेमवार पासून कडक लॉक डाऊन!

नागपूरात साेमवार पासून कडक लॉक डाऊन!

Advertisements

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १७ जुलै: नागपूर शहरात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा एकदा कडक लॉक डाऊन होण्याची चर्चा आज मनपाच्या ५ व्या मजल्यावरील आरोग्य विभागात ऐकू आली.विशेष म्हणजे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज आरोग्य विभागाच्या सर्व अधिका-यांसोबत प्रदीर्घ बैठक घेतली,बैठकीत शहरात सोमवार दि. २० जुलै पासून कडक लॉक डाऊन करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.

पुणे,मुंबई व पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसांचा कडक लॉक डाऊन लागू करण्यात आला असून वाढत्या संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी लोकांना घराबाहेर न निघू देणे,हाच एकमेव पर्याय आता शासनासमोर असल्याचे दिसून पडत आहे.नागपूरातही काल गुरुवार दि. १६ जुलै या एकाच दिवशी ७८ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मेयो,मेडीकल,एम्स इ. रुग्णालयात आता जुलै महिन्यात गंभीर रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनासमोर कडक लॉक डाऊनशिवाय आता इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.

जुलै आणि आगस्तमध्ये संसर्गितांची संख्या ही झपाट्याने वाढणार असल्याचा अंदाज आधीच भारतीय विज्ञान संस्थेने(आयआयएससी)ने वर्तवला होता. हे प्रमाण असेच राहीले तर पुढील ८ महिन्यात म्हणजे मार्च २०२१ पर्यंत देशात कोरोना बाधितांचा आकडा हा ६ कोटी १८ लाख पर्यंत जाईल तर २८ लाख रुग्णांचा मृत्यू होईल असा इशारा देण्यात आला. संस्थेच्या अंदाजानुसार येत्या नोव्हेंबरपर्यंत देशातील बाधित रुग्णांचा आकडा १ कोटी २० लाखांच्या वर जाईल, तर ५ लाखाहून अधिक रुग्णांचा मृत्यू होईल.परिणामी कोरोनाची लस सापडेपर्यंत रुग्णवाढ जास्त प्रमाणात असलेल्या भागात दर आठवड्यातील २-३ दिवस कडक लॉक डाऊन नियमितपणे लावण्याची शिफारस या संस्थेने केली आहे.

सध्या जगात भारताचा सर्वाधिक संसर्गितांच्या यादीत पहील्या तीन देशात समावेश झाला आहे. त्यात देशात तमिलनाडू व महाराष्ट्र हा कोरोना बाधितांमध्ये अग्रगण्य आहे. नागपूरात देखील यापेक्ष्ा वेगळी परिस्थिती नाही. पहीला अनलॉक १ जून पासून करण्यात आला आणि तेव्हापासून बाधितांची संख्या ही दिवसागणिक वाढतच असून काल पर्यंत शहरात एकूण दोन हजार सहाशे एकोण पन्नास रुग्णांची नोंद झाली होती. आजही शुक्रवारी वोकहार्टमध्ये कोरोनामुळे दोन रुग्णाचा मृत्यू झाला.
या पार्श्वभूमिवर आरोग्य यंत्रणेनेवर वाढलेला अत्यधिक ताण बघता व नागपूरात मुंबई सारखी विस्फोटक परिस्थिती उद् भवण्याची शक्यता गृहीत धरुन साेमवारपासून नागपूर शहरातही कडक लॉक डाऊन लावण्यात येणार असल्याची चर्चा ५ व्या माळयावर ऐकू आली.

