फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजनागपूरमध्ये पेटली 'सत्याची' मशाल

नागपूरमध्ये पेटली ‘सत्याची’ मशाल

Advertisements
(रविवार विशेष)

सोनम वांगचूक यांच्या सूटकेसाठी नागपूरात तरुणाईचा एल्गार
मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित वांगचूक मोदी सरकारच्या लेखी देशद्रोही!
पाकिस्तानला जाणे मोदी सरकारने ठरवली देशद्रोही कृती!
भाजपच्या आयटी सेलकडून विघातक प्रचार सुरु
वांगचूक यांच्या पत्नीची सर्वोच्च न्यालयात धाव:भारतीयांना न्यायाची अपेक्षा
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.४ ऑक्टोबर २०२५: भूमिपुत्रांच्या संरक्षणासाठी विशेष अधिकार देणा-या राज्यघटनेतील सहाव्या परिशिष्टामध्ये लद्दाखचा समावेश करण्याच्या मुद्दावर सामाजिक कार्यकर्ते व सुप्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी गेल्या वर्षी मे २०२४ मध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.लद्दाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा,सहाव्या परिशिष्टामध्ये लद्दाखचा समावेश करण्यात यावा,लद्दाखमध्ये लोकसभेच्या दोन जागा असाव्यात,यासह पर्यावरणाच्या मागण्यांवर वांगचूक यांनी मार्चमध्ये २१ दिवस उपोषण केले होते.त्यांना स्थानिकांकडून मोठा पाठिंबा मिळाला होता.उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांनी धरणे,आंदोलन सुरु केले होते.जून २०२४ मध्ये होणा-या लोकसभा निवडणूकीमुळे त्यांनी मे महिन्यात आंदोलन स्थगित केले होते.लद्दाखला राज्याचा दर्जा देण्याची तसेच घटनात्मक हक्कांच्या संरक्ष्णेची मागणी करीत वांगचूक यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये पुन्हा उपोषणाला सुरवात केली.यांनतर लेह शहरात आंदोलकाचा पोलिसांसोबत संघर्ष झाला,यात चार तरुणांचा दूर्देवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे व्यथित होऊन वांगचूक यांनी आपले उपोषण थांबवले .आपल्या समर्थकांनी हिंसाचाराचा मार्ग पत्करु नये,असे आवाहन त्यांनी केले.मात्र,मागील पाच वर्षांपासून बेरोजगारीचा सामना करीत असलेल्या ‘जेन-झी’चा संताप उफाळून आल्याचे वांगचूक म्हणाले.शांततामय आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा माझा संदेश फोल ठरला,अशी खंत व्यक्त करीत हिंसाचार करण्याचा मूर्खपणा युवकांनी सोडून द्यावा,यामुळे आपल्या उद्देेशाची हानी होत असल्याचे ते म्हणाले,तरी देखील मागील महिन्यात २६ सप्टेंबर २०२५ रोजी वांगचूक यांना लद्दाखचे पोलिस महासंचालक एस.डी.सिंह जामवाल यांच्या नेृत्वाखालील पोलिस पथकाने दुपारी अडीच वाजता अटक केली.त्यांना लद्दाखच्या बाहेर नेण्यात आले असल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले.त्यांच्या विरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत(एनएसए)कारवाई करण्यात आली.मोदी सरकारच्या या कृतीचा भारतभर निषेध सुरु आहे.

नागपूरात देखील आज लद्दाख विद्यार्थी संघ व वांगचूक समर्थकांतर्फे विशाल ‘मशाल’मोर्चा काढण्यात आला.झांशी राणी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन हा मोर्चा संविधान चौकात पोहोचला.संपूर्ण रॅलीत वांगचूक यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.संविधान चौकात वांगचूक यांच्या न्यायासाठी हिंदू,मुस्लिम,सिख,ईसाई,जैन व बौद्ध धर्मिय समर्थकांनी प्रार्थना केली.एखाद्या मुद्दाशी मोदी सरकार सहमत असो किंवा नसो मात्र,याचा हा अर्थ होत नाही सरकारशी सहमत नसणा-यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करुन तुरुंगात डांबावे,अशी तीव्र प्रतिक्रिया ज्येष्ठ महिला नागरिकाने माध्यम प्रतिनिधिंना दिली.

