फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजअजित पवारांची अकाली एक्झीट!घड्याळीची टिक टिक थांबली

अजित पवारांची अकाली एक्झीट!घड्याळीची टिक टिक थांबली

महाराष्ट्र सुन्न!

केंद्रिय नागरी व  उड्डाण मंत्रालय व खासगी विमान कंपनीचा कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात
नागपूर,ता.२८ जानेवरी २०२६: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्त व नियोजन,राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचं आज (२८ जानेवरी)रोजी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास दु:खद निधन झाले.मुंबईहून  खासगी विमानाने एक पायलट,एक सहपायलट ,क्रू मेंबर व दोन सहका-यां सोबत बारामतीसाठी सकाळी आठ वाजता अजित पवारांनी उड्ाण भरले,बारामतीच्या विमानतळावर उतरण्या आधी या विमानाने रनवे दिसत नसल्याचे आधी यंत्रणेला (एटीसी) कळवले,त्यांच्या सूचनेनुसार एक गिरकी घेतली कारण पहील्या प्रयत्नात ते सुरक्ष्त लँडिंग करण्यास असमर्थ ठरले होते,यानंतर यंत्रणेने त्यांना पुन्हा एक गिरकी घेऊन उतरण्याची सूचना केली होती,दुस-या प्रयत्नात उतरताना रनवेचा अंदाज न आल्याने रनवेच्या आधीच विमानाचा पुष्ठ भाग जमीनीवर आदळला,क्षणार्धात विमानाने पेट घेतला यानंतर तीन मोठे स्फोट झाले. क्षणार्धात  अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवासी यांच्या देहाचा कोळसा झाला.
सकाळी पावणे नऊ वाजता झालेल्या या भयंकर दूर्घटनेचे वृत्त वा-यासारखे पसरताच अवघा महाराष्ट्र दु:खारिकतेने सुन्न झाला.अजित पवार यांच्या मृत्यूचे वास्तव कोणीही स्वीकारण्यास धजत नव्हते.लाखो महाराष्ट्र प्रेमींना हे वृत्त निराधार असावे असे वाटू लागले,कोणता तरी चमत्कार घडावा व अजित पवार विमानाच्या अवशेषातून सुखरुप सापडावे,या फसव्या आशेकडे देखील अवघा महाराष्ट्र डोळे लावून बसला मात्र,जनतेची ही आशा फोल ठरली,विमान अपघाताचे भयंकर जळालेले अवशेष पाहता पुन्हा एकदा ’पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा’या उक्तीची शाश्‍वत सत्यता पटली.
त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामती मेडीकल कॉलेजबाहेर लाखो समर्थकांची गर्दी उसळली.पत्नी सुनेत्रासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने बारामती गाठली.उद्या सकाळी ११ वा.शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.दरम्यान महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवरी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.देशाचे गृहमंत्री अमित शाह  उद्या ११ वाजता अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.
अजित पवारांचं पार्थिव आज सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्याप्रतिष्ठित विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उसळली होती.सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रा निघेल.गदिमा चौक,विद्यानगरी चौक,विद्याप्रतिष्ठानचा अंतर्गत रस्ता,मराठी शाळेच्या गेटने विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होईल.

नेहमीप्रमाणे अजित पवार यांनी मुंबईत पक्षाच्या मंत्र्यासोबत बैठक घेतली.याप्रसंगी मंत्रालयात त्यांनी वार्षिक अर्थसंकल्पाचा देखील आढावा घेतला.जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये ते सभेसाठी येत होते.वेळेचे धनी अजित पवार यांना सभेसाठी देखील वेळेत पोहोचायचे होते.सुपे जिल्हा परिषद गटासाठीही एक सभा होणार होती.बारामतीमध्ये त्यांच्या चार सभा होत्या मात्र,सभेपर्यंत पोहोचण्या आधीच त्यांच्या ’घड्याळाची टिक टिक ’थांबली!

१९९१ साली शरद पवार यांनी काँग्रेसमधून फारकत घेतल्यानंतर स्वत:चा राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रात स्थापन केला,त्यांच्या पक्षाला निवडणूक अायोगाकडून ’घड्याळ’हे चिन्ह मिळाले.तेव्हापासून आपल्या काकांच्या,शरद पवारांच्या बरोबरीने महाराष्ट्रातील राजकारणात अजित पवार यांनी या घड्याळाची टिक टिक संपूर्ण राज्यात यशस्वीपणे सुरु ठेवली होती.मात्र,आज त्याच हातावरील घड्याळ आणि अंगावरील जॅकेटमुळे त्यांच्या जळालेल्या,भाजलेल्या देहाची ओळख पटली!