मूळात लॉक डाऊन उठवलेच कशाला?
शहरातील काही बुद्धिजीवी यांनी शहरात कोरोना संसर्गाचा हा उद्रेग बघता ‘मिशन बिगिन अगेन’च्या नावाखाली मूळात लॉक डाऊन उठवलेच कशाला?असा सवाल केला. आता गेल्या दोन महिन्यांपासून एकदा लॉक डाऊन उठल्यावर‘ पुन्हा’ लॉक डाऊनसाठी आणि ते ही ‘कडक’ लॉक डाऊनसाठी आता नागरिकांची,व्यापा-यांची,फूटकळ दूकानदारांची,हातावर पोट असणा-या गरिबांची किवा सामान्य माणसांची ‘मानसिकता‘ आता तयार होणार आहे का?असा प्रश्‍न उपस्थित होतो. मूळात कोरोनाला पहील्या तीन महिन्याच्या लॉक डाऊनच्या काळात नागपूरकर नागरिकांनी जेवढ्या गांर्भीयाने घेतले होते,ते गांर्भीयच मूळातून नष्ट झाले आहे. कोरोनातून आतापर्यंत १ हजार ६५४ रुग्ण बरे झाले,त्यामुळे काेरोनाला गांर्भीयाने घेण्याची गरज नसल्याचीच मानसिकता,नागरिकांच्या एकंदरित बेजवाबदार वागणूकीतून दिसली. मात्र अलीकडे कोरोनाचा संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णांची वाढती संख्या , आरोग्य विभागावरील ताण आणखी वाढवत असून बाधितांच्या मृत्यू संख्येत ही झपाट्याने होणारी वाढ लक्ष्ात घेता,मनपा आयुक्तांनी दहा दिवसांचा कडक लॉक डाऊनचा निर्णय अंमलात आणण्याचे संकेत देऊन प्रशासनाला कामाला लावले असल्याचे सांगितले जात आहे.
बैठकीत शासनाच्या सूचनेनुसार लॉक डाऊनच्या काळात गरीबांच्या जेवणाची सोय यावर देखील चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

जेलात जाऊ पण लॉक डाऊन नाही पाळणार-
लॉक डाऊनच्या काळात अक्ष् र श: घरात बसून राहीलो. यानंतर अनेक अटींनंतर आलू-कांदे ओळीला कॉटन मार्केटमध्ये व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली. पावसामुळे आधीच व्यवसाय होत नाही. बाजार सगळा थंडा आहे. प्रशासनाने व्यवसायाची वेळ ही अफलातून दिली आहे.सकाळी ७ वाजता पासून बाजार हा एकदम थंडाच असतो,गि-हाईक फिरकतच नाहीत. गि-हाईकी वेळ दूपारी ४ नंतर असते,थोडी वर्दळ वाढते तर बाजार बंद करावा लागतो. आता पुन्हा जर लॉक डाऊन झाला तर आम्ही कॉटन मार्केटचे आलू-कांदा ओळीवाले तो मुळीच पाळणार नाही. सकाळी ७ ते १० दरम्यान फक्त १५० रु.कमाई होते. धंध्याचे खूप नुकसान झाले आहे. कोरोनापेक्ष्ा ही घरातील माणसे यांच्या पोटात घास ढकलण्याचा, जगण्या मरण्याचा प्रश्‍न आमच्यासमोर आहे. त्यामुळे यावेळी आम्ही मुंढे साहेबांचा आदेश मुळीच पाळणार नाही, ते गुन्हा दाखल करतील, तुरुंगात डांबतील तरी चालेल, तुरुंगातील पोळ्या मोडू मात्र आता हळूहळू पूर्वपदावर येणा-या धंध्याला हात लावू देणार नाही,नाही तर मुंढे साहेबांच्या घरासमोर आंदोलन करुन आम्हाला व आमच्या कुटुंबियांना जेवू घाला ही मागणी करु.
गरीबांचे मरण केले या कोरोनाने,सर्वात जास्त सुखी या कोरोना काळात असतील तर ते सरकारी नोकर आहेत. मुंढे यांचे काय जाते?लॉक डाऊनची घोषणा करायला?आम्ही काही सरकारी नोकर नाही,अजूनही कॉटन मार्केटचे मोठे गेट हे उघडलेच नाही. आम्ही सुरक्ष्े चे सगळे नियम पाळतोय,पुढे ही पाळत राहू, कॉटन मार्केटला ’कोरोना मार्केट’होऊ देणार नाही,मात्र या पुढे आम्ही लॉक डाऊन पाळणार नाही.

