Homeब्रेकिंग न्यूजफिर्यादीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पोलिस,पत्रक़ार व वकीलावर गंभीर आरोप!

फिर्यादीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पोलिस,पत्रक़ार व वकीलावर गंभीर आरोप!

ॲड.सतीश उके प्रकरण

दोषींवर फौजदारी गुन्हे नोंदवण्याची ॲड.उके यांची पत्रकार परिषदेत मागणी
माजी पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी अंहकार दुखावल्याने डांबले साढे तीन वर्षे तुरुंगात:उके यांचा आरोप
नागपूर,ता.१३ जून २०२६: खैरुननिसा मो.समद नावाच्या फिर्यादी महिलेने बहूचर्चित ॲड.सतीश उके यांच्यावर अजनी पोलिस ठाण्यात २०२२ साली गंभीर गुन्हा दाखल केला होता.ज्या आधारावर उके बंधूंवर पुढे चक्क सक्तवसुली संचालनालय(इडी)ची कारवाई होऊन तब्बल साढे तीन वर्षे त्यांना कोणत्याही सुनावणीशिवाय मुंबईतील ऑर्थर रोड व तळोजाच्या तुरुंगात काढावे लागले व जामिनासाठी प्रदीर्घ अशी न्यायालयीन लढाई लढावी लागली.आज देखील ॲड.सतीश उके व त्यांचे बंधू प्रदीप उके यांच्यावर त्या खटल्याशी संबंधित न्यायप्रक्रिया सुरु असून उके यांनी न्यायालयाला विनंती करीत, त्यांच्या वरील आरोपासंबंधीचा खटल्यावर लवकरात लवकर सुनवणी घेण्याची मागणी केली.
यावर सुनावणी घेत फिर्यादी क्र. ५ खैरुननिसा यांना वारंवार उत्तरासाठी बोलावण्यात आले मात्र,त्या हजर न झाल्याने न्यायालयाने मागील सुनावणीत तंबी देत खैरुननिसा यांनी बाजू न मांडल्यास त्यांच्या उत्तराशिवाय खटला पुढे चालवला जाईल,असे निर्देश दिल्याने खैरुननिसा यांनी नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक खळबळजनक शपथपत्र सादर केले ज्यामध्ये खैरुननिसा यांनी नागपूरचे माजी पोलिस आयुक्त अमितेश कुमार,ज्येष्ठ वकील श्रीरंग भांडारकर तसेच काही पत्रकारांवर गंभीर आरोप केले आहेत.
आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेत ॲड.सतीश उके यांनी तेच शपथपत्र पत्रकारांसमोर सादर करत,२०२२ साली त्यांना एका भूखंडाच्या प्रकरणात कश्‍यारितीने खैरुननिसा नावाची खोटी फिर्यादी समोर करुन गुन्हा नोंदवण्यात आला,याबाबत विस्तृत माहिती देत,खैरुननिसा यांनीच कोर्टात सादर केलेल्या आपल्या शपथपत्रात तिने हे मान्य केले असल्याची माहिती दिली.
२०२२ साली समाजसेविका ज्वाला धोटे यांनी तत्कालीन नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सासरे विरोधात विरोधात मुख्य न्यायिक दंडाधिकारी(चीफ ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट) यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.यात अमितेश कुमार यांचे सासरे यांच्या एका विशिष्ट राजकीय पक्षाविषयी अतिशय अपमानास्पद फेसबुक पोस्ट्सचा हवाला धोटे यांनी दिला होता व कायदेशीर कारवाईची मागणी केली होती.त्यातील अनेक पोस्टमध्ये अमितेश कुमार हे त्यांच्या सास-यासाेबत असल्याचे दिसून पडत होते.या प्रकरणात ॲड.सतीश उके यांनी ज्वाला धोटे यांचे वकीलपत्र घेतले होते.परिणामी,अमितेश कुमार यांचा अंहकार दुखावला गेला व त्यांनी पदाचा दुरुपयोग करीत खैरुननिसाचे प्रकरण उकरुण काढले,असा आरोप याप्रसंगी ॲड.उके यांनी केला.
