Advertisements

नागपूर,ता.१६ जून २०२६: काल जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान माझ्यावर दोन तरुणांनी हल्ला केला.एक नाही दहा हल्ले करा.मला मंजूर आहे पण,मंत्री धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यायला आम्ही भाग पाडू,असे आव्हान देत,’धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो’च्या न-याने संविधान चौकातील संपूर्ण परिसर दणाणून गेला.
काल पासून संपूर्ण मिडीयामध्ये अभिजित दीपकेवर हल्ला झाला,हेच वृत्त चालवले जातेय.अभिजित दीपके कोणी मोठा नाही,पण हा हल्ला का झाला,हा मुद्दा महत्वाचा असल्याचे दीपके म्हणाले.
माझ्यावर हल्ला यासाठी झाला कारण मी ’नीट’चा प्रश्न उचलला.नीटच्या मुलांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत,त्यामुळे सरकारने माझ्यावर हल्ले करण्यापेक्षा जर ’नीट’च्या विद्यार्थ्यांना न्याय दिला,नागपूरातील आकांक्षासारख्या मृतकाला जर न्याय दिला तर आम्हाला आंदोलन करण्याची गरजच पडली नसती,असे ते म्हणाले.
आज दुपारी १२ वाजता प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील अभिजीत दीपके यांनी जयपूरमधील त्यांच्यावरील हल्ल्या मागे संघाचे स्वयंसेवक असल्याचा आरोप केला होता.दोन्ही आरोपींची समाजमाध्यमांवरील छायाचित्रे संघाच्या गणवेषात असल्याचा दावा त्यांनी केला.
आंदोलनस्थळी बोलताना ते म्हणाले,की मला तरी अमेरिकेतून सगळं सोडून भारतात येऊन आंदोलन करण्याची गरज कशाला पडली? सरकारने जर ’नीट’जबाबदारी पार पाडली असती तर आज संविधान चौकात आणि देशभरातही आंदोलनस्थळी हजारो विद्यार्थी कशाला एकत्रित आले असते?असा सवाल करीत,हे सरकार आपली जबाबदारी पार पाडत नाही त्यामुळेच देशभरातील विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ आली.
जर धर्मेद्र प्रधानांनी २० जूनच्या आधी राजीनामा दिला नाही तर २० जून रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर अख्खा भारत एकत्रित येईल,असा इशारा दीपके यांनी केंद्र सरकारला दिला.
दिल्लीला आल्यानंतर राजीनामा घेतल्याशिवाय कोणीही परत जाणार नाही.याची वचनबद्धताच दीपके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांकडून याप्रसंगी वदवून घेतली.
गेल्या दहा-बारा वर्षातील भारत देशाच्या केंद्रीय राजकारणावरही कठोर टिका करीत,फक्त हिंदू-मुस्लिमांचे राजकारण सुरु असल्याचे ते म्हणाले.त्यामुळेच आज संपूर्ण विद्यार्थ्यांनी सांगावे या हिंदू-मुस्लिमच्या राजकारणातून देशातील विद्यार्थ्यांचे काही भले झाले का?असा थेट सवाल केला.
तुम्हाला नोक-या मिळाल्या का?शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळाले का? तुमच्या परिक्षा नीट पार पडल्या का?यावर गगनभेदी आवाजात ’नाही’असा प्रतिसाद मिळाला.
मग या हिंदू-मुस्लिम राजकारणातून नेमका कोणाचा फायदा होतो आहे?फक्त त्यांना दोष देऊन चालणार नाही,त्यांनी आपल्याला हा भावनिक मुद्दा उकरुन विभाजित केले.आपण विभाजित झालो,त्याचा फायदा त्यांनी घेतला.आता आज,या पुढे हिंदू-मुस्लिमच्या राजकारणात कोणताही विद्यार्थी पडणार नाही.कोणताही राजकीय पक्ष असतो,जो राजकीय पक्ष,जो नेता हिंदू-मुस्लिमचे राजकारण करेल,जे हिंदू-मुस्लिमच्या नावावर मत मागतिल त्यांचा आपण ‘बहीष्कार’करायचा,
’हिंदू-मुस्लिम की राजनीती..नही चलेगी,नही चलेगी’असे नारे यानंतर गुंजले.मजिदीसमोर तरुणांना नाचवले,दंगे भडकवले,हल्ले झाले केवळ दोन-दोन हजार रुपये देऊन.त्या तरुणांकडे नोकरी असती,हाताला काम असतं तर ते दोन हजार रुपयांसाठी मजिदी समोर जाऊन नाचले असते का?असा सवाल दीपके यांनी केला.मंदिरा समोर जाऊन नाचा ना,आपला धर्म काय मजिदी समोर जाऊन नाचण्यासाठी आहे का?असा सवाल त्यांनी केला.
या हिंदू-मुस्लिम राजकारणाने आज आपल्या देशात मागील चाळीस वर्षातील सर्वात मोठा बेरोजगारीचा दर गाठला असल्याचे दीपके म्हणाले.पण हा मुद्दा कुठेही मुख्य प्रसार-प्रचार माध्यमात दिसून पडत नाही. आज आपल्या देशात शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. आपल्याला हिंदू-मुस्लिम राजकारणात अडकायचं नाही, जे मिडीया चालवते, आपल्याला फक्त शिक्षण व्यवस्था नाही,अापल्याला देश बदलायाचा आहे,असे आवाहन याप्रसंगी दीपके यांनी केले.