पुण्याचे घैसास यांचे उदाहरण-
पुणे येथे कडक लाॅक डाऊन करण्यात आले आहे. पुण्यातील घैसास नावाच्या महिलेचा व्हिडीयो हा अवघ्या महाराष्ट्रात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांचा सतंरजी विणण्याचा लहानसा कारखाना आहे. गेल्या तीन महिन्याच्या लॉक डाऊनमुळे त्यांच्यावर निर्भर कारागिरांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाकीची झाली असून त्यांची देखील परिस्थिती फारशी चांगली नाही. दहा दिवसांच्या लॉक डाऊनच्या मनपा प्रशासनाच्या निर्णयाचा त्यांनी कडाडून विरोध केला. मनपा प्रशासनाला हे शेवटचे दहा दिवस मी लॉक डाऊनचे सहकार्य करीत असल्याचे त्यांनी व्हिडीयोमध्ये सांगितले. ११ व्या दिवशी मी मनपासमोर उपोषणाला बसून जीव देईल,असा इशारा त्यांनी दिला आहे.
एकीकडे काेरोनाचा वाढता संसर्ग,वाढणारी मृत्यू संख्या तर दूसरीकडे पोटापाण्याचा निर्माण झालेला गंभीर प्रश्‍न,अश्‍या कोंडीत जर ख-या अर्थाने कोणी सापडला आहे तर तो आहे सामान्य माणूस….!नागपूरातही अशीच परिस्थिती उद् भवू शकते,मंुढेंच्या लॉक डाऊनच्या निर्णयामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. शासन विरुद्ध नागरिक असा संघर्ष निर्माण झाल्यास आश्‍चर्य राहणार नाही.

आधी जागरुकता वाढविण्याचा निर्णय-
नुकतेच दोन दिवसा आधी रवि भवन येथे विधान सभा अध्यक्ष् नाना पटोले व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेटीत नागपूरात एकदम लॉक डाऊनचा निर्णय न घेता आधी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची सूचना पटोले यांनी केल्याचे सांगितले जात आहे. परिणामी १७ जुलैपासून शहरात लागू होण्याची शक्यता असलेले लॉक डाऊन हे २० जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आले. यानंतरही नागरिकांनी सुरक्ष्ा नियमांचे पालन केले नाही तर,आम्ही तर सूचित केले होते, तुम्हीच ऐकले नाही त्यामुळे तुमच्याच वर्तवणूकीमुळे लॉक डाऊन केल्याचे सांगायला,प्रशासन मोकळे!

महापौर संदीप जोशी हे देखील कालपासून दहा ही झोनमध्ये नागरिकांना,दूकानदारांना सुरक्ष्ति अंतराचे आवाहन करीत फिरत आहेत. मूळात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनापासून सुरक्ष्ति कसे राहावे,याबात पुरेशी जागरुकता नागरिकांमध्ये झालेली आहे,प्रश्‍न आहे तो बिकट झालेल्या परिस्थितीचा. तीन महिन्यांच्या लॉक डाऊन नंतर प्रशासनच नागरिकांच्या गरजा भागविण्यास अपुरे पडले,परिणामी प्रत्येक ठिकाणी गर्दी वाढली. भाजी बाजार वाढवा, किराणा दूकान २४ तास उघडी ठेवा,अशी मागणी होत आहे.
दोन दिवसांनी श्रावण महिना लागतोय.गौरी,गणपती, महालक्ष्म्या यासारख्या सणांची तयारी करण्यास घराबाहेर भाविक पडला आहे.वर्षानूवर्षांची महालक्ष् म्यांची परंपरा कोरोनाच्या नावाने अथवा भीतीने खंडीत करण्यास भाविक अजिबातच तयार नाही.परिणामी बाजारात गर्दी वाढली. घरोघरी यादी बनू लागली,प्रशासकीय किवा सनदी अधिका-यांनी चार पुस्तके वाचून पदवी मिळवली आहे. त्यांना भाविकांच्या भावना कळणार नाहीत,असे देखील एका भाविकाने रोषाने सांगितले. ‘थाली बजाओ बाबा’ आणि ‘दंडे मारो बाबांना’ लोकजिवनाचा अनुभव नाही,असे ते सांगतात.

