जन्मदात्यांना संभोग करताना बघताना मजा येईल…तुम्ही पण जॉईन होणार का?
अन्….युवा पिढी जोरदार हसली!
यूट्यूबर व सोशल मिडीया इन्फ्लुएंसर रणवीर अलाहबादीया संपूर्ण भारतात ट्रोल
नागपूर,ता.१० फेब्रुवरी २०२५:‘बेशर्मो की जमात ने की गंदी बात’हा ट्रेंड आज संपूर्ण भारतात बघायला मिळाला.पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते ज्या यूट्यूबर व इन्फ्लुएंसर रणवीर अलाहबादीया याला देशाच्या ‘यूथ आयकॉनच्या ’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याने या शो मध्ये इतके घाणेरडे विधान केले की त्याला वाईट विधान या ऐवजी अतिशय घाणेरडे विधान असेच म्हणावे लागेल.
याच शो मध्ये त्याच जमातीचे आशिष चंचलानी,जसप्रीत सिंग,अपूर्व मखीजा आणि समय रैना देखील या अश्लील हास्य विनोदात रंगले होते.या विरोधात आता असामच्या गुवाहटीमध्ये एफआयआर नोंदवण्यात आली आहे.त्याच्या विरोधात अनेक ठिकाणी एफआयआर नोंद होण्याची देखील शक्यता आहे.
या शो मध्ये या ३१ वर्षीय पॉडकास्ट करणारा व यूट्यूटबर,सोशल मिडीया इन्फुएंसरने
हास्य विनोद चालत असताना ,आपल्या आई-वडीलांच्या संदर्भात अतिशय घाणेरडी टिपण्णी केली.आपल्या आई-वडीलांना संभोग करताना बघताना मजा येईल,इतकंच नव्हे तर तुम्ही पण जॉईन होऊ शकता,असे अशलाघ्य विधान त्याने केले.त्याच्या या विधानामुळे मंचावरील सहभागी तर हसलेच मात्र उपस्थित युवा पिढी हे देखील त्यात सहभागी झाले.

(छायाचित्र: हाच तो शो आणि हेच ते विधान!सोबत मंचावर र्निल्लज युवा पिढी…!)
या शो मध्ये कायम अतिशय अश्लील हास्य विनोद होत असतात. आई-वडीलांवरुन शिव्या,शरीरातील खासगी अंगावर सातत्याने बोलणे,एक दुस-याला त्या खासगी अंगाच्या नावाने संबोधित करने,अशा या शो मध्ये हा युट्यूबर आज सहभागी झाला होता.या यूट्यूबर चे
५९ लाख इन्साटाग्राम व यूट्यूटबवर १०५ कोटी व एक्सवर ६ लाखांपेक्षा जास्त सब्सक्राईबर्स आहेत.त्याचे १२ विविध सोशल मिडीया चॅनल्सवर ६ अब्जांपेक्षा जास्त Views आहेत.रणवीर अलाहबादिया नावाचे त्याचे यूट्यूब चॅनल तरुणाईच्या सर्वाधिक पसंदीचे चॅनल असून ,’दूसरो को शिक्षीत करने व प्रेरित करने के जुनून के साथ ‘डिजिटल माध्यमात आलो असल्याचा दावा तो करतो.मी माझे करियर… ज्ञान आणि प्रेरणेचा प्रसार करण्यासाठी समर्पित केल्याचे ताे सांगतो.
मात्र,आजच्या त्याच्या अतिशय घाणेरड्या विधानाने तो कोणत्या पद्धतीचे ज्ञान व शिक्षणाचा प्रसार करतोय व युवा पिढीला प्रेरित करतोय,हे जगाला कळले.लैंगिकतेच्या बाबतीत अतिशय मोकळे असणा-या पाश्चात्य देशात देखील आपल्या आई-वडीलांविषयी असे बोलले जात नाही,एखाद्या अट्टल दारुडा देखील असे बोल बोलणार नाही मात्र,पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सन्मानित झालेल्या या यूट्यूबरचे हे बोल, संपूर्ण भारतीय समाजाची मान शरमेने खाली घालणारी आहे.त्याने आपल्या चॅनलमध्ये तो हिंदू असून त्याला हिंदू असल्याचा गर्व आहे असे लिहले आहे,हिंदू धर्माचा सातत्याने अध्यन त्याच्या जिवनाचा अविभाज़्य अंग असल्याचे तो त्याच्या अधिकृत चॅनलवर नमूद करतो.