कोण-कोण हा देश बदलेल?अशी विचारणा करताच अनेक हात उंचावले.आज देशातील विद्यार्थी हा देश चालविणा-या केंद्रीय मंत्र्यांपेक्षा जास्त शिकलेला असल्याचा टोला त्यांनी हाणला.‘अनपढ गवारो की सरकार…नही चलेगी..नही चलेगी’चा नारा आंदोलनस्थळी गुंजला.
आणखी एक नवीन ट्रेंड देशात सध्या सुरु आहे.जो कोणी सरकारला प्रश्न विचारेल,त्याला सरळ ‘देशद्रोही ’ठरवल्या जातं!असे दीपके म्हणाले.जेव्हा मी ‘कॉक्रोच जनता पार्टी‘’समाज माध्यमावर सुरु केली तेव्हा या सरकारने वल्गना केली की कॉक्रोच जनता पार्टीचे सगळे फॉलोवर्स पाकिस्तानी आहेत!नागपूरात सगळे विद्यार्थी कॉक्रोचचे मुखवटे घालून आहेत,हे पण काय पाकिस्तानी आहेत का?असा थेट सवाल त्यांनी केला.
वेदांग नावाचा १७ वर्षांचा सीबीएसईचा विद्यार्थी आहे.त्याने सांगितले की त्याचा पेपर चुकीचा तपासला गेला,त्यालाही पाकिस्तानी संबाेधण्यात आलं.मी नीट वरुन प्रश्न विचारतो तर मलाही देशद्रोही ठरवण्यात येतं.या देशातला विरोधी पक्ष ही आता देशद्रोही ठरविला जातो.विरोधी पक्ष जेव्हा ‘व्होट चोरी’वर प्रश्न विचारतात तर ते देखील देशद्रोही असतात.मी,सीबीएसईचा १७ वर्षीय विद्यार्थी,प्रश्न विचारणारी मिडीया,विरोधी पक्ष हे सर्वच सरकार व त्यांच्या आंधळ्या समर्थकांसाठी ‘पाकिस्तानी’आहेत तर,देशभक्त आहेत कोण?फक्त या सरकारचे आयटीसेलवाले?असा खोचक प्रश्न दीपके यांनी केला.
हा देश कोणत्याही एका पक्षाचा नाही,हा देश १४० कोटी जनतेचा आहे.त्यांना जर वाटत असेल की हा देश कोण्या एकाच राजकीय पक्षाद्वारे चालेल,एकाच विचारधारेवर चालेल,एकाच स्वत:ला ‘महामानव’समजणा-याच्याद्वारे चालेल तर हा त्यांचा गैरसमज आहे. ’तुमसे भी पहले यहां कोई गद्दानशीन था‘.ही शायरी त्यांनी ऐकवली.
एक क्रांती देशात सुरु झाली आहे,खूप दिवसांनंतर ही संधी आपल्याला मिळाली आहे,आता मागे हटायचे नाही,असे आवाहन करीत येत्या २० जून रोजी देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही आणि कोणीही घरी जाणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.यानंतर ‘चलो दिल्ली..चलो दिल्ली’चे गगनभेदी नारे आंदोलनस्थळी गुंजले.
दीपके यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकार व राज्य सरकारला वारंवार इशारे दिले.मात्र,याच वेळेस ‘भारत माता संघटनेचे’ पदाधिकारी देखील आंदोलनस्थळी पोहोचले व त्यांनी ‘जय श्री राम’व ‘भारत माता की जय’चे नारे देण्यास सुरवात केली.यामुळे काही काळ तनावपूर्ण वातावरण निर्माण झाले.पोलिसांनी तातडीने संघटनेचे पदाधिकारी यांना अटक करुन सीताबर्डी पोलिस ठाण्यात आणले.काही काळानंतर त्यांची सुटका केली.
मिडीयाचेही कौतूक-
गोदी मिडीया येथे आलेली नाही,इथे चांगली मिडीया आलेली आहे जे लोकांचे मुद्दे दाखवत असल्याचे कौतूक दीपके यांनी केले.जे वातानुकूलन कक्षात बसून पत्रकारिता करीत आहेत,ती गोदी मिडीया असल्याचा टोला त्यांनी हाणला.मात्र,मिडीयाला मंचासमोर जागा मिळवायला तब्बल दीड तास आयोजकांशी आज वाद घालावा लागला.मिडीयाला आंदाेलनकारी यांच्याही मागे उपस्थित राहण्याचे फर्मान आयोजकांनी सोडले यावर हातात कॅमरे असणारे छायाचित्रकार यांनी इतकी गर्दी समोर असताना मंचावरील छायाचित्रे कशी टिपणार?अशी विचारणा केली.तरी देखील आयोजक हे,हा पोलिस विभागाचा निर्णय असल्याचे सांगून हात झटकत राहीले.बरीच विचारणा केल्यानंतर व वार्तांकन,छायाचित्रण व डिजिटल वार्ताकनांची अडचण पोलिस विभागातील वरिष्ठांना सांगितल्यानंतर मंचा समोर आणखी एक बॅरिकेट्सची भिंत उभारत, मिडीयाकर्मींना गर्दी व मंचाच्या मधोमध असलेल्या बेरिकेट्सच्या आत घेण्यात आले.
