Homeब्रेकिंग न्यूज'कॉक्रोच' अभिजित दीपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना थेट ’हे ’दिले आव्हान

‘कॉक्रोच’ अभिजित दीपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना थेट ’हे ’दिले आव्हान

Advertisements

नागपूर,ता.१६ जून २०२६:आंदोलनस्थळी मला यायला उशिर झाला कारण,मी आंकाक्षा चर्तुवेदी नावाच्या मृतक विद्यार्थिनीच्या कुटूंबियांना भेटायला धरमपेठ येथे गेलो होतो,‘नीट’ची परिक्षा रद्द झाली,याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.तिच्या वडीलांनाही आपल्या तरुण आणि कर्तुत्ववान मुलीच्या मृत्यूच्या दू:खातून लकवा मारला असून ह्दयाघात येऊन गेला आहे.ते कॅटरिनचे काम करत होते.आकांक्षा हीच त्यांच्या कुटूंबाचे भविष्य होती.लहान भाऊ शिक्षण घेत आहे.आता घरी कमविणारा कोणीही नाही.एक महिन्या पूर्वी  आकांक्षाने आत्महत्या केली,हा बळी व्यवस्थेने घेतला आहे,सरकारने घेतला आहे.या ही  पेक्षा लाजिरवाणी बाब ही आहे, की नागपूर हे शहर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहनगर आहे.मात्र,इतकी मोठी घटना त्यांच्या घरापासून अवघ्या ५०० मीटरवर घडली,परंतु त्यांनी या पिडीतांच्या घरी भेट देण्याची देखील तसदी घेतली नाही,किंवा साधा फोनही केला नाही.त्यांना वाटत असेल ही ’नीट’मुळे घडलेली घटना आहे,हा केंद्र सरकारचा विषय आहे पण आकांक्षा तर महाराष्ट्राची मुलगी होती,तुम्ही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात,किमान ‘माणुसकी’ म्हणून मुख्यमंत्र्यांना पिडीतांना एक फोनही करावासा वाटला नाही?
हा जहाल प्रश्‍न विचारला सध्या जगभर गाजणा-या ‘कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी)संस्थापक अभिजित दीपके यांनी.स्थळ होते,नागपूरातील संविधान चौक,जिथे सीजेपीचे आज दिनांक १६ जून २०२६ रोजी मोठे आंदोलन पार पडले.आकांक्षा ही नीटची परिक्षा रदद् झाली नसती तर डॉक्टर झाली असती,डॉक्टर होऊन तिच्याकडून समाज व देशाची सेवा घडली असती,मात्र, असे घडले नाही,अशी खंत दीपके यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांच्या नावाने शंखनाद करीत अभिजित दीपके याने, अख्ख्या महाराष्ट्राने ५० खोके देऊन कश्‍याप्रकारे सत्ता परिवर्तन झाले आहे हे पाहिले आहे,असा टोला हाणला.त्याच्या मधला केवळ एक ‘खोका’जरी आकांक्षाच्या कुटूंबियांना मिळाला असता तर या ठिकाणी आम्ही तुमचे कौतूक केले असते,असे दीपके म्हणाले.आमदार फोडायला,आमदार विकत घ्यायाला,सरकार पाडायला मुख्यमंत्र्यांकडे पैसे आहेत,पण जेव्हा अगदी तुमच्या घराजवळ एक विद्यार्थिनी आत्महत्या करते,तिच्या कुटूंबियांना द्यायला तुमच्याकडे दहा लाख रुपये देखील नाही का?असा सवाल करताच ‘शेम,शेम..’च्या आवाजाने परिसर दणाणला.
लाखो लाखो रुपयांचे रिसॉर्ट बूक करता,आमदारांना गुहावटीला घेऊन जाता,अगदी नगरसेवकांना देखील फिरायला पाठवता,कोणाच्या खर्चावर?आमच्या खर्चावर घेऊन जाता.पण जेव्हा आमच्या घरच्या लेकरांचा प्रश्‍न येतो,तुमच्याकडून एक फोन देखील जात नाही.असे मुख्यमंत्री असतात का?जेव्हा मी याविषयी बोलतो तर मुख्यमंत्री फडणवीस मला ’अराजकवादी’म्हणतात.जर मृतक आंकाक्षासोबत उभे राहणे ही अराजकता आहे तर आहे मी अराजक!जर’जय भीम’च्या घोषणा देणे अराजकता आहे तर आहे मी अराजक!जर महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणे अराजकता आहे तर आहे मी अराजक!मला तुम्हीअराजक म्हणा,तुरुंगात टाका मी तुरुंगात ही जायला तयार आहे पण,आकांक्षासोबत न्याय झालाच पाहिजे,अशी मागणी दीपके यांनी केली.
काय तर देशात नरेंद्र,राज्यात देवेंद्र!काय करायचं आहे त्यांचं?जर आमच्या लेकरांसोबत तुम्हाला उभं राहता येत नसेल तर काय उपयोग?५०० मीटरवर घर आहे आंकाक्षाचं तरी तुम्हालाआकांक्षाच्या घरी जाता ही नाही आलं,,मी तर अमेरिकेतून आलो आणि मागच्या पाच दिवसांपासून पूर्ण देश फिरत आहे,नागपूरात आल्या बरोबर मी तिच्या घरी गेलो,माणूसकी नावाची एक गोष्ट असते,तुम्हाला आमदार फोडणे,सरकार पाडणे जमतं,पहाटे ५ वा.तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेता,मात्र एक महिना उलटून गेला,मुख्यमंत्र्यांना नीट परिक्षा आत्महत्याग्रस्त पिडीतेच्या घरी जावसं वाटलं नाही,काय मुख्यमंत्री लाभला आहे महाराष्ट्राला,मलाच प्रश्‍न पडला आहे,अशी कडवट टिका याप्रसंगी दीपके यांनी केली.
मी आज त्यांच्याच शहरात येऊन त्यांच्यावर टिका करतोय,उद्या,परवा ते माझ्यावर गुन्हे ही दाखल करतील,कितीही गुन्हे दाखल केले तरी मी थांबणार नाही,असा इशारा आंदोलनस्थळी अभिजित दीपकेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh Official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
Advertisements
Advertisements

Latest बातम्या