अजित पवारांसह मुंबई पीएसओ HC विदीप जाधव,पायलट कॅप्टन सुमित कपूर,कॅप्टन शांभवी पाठक,फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यावेळी अजित पवारांसोबत विमानात होते.मुंबईहून हे विमान सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी निघाले होते.तर.बारामती येथे ८.५० मिनिटांनी पोहोचले.मात्र,लँडिेग करताना धुके असल्यामुळे धावपट्टीचा अंदाज पायलटला न आल्याने दुर्घटना झाल्याचा कयास लावला जात आहे.विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून चौकशी अंती दुर्घटनेचे खरे कारण समोर येईल.
या अपघातानंतर दिल्लीतून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे,उत्तर प्रदेशमधून समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव तसेच प.बंगालमधून ममता बॅनेर्जी यांनी प्रतिक्रिया देत या दूर्घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून दूर्घटनेची चौकशी करण्यात यावी असे सांगून या मागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला मात्र,इतक्या दू:खाच्या वेळीही शरद पवार यांना माध्यमांना यावर प्रतिक्रिया द्यावी लागली.’अजित पवार यांचा अकाली मृत्यू हा प्रचंड मोठा धक्का आहे.एक कर्तृत्वान,निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तिला महाराष्ट्र आज पोरका झाला आहे.जे काही नुकसान झालं ते कधीही भरुन न निघणारे असले तरी सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात.मी आज माध्यमांसमोर येणार नव्हतो मात्र,या अपघातामागे काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कोलकत्त्यामधून मांडली गेली.याच्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे.याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सर्वांना आहे ,याच्यात राजकारण आणू नये,हेच मला सांगायचं आहे,’असे पवार म्हणाले.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने(डीजीसीए)एक निवेदन जारी करुन बारामती येथे झालेल्या विमान अपघातापूर्वी घडलेल्या घटनांचा क्रम स्पष्ट केला.नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार पायलटचा पहिला लँडिंग प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर सकाळी ८.४३ वाजता विमानाला रनवे ११ वर उतरण्याची परवानगी देण्यात आली होती.मात्र,लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतरही पायलटकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.याच्या अवघ्या एक मिनिटानंतर,म्हणजेच सकाळी ८.४४ वाजता,एटीसीला रनवेजवळ आगीच्या ज्वाळा उठताना दिसल्या.
निवेदनात असेही नमूद करण्यात आलं की,संपूर्ण घटनाक्रमात महत्वाची बाब म्हणजे अपघातापूर्वी कोणताही ‘मेडे’कॉल किंवा कोणत्याही प्रकारची आपात्कालीन किंवा संकटाची सूचना एटीसीला देण्यात आली नाही.या अपघाताचा तपास आता नागरी उड्डाण एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो(AAIB)कडे सोपविण्यात आला असल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे.
एटीसीची जबाबदारी सांभाळणा-या अधिका-यांच्या निवेदनानुसार,२८ जानेवारी २०२६ रोजी विमान VI-SSK ने सकाळी ८.१८ वाजता प्रथमच बारामती एटीसीशी संपर्क साधला.यानंतर विमानाने बारामतीपासून ३० नॉटिकल मैल अंतरावर असल्याची माहिती दिली.त्यानंतर विमानाला पुणे अप्रोचमधून रिलीज करण्यात आले.या अहवालानुसार,वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वारा फार नाही आहे व दृष्यमानता ३००० मीटर आहे.त्यानंसार दृश्‍य हवामान परिस्थितीत(व्हिज्यूअल वेदर कंडिशन्स)लँडिंग करण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यानंतर विमानाने रनवे ११ वर अंतिम अप्रोच घेतल्याची माहिती दिली.मात्र,क्रूने रनवे दिसत नसल्याचं सांगितलं.त्यामुळे पहिल्या प्रयत्नात त्यांनी ‘गो-अराउंड’केला.