मात्र,ज्या सनातन हिंदू धर्माचा आधार घेऊन भाजपसारखा पक्ष हा देशाच्या सत्तेवर आला त्या पक्षाचे मंत्री व स्वत:पंतप्रधान यांना तरी रणवीर अलाहबादिया याची मते पटली का?हे त्यांनी उघडपणे सांगण्याची मागणी आता सोशल मिडीया वर जोर धरत आहे. नसल्यास रणवीर अलाहबादिया याला तातडीने तुरुंगात टाकण्याचे व देशाचा यूथ आयकॉनचा पुरस्कार हिसकावून घेण्याची मागणी केली जात आहे.
हिंदू धर्मात लग्न हा एक ‘संस्कार’ मानला जातो, यूट्यूबवरील पैसा कमावण्याचा ‘व्यापार’ समजला जात नाही. त्या संस्कारातून जन्माला येणारी अपत्ये ही देवाची रुपे मानली जातात.अर्थात रणवीर याच्या पालकांनाही आता ट्रोल केले जात आहे.आपल्या दिवट्या पुत्रावर संस्कार घडविण्यात ते कुठे कमी पडलेत?की कोट्यावधीच्या कमाईच्या लोभात ते देखील आपल्या दिवट्याच्या आचरट-विचरट विचारात तितकेच सहभागी आहेत?त्यांचा स्वत:चा मुलगा खुल्या मंचावर त्यांच्या सेक्सविषयी असे विधान करतो याचा अर्थ त्यांच्या घरात,विचारांचा(अविचारांचा)इतका खुलेपणा रणवीर याने अनुभवला आहे का?ज्यामुळेच त्याची मजल हे बोलण्यासाठी झाली?याचे उत्तर रणवीर सोबतच त्याच्या पालकांनाही देणे बंधनकारक आहे कारण त्यांचा दिवटा हा देशाचा ‘यूथ आयकॉन’आहे.

(छायाचित्र : डिजिटल गोल्डन पुरस्कार,संस्काराचे काय?)
त्याच्या या विधानाने देशात माजलेली खळबळ बघून रणवीर याने माफी मागितली आहे मात्र,त्याची माफी ही पुरेसी नाही.फ्रेम ऑफ माईंड था,असे तो सांगतो.मात्र,स्लिप ऑफ माईंड होता की कमर्शियल लोभ होता?असा सवाल केला जात आहे.हाच मोदी यांच्या ‘इंडियाज गॉट टेलेंट’चा परिणाम आहे.पैशांसाठी ही पिढी आपल्या जन्मदात्यांच्या अंतरंग क्षणाचाही व्यापार आणि बाजार करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही,असा संताप व्यक्त होतोय.त्यांच्या खासगी अंतरगं क्षणांना रणवीर व मंचावर बसलेले व त्या शोमध्ये उपस्थित असलेली तरुण पिढी शब्द देऊ शकतात,संवाद देऊ शकतात,चित्रबद्ध करु शकतात,ते काहीही करु शकतात,असा संताप आता देशातील बुद्धीजीवी व्यक्त करतात.
–
(छायाचित्र : चेह-याचा रंग उडाला,माफीनामा पुरेसा नाही)
२०१५ पासून यूट्यूबरवर आपल्या शरीर षोष्ठवाचे प्रदर्शन करणारे भाग त्याने सुरु केले होते.‘मोंक एंटरटेनमेंट‘च्या माध्यमातून तो युवांना प्रेरित करण्याचे काम करीत होता.तो नैराश्यचा बळी झाला होता मात्र,त्यातून बाहेर निघत या अभियंता तरुणाने युवा पिढीचे फिटनेस,पुरुषांमधील फॅशन,ग्रुमिंग इत्यादी वर लक्ष केंद्रित केले.बघता बघता कोट्यावधी फॉलोअर्स त्याच्यासोबत जुळले.त्याचा जन्म २ जून १९९३ रोजी मुंबईत एका सुशिक्षित कुटूंबात झाला.त्यांचे वडील गौतम अलाहबादीया स्वत: एक डॉक्टर आहेत.आई स्वाती अलाहबादीया या देखील स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. अतिशय लठ्ठ असल्याने वय वर्षे १६ पर्यंत रणवीर याने अनेक शस्त्रक्रिया करुन घेतल्या व यातूनच फिटनेसविषयी तो जागरुक झाला.
