फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजनागपूर विद्यापीठ झाले पैशे कमवण्याचे कुरण!

नागपूर विद्यापीठ झाले पैशे कमवण्याचे कुरण!

Advertisements

प्राध्यापिका डॉ.सोनू जेसवानी यांचे गंभीर आरोप
माजी महापौर व शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉ.कल्पना पांडेंच्या कार्यशैलीचे काढले वाभाडे
गडकरींकडे ही सुनावाई नाहीच:न्यायालयात जाण्याचा गडकरींनी दिला सल्ला
भाजप व गडकरींच्या नावावार कल्पना पांडेंचा गैरव्यवहार
कल्पना पांडेंना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली होती अटक:कारवाई थंडबस्त्यात!
माझी शैक्षणिक कारर्कीद संपवली:न्याय देण्याची जेसवानी यांची मागणी
नागपूर,ता.१६ ऑगस्ट २०२४: कोणतेही संवैधानिक पद नसताना विद्यापीठाच्या प्राध्यापक नियुक्तीच्या समितीत अवैधरित्या घूसखोरी करीत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयात कोट्यावधीची माया जमवून प्राध्यापकांच्या नियुक्तया करण्याचा गोरखधंदा ,माजी महापौर व शिक्षण मंचाच्या अध्यक्षा,भारतीय जनता पक्षाच्या नेत्या डॉ.कल्पना पांडे करीत असल्याचा गंभीर आरोप, गेल्या वीस वर्षांपासून व्हीएमव्ही महाविद्यालयाच्या हिंदीच्या शिक्ष्िा असलेल्या डॉ.सोनू जेसवानी यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
याप्रसंगी बोलताना,डॉ.जेसवानी म्हणाल्या की डॉ.पांडे यांनी विद्यापीठातील पवित्र शैक्षणिक वातवारण पूर्णत:भ्रष्टाचाराच्या अड्ड्यात पैसे कमविण्यासाठी परिवर्तित केले.विद्यापीठ सारखे ठिकाण अनैतिक मार्गाने पैसे कमावण्यासाठीचे दूकान बनवले.केवळ प्राध्यपकांच्या नियुक्तीतच भ्रष्ट मार्गाने कल्पना पांडे यांनी अमाप पैसा कमावला नाही तर,गरीब,गरजू विद्यार्थ्यांचे पीएच.डी चे ऑनलाईन अहवाल थांबवणे,प्राध्यापकांवर धाक दपटशाही करणे,त्यांना भाजप व गडकरींचा रोब दाखवून ब्लॅकमेल करने,कंत्राटी प्राध्यपकांच्या पगारातून दहा-वीस टक्के रक्कम कापून स्वत:चा खिसा भरणे,अनुभवाचा प्राधान्यक्रम नाकारुन कनिष्ठ तसेच मर्जीतील प्राध्यापकांना कॉलेज ऑडिट समितीत पाठवणे इत्यादी सर्वप्रकारच्या गैरकृत्यात डॉ.कल्पना पांडे सहभागी असल्याचा गंभीर आरोप डॉ.जेसवानी यांनी केला.
निलंबित कुलगुरु डॉ.सुभाष चौधरी हे डोळे मिटून कल्पना पांडे यांच्या प्रत्येक अनाधिकृत व अन्यायकारक कृत्याचे पालन करीत होते,डॉ.धवनकर व मनोज पांडे प्रकरणाचे अहवाल उघडकीस आल्यावर डॉ.पांडे यांचे संपूर्ण काळे-कृत्य जगा समोर येईल,असा दावा जेसवानी यांनी केला.मात्र,गेल्या अनेक वर्षांपासून हे अहवाल दाबून ठेवण्यात आले असल्याचे त्या म्हणाल्या.
भाजपच्या वरीष्ठ नेत्यांच्या नावावर कल्पना पांडे यांनी अक्षरश:गुंडगिरी केली व कोट्यावधीचा मलीदा भ्रष्ट मार्गाने लाटला.इतकंच नव्हे तर कल्पना पांडे यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात प्राध्यपकांना प्रत्येकी ५ ते ७ लाख रुपयांची मागणी केली.माझी परिस्थिती नसल्याने मी केवळ ‘शुभआर्शिवादपर‘ एक लाख रुपये पाकिटात घालून दिले.यावर चिडून अवघ्या पंधरा दिवसात कल्पना पांडे यांनी हिंदी विषयाची गाईडशिप माझ्याकडून कटकारस्थान करुन,कुलगुरु सुभाष चौधरी यांना हाताशी धरुन काढून घेतली.इतकंच नव्हे तर विद्यापीठातून हिंदी पीएच.डी संबंधित आरएसी समितीच्या सदस्यत्वातून,विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाच्या सदस्यत्वातून,विद्यापीठाच्या वाणिज्य भाषा अभ्यास मंडळाच्या सदस्यत्वातून ,विद्यापीठ वार्षिक पुस्तक निर्णय समितीच्या सदस्यत्वातूनही मला काढून टाकण्यात आले.

