
सावध रहा, सजग रहा!
पत्रकारांना कोविड१९ ची बाधा झाल्याच्या शक्यतेची बातमी पसरली.एका मोठ्या वृत्तपत्र समुहाच्या कार्यालयात काम करणा-या २ पत्रकारांनाही क्वारंनटाईन करण्यात आलंय! ठाणेतील पत्रकाराने थेट बाधिताच्या जवळ जाऊन मुलाखत घेतल्याची चर्चा आहे.
आपत्कालिन स्थितीत रोज ओरडून सगळ्या वृत्तवाहिन्या व्यवस्थेच्या कामातील त्रुटी आणि काळजी काय घ्यायला हवी हे ओरडून सांगत आहेत.
वृत्तपत्र,वृत्तवाहिन्यातील बहुसंख्य कर्मचारी घरातून काम करत आहेत,तशी साधन सुविधा व्यवस्थापनांनी पुरवली आहेत.
मात्र याही परिस्थितीत टिआरपीच्या नादात फिल्डवर पत्रकार विडियो जर्नालिस्ट आणि इतर कर्मचा-यांना धाडत आहेत.
एका वाहिनीकडे पत्रकारांसाठी पुरेशा गाड्या नाहीत इतर कोणतीही सुविधा दिली नसताना पत्रकारांना रोज बातमी पाठवणेचे, वाँकथ्रू करण्याचे मेसेज जात आहेत. कसं काम करायचं ही धास्ती आहे!
आपल्या कर्मचारी वर्गाची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवीच!आणि न घेता काम करवून घेत असतील तर तो गुन्हा आहे!
सरकारने जीआर काढून प्रसार माध्यमकर्मीचे वेतन कापू नये अशा आदेशही दिलाय.
मात्र दुसरीकडे टाळेबंदी,नुकसान मोठं हे कवच धारण करून अनेक मोठी मिडिया हाऊसेस येत्या काळात कर्मचारी वर्गावर राग काढणार हे निश्चित! यात मोठे मासे,मालकांचे हुजरे पहिले गादीवरून उडवले जातील हे नक्की!
त्यामुळे या कठीण परिस्थितीत मोठ्या पँकेजवाल्यांनी जास्त मस्ती करुन फिल्डवर काम करणारे, कार्यालयात काम करणारे यांना वेठीस नाही धरले तर उत्तम!
एका पत्रकार समुहातील चर्चा वाचली,बाहेर काम करणारे पत्रकार ,त्यांचे बुम,विडियो कँमेरे,गाडीवरील चालक,विडियो जर्नालिस्टस सुरक्षित किती आहेत?
बुमला मोठ्या दांड्या जोडतात तोडांला मास्क असतो पण तो बूम तर समोरच्या व्यक्ति जवळ असतो. गाडीचा चालक कुठे रहातो, कुठून येतो,विडियो जर्नालिस्टस्,पत्रकार सँनिटायझर वापरतात पण तरीही बहुसंख्यांच्या मनात आपण सुरक्षित नाही ही भावना होती.
टाळेबंद जाहीर होणे आधीच सर्व प्रसारमाध्यमांचे मालकांना व्यवस्थापनांना कर्मचारी वर्गाला पुरेशी सुरक्षा देणे,त्यांची काळजी घेणेचे आवाहन एनयुजे महाराष्ट्रने केले होते.तसे मुख्यमंत्रीना कामगार मंत्रींना निवेदनही पाठवले होते. शासनानेही तसे आदेश काढलेत.
मात्र कोण, किती याचं पालन करत आहेत हा विषय ऐरणीवर आलाय.
हररोज सरकारच्या माहिती जनसंपर्कविभागाकडून , मुख्यमंत्री थेट सर्वांशी संवाद साधत आहेत. सर्व मंत्रीमहोदयांमार्फत थेट विडियो येत आहेत ,माहिती मिळत आहे,काही वृत्तसंस्था बातमी देतात त्या वापरुन खुपसे काम होउ शकते, लाईव्ह शो कार्यक्रम स्काईपवरून पाहूणेंचा सहभाग घेऊन लाईनअप करता येतो. पण आम्ही १ले चा हव्यास सध्यस्थितीतही कमी होताना दिसत नाही.
म्हणूनच सर्व माध्यमकर्मी बंधुभगिनींना आवाहन आहे,आपली काळजी घ्या,वेळीच वरिष्ठांना त्रुटी दाखवून अचूक मदत घ्या! आणि तरीही काही मदत हवी असेल , अडचण असेल तर वेळीच सांगा!या लढाईत आपण सर्व सोबत आहोत!
एनयुजे महाराष्ट्र च्या माध्यमातून जिल्ह्यांतून गरजू सहका-यांना जीवनावश्यक वस्तू,आरोग्य तपासणी आणि इतर गोष्टिंसाठी सहकार्य करत आहोत! पालकमंत्री,आमदार मंत्री , अनेक संस्था सहकार्याचा हात पुढे करत आहेत.काळजी करू नका,आपलं आयुष्य अनमोल आहे!अन्याय तर अजिबात सहन करु नका! तेव्हा सावध रहा, सजग रहा स्वतःची काळजी घ्या!
असे आवाहन शीतल करदेकर,अध्यक्ष
नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस महाराष्ट्र
संलग्न- एनयुजे इंडिया,नवी दिल्ली
सदस्य: इंटर नँशनल फेडरेशन आँफ जर्नालिस्टस,ब्रुसेल्स (7021616645) यांनी पत्रकाद्वारे केले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