गो-अराउंड केल्यानंतर विमानाची स्थिती विचारण्यात आली असता,क्रूने पुन्हा रनवे दिसत नाही,दिसताच कळवू’असं सांगितलं.काही सेकंदानंतर क्रूने रनवे दिसू लागल्याची माहिती दिली.यानंतर सकाळी ८.४४ वाजता विमानाला रनवे ११ वर उतरण्याची परवानगी देण्यात आली.मात्र,क्रूकडून लँण्डिंग क्लिअरन्सचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.सकाळी ८.४४ वाजता,एटीसीला रनवे ११ च्या थ्रेशहोल्ड जवळ आगीच्या ज्वाळा दिसून आल्या.त्यानंतर तातडीच्या आपत्कालीन सेवा तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या.कोसळलेल्या विमानाचे अवशेष रनवे ११ च्या थ्रेशहोल्डच्या डाव्या बाजूला आढळून आले.
माहितीनुसार,बारामतीच्या गोजूबावी गावाजवळचा विमानतळ १९९६ पासून वापरात आहे.एमआयडीसीने बांधलेला हा मोठा सुसज्ज विमानतळ नाही,तर याचा वापर लहान विमानांची वाहतूक आणि पायलट्सच्या ट्रेनिंगसाठी केला जातो.ज्या रनवे ११ वर म्हणजे आग्नेय दिशेकडे जाणा-या धावपट्टीवर अजित पवारांचे विमान उरतले होते,तिथे रनवेच्या आधी एक .डिप्रेशन म्हणजे दरीसारखा थोडा खोलगट भाग असल्याचे दिसून पडलं.
अजित पवारांसह पाच जणांचा अत्यंत दूर्देवी बळी ज्या विमानाने घेतला ते विमान लियरजेट-45xR प्रकाराचं होतं.लियरजेट-४५ कुटूंबातली विमानं कॅनेडियन कंपनी बॉम्बार्डिएरनं तयार केली आहेत.जगभरातील अनेक कंपन्या चार्टर फ्लाईटसाठी म्हणजे खासगी प्रवासासाठी ही विमानं वापरतात.मध्यम आकाराचे लियरजेट-४५ विमान बिझनेट जेट म्हणूनही  ओळखले जाते.त्यात दोन हनीवेल  TFE731-20AR/BR टर्बोफॅन इंजिनचा वापर केला जातो.या विमानातून एकावेळी साधारणत आठ प्रवासी प्रवास करु शकतात.
हे विमान एकदा पूर्ण इंधन भरलं तर साधारणत 2.235 नॉटिकल मैलापर्यंत,म्हणजे सुमारे साडेतीन ते चार हजार किलोमीटर रेंजमध्ये जलत प्रवास करु शकतो.छोट्या धावपट्टीवरही उतरण्याची क्षमता असल्यानं भारतात खासगी चार्टर विमानसेवा या विमानाचा प्रामुख्यानं वापर करताना दिसून पडतात.बारामतीत कोसळलेलं विमान नवी दिल्लीस्थित VSR एव्हिएशेन या खासगी एयरलाईनच्या सेवेत होतं.२०१० पासून म्हणजे १६ वर्ष हे विमान VSR एव्हिएशेन एअरलाईनमध्ये कार्यरत होतं.
या आधी २०२३ साली मुंबई विमानतळावर VSR कंपनीच्याच VT-DBL या लिअरजेट 45XR प्रकारच्या विमानाला अपघात झाला होता.१४ सप्टेंबर २०२३ रोजी मुसळधार पाऊस आणि कमी दृष्यमानतामध्ये उतरताना ते विमान रनवेवरुन घसरुन  तुटलं होतं.पण त्यातील आठही प्रवाशांचा जीव वाचवण्यात तेव्हा यश आलं होतं.
देशातील पूर्व वैमिकंानी सोशल मिडीयावर आजच्या अपघातावर तीव्र संताप व्यक्त करीत,जून २०२५ मध्ये झालेल्या अहमदाबाद विमान अपघातातून केंद्रीय नागरी व उड्यण मंत्रालयाने कोणताही बोध न घेल्याचा संताप व्यक्त केला.बारामतीतील विमातळावर कोणतेही ढगाळ वातावारण नव्हते,अश्‍यावेळी पहिला लॅण्डिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटले असून,महाराष्ट्रातील एका व्हीव्हीआयपीचे अश्‍या विमान दूर्घटनेत आज मृत्यू झाल्याची चर्चा सुरु आंतरराष्ट्रीय जगात झाली.याचा अर्थ पहिले लॅण्डिंग अयशस्वी झाल्यानंतर त्यांना गोअराउंडची सूचना मिळाली,पायलटने पुन्हा एक गिरकी घेऊन सूचनेनुसार रनवेवर जाण्याचा प्रयत्न केला मात्र,रनवेवर पोहोचण्या पूर्वीच विमानाचा अपघात झाला याचा सरळ अर्थ विमानातच तांत्रिक बिघाड झाला होता.असे या माजी वैमानिकांचा सरळ आरोप आहे.