२४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये आंदोलन करणा-या जमावाने पोलिस अधिका-यांवर दगडफेक केली व एक वाहन पेटवून दिले असा ठपका आंदोलकांवर ठेवण्यात आला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधारेचा मारा आणि लाठीमार केला.या संघर्षात चार तरुणांचा मृत्यू झाला तर ७० च्या वर तरुण जखमी झाले.लेह शहरात न्याय मागणीसाठी सकाळीच हजारो तरुणांनी मोर्चा काढला होता.केंद्र सरकारसोबत ६ ऑक्टोबर रोजी चर्चा होणार होती.१० सप्टेंबर पासून वांगचूक हे उपोषणाला बसले होते.३५ दिवसांच्या उपोषणात सहभागी असलेले लेह शिखर मंडळाच्या(एलएबी)१५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या विरोधात एलएबीच्या काही युवकांनी लेहमध्ये ‘बंद’चे आवाहन केले होते.याच दरम्यान काही युवकांनी लेहमधील भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला.
आंदोलकांच्या मागण्यांबाबत गृह मंत्रालय आणि लद्दाखचे प्रतिनिधी एलएबी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्समध्ये ६ ऑक्टोबर रोजी चर्चा होणार होती.या दाेन्ही संघटनांच्या गेल्या चार वर्षांपासून केंद्र सरकारसोबत अनेक चर्चेच्या फे-या देखील झाल्या.यानंतर सुमारे चार महिने केंद्राने कोणतीही चर्चा या संघटनांसोबत केली नाही.या नंतर वांगचूक यांनी या मुद्दयांवर पुन्हा उपोषण सुरु केले.
राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये प्रशासन,राष्ट्रपती आणि राज्यपालांचे अधिकार,स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार,पर्यायी न्यायिक यंत्रणा,स्वायत्त परिषदांद्वारे वापरल्या जाणा-या आर्थिक अधिकारांच्या बाबतीत विशेष तरतुदी आहेत.ही अनुसूची त्रिपुरा,मेघालय,मिझोरम, आणि आसाम या ईशान्यकडील चार राज्यांमधील आदिवासी लोकसंख्येसाठी आहे,त्यात लद्दाखचा समावेश करण्याची मागणी वांगचूक यांची आहे.
लद्दाखचा सहाव्या परिशिष्टात समावेश करावा आणि पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा(जम्मू-काश्‍मीरमधील कलम ३७१ व ३५ ए हटवल्यानंतर लद्दाख केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला आहे)ही लद्दाखची मागणी पूर्णपणे न्याय असून तेथे निर्माण झालेली समस्या भाजपप्रणित असल्याची टिका काँग्रेसने केली आहे.लद्दाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर चार तरुणांचा दूर्देवी मृत्यू याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही काँग्रेसने केली.
या आंदोलनानंतर केंद्र सरकाने लद्दाखमधील शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरण चळवळीचे जनक सोनम वांगचूक यांनी स्थापन केलेल्या दोन संस्थांविरोधात ‘विदेशी निधी(नियमन)कायद्यांतर्गत(एफसीआर) सूडाची कारवाई केली.या कायद्याच्या कथित उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला. तसेच केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय)न्यायालयाच्या भाषेत‘पिंजरातला पोपट’या संस्थांची चौकशी केली व तातडीने वांगचूक यांच्या ‘स्टूडण्ट्स एज्युकेशन अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लद्दाख(एसईसीएओएल)या संस्थेचा एफसीआरए परवाना रद्द केला!वांगचूक यांच्या या संस्थेच्या व्यवहारात सीबीआयला अनेक कथित गैरव्यवहार आढळले!तसेच स्वीडनमधूनही काही निधी या संस्थेच्या खात्यात जमा करण्यात आला जो राष्ट्रविरोधील कृत्यांसाठी असल्याचे निर्दशनास आल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने वांगचूक यांच्या संस्थांचा परवाना तातडीने रद्द करण्याचे आदेश दिले.
सीबीआयचे एक पथक दहा दिवसांपूर्वीच एक आदेश घेऊन आले होते जे ‘हिमालय इन्सिटट्यूट ऑफ आल्टरनेटिव्हज् लद्दाख’(एचआयएएल)या शिक्षण संस्थेच्या कथित ‘एफसीआरए’उल्लंघनाबाबत गृह मंत्रालयाच्या तक्रारीवरुन कारवाई करीत असल्याचे वांगचूक यांनी सांगितले होते.
सर्वात दूर्देवी मृत्यू ठरला तो कारगिल युद्धात तीन महिने शत्रूंशी लढणा-या देशभक्त जवान थारचिन यांचा पोलिसांच्या लाठीमारात झालेला मृत्यू.कारगिल युद्धात माझा मुलगा दाह टॉप व लोलोसिंग येथे पाकिस्तानी सैन्याशी लढला.पाकिस्तानी त्याला मारु शकले नाही मात्र….आपल्याच पोलिसांनी त्याचा जीव घेतला!अशी उद्धिग्नता थारचिन यांचे वडील स्टॅनझिन नामग्याल यांनी माध्यमांकडे व्यक्त केली….!नामग्याल हे स्वत: कारगिलवीर असून २००२ मध्ये सुभेदार मेजर आणि मानद कॅप्टन पदावरुन निवृत्त झाले आहेत…!