माझ्या मार्गदर्शनात दोन मुली या आचार्य(पीएच.डी)पदवीसाठी संशोधन करीत होत्या,त्यांची देखील कल्पना पांडे यांनी ‘कुख्यात’मनोज पांडे यांना हाताशी धरुन छळवणूक केल्याचा गंभीर आरोप या प्रसंगी जेसवानी यांनी केला.केवळ माझ्या मार्गदर्शनात त्या मुली संशोधन करीत असल्यामुळे तासनतास त्यांना उभे ठेवण्यात येत होते.मनोज पांडे यांनी तर त्या दोन्ही गरीब मुलींकडून,यातील एक अकोला मधून येत होती तर एक विद्यार्थिनी दिव्यांग होती,पहले ७००-७०० रुपये व यानंतर ५००-५०० रुपयांची लाच घेतली असल्याचा आरोप केला.ज्या विभाग प्रमुखांना आधीच लाखो रुपयांचा पगार आहे,ते गरीब विद्यार्थ्यांकडूनही लाच घेतात,याहून दूसरी शरमेची बाब नाही,अशी खंत डॉ.जेसवानी यांनी व्यक्त केली.मनोज पांडे यांच्या या छळवणूकीच्या विरोधात माझ्या विद्यार्थिंनींनी विद्यापीठासमोर आंदोलन केले,याचा राग धरत कल्पना पांडे या माझ्या व्हीएमव्ही महाविद्यालयात आल्या व मी वर्ग घेत असताना देखील कक्षात येऊन मला बाहेर चलण्यास दरडावू लागल्या.मी त्यांना वर्ग संपल्यानंतर येते असे सांगितले असता,माझे  दोन्ही हात धरुन मला बाहेर ओढले.मला धक्काबुक्की केली.माझ्या विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले की,ही बाई नालायक आहे!माझ्यासोबत बसून पुस्तके लिहली,ही आज जी काही आहे ती माझ्यामुळे,असे शब्द कल्पना पांडे यांनी वापरले.मी कल्पना पांडेंसोबत वाजिण्य भाग-१ आणि भाग-२ चे तसेच विज्ञान विषयाचे पुस्तक संयुक्तरित्या लिहले मात्र,मी कल्पना पांडे यांच्या कितीतरी आधीपासून अध्यापनाचे कार्य करीत असल्याचे जेसवानी यांनी सांगितले.
सुप्रसिद्ध कवी डॉ.सागर खादीवाला यांची ‘देशभक्ती की स्याही’या कवितेचा समावेश मी हिंदीच्या पाठ्यक्रमात केला होता.ती देशभक्तीपर कविताच कल्पना पांडे यांनी माझ्यावर नको,नको ते आरोप करुन,कटकारस्थान करुन काढून टाकली.याउपरही सागर खादीवाला यांच्यासोबत अनेक वेळा त्या अनेक कार्यक्रमात मंचावर दिसत राहील्या.त्यांची कविता पाठ्यक्रमातून काढण्यासाठी कल्पना पांडे यांनी सागर खादीवाला यांच्याकडे मला दोषी ठरवले.माझ्याकडे मात्र,सत्य मांडण्याचा कोणताही पुरावा नव्हता.पुण्याचे दामोदर खडसे,सुनील देवधर तसेच अन्य एका प्राध्यपकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींच्या शोध प्रबंधांच्या सिनॉप्सिस मध्ये दोन-तीन वेळा सुधार करुन विद्यापीठात सादर केल्यानंतर देखील, हिंदीचे विभागप्रमुख मनोज पांडे यांनी विद्यार्थिनींला खूप त्रास दिला,एवढंच नव्हे तर ज्या नामवंत साहित्यकांवर व व्यक्तीमत्वांवर ते शोध प्रबंध लिहत होते,त्या महान विभूतींवर देखील अशोभनीय अश्‍या कोटी केल्याचा आरोप याप्रसंगी डॉ.जेसवानी यांनी केला.मनाेज पांडे,कुलगुरु सुभाष चौधरी या सर्वांना हाताशी धरुन कल्पना पांडे यांनी माझे शैक्षणिक करिअर संपवले तरी देखील परवा टिळक पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेऊन मलाच,या बाईला भर चौकात नागडं करुन चपलांनी मारलं पाहिजे,अशी भाषा कल्पना पांडे यांनी माझ्यासाठी वापरली!(हे सांगताना,जेसवानी यांना रडू कोसळले).
पीएच.डी च्या विद्यार्थिंनीचा छळ यावर माजी न्यायमूर्ती मीरां खड्डककार यांच्या मार्गदर्शनात चौकशी समिती बसवण्यात आली.त्या समितीचा अहवाल आजपर्यंत पटलावर ठेवण्यात आला नाही.इतकंच नव्हे तर माहितीच्या अधिकारात देखील तो देण्यात आला नाही.यानंतर अत्राम समिती नेमण्यात आली,मनोज पांडे यांच्यावर दोषी असल्याचा ठपका त्यांच्या अहवालात ठेवण्यात आला,तो अहवाल देखील कुलगुरुंनी दाबून ठेवला.बावीस्कर समितीचा अहवाल देखील असाच दाबून ठेवण्यात आला होता मात्र,पश्‍चिम महराष्ट्रातून तो फूटला.त्या अहवालात विभाग प्रमुख म्हणून मनोज पांडे यांना दोषी ठरवण्यात आले आहे.अकोला येथील विद्यार्थिनीच्या छळवादातुळे तिची कितीदा तरी ट्रेन सुटून जात होती,दिव्यांग विद्यार्थिंनीला किती तरी तास मनोज पांडे यांनी उभे ठेवले असल्याचा गंभीर आरोप याप्रसंगी डॉ.जेसवानी यांनी केला.
त्याच अमानवीय आणि संवेदनाशून्य,भ्रष्ट मनोज पांडेंचा सत्कार कल्पना पांडे यांनी सिंधी भाषा प्रचार-प्रसारच्या मंचावर केला.कुख्यात मनोज पांडे यांच्यावर विद्यार्थिंनींसमोर अश्‍लील आक्षेपार्ह्य हावभाव करण्याचे आरोप देखील झाले असल्याचे जेसवानी यांनी सांगितले.
याशिवाय मुरलीधर चांगदेकर यांचा देखील कल्पना पांडे यांच्या संपूर्ण भ्रष्ट कृत्यात बरोबरीचा सहभाग असल्याचा आरोप जेसवानी यांनी केला.चांगदेकर यांच्या विरोधातील माझी तक्रार,ती देखील अशीच दाबली गेली.माझ्या घरातील वीज रात्री अडीच वाजता अनेक तासांसाठी गेली होती,त्यावेळी मी आणि माझे कुटुंबिय हे फार घाबरले होते.आम्ही शेजा-यांकडे खरंच वीज गेली आहे का?याची मध्यरात्री चौकशी केली,इतकी दहशत आम्हाला कल्पना पांडे यांची वाटत होती.भाजप व गडकरींच्या नावावर कल्पना पांडे या नागपूरातील संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राला आपल्या तालावर नाचवित असल्याचा गंभीर आरोप जेसवानी यांनी केला.कल्पना पांडे यांनी कटकारस्थान करुन बोर्ड ऑफ लँग्वेज,बोर्ड ऑफ ह्यूमेनिटीच्या गाईडशिपमधूनही मला काढून टाकले.इतकंच नव्हे तर मला नोकरीवरुन निलंबित करण्यास संस्था संचालकांना भाग पाडले व माझ्यावर एक कोटी रुपयांचा दावा त्यांनी ठोकला आहे.
या विरोधात मी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसुनावणीच्या वेळी दाद मागितली.यावर त्यांनी मला या प्रकरणात ते काहीच करु शकत नसल्याचे सांगून, न्यायालयात दाद मागण्यास सांगितले!वीस वर्षे प्राध्यापिका म्हणून इमाने-इतबारे मी अध्यापनाचे काम केले मात्र कल्पना पांडे यांनी माझी संपूर्ण शैक्षणिक कारर्कीद संपवून टाकली.या विरोधात पोलिस ठाण्यात केलेली तक्रार देखील पोलिसांनी भाजपच्या प्रभावाखाली दाबून टाकली,असा आरोप जेसवानी यांनी केला.