क्षणचित्रे:-
– हातात महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे एकत्रित छायाचित्र घेऊन अभिजित दीपके यांची मंचावर एन्ट्री
– माँ तुझे सलाम..वंदे मातरम या गीतावर मंचावर आगमन
– तरुणांचा जोश गगनाला भिडला
– जय जय जय जय भीम व शिवाजी महाराजांचा गगनभेदी जयघोष
– बॅरिकेट्स मागे उभे असलेल्या अनेक विद्यार्थ्यांकडून गुलाबांच्या फूलांचा मंचावरुनच इतरांच्या हस्ते बोलावून स्वीकार
– बाबासाहेबांच्या नीळ्या टोपीला केले डोक्यावर श्रद्धेने धारण
– विद्यार्थ्यांनी हातात उंचावलेली,कॉक्रोच जनता पार्टी लिहलेली काळी जर्सी मंचावर मागवून घेत अंगातील जर्सीवरच परिधान केली,तरुणाईचा जल्लोष

-तगडा पोलिस बंदोबस्त,मंचाभोवती साध्या गणवेषात तिहेरी घेरा
Advertisements

-एक साध्या वेषातील महिला पोलिस कर्मचारी हिने चक्क दंडावरच कॉक्रोच जनता पार्टीचा स्टीकर चिटकवला होता,कार्यक्रम संपेपर्यंत मंचावरील छायाचित्रणात त्या व्यस्त.मात्र,माध्यमकर्मींनी विद्यार्थी रुपातील महिला पोलिसाला ओळखले.
– माजी काँग्रेस मंत्री राजेंद्र मुळक यांचा जनसंपर्क सांभाळणारा ऋषभ राऊत याचे ही मंचारुन ‘विद्यार्थी ’म्हणून भाषण!
-कार्यक्रमाच्या मध्यात मंचावर खदखद फेम क-हाळे मास्तरांच्या एन्ट्रीने एकच जल्लोष
– कार्यक्रमात ७५ वर्षीय सुप्रसिद्ध सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी देखील तरुणाईमध्ये भरला जोश
-तरुणाईच्या हातात केंद्र सरकारच्या विरोधात वेगवेगळे अर्थपूर्ण व लक्षवेधी फलके झळकत होती
-संविधान चौकात कॉक्रोचचे आंदोलन,भाजपसाठी ’खतरे की घंटी!’
-नरेंद्र,धर्मेंद्र,देवेंद्र आणि गडकरीं विरोधात फूंकले रणशिंग
-हजारो क्रॉक्रोच विचारधारेच्या समर्थकांची उपस्थिती:जोरदार नारेबाजी
-सत्यपाल महाराज,क-हाळे मास्तरांचे सत्ताधा-यांना शाब्दिक फटके
-नागपूरातील आंदोलनात सर्वात जास्त गर्दी:दिपके यांची कबुली
-मी कर्नाटका,उत्तरप्रदेश,दिल्ली ,पंजाब,राजस्थानला जाऊन आलो मात्र,या पाचही ठिकाणी जितकी गर्दी नव्हती,ती आज नागपूरात आहे,याबाबत दीपके यांनी समर्थकांचे मानले आभार
-धर्मेद्र प्रधानच्या राजीनाम्यावर कॉक्रोच जनता पार्टी ठाम:२० जूनला जंतरमंतरवर पुन्हा तीव्र आंदोलन
-पंतप्रधानांनी आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना भेट द्यावी,केली मागणी
-संविधान चौक तिन्ही बाजूने बॅरिकेट्स लावून बंद.भारतीय विद्या भवन समोरील गल्ली,रिझर्व बँक तसेच स्पीड पोस्टबाजूची गल्लीत बॅरिकेट्स.पार्किंगची व्यवस्था होती अतिशय दूर.
– किमान ५ ते ६ हजार लोकांची गर्दीमुळे संविधान चौकातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली,दीपके यांना मंचावरुन करावे लागले आवाहन
– राष्ट्रगाननंतर कार्यक्रम संपताच समर्थक तरुणाई मंचापर्यंत पोहोचण्यापूर्वीच दीपके यांचा घेराव घालत बलदंड शरीरयष्टीच्या पोलिसांनी जबरीने दीपके यांना अक्षरश:ओढतच रिझर्व बँक चौक रस्त्यावरील कारमध्ये बसवले व क्षणाधार्त ताफा आंदोलनस्थळापासून रवाना.
(बातमीशी संबंधित सर्व व्हिडीयोज Sattadheesh Official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
(वाचा उद्याच्या बातमीत खदखद फेम क-हाळे मास्तरांनी गडकरींची घेतलेली फिरकी)
………………………………………..
Advertisements

Advertisements