अहमदाबाद दूर्घटनेनंतर देखील पावणे तीनशे प्रवाश्‍यांच्या मृत्यू मधून आपण कोणताही सुरक्षेचा बोध घेतला नाही,त्या अपघाताच्या कारणाचा अहवाल देखील देशासमोर आला नाही.अश्‍या दूर्घटनांमधून आपण शिकतो काय?ज्या प्रकारचं कठोर नियंत्रण केंद्राच्या नागरी व उड्डाण मंत्रालयाचे असायला हवे विमानांच्या चाचण्या,मेंटनेंस आणि उड्डाणासाठी क्लिअरेंस इत्यादी बाबीसाठी प्रचंड हलगर्जी दाखवली जात असल्याचा आरोप ते करतात.
दृष्यमानतेसंबंधी बारामतीसारख्या विमानतळावर मोठ्या विमानतळासारख्या सुविधा उपलब्ध नाही.याशिवाय बारामतीची धावपट्टीही  पूर्णत:सपाट नाही आहे.प्रत्येक विमानतळावर थोडी बहूत ग्रेडिएंट असते,कुठलीही धावपट्टी पूर्णपणे सपाट नसते मात्र,बारामतीच्या धावपट्टीच्या मध्यभागी एक इन्वरटेड हम्ससाखं दिसून पडलं.सर्वात म्हत्वाचे म्हणजे हे विमान २०१० साली विकत घेण्यात आलं असून कॅनडाच्या कंपनीने या विमानाची निर्मिती २०१२ साली बंद केली आहे.कुठलीही कंपनी तब्बल १४ वर्ष स्पेअर पार्ट्स द्यायला बांधिल राहीत नाही.या कंपनीने देखील पाच वर्ष या विमानाचे स्पेअर पार्ट्स दिले.ते जगभर कळवतात आम्ही या विमानाची निर्मिती बंद करीत आहोत,मात्र,कालबाह्य झालेल्या अश्‍या विमानांचे उड्डाण भारतात अद्याप सुरु आहे!
याशिवाय या विमानातील एक इंजिन फेल झालं तरी दूस-या इंजिनमुळे धावपट्टीवर यशस्वीरित्या लॅण्डिंग करु शकतो.मात्र,झेब्रा मार्किंगच्या बरेच मागे जरी लॅण्डिंग केलं तरी धावपट्टीवर यशस्वी लॅण्ड करता आलं असतं मात्र,या विमानातच तांत्रिक बिघाड हाेता,याकडे देशातील अनेक माजी वैमिकांनी लक्ष वेधले.
अजित पवारांचं ६७ व्या वर्षी असं अपघातात जाणं महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे.या धक्क्यातून सावरायला संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लागणार असून, त्यांचे कामाप्रतिचे  झपाटलेपण,सामान्य कार्यकर्त्यांमध्ये सहजपणे मिसळणे,मिश्‍किल वृत्ती,द्रष्टपण,संयमीपणा आणि अचूक राजकीय धोरणे यावरही आज दिवसभर विविध वृत्त वाहिन्यांमध्ये चर्चा होती.आपल्या अखेरच्या क्षणी देखील ते सभेसाठीच तातडीने मुंबईवरुन निघाले होते.मात्र,भ्रष्ट मानवी चूकीतून देशाला आणि महाराष्ट्राला आणखी एका अनमोल जीवाला कायमचे गमवावे लागेले.
दिल्ली,मुंबईच्या मोठ्या राजकीय वर्तुळात वावरणारे सुहेल सेठ यांचे आजच्या दूर्घटनेनंतरचे  ट्टीट हे देखील केंद्रीय नागरी व उड्डाण मंत्रलायाच्या भ्रष्ट कारभारावर थेट हल्ला करतो,आज त्यांच्या या ट्टीटची देखील देशात मोठ्या प्रमाणात चर्चा होती.
……………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या