विद्यापीठाची ऑडिट कमेटी,महाविद्यालयांचे इन्सपेक्शन समितीत २०-२० वर्ष नोकरीत असण्या-या प्राध्यापकांना स्थान नसून कल्पना पांडे यांच्या मर्जीतील अनअनुभवी प्राध्यापकांचा भरणा असल्याचा आरोप त्यांनी केला.लिफाफे घ्यायाला मात्र कल्पना पांडे जात असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला.कल्पना पांडे यांच्या या संपूर्ण कारभारावर सिनेटच्या बैठकीत सिनेट सदस्य बाजपेयी यांनी आवाज उठवला.त्याला विष्णु चांगदे यांनी अनुमोदन दिले.शिवाणी दाणी,सिनेटचे राज्यपाल नियुक्त सदस्य आ.प्रवीण दटके यांनी कुलगुरु सुभाष चौधरींच्या विरोधात न्यायाचा लढा दिला असल्याचे जेसवानी यांनी सांगितले.विधान परिषदेत दटके यांनी रातुम विद्यापीठात चालत असलेला संपूर्ण गैरकारभार सभागृहासमोर मांडला व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी राज्यपालांकडे पाठपुरावा केला.यामुळे डॉ.चौधरी यांना निलंबित करण्यात आले,ही घटना कल्पना पांडे यांचे आर्थिक नुकसान करणारी बाब असल्यामुळेच, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉ.चौधरी यांच्यावर अन्याय झाल्याची मखलाशी केली,असे जेसवानी म्हणाल्या.

