फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजदोन लाख सहजयोगींची ऑनलाईन ध्यानसाधना

दोन लाख सहजयोगींची ऑनलाईन ध्यानसाधना

नागपूर,२५ एप्रिल: कोरोनाच्या दहशतीने अख्खे जग लॉकडॉऊन झाले असून, लोकांमध्ये भीती,चिंता व नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. या लोकांना नैराशेतून बाहेर काढण्यासाठी पं. पू. श्रीमाताजी निर्मलादेवी यांनी सुरू केलेल्या सहजयोग ध्यान साधनेच्या माध्यमातून जगातील 59 देशातील दोन लाख साधक रोज सकाळ-संध्याकाळ एकाच वेळी घरातून ऑनलाईन साधना करीत आहेत. या ध्यान साधनेतून विश्वकल्याणाची प्रार्थना सामूहिकपणे करत आहेत.

एकट्या नागपूरमध्ये जवळ-जवळ ४० ते ५० केंद्र हे कार्यरत आहेत.

जनमानसात असुरक्षितता, अस्वस्थता, नैराश्य, भीती व भविष्याची िंचता निर्माण झालेली आहे. कोरोनामुळे प. पू. श्रीमाताजी निर्मलादेवी यांनी सुरू केलेल्या सहजयोग ध्यान साधनेच्या माध्यमातून 50 वर्षांत असंख्य साधकांना या नकारात्मक व नैराश्यातून बाहेर येण्यास मदत होत आहे. आरोग्य शांती, समाधान व आनंद प्राप्त होऊन लोकांना संतुलित जीवन जगण्याचा मार्ग यातून मिळत आहे.

ध्यान साधना व सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या सकारात्मक चैतन्य लहरीतून संसर्गजन्य विषाणूचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल. राज्यात 1 हजार 344 ध्यानकेंद्र असून, शासनाच्या निर्णयाप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत 15 मार्चपासून सहजयोगी साधक ध्यानसाधना करीत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात सगळेच आपापल्या घरी बंदिस्त आहेत. अशावेळी साधकांना आपल्या आंतरिक शक्तीची जाणीव होण्यासाठी दररोज सायंकाळी पाच ते सात या वेळेत सहजयोग ध्यानसाधना शिकविली जाते. यू ट्यूबच्या माध्यमातून हजारो साधक त्याचा लाभ घेत आहेत. नवीन साधकांसाठी टोल फ्री क्रमांक 180030700800 कार्यरत आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या