खैरुननिसा यांनी स्वत: न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात याचा उल्लेख केला आहे. २०२२ साली अजनी पोलिस ठाण्यात खैरुननिसा यांच्या तक्रारी नंतर उके यांच्या विरुद्ध इंडियन पिनल कोडच्या कलम ३४७,३५४,३५४-ब,३५४-ड,४५२,४०४,४२०,४२३,४६५,४६७,४६८,४७१,३२३,२९४,५०६,सह कलम ३४ अंतर्गत बंदूक सारखे शस्त्र बाळगण्याचा व बंदूक दाखवून धमकावण्याचा गुन्हा दाखल करुन या कायदातील कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल केला.या गुन्ह्यात पोलिसांनी ॲड.उके यांना अटक करुन न्यायालयात पीसीआरकरिता हजर केले होते.मात्र,प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विशेष न्यायालयाने पीसीआर नाकारला.यानंतर पोलिसांनी सत्र न्यायालयात खोटे कागदपत्रे बनवून पुर्नयाचिका दाखल केली,ती देखील सत्र न्यायालाने फेटाळली.
याशिवाय गुन्हे शाखा विभागाने ॲड.उके व प्रदीप उके यांच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.या विरुद्ध उके बंधूंनी हे प्रकरण रद्दबातल होण्यासाठी २०२४ मध्ये रिट याचिका दाखल केली.याच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी क्र.५ असणारी खैरुननिसा मो.समद हिने नागपूर खंडपीठात दिनांक १२ जून २०२६ रोजी आपले उत्तर प्रतिज्ञापत्राद्वारे दाखल केले.या प्रतिज्ञापत्रात फिर्यादी खैरुननिसा यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करीत,उके हे अमितेश कुमार यांच्या सास-यांविरुद्ध ज्वाला धोटे यांचा खटला लढत असल्यामुळे शत्रूभावनेतून,ज्येष्ठ वकील श्रीरंग भांडारकर यांच्या माध्यमातून खैरुननिसा व त्यांच्या कुटूंबियांना धमकावण्यात आल्याचा उल्लेख आहे.
खैरुननिसा यांनी भांडारकर यांचे म्हणने न ऐकल्यास त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना जीवे मारण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली हाेती.परिणामी,खैरुननिसा यांनी उके बंधूंविरुद्ध अजनी पोलिस ठाण्यात,जमीनीच्या प्रकरणात बंदूक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला.नंतरच्या एफआयआरमध्ये मात्र,बंदूकीचा धाक दाखवून विनयभंग केल्याचा आरोप खैरुननिसा यांनी केला,असे ॲड.उके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
खैरुननिसा यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ॲड.श्रीरंग भांडारकर यांनी तिच्या कडून काही पोलिस व पत्रकारांना ‘शांत’ठेवण्यासाठी ५० लाख रुपये रोख घेतले तसेच काही कोरे स्टॅम्प पेपर व इतर कागदांवर तिच्या सह्या व अंगठ्याचे ठसे घेतले.तिने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ॲड.उके यांच्या विरुद्धच्या षडयंत्रामध्ये अनेक लोक सहभागी आहेत.या संबंधीची कागदपत्रे,हिंगणा पोलिस ठाण्यात धर्मदास रामाणी,मो.जफर व त्यांच्या साथीदार यांच्या विरुद्ध दाखल दरोडा,फसवणूक गुन्ह्याची कागदपत्रे,संपूर्ण पोलिस डायरीच शहरातील एक भूखंड माफिया व मो.जाफर व त्यांच्या साथीदार यांना गैरफायदा पोहोचविण्यासाठी गहाळ करण्यात आले,असा दावा उके यांनी खैरुननिसा यांच्या शपथपत्रात असल्याचा केला.
उच्च न्यायालयात खैरुननिसा यांनी सादर केलेले हे प्रतिज्ञापत्र हे या प्रकरणातील खूप महत्वाचा पुरावा असून पुन्हा भीती,दबाव किंवा लालसेतून खैरुननिसा आपला जबाब बदलवू शकते,अशी शक्यता ॲड.उके यांनी व्यक्त केली.अमितेश कुमार यांची जरी पुण्यात बदली झाली असली तरी त्यांच्यासाठी काम करणारे अनेक पोलिस अधिकारी आज देखील विविध झोनमध्ये असल्याचा आरोप यावेळी ॲड.उके यांनी केला.