वांगचूक यांचे ‘पाकिस्तान कनेक्शन’ देखील तपासण्यात आल्याचे पोलिस महासंचालकाने २७ नोव्हेंबर रोजी वांगचूक यांच्या अटकेनंतर माध्यमांना सांगितले.गेल्या महिन्यात एक पाकिस्तानी गुप्तहेर याला अटक करण्यात आली असून त्याने वांगचूक यांच्या आंदाेलनाच्या चित्रफिती पाकिस्तानात पाठवल्या असल्याचे सांगून या पार्श्वभूमीवर वांगचूक यांची चौकशी सुरु असल्याचे पोलिस महासंचालक जामवाल यांनी सांगितले.
वांगचूक यांची माहिती व पूर्वइतिहास ‘युट्यूब’वर उपलब्ध  असल्याचे सांगून त्यांच्या भाषणाने लोकांना भडकविण्याचे काम केले आहे.त्यात त्यांनी ‘अरब स्प्रिंग‘,नेपळा,बांगलादेश,आणि श्रीलंकेतील अस्थिरतेचा उल्लेख केला आहे.त्यांचा अंतस्थ छूपा हेतू होता.परदेशी निधी,परदेशी योगदान निधी नियामक कायद्याचे उल्लंघन याची देखील चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.वांगचूक यांच्या काही परदेश दौ-यांचा संदर्भ देऊन ते संशयास्पद असल्याचे सांगत वांगचूक पाकिस्तानातील ‘द डॉन‘वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी बांग्लादेशालाही भेट दिली असल्याचे पोलिस महासंचालकांनी सांगितले.
लद्दाखसाठी अंतिम श्‍वासापर्यंत लढू,असा निर्धार वांगचूक यांनी ३० जानेवरी २०२३ रोजीच केला होता.वांगचूक हे लद्दाखमधील १८ हजार फूट उंचावरील खार्दूंगला येथे उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात २६ जानेवारीपासून उपोषणाला बसले होते.अभिनेता आमिर खान यांनी ‘थ्री इडियट्स’चित्रपटात साकारलेली ‘रँचो’ ची भूमिका सोनम वांगचूक यांच्यापासूनच प्रेरित होती,हे विशेष.वांगचूक यांन २०२३ मध्ये ‘क्लायमेट फास्ट’ या नावाने हे उपोषण सुरु केले हाेते.लद्दाखला सहाव्या परिशिष्टात समाविष्ट करावे.केंद्र शासित प्रदेश झाल्यानंतर लद्दाखमध्ये नियोजनशून्य व धोकदायक खाणकाम रोखण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली होती.२१ दिवसांनंतर त्यांनी उपोषण सोडले होते.२१ दिवसत त्यांनी फक्त उणे ४० अंश तापमानात मीठ आणि पाणी याचे सेवन केले होते.
१ ऑक्टोबर २०२३ रोजी वांगचूक यांनी त्यांच्या सहका-यांसह दिल्ली येथील पोलिस ठाण्यातच  उपोषण सुरु केले.राजधानीत आंदोलनासाठी येत असताना वांगचूक यांना पोलिसांनी सिंधू सीमेवर अडवले.यानंतर त्यांच्यासह समर्थकांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नेण्यात आले.यानंतर दिल्लीतील बवाना पोलिस ठाण्यातच वांगचूक यांनी उपोषणाला सुरवात केली.काँग्रेस व केजरीवालांच्या आप पक्षाने केंद्र सरकारवर त्यावेळी खरपूस टिका केली होती.वांगचूक आणि त्यांचे सहकारी शांततामय मार्गाने आंदोलन करण्यासाठी दिल्लीत येत होते मात्र, त्यांना अडवण्यात आले.मोदी सरकारने उचललेले पाऊस अस्वीकारार्ह्य असून लद्दाखच्या भविष्यासाठी पुढाकार घेतलेल्या ज्येष्ठ लोकांना कशासाठी ताब्यात घेतले जात आहे?शेतक-यांसाठी रचण्यात आलेल्या चक्रव्यूहाप्रमाणे हा चक्रव्यहू देखील तुटेल आणि त्यासोबत मोदीजी तुमचा अहंकार सुद्धा तुटेल.तुम्हाला लद्दाखचा आवाज ऐकावाच लागेल.असे काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी एक्सवर ट्वीट केले.लद्दाखचे नागरिक लोकशाही मार्गाने त्यांचा अधिकार मागत आहेत,त्यात गैर काय आहे?असा सवाल केजरीवाल यांनी केला.दिल्ली कोणाच्या बापाच्या मालकीची नाही अशी जहाल टिका करीत केजरीवाल यांनी दिल्ली ही देशाची राजधानी असून या राज्यात येण्याचा प्रत्येक भारतीयाला अधिकार असल्याचे ठणकावले.कोणत्याही शस्त्रांशिवाय राजधानीत येणा-यांची सत्ताधा-यांना भीती का वाटते?वांगचूक यांना शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पाठींंबा जाहीर केला आहेत.वांगचूक यांना असंवैधानिक व बेकायदेशीरपणे पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचा आरोप त्यांनी केला.मुख्यमंत्री आतिशी यांना देखील पोलिसांनी वांगचूक यांची भेट घेण्यापासून रोखले….!