ज्या सेवाभावी प्रेरणास्त्रोत दत्ताजी डिडोळकर यांनी शिक्षण मंच या संघटनेची स्थापना केली,विद्यार्थ्यांचे हित व विद्यापीठाचे नावलौकिक याला मोलाचा हातभार लावला त्या शिक्षण मंचाचे, आता कल्पना पांडे सारख्या अतिशय भ्रष्ट महिलेने अध्यक्ष पद बळकावून आपल्या पदाचा भरपूर गैरफायदा घेत भरपूर माया जमवली.त्यांच्याकडे कोणतेही संवैधानिक पद नाही तरी देखील कल्पना पांडे यांची तानाशाही नागपूरातील शैक्षणिक क्षेत्रात ‘कुप्रसिद्ध ’असल्याचे जेसवानी यांनी सांगितले.आर्थिक लृटमारीसोबतच माझ्या चारित्र्यावर देखील पुणे विद्यापीठाच्या संसदेपर्यंत जाऊन कल्पना पांडे यांनी शितोंडे उडवले असल्याचा आरोप जेसवानी यांनी केला.जे आधी माझ्या लढाईत न्यायाचा साथ देत होते त्यांना प्रलोभन देऊन कल्पना पांडे यांनी माझ्यापासून दूर केले.ज्या विद्यार्थिनींनी मनोज पांडे यांच्या विरोधात विद्यापीठाकडे तक्रारी केल्या,त्या सर्व विद्यार्थिनींच्या घरी जाऊन मनोज पांडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासोबतच,मनोज पांडे हे चांगले असल्याचे पत्र विद्यार्थिनींकडून लिहून घेण्यासाठी कल्पना पांडे यांनी पुढाकार घेतला,याला काय म्हणावे?असा प्रश्‍न त्यांनी केला.,
आमच्या व्हीएमव्ही महाविद्यालयातून याच कल्पना पांडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी यांनी कल्पना पांडे यांना अटक केली होती,त्या प्रकरणाचे काय झाले?असा सवाल जेसवानी यांनी केला.आता कल्पना पांडे यांच्या डोक्यावर देखील तुरुंगात जाण्याची टांगती तलवार असल्या कारणाने भाजपचे नेते,कार्यकर्ते व सिनेटचे सदस्य यांच्यावर त्या बिनबुडाचे आरोप करीत असल्याचे जेसवानी म्हणाल्या.

विद्यापीठाच्या भ्रष्ट कारभारावर प्रसार-प्रचार माध्यमात सातत्याने वृत्त प्रसारित होत असतात,आता जेसवानी करीत असल्याचा आरोपाप्रमाणेच, विद्यापीठाचे उप-कुलगुरु दुधे यांच्या कन्येला मोहता सायंसमध्ये प्राध्यापिकेची नोकरी मिळाली असून,ज्या गाईडच्या मार्गदर्शनात दुधे यांच्या मुलीने पीएच.डी केली तेच गाईड प्राध्यापक निवड समितीत होते,याचा अर्थ एका योग्य उमेदवाराचा हक्क मारला गेला आहे का?असा प्रश्‍न केला असता,या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे जेसवानी म्हणाल्या.श्री निकेतन कॉलेजमध्ये प्लेसमेंट कमेटीमध्ये माझे नाव होते मात्र,कल्पना पांडे यांनी त्यांच्या तानाशाही वृत्तीतून नियुक्त होणा-या प्राध्यापकाला धमकी देत,मी जर समितीत असेल तर त्यांची नियुक्ती होणार नाही,असे सांगितले.परिणामी,त्या कॉलेजच्या प्राचार्यने मला विनंती केल्याने मी नियुक्ती समितीत हजर राहीली नाही,मला कोणाच्याही शैक्षणिक कारर्कीदीचे नुकसान करायचे नव्हते.मात्र,प्र-कुलगुरुंच्या मुलीच्या नियुक्तीच्या वेळी तिच्याच गाईडची उपस्थिती ही नियमात बसत नाही,हा योग्य उमेदवारांवर झालेला अन्याय असून या विराेधात आवाज उठवला गेला पाहिजे,असे उत्तर त्यांनी दिले.
सत्य व मानवतेला सर्वोच्च मानून कल्पना पांडे यांच्यावर संबंधित विभागांनी कठोर कारवाई करण्याची मागणी याप्रसंगी डॉ.जेसवानी यांनी केली.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या