माझ्यासारख्या गरीबाला आवाज उठवण्याचा अधिकार नाही, अनेक पोलिसांचे राजकीय हितसंबंध,गुंडांशी सूत,प्रामाणिक नागरिकांवर अन्याय करणारे ठरतात,ज्याचा मी खूप मोठा भोक्ता आहे,सज्जनांचे रक्षण करण्याचे ब्रीद असणा-या पोलिस विभागातच जर अमितेश कुमार यांच्यासारखे पोलिस आयुक्त,उपायुक्त असतील तर ज्याप्रमाणे साढे तीन वर्षे मला अन्यायरितीने पदाचा गैरवापर करुन तुरुंगात डांबून ठेवण्यात आले,माझ्या उमेदीची वर्षे मला व माझ्या भावाला तुरुंगात काढावी लागली,माझ्या भाऊ-वहीणीसह संपूर्ण कुटूूंबियांवरच अनेक खटले दाखल करण्यात आले,तीच वेळ कोणावरही येऊ शकते,असा इशारा याप्रसंगी ॲड.उके यांनी दिला.
एकंदरित मी खैरुननिसा व पोलिसांकडून पिडीत झालेला फिर्यादी असल्याचे उके म्हणाले.मी कधीही जमीनीचा आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातही आलो नव्हतो,तरी देखील २००८  नंतर २०२२ मध्ये माझ्या विरोधात धाकदपटशाही करुन तत्कालीन पोलिस आयुक्तांनी खैरुननिसाचा वापर करुन घेतला,जर पुढे देखील खैरुननिसा आपल्या शपथपत्रावर कायम राहील्या तर अश्‍या गंभीर प्रकरणात जेव्हा मूळ फिर्यादी स्त्री स्वत: उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे पोलिसांच्या दबावाखाली खोटी तक्रार केल्याचे मान्य करते,तेव्हा संबंधित पोलिस अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई न्यायालय करु शकते,असे उके यांनी सांगितले.
खोटा पुरावा तयार करणे व निरपराध व्यक्तीला अडकविणे,खंडणी,जबरदस्तीने साक्ष घेणे,अधिकाराचा गैरवापर करुन बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे,एखाद्या स्त्रीला व तिच्या कुटूंबियांना जीवाने मारण्याची धमकी देणे,या विरोधात उच्च न्यायालय फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश देऊ शकतात.
दोषी पोलिसांना तात्काळ सेवेतून निलंबनाचा आदेश मिळू शकतो तसेच चौकशीअंती सेवेतून कायमचे बडतर्फ केले जाऊ शकते.गुन्हा सिद्ध झाल्यास इतरांना तुरुंगात डांबणारे पोलिस अधिकारी यांना देखील अनेक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.पोलिस अधिका-यांप्रमाणेच वकीलावर देखील थेट गुन्हगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल होतील.गुन्हेगारी कट रचणे,खोटा पुरावा तयार करणे,धमकावणे,दबाव आणने,पीडित स्त्रीला आणि तिच्या कुटूूंबियांना भीती दाखवून गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल,वकीलाला देखील सह-आरोपी केले जाऊ शकते.आरोपी वकीलाची सनद रद्द होऊ शकते.वकीलाने नैतिक अधोगती व व्यवसायिक गैरवर्तन केल्याचे सिद्ध झाल्यास,बार कौनिस्ल त्याची वकीलीची सनद आयुष्यभरासाठी रद्द करु शकते.
न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असलेल्या एक वकीलानेच जर न्यायालयाची फसवणूक केली असेल,तर उच्च न्यायालय याकडे अत्यंत गंभीर गुन्हा म्हणून पाहते.न्याय व्यवस्थेचा अपमान आणि गैरवापर केल्याबद्दल उच्च न्यायालय त्या वकीलाविरुद्ध स्वत:हून( सू-मोटो)अवमानाची कारवाई सुरु करु शकते.न्यायालय या संपूर्ण प्रकरणाची पोलीस व वकील यांच्यातील संगनमताची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक(एसआयटी)नेमण्याचे आदेश देखील देऊ शकते.