वांगचूक यांच्यासह १२० समर्थकांना दिल्ली पोलिसांनी स्थानबद्ध केल्याविरुद्ध सर्वोच्च न्यालयात याचिका दाखल झाली.यांनतर वांगचूक व त्यांच्या सहका-यांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती महान्यायअभिकर्ता(सॉलिसिटर जनरल)तुषार मेहता यांनी न्यायालयात दिली.तसेच दिल्लीच्या विविध भागात लागू केलेली जमावबंदी व आंदोलनावरील निर्बंध देखील मागे घेण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयाला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सांगितले.वांगचूक यांच्या आंदोलनाला दडपण्याची कृती ही दिल्लीश्‍वरांकडून सातत्याने सुरु होती मात्र, सर्व हद्द सोडून वांगचूक यांच्यावर देशद्रेहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकासाच्या नावावर जल,जंगल,जमीन या सर्वांवर मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर गंभीर परिणाम होत आहेत.सोनम वांगचूक यांनी लद्दाखची मूळ संस्कृती व पर्यावरण वाचवण्यासाठी आंदोलन सुरु केले.विकासाच्या नावावर नागपूरचे ही पर्यावरण पार बिघडवण्यात आले असून भारताचे शिर्षस्थान लद्दाख वाचेल तर नागपूरही वाचेल असा सूर नागपूरच्या पर्यावरणवाद्यांनी ७ एप्रिल २०२४ रोजी वांगचूक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ लावला होता.रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी नागपूरकर पर्यावरणवाद्यांनी ‘पश्‍मिना मार्च’चे आयोजन केले होते.धरमपेठ येथील बोले पेट्रोल पंपजवळील आचार्य विनोबा भावे सर्वोदय आश्रमात शहरातील सर्व पर्यावरणवादी एकत्रित आले होते.अंबाझरी,फूटाळा व अजनीची घातक विकास कथा मोठ्या स्क्रीनवर दखवित अंबाझरीची जैवविविधता कश्‍याप्रकारे  कायमची नष्ट केली जात आहे,हे दोखवून नागपूर शहर कश्‍याप्रकारे सिमेंटीकरणाच्या खाली गुदमरत आहे,यावर चर्चा पार पडली.
हिमालयातून दोनशे नद्यांचा उगम आहे.यात लद्दाखचाही समावेश आहे.नद्यांचे जलचक्र बिघडले तर नद्यांद्वारे आपल्या घरापर्यंत येणा-या पाण्याचेही चक्र बिघडणार.वसुंधरेवर घाला घातल्यास एक दिवस डायनोसोरप्रमाणेच माणसाचे अस्तित्वच पृथ्वीवरुन नष्ट होणार.ही भविष्याची चिंता मांडण्यात आली.पर्यावरण क्षेत्रात काम करणारी स्प्रिंग मीडीया ही तरुणांची एक संस्था आहे.या कार्यक्रमात तरुणांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने व्हिडीयो तयार करुन विकासाच्या नावावर नागपूर शहरातचा जो विनाश चालला आहे,त्यावर वास्तविकता मांडली.
आज पुन्हा एकदा तीच नागपूरकर तरुणाई वांगचूक यांच्या अटकेनंतर रस्त्यावर उतरली व मशाल मोर्चाद्वारे आपले समर्थन वांगचूक यांच्या मागे असल्याचे स्पष्ट केले.वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली ॲग्मो यांनी देखील ‘रासुका’खालील वांगचूक यांची अटक याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहेत.या याचिकेवर उद्या ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.लद्दाखमध्ये हिंसाचार वाढू नये म्हणून सोनम यांनी उपोषण सोडले होते आणि हिंसा व संघर्षाचा निषेध केला होता.न्याय मिळण्यासाठी कायदेशीर मार्गाचा ते अवलंब करीत होते.वांगचूक यांच्या अटकेचा आदेश अद्याप देखील मिळाला नसू,न त्याबात कोणतेही लेखी निवेदन पोलिस महासंचालक देत नसल्याचे गीतांजली यांनी याचिकेत नमूद केले आहे….!
(बातमीशी संबंधित सर्व व्हिडीयोज Sattadheesh Official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या