नगरसेविकाची कोविड रुग्णालयात दंबगशाही!
मूळात मेयो,मेडीकल,एम्ससारख्या शासकीय रुग्णालयात शहरातील वाढत्या बाधितांच्या उपचारांचा ताण अत्यधिक वाढला असताना आज रात्री ८.३० वा.दरम्यान एक अपक्ष् नगरसेविका यांनी ५० समर्थकांसह मेडीकल रुग्णालय गाठले. तत्पूर्वी त्यांनी मेडीकलमधील एका वैद्यकीय अधिकारी यांना फोन केला. अत्यधिक तनावात असल्याकारणाने त्या अधिका-यांनी नगरसेविका यांना इतकेच फोनवर म्हटले, हो मी तुमचा रुग्ण जो भरती आहे, त्यांची व्यवस्था बघण्यास इतर डॉक्टराला पाठवतो,झालं,मॅडमचा भडका उडाला, त्यांनी ते वैद्यकीय अधिकारी बोलत असतानाच फोन कापला,व ५० समर्थकांसह मेडीकलच्या अधिष्ठाताच्या केबिनमध्ये धडकल्या!
नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा अक्ष्र श: उद्रेग झाला असताना व त्याचा ताण मेडीकल,मेयोसारख्या शासकीय रुग्णालयातील कोराेना योद्धांवर आला असताना,राजकीय व्यक्तिंची ही अशी वर्तवणूक, उच्च विद्याभूषित असणा-या वैद्यकीय अधिका-यांचे मनोबल खच्चीकरण करणारी आहे. या वैद्यकीय अधिका-याची ही बोलकी वेदना होती,जास्त त्रास दिल्यास मी राजीनामा देऊन टाकील…!

एका मोठ्या आणि जवाबदार पदावरील वैद्यकीय अधिका-याचे कोविडच्या गंभीर संकटाच्या काळात, फक्त कोविड वॉर्डात भरती असणा-या त्यांच्या एका नातेवाईकाला ’व्हीआयपी’ ट्रीटमेंट मिळावी यासाठी मनोबल पाडणे,आत्मसन्मान दुखावणे हे निश्‍चितच योग्य नाही.राजकीय दवाबाखाली कोरोना योद्धे हेच जर नोकरी सोडून गेले तर सेनापतीशिवाय सैन्याची दशा कशी होते?याची प्रचिती नागपूरकर अनुभवतील आणि संकट आणखी गंभीर होईल याची दक्ष् ता आज नगरसेवकांनीही घेण्याची गरज असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

मूळात कोविड वॉर्डात कोणी व्हीआयपी असो किवा सामान्य नागरिक किवा रस्त्यावरील भिक्ष्ूक,प्रत्येकाला समान उपचार दिले जातात,कारण डॉक्टरांचा उद्देश्‍यच हा मूळात रुग्णाला बरा करण्याचा असतो,अश्‍यावेळी अमूक रुग्णालाच ’व्हीआयपी’ट्रीटमेंट मिळावी,पंचतारांकित हॉटेलसारखी सुविधा द्यावी,सोने-चांदीच्या ताटात औषधे देण्यात यावी…असा काल्पनिक अट्टहास जनतेचे प्रतिनिधित्व करणारे जनप्रतिनिधीच एखाद्या वैद्यकीय अधिका-याकडे कसे करु शकतात?

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या