या यूट्यूबरने केंद्रिय मंत्री नितीन गडकरी,माजी मंत्री स्मृति इराणी,वाणिज्य मंत्री पियुष गोयल,सुब्रम्हण्यम स्वामी, यांच्यासह भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांना आपल्या पॉडकास्टमध्ये मुलाखतीसाठी आणले आहे.भारतातील मोठमोठ्या व प्रतिष्ठित पत्रकारांना ज्या केंद्रिय मंत्र्यांच्या मुलाखतीसाठी तारखा मिळत नाही त्यांना या यूट्यूबरने कोणत्याही संकोचाशिवाय पॉडकास्टमध्ये आणले.अर्थात यासाठी या मंत्र्यांनी पैसे ही मोजल्याची चर्चा आहे! ‘द रणवीर शो’या पॉडकास्टमध्ये अध्यात्मिक गुरु यांच्यापासून तर प्रियंका चोपडा,अभिषेक बच्चन,बॉडीबिल्डिंगचे दिग्गज अर्नोल्ड श्र्वार्जनेगर आदी यांचा देखील मुलाखती घेतल्या.२०२० मध्ये रणवीर याचा हा शो सर्वोच्च पॉडकास्ट स्थानावर होता.
आजचे त्याचे विधान हे देखील या शो ची प्रसिद्धी वाढवून पैसा कमावण्यासाठीच होते असा आरोप होत आहे.मात्र,असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या अकरा वर्षांची एकंदरीत कार्यशैली बघता ते यावर काही कृती करतील,अशी आशा नाही.सुवर्ण पदके जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावणा-या महिला कुश्तीपटू यांनी केलेल्या गंभीर लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर देखील मोदी यांनी भाजप खासदार बृजशरण सिंग याची हकालपट्टी कुस्तीसंघाच्या अध्यक्ष पदावरुन केली नव्हती,तो अनुभव बघता त्यांच्या हस्ते पुरस्कृत झालेल्या रणवीर याचा ‘यूथ आयकॉनचा ’पुरस्कार परत घेतला जाईल किवा त्याला जबर शिक्षा होईल,अशी काेणतीही आशा भारताची जनता करीत नाही कारण हा भाजप आता तो भाजप राहीला नाही,असे डिजिटल माध्यमावर देशातील बुद्धीवंत सांगतात आहेत.
आज संसदेत जे घडले त्याचाही उल्लेख करीत,आज संसदेत एका खासदाराने विचारले,पेरिस से भी ज्यादा महंगे तिकीट हो गये प्रयागराज के,ये लृट है, ही सनातनी धर्माची थट्टा आहे,यावर राज्यभेचे उपसभापती व उपराष्ट्रपती जयदीप धनखड म्हणाले की, अरे भाई सनातनी हो अपने धर्म के लिये कुछ पचना सिखो!कहर तर तेव्हा झाला जेव्हा हवाई वाहतूक मंत्रीच म्हणाले ‘आपको खुश होना चाहीये के अपना प्रयागराज पॅरिस से भी बडा हो गया’इतक्या गंभीर प्रश्नावर देशाचा उपराष्ट्रपती व केंद्रीय मंत्री अशी टिपण्णी करीत असतील तर या देशाचे मोदी काळात तरी काहीही होऊ शकत नाही,असे सांगून आता पालकांनाच, या डिजिटल माध्यमाच्या युगात आपापल्या पाल्यांचा बचाव करण्याची दुहेरी कसरत करावी लागणार असल्याचा इशारा प्रज्ञावंत देतात.
……………………………….