न्यायालयात आम्ही ही मागणी करणार असल्याचे याप्रसंगी ॲड.सतीश उके यांनी सांगितले.
ॲड.सतीश उके यांनी खैरुननिसा यांचे पती मो.समद यांच्याकडून २००८ साली त्यांच्या मृत्यू पूर्वी मौजा बोखारा,तहसील नागपूर ग्रामीण येथील ५ एकर शेती तसेच मौजा सावनेर येथील पाच एकर शेती विकत घेतली होती.मात्र,मो.जफर व त्याच्या नातेवाईकांनी खोट्या दस्तावेजातून त्या शेतजमीनी स्वत:च्या नावाने केल्या,या विरोधात ॲड.उके यांनी कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.अमितेश कुमार यांनी उके यांच्याशी आपले वैयक्तिक  वैर साधण्यासाठी २०२२ साली मो.जफरचा सहारा घेतला,असे खैरुननिसा यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले.
खैरुननिसा यांच्या प्रतिज्ञापत्रातील काही अंश पुढील प्रमाणे….
भांडारकर वकीलाने फोनवरुन अमितेशकुमार यांच्याशी बोलणे करुन दिले त्यावेळी स्पीकरवर असलेल्या फोनवर अमितेश कुमारने,‘तू खैरुननिशा है,तू वह उके की साथीदार है,तेरे मूंह को जुते से कुचलकर तेरे से जो चाहे कहलवा सकता हूं,तु उके के कारण इसमे फंसी है,तेरे को अगर जफरवाले अजनी पुलीस स्टेशन के एफआयआर में गिरफ्तारी से और चार्जशीटसे बचना है तो तू उके भाईयो के खिलाफ,रेप और धोकाधडी की पुलीस रिर्पोट दे,भांडारकर वकील साहब मेरे खास दोस्त है,वह तुझे उके के खिलाफ रिर्पोट लीखकर देंगे,उस उके वकीलने ज्यादा दिमाग लगाकर मेरे पापा ससूर के खिलाफ केस लढा है,उसके सभी साथीदारो को मै नही छोडूंगा,तूम लोगो का नाम इडी में भिजवा चुका हूं,तू नही मानी तो तुझे और तेरे घरवालो के उपर उके के साथ ‘मकोका’लगा दूंगा,फिर तूम कई साल जेल मे सडना,तुने हिंगणा पूलिस स्टेशन में जफर के खिलाफ दिया हूआ एफआयआर और उसके १६४ के बयाण की फाईल कभी नही मिलेगी,उसे हमने जफर के लिये गायब कर दि है,तू अगर हमारे कहने के मुताबीक चलेंगी तो ही तू और तेरे घरवाले बच पायेंगे,आगे का पुरा तुझे भांडारकर साहब समझा देंगे.’
यानंतर भंडारकर यांनी खैरुननिसा यांना,’तुम्हे अगर गिरफ्तारी से बचना है तो तूम उके भाईयो के खिलाफ पुलीस स्टेशन मे मै लिखकर देता हूं,वो रिर्पोट डालो,यह मामला बहूत बडा है,तुम इससे बच नही पाओगी,ना ही संभल पोओगी,इसमे खुद कमीश्‍नर साहब सब काम कर रहे है,तू अगर नही मानी तो तेरे बच्चो को भी पुलीसवाले और जफर के  गुंडे जान से मार डालेंगे,’असे सांगून अनेक मोठ्या वकीलांची नावे भांडारकर यांनी घेतली.‘वह भी तुझे अंदर डालने के लिये कुछ भी करेंगे,मै तुझे उके के खिलाफ पुलीस रिर्पोट बनाकर देता हूं,तू अजनी पुलीस स्टेशन मे जाकर दे,बागी सब कमीश्‍नर साहब देख लेगेंग.’
याप्रसंगी ॲड.सतीश उके यांनी खैरुननिसाने इंग्रजी व हिंदी मध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्रांची प्रत उपस्थित माध्यमकर्मींना दिली.ज्यावर खैरुननिसा यांची सही व अंगठ्याचा ठसा आहे.
……………………………….

Latest बातम्या